बातम्या

Trending:


सप्तपदी हवीच

सर्वोच्च न्यायालयाने हिंदू विवाहाला संस्कार म्हटले असून सप्तपदीला बंधनकारक ठरवले आहे. बदलत्या काळात विवाह सोहळ्यांमधील वाढता दिखाऊपणा आणि संपत्तीदर्शनाचे स्तोम, उत्सवी स्वरूप पाहता यातील संस्कारांना सन्मान देण्याची गरज नक्कीच होती. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर विवाह संस्कारांना, विवाहविधींना डावलले जाणार नाही, अशी अपेक्षा करूया. अलीकडील काळात सामाजिक विवेकाबाबत विविध स्तरावर प्रश्नचिन्ह उभं केलं जाताना दिसत आहे. …


Google Map वापरताना येणारा आवाज कोणाचा? या महिलेबद्दल तुम्हाला माहितीय का?

लोकांना कुठेही जायचं झालं की ते सर्वात आधी रस्ता आणि ते ठिकाण गुगवर सर्च करतात. ज्यामुळे ते ठिकाण किती लांब आहे आणि तिथपर्यंत कसं पोहोचता येईल हे समजतं. तुम्ही हा गुगुल मॅप वापरताना एका महिलाचा आवाज नक्कीच ऐकला असेल, जी तुम्हाला रस्त्याबद्दल गाईड करते. पण कधी विचार केलाय का की हा आवाज कोणाचा असावा? गुगल मॅपमध्ये बोलत असलेल्या या महिलेचा आवाज अनेकांना आवडतो, कधी कधी लोक या महिलेच्या आवाजाची कॉपी करतात. पण या गुगल मॅपमध्ये बोलणारी महिला कोण आहे हे तुम्हाला माहीत आहे का? तिचे नाव काय आणि ती काय करते? चला या महिलेबद्दल सविस्तर जाणून घेऊ. गुगल मॅपवर ज्या महिलेचा आवाज ऐकू येतो तिचे नाव कॅरेन जेकबसेन आहे. ती मूळची ऑस्ट्रेलियन असून सध्या न्यूयॉर्कमध्ये राहते. कॅरेन व्यवसायाने व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट, गायक, संगीतकार आणि इन्फ्लुएन्सर आहे. केरन यांना अनेक प्रमुख पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आता तिचा आवाज गुगल मॅपद्वारे जगातील अब्जावधी लोकांपर्यंत पोहोचला आहे. तसेच 2011 ते 2014 या काळातील ऍपल आयफोन, आयपॉड आणि आयपॅडवरील सिरी ऍप्लिकेशनमध्ये कॅरेन जेकबसेनचा आवाज वापरण्यात आला होता.


Thackeray - उद्धव ठाकरे यांनी घेतलं मुंबादेवीचं दर्शन

भारत, May 19 -- Thackeray - उद्धव ठाकरे यांनी घेतलं मुंबादेवीचं दर्शन


Maharashtra Rain Alert : पुढील 24 तासांत महाराष्ट्रात मुसळधार पाऊस

महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. पावसामुळे पिकांचं नुकसान झालं आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून (IMD) राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान दुसरीकडे विदर्भात देखील हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये...


TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 19 May 2024 : ABP Majha

मुंबईमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तात वाढ, ५ अप्पर पोलीस आयुक्त, २५ पोलीस उप आयुक्त, ७७ सहायक पोलीस आयुक्त यांच्यासह २ हजार ४७५ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात. २० मे रोजी ठाणे लोकसभा मतदारसंघात मदतान, या पार्श्वभूमीवर गेल्या दीड महिन्यांपासून पोलिसांकडून तयारी सुरु, मतदानावेळी ४ हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त असणार. ठाणे लोकसभेसाठी मतदानाच्या दिवशी नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करावं, ठाणे पोलीस आयुक्त अशितोष डुंबरे यांचे मतदारांना आवाहन. पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी एसटीच्या १ हजार १६१, तर बेस्टच्या ६२९ बस धावणार, कर्मचाऱ्यांची ने-आण, दिव्यांग मतदारांसाठी बेस्ट बस उपलब्ध. हादेखील व्हिडिओ पाहा Sanjay Raut Majha Vision 2024:मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, माझा व्हिजनमध्ये राऊतांचा मोठा दावा Sanjay Raut Majha Vision 2024: मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाही, माझा व्हिजनमध्ये राऊतांचा मोठा दावा संजय राऊत म्हणाले, मोदी शाह यांनी ठरवलं तर ते कुणालाही जेलमध्ये टाकू शकतात , पण सत्ता कायमची नाही, तुम्ही जे पेरले ते उगवणार आहे. सध्याचे चित्र बघून मोदींचा चेहरा काळा पडलाय, शहांची दाढी जळाली आहे. मोदी शाह खोटारडे, त्यांनी देशाला तेच धडे दिले. शिंदे आणि अजित पवार हे बुडबुडे आहेत. भाजप एकसंध आहे की नाही हे 4 जून नंतर कळेल. मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, मोदी कुठून जागा आणणार आहे. शिंदे, दादांची एकही जागा मिळणार नाही. आम्ही 30 ते 35 जागा जिंकणार आहे


निवडणुकीचा बदलता रंग

उत्तर भारतात लोकसभेच्या 180 जागा आहेत. उत्तर प्रदेश हे लोकसभेचे हृदय मानले जाते. तसेच हिंदी पट्टा हाच सत्तेच्या चाव्या कोणत्या पक्षाला द्याव्यात हे ठरवतो. यामुळे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, हरियाणा, दिल्ली, हिमाचल प्रदेश, काश्मीर या राज्यांमधील स्विंगची कथा भाजप आणि विरोधकांसाठी जास्त महत्त्वपूर्ण ठरते. लोकसभा निवडणुकीचे चार टप्पे पार पडले आहेत. म्हणजेच …


ग्रेट

समाजाची स्पंदने सर्वाधिक कुणाला वाचता येत असतील तर ती उत्तम कथा लिहिणाऱ्या सूक्ष्म निरीक्षकाला. ज्येष्ठ लेखक श्याम मनोहर यांनी समकालाला समोर ठेवून लिहिलेल्या तीन कथांच्या गुच्छापैकी ही पहिली. पुढील दोन कथा क्रमश: प्रसिद्ध करण्यात येतील.


Praful Patel on Sharad Pawar : शरद पवारांनी केलेल्या दाव्यांबद्दल पटेलांचं उत्तर, म्हणाले होय मी...

Praful Patel on Sharad Pawar : शरद पवारांनी केलेल्या दाव्यांबद्दल पटेलांचं उत्तर, म्हणाले होय मी... Praful Patel on Sharad Pawar : शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये 2004 च्या विधानसभा निवडणुकीवरुन दावे-प्रतिदावे सुरुच आहेत. 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या जास्त जागा येऊन देखील काँग्रेस पक्षाला मुख्यमंत्रिपद कशामुळे देण्यात आले? असे सवाल अजित पवार गटाचे नेते शरद पवारांना विचारताना दिसत आहेत. दोन्ही गटांच्या नेत्यांकडून दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत. आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. 2004 पासून भाजपशी युती करण्यासाठी शरद पवारांकडे आग्रह धरत होतो, असे पटेल यांनी म्हटलंय. त्यामुळे आता पुन्हा शरद पवारांची यावर काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं असणार आहे.


