PUBG मुळे पाकिस्तानवर हल्ला, दहशतवादी असा करतायत GAME चा वापर

मुंबई : पबजीचं क्रेज भारतात खूप जास्त आहे. बहुतांश तरुण मंडळींना तर या खेळाचं वेडच लागलं आहे. गोळ्या, बंदुका आणि अटॅक या सगळ्या गोष्टी तरुणांच्या मनात बसल्या आहेत. ज्यामुळे तरुण मंडळी आपल्या वयक्तीक आयुष्यात ही जास्त आक्रमक होत असल्याचं तज्ज्ञांकडून समोर आलं आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, पण याच पबजीमुळे पाकिस्तानात देखील दहशदवादी हल्ला झाला.

पाकिस्तानातील स्वात येथील बनर पोलीस ठाण्यावर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्याच्या हालचाली शोधणे पाकिस्तानी अधिकाऱ्यांसाठी आव्हानात्मक बनले कारण दहशतवाद्यांनी यासाठी लोकप्रिय व्हिडीओ गेम PlayerUnknown's Battlegrounds (PUBG) वापरला.

28 ऑगस्ट रोजी दहशतवाद्यांनी पोलीस ठाण्याला टार्गेट केलं होतं, ज्यात एक पोलीस अधिकारी शहीद झाला होता, तर दोन जण जखमी झाले होते. या हल्ल्याचा तपास करत असताना दहशतवाद्यांनी PUBG चा प्लॅनिंगसाठी वापर केल्याची धक्कादायक माहिती अधिकाऱ्यांसमोर आली आहे. अशा स्थितीत प्रश्न पडतो की, दहशतवादी यासाठी PUBG गेमचा वापर कसा करत होते?

दहशतवाद्यांनी त्यांच्या हल्ल्याची योजना बनवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक पाळत ठेवण्यासाठी संदेशांसाठी PUBG चॅट रूमचा वापर केला. त्यामुळे पाकिस्तानी अधिकाऱ्यांना त्यांच्या कारवाया शोधणे कठीण झाले. पाकिस्तानी अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, दहशतवादी हल्ल्याचा सराव करण्यासाठी PUBG खेळायचे आणि एकमेकांशी बोलण्यासाठी चॅट रूम वापरायचे. त्यामुळे सुगावा मिळणे कठीण झाले.

हल्ल्यानंतर जिल्हा पोलिसांनी तपास सुरू केला. हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या कॅमेऱ्यांतील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली. जिल्हा पोलीस अधिकारी डॉ. झाहिदुल्ला यांच्या म्हणण्यानुसार, तपासकर्त्यांनी सुरुवातीला स्फोटापूर्वी पोलिस स्टेशनजवळील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेल्या मोटरसायकलवर लक्ष केंद्रित केले होते, परंतु हल्ला कसा झाला हे ओळखणे कठीण कठीण आहे.

2024-09-18T14:03:58Z dg43tfdfdgfd