GUTKHA SEIZE : उटगीत 73 लाखांचा गुटखा जप्त; चालकास अटक

जत/सांगली : पुढारी वृत्तसेवा

जत तालुक्यातील अंकलगी ते उटगी रस्त्यावर पोलिसांनी ट्रकसह 73 लाख 60 हजार 820 रुपयांचा गुटखा व मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी ट्रकचालक रवी अर्जुन होळकर (वय 34, रा. कासरूडी यवत, ता. दौंड, जि. पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे.

रत्नागिरी : निवळीत 8 लाखांचा गुटखा जप्त

याबाबत अधिक माहिती अशी, पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथक नियुक्त करून गुटखा विक्री व वाहतूक करणार्‍यांवर कारवाई करण्याची सूचना केली होती. उपनिरीक्षक पाटील यांचे पथक शुक्रवारी सकाळी जत तालुक्यात पेट्रोलिंग करीत होते. अंकलगी ते उटगी रस्त्यावर पेट्रोलिंग करत असताना एक ट्रक (केए 29, ए. 2588) भरधाव वेगाने निघून गेला. पोलिस पथकाला संशयाने ट्रकला अडवून चालक रवी होळकर याच्याकडे चौकशी केली. ट्रकमधील मालाविषयी चौकशी करता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

मध्यरात्रीपर्यंत गुटखा, माव्याची बिनधास्त विक्री

एलसीबीच्या पथकाने उमदी पोलिस ठाण्यात आणला. तेथे पंचासमक्ष झडती घेतली असता ट्रकमध्ये 100 पोती गुटखा मिळून आला. त्याची किंमत 63 लाख 60 हजार आहे. पथकाने दहा लाखाचा ट्रकही जप्त केला. पथकाने गुटख्याचे नमुने रासायनिक तपासणीसाठी घेतले आहेत. संशयित रवी होळकर यांच्या विरोधात उमदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, उपनिरीक्षक कुमार पाटील, उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे, सागर लवटे, दरिबा बंडगर, अमर नरळे, प्रकाश पाटील, सुशांत चिले, आप्पासाहेब हाक्के, संतोष माने, आप्पासाहेब घोडके यांच्या पथकाने केली.

Nashik Crime | अंबडला बारा लाखांचा गुटखा जप्त, दोघांना अटक

पुण्यातील विक्रेत्याचे नाव निष्पन्न

संशयित रवी होळकर याने हा गुटखा विजापूर येथून आणला होता. पुण्याकडे घेऊन चालला होता. पुणे येथील मॉन्टी उर्फ दर्शन तुरेकर (रा. हडपसर, पुणे) याच्या सांगण्यावरून गुटखा आणल्याची कबुली होळकर याने दिली आहे. प्राथमिक तपासात तुरेकर यांचे नाव निष्पन्न झाले आहे.

2024-07-27T00:24:37Z dg43tfdfdgfd