SHIV SENA UBT MANIFESTO: शिवसेना ठाकरे गटाचा वचननामा जाहीर, या प्रमुख मुद्द्यांवर उद्धव ठाकरेंनी दिला भर

Shiv Sena UBT Manifesto: महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाने देखील आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. ठाकरे गटाने आपल्या जाहिरनाम्याला वचननामा असे नाव दिले आहे. शिवसेनेने या वचननाम्यात प्रामुख्याने महाराष्ट्रातील प्रश्नांवर भर दिला आहे. देशात इंडिया आघाडीचे सरकार येणार असून हे सरकार आल्यानंतर आम्ही या मुद्यांवर काम करून असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. आज पत्रकार परिषदेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. इंडिया आघाडीचं सरकार देशात येणार आहे. महाराष्ट्रासाठी ज्या गोष्टी व्हायला हव्या त्या आम्ही वचननाम्यातून प्रकाशित करत आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

भाजपला देशाची घटना बदलायची आहे - उद्धव ठाकरे

भाजपा आता समोर पराभव दिसायला लागला आहे, त्यामुळे ते आता भाजप राम राम म्हणतंय. मोदींना आता पाशवी बहुमत हवंय, जेणेकरून ते देशाची घटना बदलून टाकतील. देशाची घटना बदलणं हे त्यांचं स्वप्न आहे आणि ते आता समोर आलं आहे अशी टीका देखील यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी केली.

शिवसेनेच्या वचननाम्यातील प्रमुख मुद्दे

  • महाराष्ट्रातील उद्द्योगधंदे पळवले जात आहे. महाराष्ट्राचं वैभव लुटलं जात आहे. ही लूट आम्ही इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर थांबवू. महाराष्ट्राचा विकासाचा वेग आणखी वाढवू.
  • विधानसभा निवडणुकानंतर राज्यात देखील महाविकास आघाडीचं सरकार येईल. त्यामुळे देशात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी या सरकारने पाडलेला खड्डा भरून काढू आणि महाराष्ट्राच वैभव पुन्हा उभं करू.
  • आम्ही देशातील प्रत्येक राज्याचा सन्मान ठेवू, गुजरातचा हक्क देखील त्यांना देऊ. पण वित्तीय केंद्र नव्याने महाराष्ट्रात उभं करू, जेणेकडून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. ग्रामीण भागात आणि शहरात दोन्हीकडे रोजगाराच्या संधी उपलब्ध करू
  • आरोग्य सुविधांमध्ये असलेली उणीव भरून काढू. प्रत्येक जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक उपकरणे आणून सर्व रुग्णालये आधुनिक करण्यावर भर देऊ. तसेच नर्सेस, डॉक्टर स्टाफची कमतरता भासून देणार नाही.
  • इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमुक्त केली जाईल. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पीक विम्याचे निकष कंपन्याने ठरवले आहेत, ते अतिशय विचित्र आहेत. ते निकष आमचे सरकार आल्यानंतर बदलले जातील आणि शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई मिळेल यासाठी लक्ष ठेवू.
  • खते, बी बियाने, अवजारे, वीज पंप यासारख्या शेती संबंधीत गोष्टींवरील जीएसटीची लूट थांबवण्यासाठी शेतकऱ्याला लागणाऱ्या सर्व गोष्टीं जीएसटी मुक्त करू, जेणे करून शेतकऱ्याला कर्जमुक्त होण्यासाठी मदत होईल.
  • स्वामिनाथन आयोगानुसार शेतकऱ्यांना हमीभाव देऊ. शेतमाल साठवून ठेवण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांना गोदाम, शीतगृहे बांधून देऊ. तिथे शेतकरी आपला माल ठेवू शकतील आणि जेव्हा भाव मिळेल तेव्हा ते विकू शकतील.
  • जे विकेन, ते पिकेन यासाठी कृषी खात्यात सर्वे करणारं केंद्र स्थापन करू. हे केंद्र शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन पिके घेण्यासाठी मार्गदर्शन करेल. शेतकरी कर्जमुक्त व्हावा हा यामागचा उद्देश आहे.
  • महाराष्ट्रात उद्द्योग स्नेही वातावरण राज्यात निर्माण करू, उद्योयगधंद्यांना जास्त परवानग्या लागता कामा नये याची काळजी घेऊ. महाराष्ट्रात पर्यावरण स्नेही उद्योग आणू आणि विनाशकारी प्रकल्प राज्यात येऊ देणार नाही.

2024-04-25T13:40:16Z dg43tfdfdgfd