SANGLI FLOOD NEWS : महापुराचा धोका कायम

सांगली : पुढारी वृत्तसेवा

महापुराच्या भीतीची टांगती तलवार कायम असल्याचे शुक्रवारी रात्री स्पष्ट झाले. पाऊस आणि पाणीसाठ्याची स्थिती पाहता, आज (शनिवारी) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कोयना धरणातून 42 हजार 100 क्युसेक विसर्ग केला जाणार आहे. त्यामुळे सांगलीची वाटचाल महापुराच्या दिशेने सुरू झालेली आहे. महापुराचे सावट आणखी गडद झाले. आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीचे पाणी शुक्रवारी रात्री इशारा पातळीजवळ आले. रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पाणी पातळी 39 फूट होती. सांगलीत महापुराची इशारा पातळी 40, तर धोका पातळी 45 फुटावर आहे. आज पातळी 43 फुटावर जाण्याचा धोका कायम आहे.

  • कृष्णा नदी सांगलीत धोका पातळीच्या दिशेने

  • पूरक्षेत्रातील 1,432 नागरिकांचे स्थलांतर

  • चांदोली क्षेत्रातही पाऊस सुरूच

  • चांदोली धरणातून विसर्ग कायम

दरम्यान, पाऊस कमी झाल्यामुळे तसेच सूर्यदर्शनही झाल्याने सांगलीकरांना शुक्रवारी थोडासा दिलासा मिळाला होता. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही दुपारी पावसाचा जोर कमी झाला होता. कराडमधील कोयना पूल आणि कृष्णा पुलाजवळ पाणी पातळीही कमी झालेली होती. त्यामुळे महापुराची भीती काहीशी कमी झालेली, मात्र रात्री धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला. त्यामुळे विसर्ग दहा हजार क्युसेकने वाढविण्याचा निर्णय पाटबंधारे विभागास घ्यावा लागला. कृष्णा नदी सांगलीत शुक्रवारी पात्राबाहेर पडली आणि धाकधूक वाढली. आता आज, शनिवारी ती आणखी वाढेल.

Sangli Flood Updates : पूरस्थितीमुळे सांगली जिल्ह्यातील ८० कैदी कळंबा जेलमध्ये!

सांगलीत पूरक्षेत्रातील 1 हजार 432 नागरिकांचे स्थलांतर झाले आहे. त्यापैकी 174 नागरिक महापालिकेच्या निवारा केंद्रात आहेत. शुक्रवारी सकाळी कृष्णेच्या पाण्याने छत्तीस फुटाची पातळी ओलांडली होती. शुक्रवारी दुपारी 12 वाजता कोयना धरणाच्या सांडव्यावरून 40 हजार क्युसेक प्रति सेकंद इतका विसर्ग करण्यात येणार होता. मात्र पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने सांडव्यावरून 30 हजार व धरणाच्या पायथ्याला असलेल्या विद्युतगृहातून 2 हजार 100 क्युसेक प्रति सेकंद, असा एकूण 32 हजार 100 क्युसेक विसर्ग चालू करण्यात आला. नदीच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कमी होता. शुक्रवारी सकाळी 8 वाजता कोयना पूल कराड येथे पाणी पातळी 34 फूट, तर कृष्णा पूल कराड येथे 26 फूट होती. सायंकाळी 5 वाजता कोयना पूल कराड येथे 31 फूट 9 इंच, तर कृष्णा पूल कराड येथे 26 फूट पातळी झाली.

सांगलीत आयर्विन पुलाजवळ शुक्रवारी सकाळी सहा वाजता 36 फूट पाणी होते. दुपारी दीड वाजता ते 38 फूट झाले. सायंकाळी साडेसात वाजता पाणी पातळी 38 फूट 11 इंच होती. इशारा पातळीला 1 फूट 1 इंच पाणी कमी होते. दरम्यान, बहे पूल कराड येथेही पाणी पातळी कमी झाली आहे. सांगलीतही त्याचा परिणाम दिसून येईल, असे दिसत आहे.

