LOKSABHA ELECTION : मतदान केंद्र परिसरात निर्बंध; असे असतील निर्बंध

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात बारामती लोकसभेच्या पुरंदर, भोर, खडकवासला विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. लोकसभेसाठी 7 मार्च रोजी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रापासून 100 मीटरच्या परिसरात पोलिसांनी निर्बध घातल्याचे जाहीर केले आहे. रात्री एक वाजल्यापासून मतदान प्रक्रिया संपेपर्यंत निर्बंध असणार आहेत. सीआरपीसी 144 प्रमाणे सहआयुक्त प्रवीण पवार यांनी हे आदेश काढले आहेत.

बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण 127 मतदान केंद्रांमधील 618 बूथवर मतदान होणार आहे. मतदान सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी, सार्वजनिक शांततेला व मालमत्तेला धोका पोहचू नये, सार्वजनिक शांतता बिघडू नये, यासाठी मतदान केंद्रांच्या परिघापासून 100 मीटर सभोवतालच्या परिसराच्या जागेचा प्रचारासाठी व इतर कारणांसाठी गैरवापर होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात निर्बंध घालण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे. या आदेशानुसार 127 मतदान केंद्रांचे 100 मीटर परिसराच्या आतील सर्व व्यावसायिक दुकाने, रेस्टॉरंट, टपर्‍या (अत्यावश्यक सेवा वगळून) सर्व आस्थापना बंद ठेवाव्या लागणार आहेत. आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

थांबण्यावर किंवा वास्तव्यावर प्रतिबंध

सर्व राजकीय व्यक्तींना किंवा राजकीय पक्षाशी संबंधित असलेल्या कोणत्याही व्यक्तीस ते ज्या लोकसभा मतदारसंघाचे मतदार नाहीत, त्या लोकसभा मतदारसंघात थांबण्यास किंवा वास्तव्य करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. हा प्रतिबंध 5 मे पासून 7 मेच्या रात्रीपर्यंत राहील.

हेही वाचा

2024-05-04T03:30:43Z dg43tfdfdgfd