RAIGAD FLOOD UPDATE : गोवे येथील आदिवासी वाडीतील घर पुराच्या पाण्याने कोसळले

कोलाड : विश्वास निकम

आज (बुधवार) मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास आलेल्या पुराच्या पाण्यामुळे गोवे येथील आदिवासी वाडीतील ताराबाई वाघमारे यांच्या घरात पाणी शिरून घर कोसळले. घरात पाणी शिरताच पाण्याची पातळी वाढल्यामुळे घरातील कुटुंब घराबाहेर पडताच घर कोसळले. यामुळे घरातील कुटुंब बचावले. अन्यथा जीवितहानी झाली असती. यावेळी तरुणांनी जीवाची पर्वा न करता रात्रीच्या अंधारातून अनेक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवून अनेकांचे प्राण वाचविले. यामुळे तरुणांचे कौतुक करण्यात येत आहे.

Raigad News | अलिबाग समुद्रात अडकलेल्या १४ जणांना हेलिकाॅप्टरने वाचवले

गेल्‍या आठ दिवसांपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे कुंडलिका नदिने धोक्याची पातळी ओलांडली. या नदीचे पाणी कोलाड परिसरातील गावातील अनेक घरात घुसून अनेक घरांचे नुकसान झाले आहे. तर याबरोबर कुंडलिका नदीची उप नदी महिसदरा नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे. या नदीचे पुराचे पाणी गोवे गावातील नवीन गावठाण, बौद्धवाडी, आदिवासी वाडी, गोवे गावातील घरात शिरून अनेकांचे जीवनावश्यक वस्तूचे नुकसान झाले.

Raigad Ratnagiri Flood News | मुंबई विद्यापीठाच्या 'या' जिल्ह्यांतील सर्व परीक्षा पुढे ढकलल्या

तसेच अनेक वर्षांपासून महिसदरा नदीचा भराव पाण्याने धुपून कमी झाल्याने येथे संरक्षक भींत नसल्याने पुराचे नदीचे पाणी गोवे, पुई, पुगांव, मुठवली या गावातील भातशेतीत जाऊन मोठे नुकसान होते .काल झालेल्या पुरामुळे या परिसरातील भातशेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. या भातशेतीचे पंचनामे करावेत अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

2024-07-26T07:22:14Z dg43tfdfdgfd