INDIAN RAILWAYS: भारतातील पहिली इलेक्ट्रिक ट्रेन किती साली धावली होती माहितीये? कसा घडला इतिहास....

Indian Railways: भारतीय रेल्वेचा इतिहास हा खूप जूना आणि अलौकिक आहे. जेव्हा पहिल्यांदा रेल्वे ही रूळावर धावली होती. तेव्हा रेल्वेला पाहून लोकं घाबरायचे असे अनेक संदर्भ आपल्याला आढळतात. आता जवळपास एका शतकानंतर रेल्वेनं प्रवास करणं हे फारच कूल झाले असून आता भारतीय रेल्वेचाही प्रचंड कायापालट झाला आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेची चांगलीच चर्चा होताना दिसते. आता भारतात लवकरच बुलेट ट्रेनही दाखल होईल. आता सर्वच काही विजेतवर चालते पुर्वी डिझेलवर रेल्वे धावायची. परंतु तुम्ही कधी हा विचार केला आहे की पहिली भारतात धावलेली इलेक्ट्रिक ट्रेन कोणती होती? आणि ती किती साली सर्वात पहिल्यांदा धावली होती? या लेखातून आपण या ट्रेनचा रंजक इतिहास जाणून घेणार आहोत.

समोर आलेल्या माहितीनुसार असे कळते की, भारतात पहिली इलेक्ट्रिक ट्रेन ही 1925 मध्ये आली होती. जेव्हा ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेने बॉम्बे व्हिक्टोरिया टर्मिनस, ठाणे या भागात इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह आणले होते, तेव्हा भारतीय रेल्वे वाहतुकीच्या एका नव्या युगाची सरूवात झाली होती; हे नक्की! त्यानंतर विद्युतीकरणाचे अनेक प्रत्येक पुढील अनेक वर्षे हाती घेण्यात आले होते. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांत इलेक्ट्रिकल रेल्वेचे जाळे हे झपाट्याने विस्तारते आहे.

दक्षिण पूर्व रेल्वेच्या चक्रधरपूर विभागात राजखरस्वान-डांगोआपोसीमध्ये 9 डिसेंबर 1959 साली 25 kV AC या नव्या प्रणालीचा परिचय भारतीयांना झाला होता. या भारतीय रेल्वेच्या उत्क्रांतीच म्हत्त्वाचा पाया होय. 1990 पर्यंत दिल्ली-हावडा किंवा दिल्ली-मुंबई सारख्या कॉरिडॉर ट्रेन्सही आल्या. प्रवासाचा वेळ कमी झाला आणि प्रवासी आरामात ट्रेनने प्रवास करू लागले.

भारतातील पहिली इलेक्ट्रिक ट्रेन ही बॉम्बे व्हिटी (आत्ताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई) आणि कुर्ला हार्बर दरम्यान 3 फेब्रुवारी 1925 रोजी धावली होती. ट्रेनमध्ये 1500 व्होल्ट डीसी (डायरेक्ट करंट) असे विद्युतीकरण करण्यात आले होते. लेस्ली विल्सन, कॅमेल लेयर्ड आण उर्डिंगेन वॅगनफॅब्रिक यांनी ध्वजांकित करत या ट्रेनसाठी लोकोमोटिव्ह तयार केले.

नंतर 5 जानेवारी 1928 रोजी पश्चिम रेल्वेच्या कुर्ला आणि बोरिवली दरम्यान आणि 15 नोव्हेंबर 1931 रोजी दक्षिण रेल्वेच्या मद्रास बीच आणि तांबरम दरम्यान 1500 व्होल्ट डीसी ट्रॅक्शन सुरू करण्यात आले होते. स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान 1958 मध्ये पूर्व रेल्वेच्या हावडा-बर्दवान विभागाचे 3000 V DC वर विद्युतीकरण पूर्ण करण्यात आले आहे. तेव्हापासून आतापर्यंत भारतीय रेल्वेचा मोठा कायापालट झाला आहे.

2024-04-19T13:40:20Z dg43tfdfdgfd