गोंदिया : बेपत्ता युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : देवरी तालुक्यातील सालेगाव परिसरात एका युवकाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा मृतदेह सुब्रायटोला येथील ६ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या रुतिक सुनील सोनवाने (वय २२) या युवकाचे असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. ही घटना मंगळवारी (दि.17) सायंकाळी उघडकीस आली.मृत रुतिक सोनवाने १२ सप्टेंबरच्या पहाटेपासून बेपत्ता झाला होता. याबद्दल त्याचे वडील सुनील सोनवाने यांनी १३ सप्टेंबर रोजी देवरी पोलीस ठाण्यात तशी तक्रारही नोंदवली होती.

यवतमाळ : वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह तीन दिवसानंतर आढळला

दरम्यान, पोलीस तपास सुरु असताना सहाव्या दिवशी त्याचा मृतदेह सालेगाव शिवारातील नाल्यात कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार बोपचे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. यावेळी मृतदेहाची ओळख पटल्यानंतर ठाणेदार प्रवीण डांगे यांनी घटनास्थळाला भेट दिली. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. तपासात मिळालेल्या माहितीनुसार रुतिकने ११ सप्टेंबर रोजी विषारी औषध प्राशन केले होते. रुतिकच्या मृत्यूचे रहस्य हे पोलीस तपासात निष्पन्न होणार आहे. मात्र, रुतिक सोनवाने याने जीवन संपवले नसून त्याची हत्या झाल्याची चर्चा गावात रंगल्या आहेत. या घटनेचा अधिक देवरी पोलीस करीत आहेत.

2024-09-18T13:22:04Z dg43tfdfdgfd