Trending:


Mumbai Goa Highway Accident : जगबुडी पूल आणि भोस्ते घाट ठरतोय अपघातांचा ब्लॅक स्पॉट; एकाच रात्री दोन भीषण अपघात, दोन जण गंभीर

Ratnagiri News रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway) असलेल्या जगबुडी पूल आणि भोस्ते घाट अपघातांसाठी ब्लॅक स्पॉट ठरला आहे. कारण काल, शनिवारच्या रात्री या महामार्गावर दोन वेगवेगळ्या ठिकाणी भीषण अपघातांच्या (Accident) घटना घडल्या आहेत. हे दोन्ही अपघात कंटेनरचे असून यात दोघे गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्यांचावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मुंबई-गोवा महामार्गावरील ब्लॅक स्पॉट...


मधमाशी पालनाचा इस्रायली मंत्र

इस्रायलमध्ये जी कृषी क्रांती झाली, त्यात मधपाशीपालन आणि त्याचा कृषी क्षेत्रासाठी केलेला पुरेपूर उपयोग यांचा महत्त्वाचा वाटा आहे. देशात मधाचे वार्षिक उत्पादन ३५०० टन आहे. मध व्यवसायाची वार्षिक उलाढाल २०-२२ दशलक्ष डॉलर्स असते.


Delhi Arvind Kejriwal protest । दिल्लीत आज हायव्होल्टेज ड्रामा? केजरीवाल भाजप ऑफिसमध्ये जाणार

Delhi Arvind Kejriwal protest. High voltage drama in Delhi today? Kejriwal will go to BJP office


EVM Machine Demo : मशीन कशाप्रकारे काम करते पाहा डेमो व्हिडिओ

EVM Machine Demo : मशीन कशाप्रकारे काम करते पाहा डेमो व्हिडिओ


Garib Rath Express Train: गरीब रथचे नशीब फळफळणार, मिळणार सुपर VIP दर्जा; असा आहे Railway चा प्लॅन

Garib Rath Express Train: गरीब रथ एक्सप्रेस मध्ये राजधानी एक्सप्रेससाठी जर्मनीहून आयात करण्यात आलेले एलएचबी कोच जोडण्यात येणार असल्याची माहिती भारतीय रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. हा बदल देशातील पहिल्या गरीब रथ एक्सप्रेसमध्ये होणार आहे, यामुळे प्रवाशांच्या आसनक्षमतेत कमालीची वाढ होणार आहे.


Yogi Adityanath : उत्तर प्रदेशात गेल्या सात वर्षांत एकही दंगल झाली नाही : योगी आदित्यनाथ

उत्तर प्रदेशात गेल्या सात वर्षांत एकही दंगल झाली नाही, बुलडोझर चालवून एका दिवसात माफिया संपवून टाकलं, नालासोपारा इथल्या सभेत योगी आदित्यनाथांंचं वक्तव्य तर काँग्रेसह इतर विरोधीपक्षांवरही साधला निशाणा. चारशे पारचा नारा दिला की विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकते 140 कोटी जनतेच्या धार्मिक भावनेच्या आधारावर श्रीराम मंदिर बांधले गेले. काँग्रेस सरकार म्हणायचं की, हिंदूंच्या बाजूने निकाल लागला तर दंगे होतील पण हा नवा भारत आहे. रामलल्ला आयेंगे, मंदिर वही बनायेंगेचा आमचा संकल्प होता आणि मंदिर बांधले. यासाठी महाराष्ट्रातील हजारो कारसेवकांचे योगदान आहे. काँग्रेसचे सरकार पुन्हा येण्याचे लायकीचे राहणार नाही. पुन्हा एकदा मोदी सरकार येणार आहे. अबकी बार चारशे पारचा नारा दिला की विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकते. काहीच संदेह ठेवू नका, पुन्हा मोदी येणार आहे. मालेगाव, धुळे येथील बांधवांना अयोध्या येथे राम मंदिर दर्शनाला या, असे आवाहन त्यांनी केले.


