बातम्या

Trending:


Man Locked Wifes Private Parts : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावलं, पुण्यातील धक्कादायक प्रकार!

Pune Shocking News: पुण्यातील वाकड परिसरात चारित्र्याच्या संशयावरून एका व्यक्तीने पत्नीच्या गुप्तांगावर कुलूप लावले.


बारामतीपाठोपाठ शिरूरच्या EVM गोडाऊनमधली CCTV डिस्प्ले 24 तास बंद!

शिरूर, (चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी) : बारामती लोकसभेच्या ईव्हीएमवर सुरक्षिततेसाठीच्या सीसीटीव्हीचा डिस्प्ले 45 मिनिटे बंद पडल्याने मोठा वाद उभा राहिला. पण दुसरीकडे शिरूर लोकसभेच्या ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूमच्या सीसीसीटीव्हीचा डिस्प्ले 24 तास बंद होता. याची उमेदवारांच्या प्रतिनिधींना थोडीसुद्धा कल्पना नव्हती. कारण जागेवर कुणीच नव्हते. सीसीटीव्हीचा डिस्प्ले बंद असल्याची माहिती खात्रीदायक सूत्रांनी दिली असून, अधिकार्‍यांच्या ही बाब लक्षात...


Mumbai Water Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा; गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी आणि विलेपार्ले भागांतील पाणीकपातीचा निर्णय रद्द

Andheri Water Supply Updates: गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी आणि विलेपार्ले भागात पाणीकपात किंवा पुरवठ्यात व्यत्यय येणार नाही, असे बीएमसीने शुक्रवारी सांगितले.


निकालविलंबाचा भुर्दंड

मुंबई विद्यापीठाकरिता असे गोंधळ काही नवे नाहीत. कित्येकदा विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्त्यांसाठी किंवा उच्च शिक्षणासाठी अर्ज करायचे असतात, परंतु परीक्षांचे निकालच लागत नाहीत. खासकरून विद्यापीठातील व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये असे प्रकार अनेकदा घडतात.


Rakhi Sawant Health Updates : रुग्णालयात दाखल झाल्यानंतर राखी सावंतने स्वत: दिली हेल्थ अपडेट, म्हणाली गर्भाशयात गाठ आता...

Rakhi Sawant Health Updates : राखी सावंत (Rakhi Sawant) गेल्या दोन दिवसांपासून रुग्णालयात आहे. छातीत तीव्र वेदना होत असल्याच्या तक्रारीनंतर मंगळवारी सायंकाळी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. ड्रामा क्वीन अचानक रुग्णालयात दाखल झाल्याने चाहत्यांना धक्का बसला. अनेकांनी ती पुन्हा एकदा काहीतरी नौटंकी करत असावी असा कयास बांधला. मात्र, तिचा पूर्व पती रितेशने तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले. आता राखीने स्वतःच्या तब्येतीबद्दल अपडेट दिली आहे. राखीला...


TOP 80 : टॉप 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 18 May 2024 : ABP Majha