Nanded ATM Robbery : मुदखेड तालुक्यातील धक्कादायक प्रकार, पोलिसांकडून आरोपींच शोध सुरू

Nanded ATM Robbery : मुदखेड तालुक्यातील धक्कादायक प्रकार, पोलिसांकडून आरोपींच शोध सुरू नांदेड जिल्हयातील मुदखेड तालुक्यातील बारड येथे चोरट्यांनी चक्क एटीएम मशीनच पळवली. मध्यरात्री ही चोरी झाली . बारड भोकर मार्गावर मुख्य रस्त्यावरच बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेचे एटीएम आहे .. रात्री चोरट्यांनी ही एटीएम मशिन चोरून नेली . घटना स्थळी मोठी दोरी आणि एक पोत पोलीसांना आढळलं. चोरी करण्यापूर्वी चोरट्यांनी सीसीटिव्ही कॅमेरा फोडला.त्यामूळे नेमकी चोरी झाली कशी आणि चोरटे कोण याचा तपास लावने अवघड झाले . एटीएम मशिन मध्ये रककम किती होती याची अधिकृत माहिती मिळाली नाही. दरम्यान, या प्रकरणात थेट एटीएम मशिनच पळवून नेल्यामुळे या प्रकरणाची चर्चा मात्र तुफान होते आहे. त्यामुळे पोलीस तपासाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.


VIDEO | खलिस्तान्यांचा भारतात घातपाताचा डाव

Khalistani Assassination In India


Yogi Adityanath: उत्तर पश्चिमसाठी महायुतीचे 'योगी कार्ड'; विशेष कार्यक्रमांसाठी योगी आदित्यनाथ यांना आमंत्रण

Yogi Adityanath: मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघाकडे उभ्या देशाचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात दोन्ही शिवसेना पक्षांचे उमेदवार आमने-सामने आहेत.


Akola News : अकोल्याच्या मोर्णा नदीपात्रात आढळला चिमुकल्याचा मृतदेह; परिसरात एकच खळबळ

Akola Crime News अकोला : अकोला (Akola) जिल्ह्यात एक खळबळजनक घटना उजेडात आली आहे. अकोल्यातल्या मोर्णा नदीपात्रात एका चिमुकल्याचा मृतदेह आढळून आलाय. वय वर्ष अवघ्या एक वयोगटाच्या आतील हा चिमुकला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच डाबकी रोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पुढील कारवाई सुरू केली आहे. यात नदीपात्रातील चिमुकल्याचा मृतदेह बाहेर काढून अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे....


Pune Khed Gas Cylinder Blast : गॅस चोरीचा गोरखधंदा सुरुच; गॅस चोरी करताना एकामोगामाग एक भीषण स्फोट, खेड तालुक्यातील धक्कादायक घटना

पुणे : पुण्यात गॅस चोरीच्या घटना काही नवीन नाही. आतापर्यंत (Pune gas cylinder Blast) अनेकदा अशा घटना समोर आल्या आहे. परिणामी या घटनांमुळे अनेकांना चापदेखील देण्यात आला आहे. मात्र तरीही गॅस चोरी काही थांबायचं नाव घेत नाही आहे. गॅस चोरी करताना भीषण स्फोट झालाय. गॅसच्या कंटेनरमधून ही चोरी सुरू असताना एकामागोमाग एक स्फोट झालेत. चाकण-शिक्रापूर मार्गावरील शेल पिंपळगावमध्ये ही धक्कादायक घटना आज पहाटे पावणे पाच च्या सुमारास घडली. ग्रामस्थांच्या जीवाशी...


नाम गुम जाएगा...!

मतदार याद्यांमधून नावे गायब होण्याच्या तक्रारी आता दर निवडणुकीत नित्याच्या बनल्या आहेत. निवडणूक यंत्रणेकडे स्वतंत्र कर्मचारीवर्ग नसतो; हे मान्य करूनही दोन निवडणुकींच्या मधल्या काळात याद्या सुधारण्याकडे लक्ष देणे, ही अपेक्षा चुकीची म्हणता येणार नाही.


Kharif Crop : खरीप हंगामाच्या पेरणीसाठी पूर्वमशागतीच्या कामांना वेग; शेतकऱ्यांचा कल कापूस, सोयाबीनकडे

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खरीपाचे सहा लाख ७५ लाख हेक्टर क्षेत्र असून, प्रत्यक्ष पेरणी सहा लाख ७१ हजार हेक्टरवर होते. दर वर्षीप्रमाणे शेतकऱ्यांचा कल कापूस, मका, सोयाबीन या पिकांकडे अधिक आहे.