VIDEO | भाजपला संघ नकोसा? जे. पी. नड्डांच्या वक्तव्याची चर्चा

BJP Possible To take distance from RSS in near future


Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

Bengaluru - Kochi Air India Flight Catches Fire: एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाच्या इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.


BECIL Recruitment 2024 : ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट इंडिया येथे नोकरीची संधी! पाहा अधिक माहिती

BECIL Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांनी ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट इंडिया येथे होणाऱ्या भरती आणि अर्जाबद्दल अधिक माहिती पाहा.


घुसखोर बांगलादेशी महिलांना सांगलीतून आधार, रेशन कार्ड

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर पोलिसांनी जेरबंद केलेल्या बांगलादेशी महिलांकडे आधार कार्डसह रेशनकार्डही आढळून आले आहे. विशेष म्हणजे घुसखोरी करून भारतात बेकायदा वास्तव्य केलेल्या महिलांना सांगलीतून दोन्ही कार्डे मिळाली आहेत. वरिष्ठाधिकार्‍यांनी या कृत्याची दखल घेत, चौकशीची व्याप्ती वाढविण्याचे आदेश तपासाधिकार्‍यांना शनिवारी दिले आहेत. कोणत्याही पुराव्याशिवाय नागरिकत्वाची ओळखपत्रे तयार करून देणार्‍या शासकीय अधिकार्‍यांसह एजंटांची साखळी...


जनतेचा जाहीरनामा

नंदुरबार हा राज्यातील आदिवासीबहुल जिल्हा. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत या जिल्ह्याच्या विशेष गरजांकडे कोणत्याही राजकीय पक्षाचे लक्ष गेलेले दिसत नाही. अस्मितेच्या मुद्द्यापासून, डी लिस्टिंग, शिक्षण, आरोग्य, रोजगार या मूलभूत गरजांसंदर्भात येथील आदिवासींची नेमकी काय स्थिती आहे, याचा वेध.


Shantigiri Maharaj Statment : भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा पाठिंबा, शांतिगिरी महाराजांचा दावा

नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांनी मोठं वक्तव्य केलं आहे. भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनाचा आम्हाला पाठिंबा असल्याचं मोठं वक्तव्य शांतिगिरी महाराजांनी केलं आहे. शांतिगिरी महाराज यांनी नाशिक लोकसभेसाठी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. शांतीगिरी महाराजांकडून (Shantigiri Maharaj) नाशिकमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केले जात आहे. शांतीगिरी महाराज प्रचारासाठी दररोज नवनवीन फंडे शोधत आहे. आज प्रचाराचा अखेरचा दिवस असून शांतिगिरी महाराजांनी आज भव्य प्रचार रॅली काढली आहे. यावेळी त्यांनी एबीपी माझाशी बोलताना मोठा दावा केला. नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांच्याकडून शक्ती प्रदर्शन केले आहे. नाशिकच्या गंगा घाटावरून शांतीगिरी महाराजांच्या रॅलीला सुरुवात झाली. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचार रॅली आयोजित करण्यात आली आहे. शांतीगिरी महाराजांच्या उमेदवारीने नाशिक लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत तिरंगी लढत होणार आहे.


नाम गुम जाएगा...!

मतदार याद्यांमधून नावे गायब होण्याच्या तक्रारी आता दर निवडणुकीत नित्याच्या बनल्या आहेत. निवडणूक यंत्रणेकडे स्वतंत्र कर्मचारीवर्ग नसतो; हे मान्य करूनही दोन निवडणुकींच्या मधल्या काळात याद्या सुधारण्याकडे लक्ष देणे, ही अपेक्षा चुकीची म्हणता येणार नाही.


