छ. संभाजीनगर ऑनर किलिंग प्रकरणातील हल्ल्याचा EXCLUSIVE VIDEO समोर

छत्रपती संभाजीनगर, सिद्धार्थ गोदाम, प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगर ऑनर किलिंगच्या घटनेनं हादरलं आहे. आंतरजातीय विवाह केला म्हणून मुलीच्या वडिलांनी आणि भावानेच तरुणाची हत्या केली आहे. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ज्याच्यावर प्रेम केलं त्याच्यासोबतच लग्न झालं म्हणून तरुणी आनंदात होती. मात्र हा आनंद एक महिनाही टिकला नाही. तरुणीच्या भावानं आणि वडिलांनी तरुणाची हत्या केली. अमित साळुंखे असं हत्या झालेल्या 22 वर्षांच्या तरुणाचं नाव आहे. अमितने आपल्या बालपणीच्या मैत्रिणीसोबत पळून जाऊन लग्न केले होते. मात्र मुलीच्या वडिलांनी आणि भावाने अमित वर 14 जुलै रोजी चाकू आणि तलवारीने हल्ला केला. उपचारादरम्यान शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला.

अमित साळुंखे नावाच्या 22 वर्षांच्या गोंधळी समाजाच्या मुलाशी विद्या किर्तीशाही हीने पळून जाऊन लग्न केले. मुलाच्या कुटुंबाने या आंतरजातीय विवाहाचा स्वीकार केल्याने ते परत छत्रपती संभाजीनगर येथील इंदिरा नगरमध्ये राहायला आहे. मात्र मुलीच्या कुटुंबाने लग्न मान्य केलं नाही. त्याच्यावर 14 जुलै रोजी हल्ला करण्यात आला होता. अमित पबजी खेळत असतांना मित्रांनी त्याला बाहेर बोलावले. बाहेर आल्यावर विद्याच्या चुलत भावांनी अमितवर चाकू तलवारीने हल्ला केला आणि अमितचा बळी गेला. पबजी खेळतच तो बाहेर पडला. त्याच्यावर हल्ला झाला त्यावेळी त्याने केलेली आरडाओरड त्यांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाली आहे. अंगावर शहारे आणणारा अमितच्या आवाजाचा व्हिडीओ समोर आला आहे.

विद्या आणि अमित दोघेही इंदिरानगर मध्येच लहानाचे मोठे झाले. बालपणीचे हे मित्र एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी पळून जाऊन पुण्यात विधिवत लग्न केले. अमितच्या घरच्यांचा पाठिंबा मिळाल्याने ते परत आले. 13 जूनला त्यांनी लग्न केले आणि लग्नाचा एक महिना झाला असतानाच 14 जुलै रोजी अमित वर भर चौकात हल्ला झाला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या अमितचा उपचारादरम्यान मृ्त्यू झाला आहे.

2024-07-27T03:03:42Z dg43tfdfdgfd