VIRAL : 200 लोकांसमोर राणी द्यायची मुलांना जन्म, प्राचीन काळातील विचित्र प्रथा, कारण धक्कादायक!

Weird Traditions in Marathi : घरात पाळणा हलणार म्हटल्यावर कुटुंबात आनंदाचं वातावरण असतं. हा क्षण महिलांच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय असतो. आजकाल महिलेचे प्रसूती ही हॉस्पिटलमध्ये होते. नवीन ट्रेंडनुसार डॉक्टर प्रसुतीच्या वेळी महिलेच्या पतीला लेबर रुममध्ये येण्याची परवानगी देतात. एकतर यामागे संकल्पना म्हणजे महिलेला प्रसुतीमागे होणारा त्रास हा नवऱ्या समजावा हा असतो. शिवाय आई वडिलांच्या आयुष्यातील सर्वात अनमोल क्षण कॅमेऱ्यात टिपण्यासाठीही ही संधी दिली जाते. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्यचा धक्का बसेल की प्राचीन काळात राजघराण्यातील महिला किंवा राण्या या 100-200 लोकांसमोर बाळाला जन्म देतात. या विचित्र प्रथेमागे कारणही तेवढंच धक्कादायक आहे. (weird traditions In front of 200 people the queen gave birth to children bizarre viral news)

History.com वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, 1 नोव्हेंबर 1661 ला फ्रान्सचा राजा लुई चौदावा यांच्या पत्नी मेरी थेरेसची प्रसूतीचा वेळ झाली होती. त्यावेळी राणीच्या प्रसुतीच्या वेळी खोलीमध्ये माणसांची गर्दी झाली होती. राजकन्या, राजकुमार आणि राजघराण्याशी संबंधित इतर लोक राण्याच्या खोलीत एकत्र झाले होते. धक्कादायक म्हणजे या असंख्य लोकांच्या समोर त्या राणीने बाळाला जन्म दिला. एवढंच नाही तर राणीच्या खोली बाहेरही असंख्य लोक एकत्र झाली होती. तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की राणीला मुलगा झाला सर्वत्र एकच आनंदाच वातावरण होतं. 

मीडिया रिपोर्टनुसार फ्रान्सची राणी मेरी एंटोइनेट यांनीही 1778 मध्ये सुमारे 200 लोकांसमोर आपल्या बाळाला नवीन दुनियेत आणलं होतं. प्रसूतीच्या वेळी राजवाड्याच्या बाहेर दिवाळीसारखा उत्साह होता. रिपोर्टनुसार प्रसुतीवेळी लोक नाचायचे आणि गायचे. जेव्हा राणीने बाळाला जन्म दिला तेव्हा एवढा गोंगाट, गोंधळ आणि गर्दी होती की राणी बेशुद्ध झाली होती. त्यानंतर राणीच्या खोलीच्या खिडक्या उघडण्यात आल्या भिंती तोडल्या गेल्या. 

'या' विचित्र प्रथेमागील कारण काय?

प्राचीन काळी राजघराणे पुढे येण्यासाठी राजांना मुलगा हवा असायचा. अशावेळी साम्राज्याला वारस होत असताना कोणी त्या बाळाची अदलाबदल करु नये किंवा शत्रू मूल चोरु नये म्हणून राणीच्या प्रसुतीच्या वेळी खोलीत साक्षीदार म्हणून असंख्य लोक असायची. राणीला मुलगा झाली की मुलगी हे सिद्ध होण्यासाठी या लोकांची मदत मिळायची. त्याशिवाय राजांचं साम्राज्य कोणी बळकावू नये म्हणून इतर कोणाच्या मुलगा राजा म्हणून राज्यभिषेक होऊ नये यासाठी हा सगळा आटापीटा असायचा. तसंच प्रसुतीच्या वेळी मूल मृत जन्माला आलं होतं हे सांगण्यासाठी असंख्य साक्षीदार असायचे. या जगाच्या पाठीवर आणि इतिहासात अनेक धक्कादायक प्रथा पाहिला मिळतात. 

2024-05-07T18:54:11Z dg43tfdfdgfd