धुमसते पाकव्याप्त काश्मीर

पाकिस्तान सरकार आणि लष्कराने पाकव्याप्त काश्मीरचा वापर नेहमीच भारतात अशांतता, दहशतवाद आणि हिंसाचारासाठी केला. आता तेथील परिस्थिती अनियंत्रित आणि हिंसक बनली आहे. जनतेत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. हा भाग भारताने ताब्यात घ्यावा, अशी मागणी केली जात आहे. तथापि भावनिकतेच्या पलीकडे जात वास्तवाचे भान ठेवून विचार केल्यास हा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा असल्याचे लक्षात येते. अलीकडील …


ABP Majha Headlines : 12 PM : 19 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

कुटुंबप्रमुख म्हणून मी सुप्रिया सुळे आणि अजित पवारांमध्ये कधीच भेदभाव केला नाही, अनेक मंत्रीपदं दिली त्यामुळे संधी मिळाली नाही ही ओरड निरर्थक, शरद पवारांनी अजितदादांना सुनावलं मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे नको ही २०१९च्या आधी भाजपचीही भूमिका होती, संजय राऊतांचा मोठा दावा, मविआ बनत असताना अजितदादांनी देखील विरोध केल्याचं वक्तव्य((सीएमपदी भाजपला शिंदे नको होते-राऊत)) मुंबईसह महाराष्ट्रात उद्या १३ जागांवर मतदान, आज करणार मतदान साहित्याचं वाटप, पोलिसांचं कडक बंदोबस्त ((उद्याच्या मतदानाची जय्यत तयारी)) मुंबईतल्या तीन मतदारसंघात दोन शिवसेना आमने-सामने, दक्षिण मुंबईत अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव, दक्षिण मध्यमधून अनिल देसाई विरुद्ध राहुल शेवाळे लढत, वायव्य मुंबईत अमोल कीर्तिकर रवींद्र वायकरांना भिडणार आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर कालपासूनआयकर विभागाचे छापे. ४०कोटींची रोकड जप्त. तर बूट व्यापारी कर चुकवत असल्याची आयकर विभागाकडे माहिती. पुण्यातील कल्याणीनगरमध्ये स्पोर्ट्स कारची दुचाकीला धडक, तरण-तरुणीचा जागीच मृत्यू मुंबईत आज आणि उद्या उकाडा कायम राहणार, हवेतील आर्द्रता प्रचंड वाढल्यानं मुंबईकर घामाघूम((मुंबईत गरमी, दमटपणा कायम राहणार)) मान्सून आज अंदमानात दाखल होणार, ३१ मे रोजी केरळ आणि ७ जूनला महाराष्ट्रात धडकण्याचा अंदाज((मान्सून आज अंदमानात धडकणार)) वरंधा घाट वाहतुकीसाठी येत्या ३१मेपर्यंत बंद राहणार. घाट बंद असल्यानं प्रवाशांना ताम्हिणी,आंबेनळी घाटामार्गे प्रवास करावा लागणार. सिंगापूर एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांची मे महिन्यातच दिवाळी, बोनस म्हणून आठ महिन्यांचा पगार मिळणार ((बोनस म्हणून आठ महिन्यांचा पगार!))


Megablock : पश्चिमच्या प्रवाशांची सुटका, मध्यच्या दोन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; वेळापत्रक पाहूनच घ्या प्रवासाचा निर्णय

Megablock : देखभाल आणि दुरूस्तीच्या कामासाठी रेल्वेने मुंबई विभागात रविवारी (19 मे) मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मध्य रेल्वेच्या मेन आणि हार्बर मार्गावर हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेने या दिवशी मेगाब्लॉक नसल्याचे जाहीर केले आहे.


