पुणे : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर काका-पुतण्यांमध्ये वादावादी आणि टीका टीपण्णी सुरुच असल्याचं चित्र आहे. अजित पवार आणि रोहित पवार एकमेकांवर हल्लाबोल करताना दिसत आहे. त्यातच रोहित पवारांनी अजित पवारांवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. भाजपनं अजित पवारांना लोकल नेता केलं, त्यांनी बारामतीत अडकून राहावं ही भाजपची चाल असल्याची बोचरी टीका रोहित पवारांनी अजित पवारांवर केली आहे.
भाजपनं अजित पवारांना लोकल नेता बनवलं, शरद पवारांच्या नेतृत्वात काम करायचे तेव्हा अजित पवार महाराष्ट्रभर फिरायचे, पण सध्या मात्र ते बारामतीत अडकले आहेत असं रोहित म्हणाले.