पृथ्वीच्या गर्भात काय?

जॉर्जिया : पृथ्वीच्या गर्भात काय आहे, असा प्रश्न कधी ना कधी नक्कीच पडला असेल. हेच पाहण्याचा एका व्यक्तीने प्रयत्न केला. ही व्यक्ती पृथ्वीच्या गर्भात गेली. आतमध्ये जे दिसले ते दृश्य पाहून सर्व जण थक्क झाले आहेत. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

एलिसन गुहा ही अमेरिकेच्या जॉर्जियामध्ये आहे. अ‍ॅपलाचियन पठारावरील पिजन माउंटनवर वॉकर काउंटीमध्ये ही गुहा आहे. ही युनायटेड स्टेटस्मधील 12 वी सर्वात खोल गुहा आहे, ज्याला फॅन्टॅस्टिक पिट असे नाव देण्यात आले आहे. गुहा 12 मैल (19.31 किमी) लांब आणि 1063 फूट (324 मीटर) खोल आहे. या इतक्या खोल गुहेत एक व्यक्ती दोरीच्या मदतीने उतरली. आतील फोटो काढले.

जे सोशल मीडिया वर पोस्ट करण्यात आले असून, दृश्य पाहून लोक थक्क झाले. या गुहेत यूट्यूबरनी आत कॅमेरा सोडला आणि आतील दृश्य दाखवले होते. जसजसा कॅमेरा आत खोलवर गेला तसतसे अद्भुत आणि भीतिदायक दृश्य दिसू लागले. कुणी आपल्याला विचित्र आकृत्या, तर कुणी भूत दिसल्याचेही सांगितले.

2024-09-15T23:43:50Z dg43tfdfdgfd