Uddhav Thackeray Dadar Full Speech : राज ठाकरेंवर निशाणा, मोदींना सुनावलं, उद्धव ठाकरेंचं भाषण

Uddhav Thackeray On Raj Thackeray : वापरा आणि फेकून द्या, भाजपचे हे नवे धोरण आहे. नकली सेना, नकली पुत्र म्हणत आहेत. काही दिवसांनी मोदी नकली आरएसएसही म्हणतील. आज एका वृत्तपत्रात बातमी ही आली आहे, आता भाजपला आरएसएसची गरज नाही. याचा अर्थ आता संघाला धोका आहे. सोळावं वरीस धोक्याचं तसं संघाला शंभर वरीस धोक्याचं होणार असल्याची खोचक टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. महाविकास आघाडीचे दक्षिण मध्य मुंबई लोकसभेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे ह्यांची जाहीर सभा खांडके बिल्डिंग, दादरला पार पडली. या सभेत बोलताना राज ठाकरे यांचा भाडोत्री असा उल्लेख केला. मोदी आणि शाह यांना निवांत झोप लागो या शुभेच्छा देतो. त्यांना आपण इंडिया आघाडीच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीला बोलावणार आहोत, असा टोलाही त्यांनी लगावला.


पुरोगामी राज्यात द्वेषजनक भाषणे…

इंडिया हेट लॅब नावाच्या वॉशिंग्टन स्थित संस्थेच्या अहवालानुसार २०२३ मध्ये मुस्लीम समुदायाच्या विरुद्ध भारतात एकूण ६६८ द्वेषजनक भाषणे देण्यात आली.


Pandharpur : 2 जूनपासून विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन होणार

Vitthal's inauguration will be held from June 2


Lok Sabha Election 2024 : मुंबईत 6 जागांसाठी मतदान, निवडणूक प्रक्रियासाठी 2520 मतदान केंद्र सज्ज

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असेलेल्या मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांसाठी 20 मे रोजी मतदान होणार असून त्यावर वर्चस्व ठेवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीने कंबर कसल्याचं दिसतंय. मुंबईतील सहा मतदारसंघांतील मतदान संख्येची आकडेवारी (Mumbai Lok Sabha Election Total Voting List) समोर आली असून त्यामध्ये मुंबई उत्तर लोकसभेमध्ये एकूण मतदारांची संख्या सर्वाधिक असून ती 18.12 लाख इतकी आहे. तर मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वात कमी म्हणजे 14.74 लाख मतदान आहे. मुंबई लोकसभानिहाय आकडेवारी मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ पुरुष मतदार- 9 लाख 68 हजार 983 महिला मतदार- 8 लाख 42 हजार 546 तृतीयपंथीय मतदार- 413 एकूण मतदार- 18 लाख 11 हजार 942 मतदान केंद्र- 1 हजार 702, संवेदनशील मतदान केंद्र- 30 मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ पुरुष मतदार- 9 लाख 38 हजार 365 महिला मतदार- 7 लाख 96 हजार 663 तृतीयपंथीय- 60 एकूण मतदार- 17 लाख 35 हजार 88 मतदान केंद्र- 1 हजार 753 संवेदनशील मतदान केंद्र- 21 मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघ पुरुष मतदार- 8 लाख 77 हजार 855 महिला मतदार- 7 लाख 58 हजार 799 तृतीयपंथीय - 236 एकूण मतदार- 16 लाख 36 हजार 890 मतदान केंद्र- 1 हजार 682 संवेदनशील मतदान केंद्र- 32 मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ पुरुष मतदार- 9 लाख 41 हजार 288 महिला मतदार- 8 लाख 2 हजार 775 तृतीयपंथीय- 65 एकुण मतदार- 17 लाख 44 हजार 128 मतदान केंद्र- 1 हजार 698 संवदेनशील मतदान केंद्र - 30 मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ पुरुष मतदार- 7 लाख 87 हजार 667 महिला मतदार- 6 लाख 86 हजार 516 तृतीयपंथीय मतदार- 222 एकूण मतदार- 14 लाख 74 हजार 405 मतदान केंद्र- 1 हजार 539, संवदेनशील मतदान केंद्र- 0 मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघ पुरुष मतदार- 8 लाख 32 हजार 560 महिला मतदार- 7 लाख 3 हजार 565 तृतीयपंथीय मतदार- 43 एकुण मतदार- 15 लाख 36 हजार 168 मतदान केंद्र- 1 हजार 530 संवदेनशील मतदान केंद्र - 11 मुंबईत 22 हजार पोलिस तैनात बृहन्मुंबई शहरामध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या अनुशंगाणे मुंबई पोलीस (Police) दलाकडून 5 अपर पोलीस आयुक्त, 25 पोलीस उपआयुक्त, 77 सहायक पोलीस आयुक्त यांच्यासह 2475 पोलीस अधिकारी व 22,100 पोलीस अंमलदार व 03 दंगल काबु पथक (RCP) बंदोबस्तकामी तैनात करण्यात आलेले आहेत.