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची आज मालेगावात सभा, नतंर मुंबईत उज्ज्वल निकमांसाठी देखील प्रचार करणार ((मालेगावमध्ये गरजणार योगी आदित्यनाथ)) निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचा प्रचार आज संध्याकाळी संपणार, सोमवारी मुंबई, ठाणे, कल्याणसह १३ जागांवर मतदान ((आज थंडावणार प्रचाराच्या तोफा)) नकली शिवसेनेनं बाळासाहेबांना दगा दिला आणि शिवसैनिकांचा विश्वासघात केला, शिवाजी पार्कमधल्या सभेतून पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. चार जूननंतर मोदी पंतप्रधान राहणार नाहीत, फक्त मोदीच राहतील, उद्धव ठाकरेंची टीका, मोदींनी उद्धव ठाकरेंना संपवून दाखवावं, ठाकरेंचा घणाघात. राज ठाकरेंच्या भर मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे सात मागण्या, जे सत्तेत येणारच नाहीत त्यांच्यावर का बोलता म्हणत इंडिया आघाडीला टोला. मुलुंडमध्ये भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयाजवळ राडा... पैसे वाटप केल्याचा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून आरोप... मतदान झाल्यावर काही दिवसांनी मतदानाची टक्केवारी कशी वाढते याचं उत्तर द्या, एडीआर संस्थेच्या याचिकेवरून सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला निर्देश ((मतदान टक्केवारीवरून नि. आयोगाला निर्देश)) नागपूरह विदर्भाला दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट, हवामान खात्यानं वर्तवली वादळी पावसाची शक्यता ((विदर्भावर पुन्हा अवकाळीचं सावट)) मुंबईतला उकाडा सोमवारपर्यंत कायम राहण्याचा अंदाज, हवेतील आर्द्रता प्रचंड वाढल्यामुळे मुंबईकर घामाघूम ((मुंबईत पुढचे दोन दिवस उकाड्याचेच)) मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे आज आणि उद्या दीड तास बंद राहणार, ओव्हरहेड गँट्रीच्या कामासाठी पुण्याकडे जाणारी वाहतूक सकाळी साडे दहा ते दुपारी १२ पर्यंत बंद ठेवणार ((एक्स्प्रेसवे दीड तास बंद राहणार)) तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेतील बेपत्ता अभिनेता गुरुचरण सिंग २५ दिवसांनी घरी परतला, आध्यात्मिक यात्रेवर गेल्याचा दावा ((२५ दिवसांनी परतला गुरुचरण सिंग))


कुंभमेळ्यासाठी केंद्राकडून भरीव मदत देऊ : गडकरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- फुले, शाहू, आंबेडकरांची समतामूल्ये चिरकाल टिकून राहण्यासाठी तसेच देशात शिवशाही, रामराज्य आणण्यासाठी भारत विश्वगुरू बनने गरजेचे आहे. त्यासाठी देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांना पुन्हा विराजमान करण्याची आवश्यकता आहे, असे नमूद करत नाशिकमध्ये २०२७मध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी केंद्र सरकारकडून भरीव सहकार्य दिल्याशिवाय राहणार नाही, असे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग …


Baba Vanga Prediction : बाबा वेंगा यांचं हवामानाबाबत भाकीत काय सांगतं? खरंच येत्या काळात उष्णतेमुळे...

Baba Vanga Prediction : बाबा बांगा यांनी हवामानाबाबत भाकीत केलं असून येत्या काळात उष्णतेमुळे काय परिणाम होणार याबद्दल सांगितलंय.


छत्तीसगडमधील तरुणीवर कोल्हापुरात अत्याचार

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : नोकरीचे आमिष दाखवून छत्तीसगडमधील तरुणीला फूस लावून कोल्हापुरात आणून अत्याचार केल्याचे शुक्रवारी उघड झाले. संबंधित तरुणीने शिरोलीतील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना माहिती दिली. त्यानंतर सायंकाळी संबंधित तरुणीला घेऊन कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलिसप्रमुखांचे कार्यालय गाठले. तरुणीच्या तक्रारीवरून माजीद खान या तरुणाविरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली. त्याच्या शोधासाठी पथके रवाना झाली. दरम्यान, लव्ह जिहादचा संशय व्यक्त करत …


पुन्हा मुलींची बाजी!

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात सीबीएसईचा निकाल यंदाही उत्साहवर्धक राहिला आहे. या निकालाच्या डेटाचे विश्लेषण करण्याबरोबरच त्याच्या सामाजिक पैलूंचीही चर्चा होणे स्वाभाविक आहे. गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या ट्रेंडनुसार यंदाही दहावी आणि बारावीच्या परीक्षेत विद्यार्थिनींनी बाजी मारली आहे. विद्यार्थ्यांचे यशाचे प्रमाणही चांगले असले, तरी मुलींनी मुलांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. बारावी परीक्षेच्या निकालात एकूण …


Dadar Public Reaction on Lok Sabha : राज ठाकरे की उद्धव ठाकरे? दादरकरांची तुफान खडाखडी

