SOLAPUR CRIME NEWS | हिवरे येथे २२ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन जीवन संपवले

पोखरापूर : मोहोळ तालुक्यातील हिवरे येथे २२ वर्षीय विवाहितेने बाथरूममध्ये ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना आज (दि. १६) सकाळी साडेनऊ वाजता उघडकीस आली. प्रतीक्षा अक्षय गवळी असे या विवाहितेचे नाव आहे.

याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळ तालुक्यातील चिखली येथील संजय अभिमान मते यांची मुलगी प्रतीक्षा हिचा विवाह २०२२ मध्ये मोहोळ तालुक्यातीलच हिवरे येथील अक्षय पितांबर गवळी याच्याबरोबर झाला होता. त्यांना ८ महिन्याचा मुलगा आहे. आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास संजय मते यांना नातेवाईकांनी प्रतिक्षा हिने घरातील बाथरूममध्ये ओढणीने गळफास घेतल्याचे सांगितले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. नातेवाईक आणि पोलिसांनी प्रतीक्षाला मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. प्रतिक्षाचे वडील संजय मते यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात मुलीने अज्ञात कारणावरून गळफास घेऊन जीवन संपवल्याची खबर दिली असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार संतोष चव्हाण करीत आहेत.

पिंपरी : मोबाईलचा हट्ट न पुरविल्याने विवाहितेने संपवले जीवन

2024-09-16T09:36:09Z dg43tfdfdgfd