निवडणुकीचा बदलता रंग

उत्तर भारतात लोकसभेच्या 180 जागा आहेत. उत्तर प्रदेश हे लोकसभेचे हृदय मानले जाते. तसेच हिंदी पट्टा हाच सत्तेच्या चाव्या कोणत्या पक्षाला द्याव्यात हे ठरवतो. यामुळे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, हरियाणा, दिल्ली, हिमाचल प्रदेश, काश्मीर या राज्यांमधील स्विंगची कथा भाजप आणि विरोधकांसाठी जास्त महत्त्वपूर्ण ठरते. लोकसभा निवडणुकीचे चार टप्पे पार पडले आहेत. म्हणजेच …


Hemant Godse Nashik : 100 % आमचा विजय निश्चित,हेमंत गोडसेंनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

Hemant Godse Nashik : नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांनी मोठं वक्तव्य केलंय.. भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनाचा आम्हाला पाठिंबा असल्याचं मोठं वक्तव्य शांतिगिरी महाराजांनी केलंय. यावेळी शांतिगिरी महाराजांनी मोदींच्या कटआऊटवर पृष्पवष्टी केलीय. यानंतर महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसेंनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय. भाजप आमच्यासोबतच असल्याचा विश्वास नाशिक मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार, हेमंत गोडसेंचं वक्तव्य. Shiv Sena Hemant Godse Nashik News भाजप हा महायुती मधील अधिकृत पक्ष आहे भाजप आमच्या सोबतच आहे शांतिगिरी महाराज यांनि काही वक्तव्य केले असले तरी त्यातुन गैरसमज निर्माण होऊ नये मोदींच्या फोटोवर पुष्पहार घातला याचा अर्थ त्याचा आशीर्वाद महायुतीच्या उमेदवारालाच आहेत भुजबळ प्रचारात सक्रीय आहेत, त्यांचा पाठींबा मिळतोय आमचा विजय निश्चित आहे 100 टक्के विजयी होणार


Raj Thackeray: राज गर्जना... शिवसेनेकडून राज ठाकरेंच्या कळव्याच्या सभेचा टीझर जारी

Raj Thackeray Kalva Rally: कळव्यात राज ठाकरे यांची सभा होणार आहे. महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी आज राज ठाकरे सभा घेणार आहेत. यावेळी राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.


अमेठीतील सामना चुरशीचा

गांधी कुटुंबातील कोणतीही व्यक्ती अमेठीमधून निवडणूक लढवत नसल्याची गेल्या २५ वर्षांमधील ही पहिलीच वेळ आहे


Google Map वापरताना येणारा आवाज कोणाचा? या महिलेबद्दल तुम्हाला माहितीय का?