सांगली : बामणोली येथे धारदार शस्त्राने तरुणाचा खून

संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी महापालिकेच्या सर्व अधिकार्‍यांची मंगलधाम येथे तातडीने बैठक घेतली. अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, चंद्रकांत खोसे, उपायुक्त वैभव साबळे, शिल्पा दरेकर, संजीव ओव्होळ, तसेच अधिकारी उपस्थित होते. पूरबाधीत नागरिकांना स्थलांतरासाठी मदत करणे, निवारा केंद्र, पिण्याच्या पाण्याची सोय आदीबाबत नियोजन करण्यात आले. बैठकीनंतर आयुक्त गुप्ता, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, सहायक आयुक्त (आपत्ती व्यवस्थापन) नकुल जकाते, अग्निशमन व आणीबाणी विभागाचे प्रमुख सुनील माळी, आरोग्याधिकारी डॉ. रवींद्र ताटे, सहायक आयुक्त सहदेव कावडे यांनी सांगलीवाडी व सांगलीतील पूरग्रस्त भागाची पाहणी केली व नागरिकांशी संवाद साधला. पूरपरिस्थितीत प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, कोणत्याही परिस्थितीत प्रशासन आपल्याबरोबर असणार आहे, त्यामुळे घाबरून जाऊ नये, असे सांगितले. आयुक्त स्वतः नागरिकांना भेटत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. सांगलीवाडी धरणभाग व कदमवाडी सांगलीत पाटणे प्लॉट, कर्नाळ रोड याठिकाणी पाहणी केली.

सांगली : गांजा तस्करीतील बडे मासे मात्र मोकाटच

सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, गोवर्धन प्लॉट, पटवर्धन प्लॉट, पंत लाईन, आरवाडे पार्क, साईनाथनगर, मगरमच्छ कॉलनी, कर्नाळ रोड, जगदंब कॉलनी, मानसिंग शिंदे पिछाडी येथील 315 कुटुंबांतील 1 हजार 432 नागरिकांनी स्थलांतर केले आहे. यामध्ये 577 पुरूष, 654 महिला आणि 201 मुलांंचा समावेश आहे. महापालिकेच्या शाळा क्रमांक 17 व शाळा क्रमांक 23 मध्ये निवारा केंद्रात 174 पूरग्रस्तांची सोय करण्यात आली आहे. महापालिकेने 36 निवारा केंद्रे सज्ज केली आहेत. चार मंगल कार्यालयांचे अधिग्रहण केले आहे. यामध्ये कल्पतरू मंगल कार्यालय, राजमती भवन, कच्छी भवन, माळी मंगल कार्यालयाचा समावेश आहे. गरज पडल्यास याठिकाणी महापालिका निवारा केंद्र सुरू करणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी दिली.

हे दोन रस्ते बंदच

सांगलीत जुना बुधगाव रस्ता तसेच कर्नाळ रोडवर पाणी आले आहे. त्यामुळे हे दोन्ही रस्ते वाहतुकीस बंद आहेत. सरकारी घाटावर बाजार समितीच्या जनावरांच्या बाजारातही पाणी आले आहे.

Kolhapur Heavy Rain : उदगावात पाणी आल्याने सांगली-कोल्हापूर बायपास महामार्ग बंद

चार तालुक्यांत शाळांना आजही सुट्टी

सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, पलूस आणि मिरज तालुक्यातील शाळांना आजही (शनिवार) सुट्टी जाहीर केलेली आहे. अतिवृष्टीमुळे आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये याकरिता जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी हा निर्णय घेतला आहे.

सांगली सिव्हिल हॉस्पिटल परिसरात स्वच्छता मोहीम

‘आपत्ती मित्र’चे ट्रॅफिक जाम

पाणी पातळी, निवारा केंद्र, नियंत्रण कक्ष, पूरग्रस्त क्षेत्र, महत्त्वाचे संपर्क क्रमांक, महत्त्वाच्या लिंक्स, मदत स्वीकृत केंद्र व अन्य माहिती नागरिकांना सहज उपलब्ध व्हावी, यासाठी महापालिकेने ‘आपत्ती मित्र’ मोबाईल अ‍ॅप तयार केले आहे. अठरा हजार नागरिकांनी ते मोबाईलवर डाऊनलोड केले आहेे. गुरुवारी रात्री ते शुक्रवारी सकाळपर्यंत 11 हजार नागरिकांनी अ‍ॅप डाऊनलोड करून घेतले. सर्व 18 हजार नागरिक या अ‍ॅपचा सतत वापर करत आहेत. त्यामुळे त्याचे ट्रॅफिक जाम झाले.

2024-07-27T00:09:35Z dg43tfdfdgfd