JALGAON GANESH VISARJAN | जळगाव जिल्ह्यातील गणेश विसर्जनाची तयारी पूर्ण

जळगाव : जिल्ह्यात श्री गणेशाचे आगमन जोरदार झाले होते. त्याच जोरदार पद्धतीने विसर्जनही होणार आहे. यासाठी प्रशासनाने (दि. 17 ) होणाऱ्या गणेश विसर्जनासाठी संपूर्ण तयारी पूर्ण केले आहे. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. कुठेही अनुचित घटना घडू नये यासाठी शहरात व तालुक्यांमध्ये सीसीटीव्ही उभारण्यात आले आहे व मिरवणुकीच्या मुख्यमार्गांवर सुद्धा या तिसऱ्या डोळ्याची नजर असणार आहे.

मंगळवार दि. 17 रोजी श्री गणेशाला निरोप द्यावा लागणार आहे. यासाठी प्रशासनाकडून संपूर्ण तयारी पूर्ण झालेली आहे. जळगाव शहरात सकाळी दहा वाजेला मुख्य मानाच्या गणपतीची आरती कोर्ट चौकात झाल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. तर भुसावळ येथे मुख्य मिरवणुकीत नरसिंह मंदिराजवळ आरती होऊन मुख्य मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. रावेर या ठिकाणीही पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त लावलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून मुख्य मिरवणुकीला प्रारंभ होईल.

जळगाव शहरात 83 कॅमेरे लावण्यात आले आहेत तर रावेर या ठिकाणी मुख्य मिरवणुकीच्या मार्गात व तसेच संवेदनशील भागात आधीपासूनच कॅमेरे लागलेले आहेत. त्याचप्रमाणे भुसावळ येथील जामा मशिद या परिसरात नगरपालिकेच्या वतीने कॅमेरे लावण्यात आले आहेत. जळगाव येथील मेहरून तलावावर होणारे विसर्जनासाठी 100 जीवन रक्षक, दहा तराफे, दोन बोटी, पंधरा पट्टीचे पोहणारे तर भुसावळ येथे जवळपास 100 पट्टीचे पोहणारे दोन्ही बाजूला बोट आपदा मित्र तसेच नदीवर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.

काही अप्रिय घटना होऊ नये म्हणून भुसावळ नगरपालिका श्री गणेशाचे विसर्जन आपल्या कर्मचाऱ्यांकडून करीत असते.

निर्माल्याचे संकलन करण्यासाठी जळगाव येथे सहा ठिकाणी निर्माल्य जमा करण्याची व्यवस्था करण्यात आली तर भुसावळ येथे तापी नदीच्या काठावर निर्माल्य जमा करण्याची व्यवस्था झालेली आहे . मिरवणूकीवर लक्ष ठेवण्यासाठी जळगाव शहरात त्या ठिकाणी मचान उभारण्यात येणार आहे. यासह स्थानिक पोलिसांच्या बंदोबस्त यांच्यासह क्यू आर टी, आरसीपी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी हे मुख्यतः संवेदनशील भागात याचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

2024-09-16T10:21:13Z dg43tfdfdgfd