बीडमध्ये पकडं एवढं मोठं घबाड; पैसे पाहून पोलिसांचेही डोळे विस्फारले

बीड, सुरेश जाधव प्रतिनिधी : बीडमधून मोठी बातमी समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. निवडणूक काळात कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत यासाठी बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी चेकपोस्ट कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. गेवराई तालुक्यातील खामगाव चेकपोस्टवर  एका आलिशान कारमधून नेण्यात येत असलेली कोट्यवधी रुपयांची रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. कारचालकाकडे कोणतेही कागदपत्रं नसल्यानं पोलिसांचा संशय बळावला आहे. एवढे मोठे पैसे या गाडीत कुठून आले? हे पैसे कोणाचे आहेत याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, निवडणूक काळात बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी चेकपोस्ट कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. गेवराई तालुक्यातील खामगाव चेकपोस्टवर पोलिसांकडून तपासणी सुरू असताना एका आलिशान कारमधील लोखंडी पेटीत पोलिसांना तब्बल एक कोटी रुपये आढळून आले आहेत. या घटनेनं खळबळ उडाली आहे.

कार चालकाकडे कोणतेही कागदपत्रे नसल्याने पोलिसांचा संशय बळावला आहे. दरम्यान पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले आहे. एम एच 23 एचडी 0366 असा गाडीचा नंबर आहे. ड्रायव्हरकडे कुठलेच कागदपत्रं आढळून न आल्याने त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात चौकशी सुरू आहे. चौकशी करूनच ही रक्कम कुठून आणली, कोणाची आहे याबाबत सत्य समोर येईल अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

2024-05-05T04:38:56Z dg43tfdfdgfd