EID-E-MILAD-UN NABI: या मुस्लिम देशांमध्ये साजरा होत नाही ईद-ए-मिलाद, कारण काय?

आज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ईद मिलादचा जुलूस काढण्यात येणार आहे. इस्लामिक कॅलेंडरनुसार, ‘ईद-मिलाद-उन-नबी’ हा दिवस पैगंबर मुहम्मद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. मुस्लिम बांधव हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करतात. या दिवशी ते जुलूस या कार्यक्रमाचे आयोजन करतात. सोमवारी ईद मिलादची शासकीय सुट्टी रद्द करून बुधवारी १८ सप्टेंबर रोजी देण्यात आली आहे.

मंगळवार १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी हा हिंदू सण असल्याने दोन्ही समाजामध्ये शांतता व सामाजिक सलोखा कायम राहण्याच्या हेतूने यावर्षी मुंबई शहर, मुंबई उपनगर व इतर काही जिल्ह्यांमध्ये मुस्लिम धर्मियांनी बुधवार १८ सप्टेंबरला जुलूस काढण्याचा निर्णय घेतला होता. म्हणूनच या सुट्टीत मध्ये बदल करण्यात आला. या बदलानुसार आज हा सण साजरा होईल. दरम्यान महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये उत्साहात साजरा केला जाणारा हा सण काही मुस्लिम देशांमध्ये साजरा केला जात नाही.

जगभरातील अनेक मुस्लिम देशांमध्ये ‘ईद-ए-मिलाद-उन-नबी’ हा सण साजरा होतो. याच दिवशी पैगंबर मुहम्मद यांचा जन्म झाला होता. अनेक हिंदू सणांप्रमाणेच हा सणही मुस्लिम बांधव अतिशय जल्लोषात साजरा करतात. यावेळी ते त्यांची घरे सजवतात, जुलूस काढतात. मात्र तुम्हाला हे जाणून नवल वाटेल की असेही काही मुस्लिम देश आहेत जिथे हा सण साजरा केला जात नाही. असे मानले जाते की पैगंबर मुहम्मद यांनी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात यावा असे सांगितल्याचा कोणताही उल्लेख कुराणमध्ये आढळत नाही. त्यांनी स्वतः असे केले नाही आणि इतर कोणालाही असे करण्यासही सांगितले नाही. त्यामुळे आपणही असे करू नये असे अनेकांचे मत आहे.

बायकोला दिवसातून 100 वेळा करायचा फोन; नवऱ्याला पोलिसांनी केली अटक

एकीकडे जगभरातील मुस्लिम पैगंबर मुहम्मद यांचा जन्मदिवस ‘ईद-ए-मिलाद-उन-नबी’ मोठ्या थाटामाटात साजरा करतात, तर दुसरीकडे सौदी अरेबिया आणि कतारसारखे काही मुस्लिम देश त्यांच्या विचारसरणीमुळे या प्रथेला विरोध करतात. त्यांचा असा विश्वास आहे की पैगंबरांनी हा दिवस साजरा केल्याची कोणतीही नोंद नाही.

पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या जन्मासंदर्भात हदीसच्या सहा प्रसिद्ध पुस्तकांमध्ये उल्लेख नाही. एकमेव कथेनुसार, पैगंबर मुहम्मद यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला हे माहीत आहे, परंतु तारखेबद्दल स्पष्टपणे काहीही सांगता येत नाही. अबू कतादाच्या म्हणण्यानुसार, एक बेदुइन पैगंबरांकडे आला आणि त्यांना सोमवारी उपवास करण्याबद्दल विचारले. त्यावर पैगंबर म्हणाले, “हा तो दिवस आहे ज्या दिवशी माझा जन्म झाला.”

2024-09-18T03:33:48Z dg43tfdfdgfd