लोकांना कुठेही जायचं झालं की ते सर्वात आधी रस्ता आणि ते ठिकाण गुगवर सर्च करतात. ज्यामुळे ते ठिकाण किती लांब आहे आणि तिथपर्यंत कसं पोहोचता येईल हे समजतं. तुम्ही हा गुगुल मॅप वापरताना एका महिलाचा आवाज नक्कीच ऐकला असेल, जी तुम्हाला रस्त्याबद्दल गाईड करते. पण कधी विचार केलाय का की हा आवाज कोणाचा असावा? गुगल मॅपमध्ये बोलत असलेल्या या महिलेचा आवाज अनेकांना आवडतो, कधी कधी लोक या महिलेच्या आवाजाची कॉपी करतात. पण या गुगल मॅपमध्ये बोलणारी महिला कोण आहे हे तुम्हाला माहीत आहे का? तिचे नाव काय आणि ती काय करते? चला या महिलेबद्दल सविस्तर जाणून घेऊ. गुगल मॅपवर ज्या महिलेचा आवाज ऐकू येतो तिचे नाव कॅरेन जेकबसेन आहे. ती मूळची ऑस्ट्रेलियन असून सध्या न्यूयॉर्कमध्ये राहते. कॅरेन व्यवसायाने व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट, गायक, संगीतकार आणि इन्फ्लुएन्सर आहे. केरन यांना अनेक प्रमुख पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आता तिचा आवाज गुगल मॅपद्वारे जगातील अब्जावधी लोकांपर्यंत पोहोचला आहे. तसेच 2011 ते 2014 या काळातील ऍपल आयफोन, आयपॉड आणि आयपॅडवरील सिरी ऍप्लिकेशनमध्ये कॅरेन जेकबसेनचा आवाज वापरण्यात आला होता.


ग्रेट

समाजाची स्पंदने सर्वाधिक कुणाला वाचता येत असतील तर ती उत्तम कथा लिहिणाऱ्या सूक्ष्म निरीक्षकाला. ज्येष्ठ लेखक श्याम मनोहर यांनी समकालाला समोर ठेवून लिहिलेल्या तीन कथांच्या गुच्छापैकी ही पहिली. पुढील दोन कथा क्रमश: प्रसिद्ध करण्यात येतील.


विधिसेवा आणि ग्राहकसेवा

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक महत्त्वाचा निवाडा दिला. त्यानुसार ‘ग्राहक संरक्षण कायदा, १९८६, सुधारित २०१९’च्या तरतुदीनुसार वकिली सेवा ग्राहक कक्षेत येत नाही. या निवाड्यातील महत्त्वाच्या तरतुदी लक्षात घेणे आवश्यक आहे.


Wardha News : हिंगणघाटच्या हैदराबाद महामार्गवरील उड्डाणपुलावर पडले मोठे भगदाड; राष्ट्रवादी काँग्रेसचा आक्रमक पवित्रा

Wardha News हिंगणघाट : हिंगणघाट शहरातील हैद्राराबाद महामार्गावरील उड्डाणपुलावर मोठे भगदाड पडल्याचे समोर आले आहे. अवघ्या दोन वर्षाआधी बांधण्यात आलेल्या या पूलाची दुरावस्था झाल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. शिवाय अवघ्या दोन वर्षांत पूलाची दुरावस्था होत असेल तर नक्कीच यात कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे काम केले असावे, परिणामी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेश...


काळवंडलेलं आभाळ

कर्नाटकमधील प्रज्वल यांच्या व्हिडीओंचं प्रकरण... पश्चिम बंगालमधील संदेशखाली प्रकरण... महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचं प्रकरण... या सगळ्या घटना अतिशय गंभीर आहेत. पंख पसरून भरारी घेऊ पाहणाऱ्या हजारो महिला आणि मुलींचं आभाळ अशा घटनांमुळे काळवंडून जाताना पाहणं हे दुःखद आणि भयंकर लाजीरवाणं आहे.


अक्षम्य संकेतभंगाचे बळी

इस्रायल-हमास संघर्षात होरपळून निघणाऱ्या गाझा पट्टीत संघर्षाची झळ सोसणाऱ्यांना मदत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती.


मुंबई, ठाण्यात महायुतीची कसोटी

मुंबई महानगरावरच महायुतीची सारी भिस्त अवलंबून आहे.