अक्षम्य संकेतभंगाचे बळी

इस्रायल-हमास संघर्षात होरपळून निघणाऱ्या गाझा पट्टीत संघर्षाची झळ सोसणाऱ्यांना मदत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती.


Most Haunted Island: जगातील सर्वात झपाटलेलं बेट, लाखो लोक जिवंत जाळले होते!

नवी दिल्ली : भुताचं अस्तित्व मान्य करायचं की नाही, याबाबत प्रत्येकाचं वेगवेगळं मत असते. परंतु जगात अशी अनेक ठिकाणे आहेत, ज्यांना भूतांनी पछाडलेलं आहे, असं मानलं जातं. अनेकांचा दावा असतो की, अशा ठिकाणी भूतंप्रेतं राहतात. आज आम्ही तुम्हाला अशा एका बेटाबद्दल सांगणार आहोत, जे जगातील सर्वात ‘हॉन्टेड बेट’ म्हणून ओळखलं जातं. इटलीमध्ये हे बेट असून या बेटावर भूत आहे किंवा नाही, याबाबत आम्ही कुठलाही दावा करीत नाही. मात्र, या बेटाचा इतिहास खूपच भीतीदायक...


कृतिशील विचारवंत

बुद्धिनिष्ठ विचारवंत, लेखन आणि विचार स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे समीक्षक, दलित साहित्याची पाठराखण करणारे साहित्यिक असणारे डॉ. भालचंद्र फडके यांची ही जन्मशताब्दी. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा हा थोडक्यात आढावा...


जनतेचा जाहीरनामा

नंदुरबार हा राज्यातील आदिवासीबहुल जिल्हा. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत या जिल्ह्याच्या विशेष गरजांकडे कोणत्याही राजकीय पक्षाचे लक्ष गेलेले दिसत नाही. अस्मितेच्या मुद्द्यापासून, डी लिस्टिंग, शिक्षण, आरोग्य, रोजगार या मूलभूत गरजांसंदर्भात येथील आदिवासींची नेमकी काय स्थिती आहे, याचा वेध.


अवकाळी पावसाचा पालेभाज्यांना फटका

अवकाळी पावसामुळे पालेभाज्यांची आवक कमी झाली असून, पालेभाज्यांच्या प्रतवारीवर परिणाम झाला. त्यामुळे चांगल्या प्रतीच्या पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली.


Sindhudurg : तळकोकणात जंगली हत्तींचा हैदोस, माड बागायत आणि फळपिकाची नासधूस

Sindhudurg : तळकोकणात जंगली हत्तींचा हैदोस, माड बागायत आणि फळपिकाची नासधूस तळकोकणातील दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात जंगली हत्तींच्या कळपाकडून फळपिकाची नासधूस सूरू आहे. तर पाळये गावात भरवस्ती जवळ येऊन हत्तीच्या कळपाने माड बागायतीचे आणि केळी पिकाची नासधूस केली आहे. पाळये गावातील शेतकरी गणेश शिरसाट यांच्या घरालगत असलेल्या नारळाच्या झाडांना जंगली हत्तीनी जमीन दोस्त केलं आहे. दिवसाढवळ्या हत्ती लोकवस्ती जवळ येऊन नासधूस करत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वनविभागाकडून मात्र बघ्याची भुमिका घेतली जात आहे. त्यामुळे गावातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये रोष असून या हत्तीचा कायम स्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. सिंधुदुर्गच्या पाळये गावात जंगली हत्तीच्या कळपाकडून माड बागायत आणि केळी पिकांची नासधूस, वनविभाग बघ्याची भुमिका घेत असल्यानं शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये रोष.


