LEOPARD ATTACK : पालेबारसा गावात बिबट्याचा बापलेकावर हल्ला

चंद्रपूर ; पुढारी वृत्तसेवा

जंगलालगतच्या गावांमध्ये वाघ आणि बिबट्यांनी चांगलाच धुडगूस सुरू केला आहे. थेट गावात पाळीव जनावरांची शिकार करण्याकरीता येणाऱ्या बिबट्यांच्या हल्यात नागरिकांचे कुठे जीव जात आहेत. तर कुठे जखमी व्हावे लागत आहे. आज (शनिवार) दुपारच्या सुमारास सावली तालुक्यातील पालेबारसा गावात शिरलेल्या बिबट्याने बाप लेकाला जखमी केल्याची घटना घडली. दोघांवरही उपचार करण्यात येत आहेत. (Leopard attack)

'लाडकी बहिण' याेजनेला अर्थ खात्‍याचा विरोध? अजित पवारांनी केला मोठा खुलासा

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज चंद्रपुरात ऑरेंज अलर्ट आहे. संततधार पाऊस सुरू आहे. याच पावसात सावली तालुक्यातील पालेबारसा गावात दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास बिबट पाळीव जनावरांची शिकार करण्याच्या उद्देशाने माधव मेश्राम यांच्या घरी शिरला. घरी त्यांचे दोन छोटी नातवंडे हे जेवन करीत होते. यावेळी त्‍यांना बिबट दिसल्याने त्यांनी प्रचंड आरडाओरड केली. त्यामुळे मेश्राम व शेजारी नेताजी कावळे हे हातात दंडक घेऊन हाकण्यासाठी गेले.(Leopard attack)

Maharashtra Rain Updates Live : राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर कायम

घरा शेजारी बिबट्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करीत असतानाच बिबट्यांने नेताजी कावळे यांच्यावर हल्ला केला. वडिलांवर बिबट हल्ला करीत असल्याचे पाहून मुलगा धावून आला. बिबट्याने पहिला वडिलांवर त्यानंतर मुलगा लेंसवर हल्ला केला. त्यानंतर बिबट्याने जंगालच्या दिशेने धूम ठोकली. सदर घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. घटनास्थळी वनपरिक्षेत्राधिकारी धुर्वे, वनाधिकारी पवनरकर, गोडसेलवार, धनविजय, आदे, चुदरी यांचा ताफा आला.(Leopard attack)

विवाहित व्‍यक्‍तीने 'लिव्ह इन'मध्‍ये राहणे व्‍यभिचार आणि बेकायदा लग्‍नासारखेच

बिबट्याला गावात व गावाशेजारी पाहण्यात आले, परंतु तोपर्यंत तो पळून गेला होता. पालेबारसा गाव जंगलालगत आहे. त्यामुळे गावात रात्री बेरात्री वन्यप्राणी येतात. आता तर दिवसाही येऊ लागले आहेत. जखमींना सर्वप्रथम उपचारांकरीता रूग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर बिबट्याचा बंदोबस्त करण्याकरीता वनाधिकारी, कर्मचारी यांनी प्रयत्न सुरू केले. कॅमेरेही लावण्यात आले असून, बिबटला पकडण्यासाठी पिंजरा बोलविण्यात आला आहे. तसेच कर्मचाऱ्यांनी गस्त देणे सुरू केले आहे. भर दिवसाच बिबट्याने बापलेकावर हल्ला करून जखमी केल्याने नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.(Leopard attack)

2024-07-27T11:19:38Z dg43tfdfdgfd