Mahayuti Sabha at Shivaji Park : मुंबई : लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election 2024) पाचवा टप्पा येत्या 20 मे रोजी पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईत (Mumbai News) सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे. पाचव्या टप्प्यातील महायुतीची (Mahayuti) सांगता सभा आज दादरमधील (Dadar) शिवाजी पार्कवर (Shivaji Park) होणार आहे. आजच्या सभेसाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) उपस्थित राहणार असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) देखील हजेरी लावणार आहेत. पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर येणार आहेत. त्यामुळे आजच्या महायुतीच्या सभेकडे संपूर्ण राज्याचंच नाहीतर देशाचंही लक्ष लागलं आहे. दरम्यान या सभेबद्दल आणि एकुणच सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल जनतेला नेमकं काय वाटतंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे प्रतिनिधी नाजिम मुल्ला यांनी.


Hingoli News : माजी सरपंचावर तहसील कार्यालयासमोरच कोयत्यानं सपासप वार

हिंगोली, मनीष खरात, प्रतिनिधी : जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. माजी सरपंचावर धारदार कोयत्यानं हल्ला करण्यात आला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. विजय नरवाडे असं या माजी सरपंचांचं नाव आहे. जमिनीच्या जुन्या वादातून हा हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. या हल्ल्यात नरवाडे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणात दोन हल्लेखोरांना पोलिसांनी...


Raj Thackeray Speech : मोदींसमोर तोफ धडाडली, राज ठाकरेंच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे

Raj Thackeray Speech : येत्या 20 मे रोजी लोकसभा निवडणुकांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्याआधी महायुती आणि महाविकास आघाडीकडून सभांचा धडका लावण्यात आला. शिवतीर्थावर महायुतीची सभा पार पडली. या सभेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची देखील उपस्थित होती. कारण मनसेच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी महायुतीच्या सरकारला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर पुणे, कोकण, कल्याण-डोंबिवली आणि आता मुंबई अशा महत्त्वाच्या...


Pm Modi Vs Uddhav Thackeray : नकली शिवसेनेवरून उद्धव ठाकरे, नरेंद्र मोदी यांच्यात आरोप-प्रत्यारोप

मुंबईतल्या महायुती आणि इंडिया आघाडीच्या सभेतून एकमेकांवर सडकून टीका करण्यात आली. तर असली नकली शिवसेनेवरुन नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरेंमध्ये पुन्हा एकदा वार-प्रतिवार रंगला. तर शरद पवार यांनीही नकली शिवसेनेच्या टीकेवरुन मोदींना टोला लगावलाय. तर उद्धव ठाकरेंनी देखील सडकून टीका केली "बाळासाहेबांची घराणेशाही चालत नाही, पण गद्दाराच्या कार्ट्याला उमेदवारी देता. ज्या प्रमोद महाजनांनी भाजप वाढवण्यासाठी खस्ता खाल्ल्या, त्यांच्या मुलीला उमेदवारी नाकारली. पूनम तुमच्या पक्षात असली तरी प्रमोद महाजन आणि माझे भावासारखे संबंध होते", असे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले. मुंबईतील बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित होते. उद्धव ठाकरे म्हणाले, एकीकडे आपण जमलो आहेत. दुसऱ्या बाजूला गद्दार आणि भाडोत्री जमले आहेत. सगळे बेअकली आणि नकली आहेत. 4 जूनपर्यंत पंतप्रधान बोलायला उभे राहिले आहेत. कारण 4 जूननंतर ते पंतप्रधान नसणार आहेत. ज्याप्रमाणे मोदींनी नोटबंदी जाहीर केली. त्याप्रमाणे 4 जून ला संपूर्ण देश डिमोदीनेशन करणार आहे. तुमची मुंबईत पंतप्रधान म्हणून शेवटी सभा आहे.


