IAS POOJA KHEDKAR : IAS पूजा खेडकर प्रकरणी एबीपी माझाने पोलखोल करताच पिंपरी पालिका रूग्णालयाच्या डीनची आयुक्तांकडून चौकशी सुरू

IAS Pooja Khedkar : राज्यभरात सध्या चर्चेत आलेली वादग्रस्त ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकरला (IAS Pooja Khedkar) दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र देणारे डॉक्टर अडचणीत आले आहेत.दिव्यांग प्रमाणपत्राबाबत आता वायसीएम रूग्णालयात चौकशी सुरू करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड पालिका रूग्णालयाचे डीन डॉ. राजेश वाबळे चौकशीच्या रडारवर आले आहेत. डॉ. राजेश वाबळे यांच्या सहीने पूजा खेडकला 7 टक्के अधुपणा असल्याचं प्रमाणपत्र देण्यात आलं त्यामुळे डॉ. राजेश वाबळे चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. त्याचबरोबर डॉ. राजेश वाबळे यांनी पूजा खेडकरला दिलेल्या प्रमाणपत्राचा वापर दिव्यांग कोट्यातून परिक्षा देण्यासाठी केला असल्याचं मान्य केलं आहे. 

IAS पूजा खेडकरचे (IAS Pooja Khedkar) अपंगत्वाचे प्रमाणपत्र खोटं आहे का? यावर शिक्कामोर्तब करणारी कागदपत्रे एबीपी माझाने समोर आणली. त्यानंतर पिंपरी पालिकेचे आयुक्त शेखर सिंह खडबडून जागे झालेत. आयुक्तांनी वैद्यकीय विभागाच्या सगळ्या प्रमुखांना चौकशीसाठी बोलावून घेतलं आहे. यात वायसीएमचे अधिष्ठाता राजेश वाबळे, ऑर्थोपेडिक प्रमुख, फिजिओथेरपीच्या प्रमुखांसह ज्यांचा ज्यांचा पूजा खेडकरांशी संबंध आला त्या सर्वांची ते चौकशी होत आहे.

याबाबतीत एबीपी माझाशी बोलताना डॉ. राजेश वाबळे म्हणाले, पूजा खेडकरने दिलेल्या प्रमाणपत्रामध्ये 40 टक्के दिव्यांग असल्याचं लिहण्यात आलेलं आहे. त्यांंना आम्ही प्रमाणपत्रामध्ये जी टक्केवारी लिहण्यात आलेली ती 7 टक्के इतकी होती. कोणत्याही गोष्टीसाठी लागणारे दिव्यांग प्रमाणपत्रासाठी 40 टक्के दिव्यांगपणा लागतो. पूजा खेडकरला अहमदनगरच्या रूग्णालयातून ते प्रमाणपत्र 2021 साली मिळालेलं होतं. मात्र, तरीदेखील पूजा खेडकरने पुण्यातील रूग्णालयात अर्ज केला. त्यानंतर पुण्यातील रूग्णालयातून 7 टक्के दिव्यांगपणा असल्याचं प्रमाणपत्र दिल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. 

आयएएस अधिकारी पूजा खेडकरला पिंपरीतील वाय.सी.एम रुग्णालयाने सात टक्के दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र दिलं होतं. यानंतर वायसीएम रुग्णालयावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. त्यानंतर आता आयुक्तांनी वैद्यकीय विभागाच्या सगळ्या प्रमुखांना चौकशीसाठी बोलावून घेतलं आहे. 

दोन दिव्यांग प्रमाणपत्र एकत्र करून नवीन प्रमाणपत्र मिळवल्याचं समोर 

पूजा खेडकर यांनी अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून सुरूवातीला दोन दिव्यांग प्रमाणपत्र काढली होती. नंतर त्या दोन्ही अपंग प्रमाणपत्रांचे एकत्रिकरण करून एकच प्रमाणपत्र देण्यात आलं असून त्यामध्ये पूजा खेडकर या 51 टक्के अपंग असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून पूजा खेडकर यांना दोन प्रमाणपत्र देण्यात आले होते. नंतर ते दोन्ही प्रमाणपत्रं एकत्र करून एकच दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आले होते. 2018 साली जिल्हा रुग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय मंडळाने दिलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रात खेडकर यांना 40 टक्के दिव्यांग तर 2021 साली मानसिक आजाराच्या प्रमाणपत्रात 20 टक्के दिव्यांग असल्याच प्रमाणपत्रात नमूद असल्याचे डॉ. संजय घोगरे यांनी सांगितले आहे. 

दरम्यान, पुन्हा मार्च 2021 मध्ये ही दोन्ही प्रमाणपत्रं एकत्र करून देण्यात आली होती. दोन्ही प्रमाणपत्राची बेरीज जरी 60 टक्के होतं असली तरी सॉफ्टवेअरने ऑटो जनरेटर करून 51 टक्के दिव्यांगत्व असल्याचं प्रमाणपत्र देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय घोगरे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. 

संबधित बातम्या: IAS Pooja Khedkar : पूजा खेडकर 51 टक्के दिव्यांग, दोन दिव्यांग प्रमाणपत्र एकत्र करून नवीन प्रमाणपत्र मिळवल्याचं समोर 

2024-07-26T09:44:21Z dg43tfdfdgfd