NAGPUR NEWS : नागपूरमध्ये भाजप-काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा; काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या टेबलवरचं मशीन उचलून आपटलं

Lok Sabha Election 2024 Nagpur : नागपुरात काँग्रेस (Congress) आणि भाजप (BJP) कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याची घटना घडली. नागपुरातील (Nagpur) जरीपटका आणि नारा रोड या दोन भागांमध्ये दुपारी 12 आणि 1 वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती पुढे आली आहे. भाजप कार्यकर्त्यांनी मतदान केंद्राजवळ लावलेल्या त्यांच्या टेबलवरून मतदारांना मतदान केंद्रात जाण्यापूर्वी मदत म्हणून मतदार यादी क्रमांक, खोली क्रमांक कळवण्यासाठी जी छोटी कागदी स्लिप दिली. त्या स्लिपवर नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि भाजपचा निवडणूक चिन्ह होते. तसेच नितीन गडकरी यांच्या समर्थनार्थ घोषणाही लिहिलेली असल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपवर केलाय.

परिणामी, ही कृती नियमांचे उल्लंघन करणारी असल्याचा आरोप करत त्यांना गडकरींचा फोटो आणि भाजपचा निवडणूक चिन्ह छापून देणारी मशीन तिथून हटवण्यास सांगितले. यावरुन दोन्ही गटामध्ये शाब्दिक वाद झाला. तसेच यातील संतप्त काँग्रेसचा एक कार्यकर्त्याने ही मशीन फोडल्याची माहितीही पुढे आली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणणायचे प्रयत्न केले आणि काही वेळाने त्यांना यशही आले. मात्र, काही काळ या मतदान केंद्रावर गोंधळाचे वातावरण बघायला मिळाले. 

नेमकं प्रकरण काय? 

राज्यात लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीचा नारळ आज पूर्व विदर्भातील पाच मतदारसंघात फुटला आहे. एकीकडे विदर्भात उष्णतेच्या पाऱ्याचा जोर वाढत असताना मतदानाचा जोर देखील वाढताना दिसतोय. अशातच राज्यात बहुचर्चित आणि प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या नागपूर मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याची घटना घडली आहे. हा वाद उफाळून येण्यामागील कारण म्हणजे, नागपुरातील जरीपटका आणि नारा रोड येथे भाजपच्या वतीने मतदान केंद्रानजीक बुथ लावण्यात आले होते. या बुथवरुन मतदारांना मतदान केंद्रात जाण्यापूर्वी मदत म्हणून मतदार यादी क्रमांक, खोली क्रमांक कळवण्यासाठी एक छोटी कागदी स्लिप दिली जात होती.

मात्र, त्या स्लिपवर भाजपचे उमेदवार नितीन गडकरी आणि भाजपचा निवडणूक चिन्ह होते. तसेच नितीन गडकरी यांच्या समर्थनार्थ घोषणाही लिहिलेली होती. नियमानुसार ही कृती नियमांचा उल्लंघन करणारी असल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला. तसेच भाजपचे निवडणूक चिन्ह छापून देणारी मशीन तिथून हटवण्याची मागणी केली. परिणामी, या विषयावरून दोन्ही पक्षाचा कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद झाला आणि मतदान केंद्रावर एकच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. 

टेबलवरचं मशीनच उचलून आपटलं

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ या दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. तितक्यात एका कार्यकर्त्याने तेथील मशीन फोडल्याचीही माहिती समोर आली आहे. यामुळे हे प्रकरण आधिक चघळले असल्याचे बोलले जात आहे. सध्याघडीला पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला असून या प्रकरणी पोलीस काय कारवाई करते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. मात्र, एकीकडे उष्णतेचा पारा तापत असताना आता नागपुरातील राजकारण देखील तापले असल्याने सर्वत्र एकच चर्चा होतांना दिसत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

2024-04-19T11:05:51Z dg43tfdfdgfd