EVM Machine Demo : मशीन कशाप्रकारे काम करते पाहा डेमो व्हिडिओ

EVM Machine Demo : मशीन कशाप्रकारे काम करते पाहा डेमो व्हिडिओ


BECIL Recruitment 2024 : ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट इंडिया येथे नोकरीची संधी! पाहा अधिक माहिती

BECIL Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांनी ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट इंडिया येथे होणाऱ्या भरती आणि अर्जाबद्दल अधिक माहिती पाहा.


Ratan Tata: मतदार राजा, हक्क बजावायलाच हवा..., रतन टाटा यांच्यासह अनेक मान्यवरांचा आग्रह

Ratan Tata Appeal To Vote In Lok Sabha 2024: मी सर्व मुंबईकरांना आवाहन करतो की, त्यांनी घराबाहेर पडून मतदान करावे आणि ते जबाबदारीने करावे’, असे आवाहन ज्येष्ठ व प्रसिद्ध उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांनी शनिवारी आपल्या ‘एक्स अकाऊंट’च्या माध्यमातून मुंबईतील नागरिकांना केले.


दारी कुरिअर येता...

निवडणुकीच्या काळातील जाहीर सभांमधून आणि मुलाखतींमधून जे काही सांगितलं जातं, ते वस्त्रगाळ केलं तर खाली किती सत्व पडेल आणि वर काय सत्य उरेल, हे कोणालाच सांगता येत नाही. परतु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवा भूतकाळ उकरून जो सत्याचा प्रकाश पाडला त्या प्रकाशात पाहिलं तर एक प्रसंग डोळ्यांपुढे येतो... गृहिणी- अहो हे काय केलंत? त्याला कशाला बसवता ख...


Pandharpur Vitthal Mandir : विठुरायाची मूर्ती पेटीतून बाहेर काढणार, वारकऱ्यांमध्ये आनंद

Pandharpur Vitthal Mandir : विठुरायाची मूर्ती पेटीतून बाहेर काढणार, वारकऱ्यांमध्ये आनंद गेली दोन महिने काचपेटीत बंद असलेला विठुराया आज काचपेटीतुन मुक्त झाला असून आज मोहिनी एकादशीला आलेल्या भाविकांना देवाचे दगडी गाभाऱ्यातील मूळ रूपाचे मुखदर्शन घेता आले आहे . सध्या मंदिराचे दुरुस्ती आणि संवर्धनाचे काम सुरु असल्याने १५ मार्च पासून देवाचे काचपेटीतील रूप दुरून पाहता येत होते . मात्र आता गाभाऱ्यातील बहुतांश काम पूर्ण झाल्याने देवाच्या भोवती मूर्तीच्या संरक्षणासाठी लावलेली अन ब्रेकेबल काचेची पेटी हटविण्यात आल्याने दगडी गाभाऱ्यातील देवाच्या मूळ रूपाचे दर्शन घेऊन भाविक तृप्त झाले . आता २ जून पासून देवाच्या पायावरील दर्शनाला सुरुवात होणार असून आता भाविकांना पायावरील दर्शनाची आस लागून राहिली आहे . आज ABP माझाच्या माध्यमातून देवाचे हे दगडी गर्भगृहातील मूळ रूपाचे exclusive दर्शन घेता येत आहे.


राहुल गांधींच्या सभेला गर्दी उसळली, प्रयागराजमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन

उत्तर प्रदेशमधील प्रयागराज लोकसभा मतदारसंघात राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांची सभा झाली.राहुल गांधींच्या सभेसाठी जोरादार गर्दी उसळली.भाजपचा खासदार असलेल्या प्रयागराजमध्ये अखिलेश यादव आणि राहुल गांधींनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं.


विधिसेवा आणि ग्राहकसेवा

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक महत्त्वाचा निवाडा दिला. त्यानुसार ‘ग्राहक संरक्षण कायदा, १९८६, सुधारित २०१९’च्या तरतुदीनुसार वकिली सेवा ग्राहक कक्षेत येत नाही. या निवाड्यातील महत्त्वाच्या तरतुदी लक्षात घेणे आवश्यक आहे.


