इचलकरंजी : युवतीचा विनयभंग करणार्‍या फरार डॉक्टरला एक महिन्याने बेड्या

इचलकरंजी : पुढारी वृत्तसेवा

रुग्णालयात युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या डॉ. अभिनंदन धोतरे (रा. महाराणा प्रताप चौक, इचलकरंजी) या संशयितास पोलिसांनी अटक केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित धोतरे तब्बल महिनाभरापासून पसार होता. न्यायालयाने त्यास एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

इचलकरंजी : यळगूड येथील ‘त्या’ दुर्दैवी मुलीचा मृतदेह आढळला पंचगंगेत

गावभाग पोलिसांनी धन्वंतरी क्लिनिकचा डॉ. अभिनंदन धोतरे या संशयितावर गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून डॉ. धोतरे पसार होता. या घटनेचे संतप्त पडसादही उमटले होते. त्यातूनच धोतरे याच्या दवाखान्यावर दगडफेक करण्यात आली होती. तसेच साहित्याचीही मोडतोड करण्यात आली होती. दरम्यान, जिल्हा न्यायालयाने डॉ. धोतरेचा अटकपूर्व जामीनही फेटाळला होता. संशयित डॉ. धोतरे यास शुक्रवारी रात्री पोलिसांनी अटक केली. शनिवारी त्याला न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. अधिक तपास पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे करीत आहेत.

2024-09-08T01:17:35Z dg43tfdfdgfd