केमिस्ट्रीमध्ये 100 पैकी 100 मार्क्स, कोणत्याही कोचिंगविना गरीब शेतकऱ्याची पोरगी

विकास पाण्डेय, प्रतिनिधी

सतना : कोणत्याही कोचिंगविना, ट्यूशनविना बोर्डाच्या परीक्षेतही चांगले यश मिळवता येते, हे एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीने सिद्ध करुन दाखवले आहे. कोणत्याही कोचिंगविना, यूट्यूबच्या मदतीने अभ्यास करत एका शेतकऱ्याच्या मुलीने विज्ञान विद्याशाखेत राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे.

अंशिका मिश्रा असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. अंशिकाने 500 पैकी तब्बल 493 गुण मिळवले आहे. मध्यप्रदेश शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये रीवा जिल्ह्यातील अंशिका मिश्राने हिने राज्यात विज्ञान विद्याशाखेत पहिला क्रमांक मिळवला.

अंशिका ही एका मध्यमवर्गीय कुटुंबातून येते. तिचे वडील शेतकरी आहेत. तसेच आई ही गृहिणी आहे. त्यामुळे आर्थिक रुपाने दुर्बल कुटुंबातील या विद्यार्थिनीने सेल्फ स्टडीच्या माध्यमातून हे यश मिळवले. अनेक विद्यार्थी हे सर्व साधने असतानाही अपयशी होतात. मात्र, अंशिकाने कोणत्याही कोचिंग, ट्यूशनविना 500 पैकी 493 गुण मिळवत विज्ञान विद्याशाखेत राज्यात पहिला क्रमांक मिळवला.

काय आहे अंशिकाचे स्वप्न -

सतना शहरातील बोदाबाग रविदास नगरमध्ये भाड्याच्या खोलीत राहून शिक्षण घेणारी अंशिका हिचे वडील ज्ञानेंद्र मिश्रा शेतकरी आहेत. तर तिची आई ही गृहिणी आहे. अंशिका ही बोदाबागमधील संचालित शिक्षा इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. लोकल18 शी बोलताना तिने सांगितले की, ती 24 तासांपैकी जवळपास 10 ते 12 तास अभ्यास करायची. तसेच एकाग्रतेने अभ्यास केल्याने आपल्याला विषय चांगल्याप्रकारे लक्षात राहतो. भविष्यात मला आयएएस व्हायचे आहे, असे तिचे स्वप्न तिने यावेळी सांगितले.

रसायनशास्त्रात 100 पैकी 100 गुण -

अंशिकाने विज्ञान विद्याशाखेत बारावीचे शिक्षण घेतले. यामध्ये तिने 500 पैकी 493 गुण मिळवले. विशेष म्हणजे यामध्ये तिने रसायनशास्त्रात 100 पैकी 100 गुण मिळवले. तर भौतिकशास्त्रात 100 पैकी 98, गणितात 100 पैकी 99, हिंदीमध्ये 100 पैकी 97 आणि इंग्रजीमध्ये 100 पैकी 99 गुण मिळवले. तिच्या या यशानंतर तिच्या कुटुंबामध्ये एकच आनंदाचे वातावरण आहे. तिच्या कुटुबीयांनी तिच्या या यशाचे श्रेय तिच्या सर्व शिक्षकांना देत त्यांचे आभार मानले.

2024-04-26T03:18:05Z dg43tfdfdgfd