TRAFFIC PROBLEM | विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक मार्गात बदल

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

गणेश विसर्जन मिरवणुकानिमित्त सोमवारी (दि. १६) भोसरी आणि वाकड परिसरातील तसेच मंगळवारी (दि. १७) चिंचवड, पिंपरी येथील बाहतुक मार्गात बदल करण्यात आले आहेत. वाहतुक शाखेचे पोलिस उपायुक्त बापू बांगर यांनी याबाबत माहिती दिली.

वाकड भागातील बहुतांशी गणेश मंडळांच्या मुर्तीचे अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी विसर्जन करण्याची परंपरा आहे. तर, चिंचवड, पिंपरीसह शहरात अनेक मंडळांच्या मुर्तीचे अनंत चतुर्दशीदिवशी विसर्जन करण्यात येते. बहुतांश मंडळांमार्फत मिरवणूक काढण्यात येते. दरम्यान, रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी बाहतूक विभागाच्या वतीने परिसरातील गणेशविसर्जन मागर्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आली आहेत.

वाकड वाहतूक विभाग वाहतूक बदल

या कालावधी १६ सप्टेंचा रोजी दुपारी चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत. साठे चौक येथून दत्त मंदिर रोडवर जाण्यास मनाई असून ही वाहतूक कावेरीनगर किंवा काळा खडक चौक मार्गे जाईल. वाकड चौकाकडून दत्त मंदिर रोडवर जाण्यास मनाई असून ही वाहतूक वाकड चौकातून कस्पटे कॉर्नर मागे जाईल, उत्कर्ष चौकाकडून दत्त मंदिर रोड वाकड येथे येणार्या वाहनांना म्हातोबा बौक येथून प्रवेश बंद असून ही वाहने कस्पटे कॉर्नर मागे जातील. पोलारीस हॉस्पिटल चौक दत्त मंदिर रोड तसेच सम्राट चौक दत्त मंदिर रोड येथील वाहतूक गरजेनुसार वळवरली जाणार आहे.

भोसरी वाहतूक विभाग वाहतूक बदलाचा कालावधी

१६ सप्टेंबर रोजी दुपारी दोन ते रात्री अकरा वाजेपर्यंत. फुगेवाडी दापोडी ओव्हरब्रिज मार्गे शितळादेखी चौकाकडून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मागे पुण्याकडे जाणारा मार्ग बंद राहणार असून या मार्गावरील वाहतूक शितळादेवी चौकातून उजवीकडे वळून सांगवी मार्गे फुगेवाड़ी चौकातून हॅरीस ब्रिजच्या अंडरपासमधून बोपोडी मार्गे जातील. बावर पेट्रोल पंप ते भोसरी ओव्हर ब्रिज खाली जाणार्या वाहनांना प्रवेश बंद असून या मार्गावरील वाहतूक भोसरी ओवर ब्रिज मार्गे पुढे धावडे वस्तीकडे जाऊन सद्गुरुनगर चौकातून यु टर्न मारून भोसरी ब्रिज खाली येऊन दिधी आळंदीकडे जातील.

पिंपरी वाहतूक विभाग

वाहतूक बदलाचा कालावधी १७ सप्टेंबर रोजी दुपारी चार ते रात्री बारा वाजेपर्यंत. कात्रज पिंपरी चौकाकडून शगुन चौकाकडे जाणारा मार्ग बंद राहणार असून पिंपरी पुलावरून उजवीकडे वळून भाटनगर मागे, मोरवाडी मार्गे एम्पायर इस्टेटच्या मदर टरेसा ब्रिजवरून काळेवाड़ी मार्गे जाता येईल.

काळेवाडी पुल ते डिलक्स चौक, कराची चौकाकडे जाण्यास बंदी राहणार असून या मार्गावरील वाहतूक काळेवाडी पुलावरून उजवीकडे वळून जमतानी चौक व गेलार्ड चौकाकडून महात्मा फुले कॉलेज येधून उजव्या बाजूला बळून नवमहाराष्ट्र शाळा येथून पुढे जातील. पिंपरी चौकातून गोकुळ हॉटेलकडे जाण्यास बंदी असून ही वाहतूक पिंपरी सेवा सत्याने कोया शोरूम सम्परील रस्त्याने जाईल. सां हटिल ते पवनेश्वर मंदिर यामार्गावरील वाहतूक बंद राहणार असून ही बाहतूक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पिंपरी येथून वळविण्यात आली आहे.

चिंचवड वाहतूक विभाग वाहतूक

बदलाचा कालावधी १७ सप्टेंबर रोजी दुपारी चार ते रात्री बारा वाजेपर्यंत. अहिंसा चौक ते चापेकर चौकाकडे जाणारा मार्ग बंद राहणार असून ही वाहतूक एसएएफ चौकातून खंडोबा माळ मार्गे वळविण्यात येणार आहे. दळवीनगर ब्रिजकडून चापेकर चौकाकडे जाणारा मार्ग बंद राहणार असून ही वाहने एसकेएफ चौकाकडून विजलीनगर मागे जातील. वाल्हेकरवाडी टी जंक्शनकडून चापेकर चौकाकडे जाण्यास बंदी असून वाल्हेकरवाडी जुना जकात नाका डावीकडे वळून जैन शाळेपासून विजालीनगर अथवा एसकेएफ-खंडोबा माळ मागे जाता येईल.

लिंकरोडवरून चापेकर चौकातील पीएमटी बस थांबा येथून खापेकर चौकात जाण्यास बंदी असून लिंकरोडने डावीकडे वळून काळेवाडी मार्गे पुढे जाता येईल. भोई आळी तसेब चिंचवड चौकी येवून चापेकर चौकात जाण्यास बंदी असून केशवनगर मागे पुढे जाता येईल. - चिंतामणी चौक वाल्हेकरवाडी रिव्हर यहा चौकाकडे जाण्यास बंदी वाहनांना बंदी असून चिंचवडेफार्म वाल्हेकरवाडी ब्रिज सवेल मार्गे पुढे जाता येईल. अहिंसा चौक व रिव्हर व्हा चौकाकडून चापेकर उड्डाणपुलावरून जाण्यास बंदी असून रिव्हर व्हा चौकाकडून वाल्हेकरवाडी मागे अथवा अहिंसा चौक ते महावीर चौक अथवा एसकेएफ चौक मार्गे जाता येईल.

2024-09-16T08:40:32Z dg43tfdfdgfd