अनपेक्षित संकटांसाठीची तयारी

[author title=”डॉ. धनंजय त्रिपाठी विश्लेषक” image=”http://”][/author]

आजच्या काळात सुरक्षेचा मुद्दा हा केवळ सीमा सुरक्षा या पारंपरिक विचारांपुरताच मर्यादित नसून, आता त्यात अनेक पैलू जोडले गेले आहेत. उदा. आपल्या देशातील आर्थिक प्रणालीवर सायबर हल्ला झाला तर दोन ते तीन दिवस अर्थव्यवस्था विस्कळीत राहू शकते किंवा शेअर बाजारात डिजिटल घुसखोरी केली गेली, तर बाजार ठप्प पडेल. याशिवाय पॉवर ग्रीड आणि त्याच्या वितरण व्यवस्थेत अडथळे आणण्याचा प्रयत्नही ‘ब्लॅक स्वॅन’मध्ये मोडतो.

भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी सशस्त्र दलाला ‘ब्लॅक स्वॅन’ म्हणजेच अनपेक्षित घटना, संकटावर मात करण्यासाठी सतत सज्ज राहिले पाहिजे, असे आवाहन केले. अर्थातच हे आवाहन संयुक्तिक आहे; कारण आजघडीला देशादेशांत असणारी सामारिक स्पर्धा पाहता तंत्रज्ञानाच्या बळावर देण्यात येणारे धक्कातंत्र हे नवीन क्षेत्र म्हणून समोर आले आहे.

‘ब्लॅक स्वॅन’चा संदर्भ हा अनाकलनीय, अचानक, अनपेक्षित व कल्पनेपलीकडील घटनांशी संबंधित आहे. आजच्या काळात सुरक्षेचा मुद्दा हा केवळ सीमा सुरक्षा या पारंपरिक विचारांपुरताच मर्यादित नसून, आता त्यात अनेक पैलू जोडले गेले आहेत. यात मानवी सुरक्षा, आर्थिक सुरक्षा, ऊर्जा सुरक्षा आदी पैलूंचा विचार केला जातो. अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरचा हल्ला. त्याबाबत कोणीही विचार केला नव्हता. भारतीय संसदेवरचा हल्ला हीसुद्धा अचानक घडलेली घटना होती. संसदेभोवती कडक सुरक्षा व्यवस्था असूनही दहशतवाद्यांनी त्रुटी हेरत भारतीय लोकशाहीला संकटात टाकले.

सध्याच्या काळात लाल समुद्रात सुरू असलेले हल्ले. त्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि पुरवठा साखळीवर होत आहे. आजच्या काळात जागतिक अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य पाहिले तर त्यात परस्पर अवलंबिता आणि इंटरनेट याचे घनिष्ट नाते दिसून येते. विविध पुरवठा साखळ्या या एकमेकांना जोडलेल्या आहेत आणि त्यापैकी एकालाही अडथळा आला तर अर्थव्यवस्था कोलमडून पडते. अशावेळी लष्करप्रमुख जनरल पांडे यांचा विचार महत्त्वाचा आहे.

या घटनांवरून केवळ भारतच नाही, तर जगातील सर्व मोठे देश साशंक राहत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारचे धोके केवळ देशांकडून उत्पन्न होत नाहीत, तर ‘नॉन स्टेट अ‍ॅक्टर’ही अशा प्रकारची स्थिती निर्माण करू शकतात. उदा. हिंद महासागरात एखादा मोठा दहशतवादी हल्ला झाला तर भारताच्या आर्थिक हितांना मोठी बाधा येऊ शकते; कारण या क्षेत्रातूनच तेलाची आयात होते आणि तोच आपल्या ऊर्जा सुरक्षेचा मुख्य आधार मानला जातो. ही एकप्रकारे ‘ब्लॅक स्वॅन’ घटना असेल; कारण आपण त्यासंदर्भात कधीही विचार केला नव्हता आणि परिणामी आपण अडचणीत येतो. जनरल पांडे यांनीदेखील पुरवठा साखळीच्या सुरक्षेवरूनही मुद्दे मांडले आहेत.

विशेषत: हिंद महासागर क्षेत्रात यासंदर्भात चिंता व्यक्त केली जात आहे. भविष्यात एखादे मोठे भू-राजकीय किंवा सामरिक संकट निर्माण झाले, तर ते हिंद महासागर क्षेत्रातच होईल, असे भाकित केले जात आहे. या प्रकारची चिंता व्यक्त करण्याचे कारण म्हणजे चीनचा वाढता हस्तक्षेप आणि सक्रियता. अलीकडेच चीनने नवीन नकाशा जारी केला असून, त्यावरून आग्नेय आशियात मोठी चर्चा झाली.

यावरून चीनवर बरीच टीका झाली. अर्थात, कल्पनेपलीकडची गोष्ट घडवण्यात चीनचा हातखंडा आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. काही दिवसांपूर्वीच भारताच्या संरक्षणप्रमुखांनीही चीन हे आपल्यासमोरचे सर्वात मोठे आव्हान असल्याचे अधोरेखित केले होते. या द़ृष्टिकोनातूही भारत व चीन यांच्यात चांगले संबंध असायला हवेत, असे सांगितले जात आहे. यात सीमावाद हा महत्त्वाचा पैलू आहे; कारण सीमेवर तणाव आहे, तोपर्यंत राजकीय संबंध चांगले राहणार नाहीत.

2024-04-20T04:39:03Z dg43tfdfdgfd