RAIGAD RAIN : कुंडलिका नदीच्या पुलावरील संरक्षक कठडे व पाईप तुटल्‍या

रोहे : महादेव सरसंबे

कुंडलिका नदी काल तुडुंब भरून वाहत होती. काल मोठ्या प्रमाणात पाऊस असल्याने कुंडलिका तुडुंब भरून वाहत होती. पाण्याचा प्रवाह मोठा होता. प्रवाहाला वेग जास्त असल्याने कुंडलिका नदीवरील रोहा अष्टमीला जोडलेला पुलावर झाडे झुडपे अडकल्याने पुलावरील संरक्षणासाठी लावलेल्‍या लोखंडी पाईप, संरक्षण भिंत वाहून गेल्‍या आहेत. (Raigad Rain)

रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील रोहा अष्टमीला जोडणारा कुंडलिका नदीवर असलेल्या रोहा अष्टमी पुलावरील संरक्षण भिंत काही ठिण्णी वाहून गेली आहे. नदीच्या प्रवाहात वाहून आलेली लाकडे, झुडपे, झाडे पुलावर अडकली आहेत. संरक्षणासाठी बांधण्यात आलेले लोखंडी पाईपचे संरक्षण तुटले आहे.(Raigad Rain)

सध्या रहदारीसाठी हा पुल बंद करण्यात आलेला आहे. रहदारी नव्या पुलावरून चालू आहे. पुलावरील झालेल्या नुकसीनीचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकार्‍यांकडून पाहणी करण्यात आली आहे. या पुलावर प्राथमिक स्वरूपात कामाला सुरवात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आली आहे. दरम्‍यान कुंडलिका नदीचे पाणी ओसरले असून, बाजारात व्यापारी वर्गाकडून साफसफाई करण्यात येत आहे.(Raigad Rain)

2024-07-26T06:22:03Z dg43tfdfdgfd