मुंबईत उष्मा कायम

मुंबईमध्ये शनिवारी कडक उन्हाचे चटके आणि प्रचंड उष्मा जाणवत होता. यामुळे मुंबईकर शनिवारी हैराण झाले होते.


घुसखोर बांगलादेशी महिलांना सांगलीतून आधार, रेशन कार्ड

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर पोलिसांनी जेरबंद केलेल्या बांगलादेशी महिलांकडे आधार कार्डसह रेशनकार्डही आढळून आले आहे. विशेष म्हणजे घुसखोरी करून भारतात बेकायदा वास्तव्य केलेल्या महिलांना सांगलीतून दोन्ही कार्डे मिळाली आहेत. वरिष्ठाधिकार्‍यांनी या कृत्याची दखल घेत, चौकशीची व्याप्ती वाढविण्याचे आदेश तपासाधिकार्‍यांना शनिवारी दिले आहेत. कोणत्याही पुराव्याशिवाय नागरिकत्वाची ओळखपत्रे तयार करून देणार्‍या शासकीय अधिकार्‍यांसह एजंटांची साखळी...


Garib Rath Express Train: गरीब रथचे नशीब फळफळणार, मिळणार सुपर VIP दर्जा; असा आहे Railway चा प्लॅन

Garib Rath Express Train: गरीब रथ एक्सप्रेस मध्ये राजधानी एक्सप्रेससाठी जर्मनीहून आयात करण्यात आलेले एलएचबी कोच जोडण्यात येणार असल्याची माहिती भारतीय रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. हा बदल देशातील पहिल्या गरीब रथ एक्सप्रेसमध्ये होणार आहे, यामुळे प्रवाशांच्या आसनक्षमतेत कमालीची वाढ होणार आहे.


Bharti Pawar Dindori Lok Sabha: दिंडोरीत उद्या मतदान, नाशिककर सज्ज; भारती पवार यांचं मतदारांना आवाहन

दिंडोरी लोकसभोची निवडणूक कांदा प्रश्नाभोवती केंद्रित झालीये. त्यामुळे ही लढत अटीतटीच्या वळणावर येऊन पोहचली आहे. मात्र मी निवडून आल्यानंतर कांदा प्रश्न हक्काने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सोडून घेईल असं आश्वासन भारती पवार यांनी दिलंय. यामुळे देश हितासाठी जास्तीत जास्त मतदारांनी घराबाहेर पडून उद्या मतदान करावं अशी प्रतिक्रिया भारती पवार यांनी दिलीय. हे व्हिडिओ देखील पाहा J. P. Nadda : RSS ही सांस्कृतिक, सामाजिक संस्था मात्र भाजप राजकीय पक्ष : जे.पी. नड्डा : ABP Majha भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केलेल्या एका मोठ्या वक्तव्याची.. शुरु मे हम अक्षम होंगे थोडा कम होंगे, आरएसएस की जरुरत पडती थी, आज हम बढ गये हैं, सक्षम हैं, तो बीजेपी अपने आप चलती है.. हे वक्तव्य आहे जे पी नड्डा यांचं.. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केलंय. वाजपेयींच्या काळातील भाजप आणि सध्याच्या भाजप यातील फरक काय असा प्रश्न नड्डांना विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी हे उत्तर दिलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सांस्कृतिक आणि सामाजिक संस्था आहे तर भाजप हा राजकीय पक्ष आहे हे अधोरेखित करायला देखील जे पी नड्डा विसरले नाहीत. त्यामुळे विरोधकांनी टीकेची झो़ड उठली.


