RAILWAY TICKET BOOKING RULE : रेल्वेच्या तात्काळ तिकीट नियमात मोठा बदल, प्रवाशांना होणार फायदा

Railway Ticket Booking New Rule : भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी आहे. तात्काळ तिकिट बूक करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. रेल्वेने आपल्या एका प्रमुख नियमात बदल केला आहे. तुम्ही कुठेही तिकीट बुक केले असेल आणि ते वेटिंग किंवा आरएसीमध्ये अडकले असेल तर आता तुम्हाला अशी सुविधा देण्यासाठी रेल्वेने आपल्या नियमांमध्ये बदल केले आहेत. अशा प्रकारचे तिकीट रद्द केल्यावर आकारण्यात येणाऱ्या सुविधा शुल्कात रेल्वेने बदल केले आहेत. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

एवढे सुविधा शुल्क भरावे लागणार

अनेक वेळा लोकांचे वेटिंग तिकीट कन्फर्म होत नाही किंवा आरएसीमध्ये पोहोचल्यानंतर तिकीट अडकते. अशा परिस्थितीत रेल्वे स्वतःच अनेक वेळा तिकिटे रद्द करते. या मोबदल्यात प्रवाशांकडून मोठी रक्कम वसूल करण्यात येते, ज्याला सुविधा शुल्क म्हणतात. मात्र आता रेल्वेने ही रक्कम बदलली आहे. आता रेल्वे प्रवाशांनी तिकीट रद्द केल्यास किंवा ते आपोआप रद्द झाल्यास 60 रुपये एवढी निश्चित रक्कम आकारणार येणार आहे.

रेल्वेने कशामुळे केला हा बदल

रेल्वेच्या या नव्या नियमाच्या अंमलबजावणीमागे झारखंडमधील एका नेत्याचा हात आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील कुमार खंडेलवाल यांनी काही दिवसांपूर्वी वेटिंग तिकीट रद्द करण्यासाठी रेल्वेकडून आकारण्यात येणाऱ्या मोठ्या रकमेविरोधात तक्रार दाखल केली होती. एका प्रवाशाने 190 रुपयांचे तिकीट घेतल्याचे उदाहरण त्यांनी दिले होते. हे तिकीट वेटिंग तिकीट होते आणि ते कन्फर्म न झाल्याने रेल्वेनेच ते रद्द केले होते. त्यानंतर त्यांला केवळ 95 रुपये मिळाले. उर्वरित रक्कम सुविधा शुल्काच्या नावाखाली कापण्यात आली. या कारणास्तव रेल्वेने आता फक्त 60 रुपये निश्चित रक्कम कापण्याचा नवीन नियम लागू केला आहे. त्यामुळे आता तुमचे तिकीट रद्द झाल्यास त्यातून फक्त 60 रुपये सुविधा शुल्क कापले जाणार आहेत.

पाण्याच्या बाटल्यांच्या नियमातही बदल

भारतीय रेल्वेने अलीकडेच पाण्याच्या बाटल्यांशी संबंधित नियमांमध्ये बदल केले आहेत. याआधी रेल्वेतील प्रवाशांना एक लिटरच्या पाण्याच्या बाटल्या दिल्या जात होत्या. आता नव्या नियमानुसार प्रवाशांना 500 मिलीच्या बाटल्या दिल्या जाणार आहेत. यानंतर प्रवाशांना वेगळे पाणी हवे असल्यास प्रवाशांना अतिरिक्त बाटल्या मोफत दिल्या जातील. हा नियम आणण्यामागील कारण म्हणजे पाण्याची बचत करणे हा आहे. प्रवाशांना उत्तम सुविधा मिळावी यासाठी रेल्वेकडून कायम प्रवाशांच्या सेवेसाठी आपल्या नियमांत सकारात्मक बदल करण्याचा निर्णय घेत असतो.

2024-04-30T15:33:09Z dg43tfdfdgfd