JAMMU KASHMIR : हवाई दलाच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवादी हल्ला, हाय अलर्ट जारी

Terrorists attack on Indian air force Convoy : जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात सुरक्षा दलावर दहशतवादी हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. भारतीय हवाई दलाच्या वाहन ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला असून सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली आहे. जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात शनिवारी दहशतवाद्यांनी भारतीय वायु सेना (आयएएफ) च्या एक वाहनावर तसेच सुरक्षा दलांच्या ताफ्यांवर अंधाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात पाच सुरक्षा जवान जखमी झाले आहेत. 

एका बसमधून हवाई दलाचे जवान जात होते. तेव्हा हा हल्ला झाला आहे. देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच हा हल्ला झाल्याने देशातील सुरक्षा यंत्रणांकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला असून कडक बंदोबस्त तैनात केला आहे. सीमारेषेवरील पोलीस व सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद्यांची शोधमोहीम सुरू केली आहे. स्थानिक राष्ट्रीय रायफल्स युनिटने परिसराला घेराव घालून शोधमोहीम सुरू केली आहे. 

हल्ल्यानंतर वाहने हवाई तळाची वाहने शाहसीतारजवळील भागात सुरक्षित करण्यात आली आहेत. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात लष्कराचे काही जवान जखमी झाले आहेत. 

हा हल्ला पुंछमधील सुरणकोट गावात झाला. या घटनेत हवाई दलाचे पाच जवान जखमी झाले आहेत. गोळीबाराची माहिती मिळताच लष्कर आणि पोलिसांचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. परिसराची नाकाबंदी करण्यात आली आहे. दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या जखमी जवानांना पुढील उपचारासाठी पंजाबमधील उधमपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. 

2024-05-04T15:29:52Z dg43tfdfdgfd