MAHARASHTRA WEATHER: राज्यात आज गारपीटीची शक्यता, या जिल्ह्यांना अलर्ट जारी

Unseasonal Rain in Maharashtra: गेल्या 15 दिवसांपासून राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाचा कहर पहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच राज्यात आज पुन्हा अवकाळी पावसाची आणि गारपीटी शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा फटता शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. पावसामुळे फळबागांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तसेच मुंबई, ठाणे आणि कोकणासह काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्याच्या कोणत्या भागात गारपीट होणार आणि कोणत्या भागात उष्णतेची लाट येणार ते जाणून घेऊयात...

या भागात गारपीटीची शक्यता

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार विदर्भात आज एक किंवा दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे. यावेळी वाऱ्याचा वेग 40-50 किमी प्रतितास इतका असेल. यात यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश असेल. या जिल्ह्यांवा गारपिटीचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.

त्याच बरोबर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, संभाजीनगर, लातूर , जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, नांदेड, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच सांगली, अहमदनगर, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांना गारपीटीचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

या भागात उष्णतेची लाट

कोकण आणि पश्चिम किनारपट्टीवरील जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा अलर्ट देण्यात आला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा वाढणार आहे. त्यामुळे या भागात उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच घराबाहेर पडायचे असल्यास योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन IMD ने केले आहे.

राज्याच्या भागाला पावसाने झोडपले

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडत आहे. गेल्या 2-3 दिवसांमध्ये नगर, पुणे, सोलापूर, नाशिक, संभाजीनगर, बीड, धाराशीव या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे बऱ्याच ठिकाणी शेतमालाचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान आजही या भागामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

2024-04-25T02:23:30Z dg43tfdfdgfd