मुंबईत जॉबसाठी MARATHI PEOPLE NOT WELCOME म्हणणाऱ्या HRने मागितली माफी

मुंबई : मुंबईत एका कंपनीत नोकरीची संधी असल्याची जाहिरात पोस्ट करणाऱ्या एचआर मॅनेजरने माफी मागितली आहे. मुंबईत नोकरीसाठी जागा आहेत अशी पोस्ट करताना एच आर मॅनेजरने मराठी उमेदवार नको असं स्पष्ट लिहिलं होतं. ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. शेवटी एच आर मॅनेजरला या प्रकरणी माफी मागावी लागली.

गुजरातमधील फ्रीलान्स एचआर रिक्रूटर आणि सल्लागार यांनी ग्राफिक डिझायनर पोस्टसाठी मुंबईत नोकरीची जागा असल्याची पोस्ट शेअर केली होती. पण या पोस्टसाठी असलेल्या पात्रतेत मराठी उमेदवार नसावा असं लिहिलं होतं. मुंबईत केवळ मराठी असल्यानं उमेदवार नको असं लिहिल्यानं यावर संतापाची लाट उसळली.

मुंबईतच ग्राफिक डिझायनर हवा असल्याच्या जाहिरातीत उमेदवाराची पात्रता लिहिताना त्याला काय यायला हवं याचा तपशील दिला आहे. दरम्यान, त्यात मराठी लोक उमेदवार म्हणून नको असं स्पष्ट लिहिलं होतं. जर एखाद्याकडे कौशल्ये असतील तर तो मराठी आहे म्हणून डावलणार का? असा प्रश्न विचारत मराठीच्या गळचेपीवरून संतप्त भावना व्यक्त केल्या गेल्या.

एचआर कडून शेवटी माफी मागत हे नजरचुकीने झाल्याचं सांगण्यात आलं. एच आर मॅनेजरने म्हटलं की, मी तुमची मनापासून मागते. काही दिवसांपूर्वी ग्राफिक डिझायनरसाठी पोस्ट टाकली होती. त्यात एका आक्षेपार्ह वाक्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या. आम्ही कोणत्याही प्रकारचा भेदभाव करण्याच्या भूमिकेचं समर्थन करत नाही. अनावधानाने हे झालं आहे.

9 वर्षात बांधला अर्धा किमी लांब ब्रिज; 917 अब्ज रुपयांचा खर्च, ना गाडी धावते, ना ट्रेन

दरम्यान, राज्य सरकारनेही ही बाब गांभीर्याने घेत याप्रकरणाची चौकशी केली जाईल असं म्हटलंय. तसंच हे खपवून घेतलं जाणार नाही अशा शब्दात राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी इशारा दिला. मुंबईतील ज्या फ्री लांसर कंपनीने मराठी पीपल आर नॉट वेलकम हिअर अशा पद्धतीचा सोशल मीडियावर मेसेज व्हायरल केला आहे त्या कंपनी ची संपूर्ण चौकशी केली जाईल अशी माहिती आज शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. ते पुढे म्हणाले की, अशी पोस्ट टाकता येते का ते तपासून पाहायला सांगितल जाईल. आम्ही मराठी भाषा धोरण जाहीर केलं असताना अशा पद्धतीची पोस्ट टाकता येते का याची माहिती मागवली जाईल. अशा कंपन्या महाराष्ट्रात नसल्या तरी चालतील आम्ही नव्या कंपन्या उभ्या करू पण असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत.

2024-05-06T07:58:17Z dg43tfdfdgfd