MUMBAI-PUNE EXPRESSWAY: मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवरुन आज प्रवास करणार असाल तर 'ही' बातमी तुमच्यासाठी, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Mumbai-Pune Expressway: पुणे - मुंबई महामार्गावर 25 एप्रिल गुरुवारी दोन तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. याबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली आहे. या मेगाब्लॉकमुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. मेगाब्लॉक दरम्यान वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद राहील. मेगाब्लॉक दरम्यान महामार्गाच्या पुणे - मुंबई मार्गावर उपकरणे बसवण्याचे काम केले जाणार असल्याचे एमएसआरडीसीकडून सांगण्यात आले. पुणे - मुंबई महामार्गावरुन मुंबईकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) पुणे - मुंबई द्रुतगती मार्गावर आज गुरुवारी 25 एप्रिल रोजी दोन तासांचा मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व प्रकारच्या हलक्या व जड-अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. हा मेगाब्लॉक दुपारी 12 ते 2 या वेळेत असेल. मेगाब्लॉक दरम्यान वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. वाहनचालकांसाठी एमएसआरडीसीने पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहने खोपोली शहरातून मुंबईच्या दिशेने वळवण्याची व्यवस्था केली आहे. यात फक्त हलक्या वाहनांचा समावेश आहे. हलकी वाहने जुना पुणे - मुंबई राष्ट्री महामार्ग क्रमांक 48 खोपोली शहरातून शेंडूग टोलनाक्यामार्गे मुंबईच्या दिशेने मार्गस्थ होतील अशी माहिती खात्याकडून देण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून पुणे - मुंबई द्रुतगती मार्गावर 19.100 किमीवर दुपारी 12 ते 2 या वेळेत ग्रॅन्ट्री उभारण्याचे काम करण्यात येणार आहे. या प्रक्रियेदरम्यान पुणे मुंबई मार्गावरुन हलक्या आणि जड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद केली जाणार आहे. तसेच वाहनचालकांच्या तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी प्रशासनाने पर्यायी मार्गाची व्यवस्था केली आहे. या व्यवस्थेमध्ये जुन्या पुणे मुंबई महामार्गाचा वापर केला जाणार आहे.

2024-04-25T07:39:20Z dg43tfdfdgfd