Cyber Crime : व्यावसायिकाला तब्बल एक कोटीचा गंडा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर मोठा परतावा देण्याचे प्रलोभन दाखवत सायबर चोरट्यांनी एका व्यावसायिकाला एक कोटी 20 लाखांचा आर्थिक गंडा घातला आहे. व्यावसायिकाने आपले पैसे सायबर चोरट्यांच्या हवाली तर केलेच; शिवाय बहिणीचे देखील पैसे दिले. याप्रकरणी भवानी पेठेतील 55 वर्षीय व्यावसायिकाने शिवाजीनगरमधील सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान …


Kanhaiya Kumar : कन्हैया कुमार यांच्या रॅलीत घुसून तरुणाने मारली कानाखाली, VIDEO

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरू आहे. पाचव्या टप्प्यात आता मतदान होणार आहे. दिल्लीमध्ये काँग्रेसचे उमेदवार कन्हैयाकुमार हे प्रचार करत होते. यावेळी गर्दीमध्ये घुसून आलेल्या 2 तरुणाने कन्हैयाकुमार यांच्या श्रीमुखात भडकावली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दोन्ही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी नवी दिल्लीमध्ये नंदननगरी परिसरामध्ये काँग्रेसचे उमेदवार कन्हैया कुमार प्रचार करत होते. आपल्या...


Loksabha election 2024 | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

CM Eknath Shinde Serious Allegation On Uddhav Thackeray


Pune Crime News : महादेव अॅपमधून कोट्यावधींची उलाढाल; पोलिसांची धडक कारवाई, 45 लॅपटॉप, 89 मोबाइल जप्त

पुणे : पुणे ग्रामीण पोलिसांनी नारायणगावातील (Pune Crime news) एका तीन इमारतीवर छापेमारी केली आहे. ‘महादेव बेटिंग ॲप’संबंधी केलेल्या कारवाईत पोलिसांच्या हाती मोठं धबाड लागलं आहे. तब्बल 62 लाख 74 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या ऑनलाईन जुगारांच्या आर्थिक व्यवहार आणि पैसा वळवण्यासाठी 452 बँक खात्यांचा वापर करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. या अॅपच्या माध्यमातून कोट्यावधींची उलाढाल झाल्याची माहित आहे. महादेव सट्टेबाजी अॅपच्या...


जंगलात चरण्यासाठी गेलेल्या जनावरांना विषबाधा


Yogi Adityanath: योगींच्या सभेने वातावरण बदलणार? डॉ. भामरेंच्या प्रचारार्थ आज मालेगावी दौरा

Yogi Adityanath Malegaon Sabha: भाजप महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची आज (दि. १८) मालेगावात जाहीर सभा होत आहे.


Maharashtra Superfast News : वारे निवडणुकीचे : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 17 May 2024

छगन भुजबळ नाराज असल्याचं कानावर, जयंत पाटलांची प्रतिक्रिया तर भुजबळ फक्त जागावाटपार्यंतच नाराज होते, तटकरेंचं स्पष्टीकरण शरद पवारांचा मुक्काम असलेल्या हॉटेलला सुनील तटकरेंची भेट, अनिल देशमुखांचा दावा, संपर्कात आलं तरी कोणालाही परत घेणार नसल्याचं वक्तव्य ११ मे पासून माध्यमापासून दूर असणारे अजित पवार महायुतीच्या सभेत भाषण ठोकणार अजितदादा पुन्हा सक्रिय झाल्याची तटकरेंची माहिती मुंबईतल्या शिवाजी पार्कवर होणाऱ्या महायुतीच्या सांगता सभेत मोदी आणि राज ठाकरेंची तोफ धडाडणार , सभेपूर्वी मोदी चैत्यभूमी, सावरकर स्मारक आणि बाळासाहेब स्मृतीस्थळाला भेट देणार गेल्या १० वर्षांपासून बहुमत असतानाही संविधान बदलण्याचा प्रयत्न नाही,.... केवळ राजकीय स्थैर्यासाठीच ४०० जागा हव्यात... केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचं स्पष्टीकरण महामुंबईसाठी बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची महासभा.. शरद पवार, उद्धव ठाकरे, मल्लिकार्जुन खरगेंसह अरविंद केजरीवालही उपस्थित राहणार मुंबई पोलिसांना चकवा देण्यासाठी चार शहरं फिरणारा भावेश भिंडे अखेर उदयपूरमधून गजाआड, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई, तपास गुन्हे शाखेकडे दहावी आणि बारावी बोर्डाचा निकाल मे महिन्यातच, बारावीचा येत्या आठवड्यात तर दहावीचा शेवटच्या आठवड्यात निकाल जाहीर होणार मुंबईत उष्णतेसोबत आर्द्रता वाढणार, दमट वातावरणामुळे उकाड्यात आणखी भर पडणार, २४ तास उष्ण आणि दमट वातावरण


