मुलुंडमध्ये गणेश मंडळाच्या 2 कार्यकर्त्यांना BMWने उडवलं, एकाचा मृत्यू

मुंबई : गणेशोत्सावानिमित्त सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. बाप्पाच्या आगमन आज होत आहे. दरम्यान, मुलुंडमध्ये मुलुंडचा राजा गणपती मंडळाच्या दोन कार्यकर्त्यांना बीएमडब्ल्यू कारने धडक दिल्याची घटना घडलीय. यात एकाचा मृत्यू झाला असून दुसऱ्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आलीय. कारने धडक दिल्यानंतर कार चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.

लुंडचा राजा गणपती मंडळाच्या मंडपाची तयारी कार्यकर्ते करत होते. पहाटे चारच्या सुमारास प्रीतम थोरात आणि प्रसाद पाटील हे बॅनर लावत होते. त्यावेळी भरधाव कारने दोघांना जोराची धडक दिली. ही कार कँपस हॉटेलकडून मुलुंड पूर्व ते वेस्टच्या ब्रीजकडे निघाली होती.

अपघातानंतर कार चालक न थांबता मुलुंड पश्चिमच्या दिशेने गेला. अपघातात प्रीतम थोरातचा मृत्यू झाला तर प्रसाद पाटील याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आलीय. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत.

2024-09-07T04:14:22Z dg43tfdfdgfd