Chanda Te Banda Superfast News : चांदा ते बांदा: सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 18 May 2024

भाजपला एकेकाळी संघाची गरज लागायची, पण आता आम्हीच आमचा पक्ष चालवतो, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचं मोठं वक्तव्य ((संघाबद्दल नड्डा यांचं मोठं वक्तव्य)) मुंबईतील मोदींच्या रोड शोसाठी मुंबई महानगरपालिकेकडून तीन कोटी ५६ लाखांचा निधी खर्च, संजय राऊतांचा आरोप, मोदींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी ((रोड शोसाठी बीएमसीवर ३.५६ कोटींचा बोजा?)) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची आज मालेगावात सभा, नतंर मुंबईत उज्ज्वल निकमांसाठी देखील प्रचार करणार ((मालेगावमध्ये गरजणार योगी आदित्यनाथ)) निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचा प्रचार आज संध्याकाळी संपणार, सोमवारी मुंबई, ठाणे, कल्याणसह १३ जागांवर मतदान ((आज थंडावणार प्रचाराच्या तोफा)) मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी घेतली राज ठाकरेंची भेट, नंतर दोघं नेते प्रचारासाठी एकत्र रवाना ((राज ठाकरे, शेलारांमध्ये खलबतं)) संभाजीनगर गर्भलिंग निदान प्रकरणी आयुर्वेदिक डॉक्टर रोशन ढाकरेला अटक, रॅकेटमध्येे १५ ते २० एजंट्सचा सहभाग असल्याचं तपासात समोर ((डॉक्टरच घ्यायचा अर्भकांचा जीव)) नागपूरह विदर्भाला दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट, हवामान खात्यानं वर्तवली वादळी पावसाची शक्यता ((विदर्भावर पुन्हा अवकाळीचं सावट)) मुंबईतला उकाडा सोमवारपर्यंत कायम राहण्याचा अंदाज, हवेतील आर्द्रता प्रचंड वाढल्यामुळे मुंबईकर घामाघूम ((मुंबईत पुढचे दोन दिवस उकाड्याचेच)) मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे आज आणि उद्या दीड तास बंद राहणार, ओव्हरहेड गँट्रीच्या कामासाठी पुण्याकडे जाणारी वाहतूक सकाळी साडे दहा ते दुपारी १२ पर्यंत बंद ठेवणार ((एक्स्प्रेसवे दीड तास बंद राहणार)) हरियाणाच्या नूहमध्ये भाविकांच्या बसला भीषण आग, ८ जणांचा मृत्यू तर २४ जण जखमी ((हरियाणात बसला आग, ८ भाविक मृत्युमुखी)) तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेतील बेपत्ता अभिनेता गुरुचरण सिंग २५ दिवसांनी घरी परतला, आध्यात्मिक यात्रेवर गेल्याचा दावा ((तारक मेहता फेम 'सोढी'ची घरवापसी))


Pune Jobs : IITM पुणे येथे नोकरीची संधी! आजच अर्ज करा, जाणून घ्या सविस्तर माहिती

भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था पुणे ((Indian Institute of Tropical Meteorology, Pune) अंतर्गत विविध पदांच्या एकूण ६७ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.


कृतिशील विचारवंत

बुद्धिनिष्ठ विचारवंत, लेखन आणि विचार स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे समीक्षक, दलित साहित्याची पाठराखण करणारे साहित्यिक असणारे डॉ. भालचंद्र फडके यांची ही जन्मशताब्दी. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा हा थोडक्यात आढावा...


मतपेटीसाठी लोकसंख्येचा बागुलबुवा

मुस्लीम लोकसंख्या हा कायम चिंता, चर्चा आणि चिंतनाचा विषय बनवला आहे. मात्र ही चिंता कमी व्हावी आणि परिस्थितीत बदल व्हावा यादृष्टीने ठोस उपाययोजना करण्याबाबत सकारात्मक चिंतन करण्यापेक्षा असत्य आणि अर्धसत्य संदर्भ आणि संख्याशास्त्रीय आधार घेऊन हेतुपूर्वक चर्चा होत असते.