Navi Mumbai Work From Home Scam: महिलेने ४ दिवसांत गमावले ५४ लाख; फसवणूक करणाऱ्यांचा प्लॅन वाचून व्हाल चकित

झालं असं की, नवी मुंबईतील ऐरोली येथे स्थायिक असणारी एक ३७ वर्षीय गर्भवती महिला आपल्या प्रसुती रजेवर असताना घरबसल्या अतिरिक्त कमाईसाठी काम शोधत होती. अन् मग...


Devendra Fadnavis on Ajit Pawar : सिंचन घोटाळ्याचे आरोप खरे, पण अजित पवार दोषी नाहीत- फडणवीस

सिंचन घोटाळ्याचे आरोप सत्य आहे, पण अजित पवार दोषी नाहीत, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. खात्याचे मंत्री म्हणून जबाबदार मात्र अजितदादांविरुद्ध पुरावा नाही, अशी स्पष्टोक्ती देखील फडणवीसांनी दिली. हेही पाहा सिंचन घोटाळ्यात देवेंद्र फडणवीस यांना जावई शोध कधी लागला Prithviraj Chavan on Devendra Fadnavis : सिंचन घोटाळ्यात देवेंद्र फडणवीस यांना जावई शोध कधी लागला हे स्पष्ट केलं पाहिजे, जर त्यांना हा शोध लागला तर त्यांनी पंतप्रधानांना का सांगितलं नाही? असा खोचक सवाल ज्येष्ठ काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. कथित 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यात फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना म्हणाले की, अजित पवार हे त्या खात्याचे प्रमुख असल्यामुळे त्यांच्यावर आम्ही आरोप केले. त्यांना जबाबदार धरणे साहजिकच होते. तपास यंत्रणांनी सर्व काही तपासले. परंतु कोणत्याही आरोपपत्रात, यंत्रणांनी अजित पवारांवर थेट भूमिका असल्याचं म्हटलेलं नाही. आपल्याला यंत्रणा आणि त्यांच्या तपासाला सामोरे जावे लागते, असे म्हणाले होते. शोध लागला तर त्यांनी पंतप्रधानांना का सांगितलं नाही? फडणवीस यांनी मांडलेल्या भूमिकेनंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी खोचक शब्दात विचारणा केली आहे. ते म्हणाले की, अजित पवार यांना मंत्री करण्यापासून ते सोबत घेण्यापर्यंत भाजपचा मोठा विरोध होता. सिंचन घोटाळा, बँक घोटाळा हे पंतप्रधानांनी सांगितलं. एवढे आरोप असलेल्या अजित पवारांना यापुढे सोबत घेऊ नका असंही त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना हा जावई शोध कधी लागला हे स्पष्ट केलं पाहिजे. जर त्यांना हा शोध लागला तर त्यांनी पंतप्रधानांना का सांगितलं नाही? असा खोचक सवाल त्यांनी केला. ते म्हणाले की, पंतप्रधान यांनी केलेला आरोप ग्राह्य धरायचा की देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले ते ग्राह्य धरायचं? मी मुख्यमंत्री असताना त्यांच्याच विभागाने मला ही माहिती दिली होती. त्यांनी सांगितले की, मनसेकडून आज मुंबईत पंतप्रधानांची सभा बोलावली आहे. त्यामुळे किमान आज त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच आश्वासन दिलं पाहिजे. आम्ही ही लढाई सुरु केली होती, असेही त्यांनी सांगितले.


CM Eknath Shinde | 'उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंनाही त्रास दिला', झी 24 तासच्या मुलाखतीत गौप्यस्फोट

CM Eknath Shinde Allegation Of Uddhav Thackeray Not Good With Anand Dighe