MUMBAI POLICE ON ALERT: 'लॉरेन्स बिश्नोईचा माणूस मुंबईत काहीतरी मोठं करणार' अज्ञात व्यक्तिचा MUMBAI POLICE ना फोन, चौकशी सुरु

Mumbai Crime: मुंबई पोलिसांना एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीतील माणसं लवकरच मुंबईत येऊन मोठी घटना घडवणार असल्याचा धमकीचा फोन मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला होता. त्यानंतर नियंत्रण कक्षाकडून स्थानिक पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. या फोननंतर मुंबई पोलिस हाय अलर्ट मोडवर आले आहेत. हे प्रकरण शनिवारचे असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या मुंबई पोलिस फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तिचा शोध घेत आहेत.

मुंबई पोलिसांनी सांगितले की, अज्ञात व्यक्तीने फोनवर असा दावा केला की, लॉरेन्स बिश्नोईच्या गॅगचा माणूस मुंबईत येऊन मोठी घटना घडवून आणणार आहे. विशेष म्हणजे, हा कॉल सुरुवातीला मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला. त्यानंतर त्यांनी या घटनेबाबत स्थानिक पोलिस ठाण्याशी संपर्क साधला असे मुंबई पोलिसांनी सांगितले. मागील चार महिन्यात अज्ञात व्यक्तींकडून मुंबई पोलिसांना 8 निनावी फोन आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यात पोलिसांना दोन धमकीचे मेल आले होते.

2024-04-20T09:08:42Z dg43tfdfdgfd