LAVASA LAND SLIDE : दोन दिवस उलटूनही लवासात एनडीआरएफचे शोधकार्य सुरूच! दोन आलीशान बंगल्यांवर कोसळली दरड; चौघे बेपत्ता

Lavasa land slide : पुण्यातील लवासा येथे गुरुवारी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे येथे मोठी दरड कोसळली असून यासह येथील डोंगरावर असलेले दोन आलीशान बंगले देखील ढासळले आहेत. या घटनेत चौघे जण बेपत्ता झाले आहेत. एनडीआरएफचे जवान शोधकार्य करत असून आज या घटनेला दोन दिवस उलटूनही कुणाचा शोध लागलेला नाही.

पुण्यात बुधवारी आणि गुरुवारी अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. पुणे जिल्ह्यातील खेड, मुळशी, आंबेगाव, जुन्नर, भोर, वेल्हा या तालुक्यात पावसामुळे सर्वाधिक नुकसान झाले. पुणे जिल्ह्यातील लेक सीटी असणाऱ्या लवासा येथे देखील अतिवृष्टी झाली. या पावसामुळे येथे दरड कोसळली असून या दरडी सोबत उंचावर असणारे दोन आलीशान बंगले देखील खाली कोसळले आहेत. या बंगल्यात चार जण राहत असल्याची माहिती आहे. हे चौघे देखील बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जात आहे.

या घटनेची माहिती मिळताच, अग्निशामक दल आणि एनडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले असून दोन दिवसांनपासून सोध कार्य सुरू आहे. मात्र, अद्याप ढीगाऱ्या खाली दाबलेल्यांचा शोध लागलेला नाही. ही बचाव मोहीम सुरूच आहे.

एनडीआरएफच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी जोरदार पावसामुळे डोंगराचा कडा खाली कोसळला. ही दरड येथील दोन बंगल्यावर पडली. त्यामुळे हे दोन्ही बंगले, ढीगाऱ्या खाली दबले गेले. या बंगल्यात चौघे जण राहत होते. ते या खाली दबले गेल्याची शक्यता आहे. शोध कार्य सरू असून अद्याप त्यांचा सोध लागलेला नाही.

Kokan Railway : कोकणवासीयांसाठी खुशखबर! गणेशोत्सवासाठी आणखी ६ विशेष रेल्वे गाड्या; उद्यापासून आरक्षणास सुरुवात

पुण्यात घाट विभागात जोरदार पाऊस

पुण्यात पाऊस ओसरला असला तरी घाट विभागात जोरदार पाऊस सुरू आहे. लवासा परिसर हा डोंगराळ भागात आहे. येथे ही लेकसीटी उभारण्यात आली आहे. डोंगर माथ्यावर अनेक आलीशान बंगले या ठिकाणी बांधण्यात आले आहेत. दरम्यान, आज देखील हवामान विभागाने पावसाचा ऑरेंज अलर्ट पुण्यात दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच नदीपत्रापासून लांब राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

Trending News: चोरी करण्यासाठी हॉटेलमध्ये शिरला, काहीच मिळालं नाही; जाताना मालकासाठी टेबलावर ठेवली २० रुपयांची नोट

2024-07-27T05:32:57Z dg43tfdfdgfd