CM Eknath Shinde Mumbra Shiv Sena Shakha : मुख्यमंत्री शिंदे मुंब्र्यातील नव्या शाखेत

CM Eknath Shinde Mumbra Shiv Sena Shakha : मुख्यमंत्री शिंदे मुंब्र्यातील नव्या शाखेत, भिंतींवर कुणाकुणाचे फोटो? मुंबईचे ज्या शाखेवर बुलडोझर चालवल्यामुळे वाद झाला होता, त्या ठिकाणी नवीन शाखा बांधली आहे, त्या शाखेत सीएम येत आहेत. मुंब्र्यातील वादग्रस्त शाखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिली भेट. मुंब्रा विभागामध्ये शिवसेना मध्ये दोन गट पडल्यानंतर मुंब्रा येथील शिंदे गटाच्या शिवसेनेच्या वतीने शाखेवरती ताबा घेण्यात आला होता. या शाखेला उबाठा गटाच्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्याचबरोबर विरोधी पक्षाचे अनेक नेत्यांनी देखील भेट दिली होती. परंतु आज पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री भेटणार शिंदे मुंब्रातील वादग्रस्त शाखेलादीली भेट. मी राज्यभर प्रचार केला लोकांना विकास पाहिजे, आणि आम्ही विकास केलाय त्यामुळे मतदार विकासाच्या बाजूने मतदान करतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय राज्यात आम्हाला 45 पेक्षा जास्त जागा मिळतील अल्पसंख्यांकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि राज्य सरकारने खुप काम केलय त्यामुळे यंदा अल्पसंख्याक मोठ्या संख्येने मतदान करतील असा विश्वास देखील यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.


मधमाशी पालनाचा इस्रायली मंत्र

इस्रायलमध्ये जी कृषी क्रांती झाली, त्यात मधपाशीपालन आणि त्याचा कृषी क्षेत्रासाठी केलेला पुरेपूर उपयोग यांचा महत्त्वाचा वाटा आहे. देशात मधाचे वार्षिक उत्पादन ३५०० टन आहे. मध व्यवसायाची वार्षिक उलाढाल २०-२२ दशलक्ष डॉलर्स असते.


Delhi Weather: नजफगड @४७.४ अंश; देशातील सर्वोच्च तापमानाची नोंद, 'या' राज्यांत अलर्ट जारी

Delhi Weather Update: दिल्लीच्या आग्नेयेकडील नजफगड भागात शुक्रवारी तापमान ४७.४ अंश आणि हरियाणातील सिरसा येथे ४७.१ अंश तापमान नोंदवण्यात आले.


Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंची टीका, देवेंद्र फडवीसांचा पलटवार

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उद्धव ठाकरे आणि फडणवीसांनी आपल्या उमेदवारांसाठी सभा घेतल्या.. उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केलाय. मुंबईतील प्रचारसभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी निशाणा साधलाय. ठाकरेंनी पुन्हा फडणवीसांचा फडतूस असा उल्लेख केलाय..तर मविआचे नेते फक्त शिव्या देतात अशी टीका फडणवीसांनी केलीय.. Suhas Palshikar Majha Katta:युती की मविआ, राज्याची हवा कुणाच्याबाजूने? पळशीकरांचं विश्लेषण 'कट्टा'वर Thackeray VS Shinde : मुलुंडच्या राड्यावरुन शाब्दिक राडा; ठाकरेंचा इशारा, शिंदे म्हणाले... Maharashtra Superfast News : वारे निवडणुकीचे : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 18 May 2024 CM Eknath Shinde : प्रचाराच्या तोफा थंडावल्या, मुख्यमंत्री शिंदे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर Pune Loni Kalbhor Banner : पावसामुळं लोणी काळभोरमध्ये होर्डिंग कोसळलं; घोडा जखमी, बँड पथकाचं नुकसान


करोना लशीची नवी दहशत

जगातील सर्वांत मोठी लसीकरण मोहीम म्हणून गवगवा झालेल्या भारतात, ‘कोव्हिशील्ड’ लशीचे साधारणतः १७५ कोटी डोस देण्यात आले आहेत. या लशीमुळे लाखो भारतीयांचे प्राण वाचले आहेत. त्यामानाने त्याचे जे काही दुष्परिणाम दिसले, ते नगण्य संख्येत होते; त्यामुळे ही लस आपल्या दृष्टीने संजीवनीच म्हणावी लागेल.