राज्यातील आरक्षण युद्ध सरकार पुरस्कृत?

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण आणि ओबीसी आंदोलनाचा मुद्या ऐरणीवर असताना या संदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकार टीका केली आहे. या वेळी ते म्हणाले, राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी आंदोलन असे सुरु आहे पण हे सरकार पुरस्कृत तर नाहीत ना? असे प्रश्न आता लोकांपुढे आहेत. गोंदिया जिल्ह्यातील पूर परिस्थिती पाहणी करताना माध्यमांशी ते बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण हा विषय कसा निर्माण झाला. यावर मला आता बोलायच नाही, पण राज्यात आरक्षणाचा प्रश्न हा अनेक दिवसांपासून चाललेला आहे. प्रत्येकाला आरक्षण मिळावे, संविधानानुसार प्रत्येकाला न्याय मिळावा ही भूमिका तर आहेच, सरकारने पण हीच भूमिका घेऊन पुढे जाणे गरजेचे आहे.

देशाच्या गृहमंत्र्यांनी 150 कलेक्टरांना फोन करून धमकावले : नाना पटोले

पुढे नाना पटोले म्हणाले की, सरकार पुढे आम्ही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आरक्षण संदर्भात जनगणना हा त्या सगळ्यांचा मूळ गाभा आहे. जातीनिहाय जनगणना केल्यावरच कुणाला आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण देता येणार, हे विविध समाजातील आकडे जोपर्यंत केंद्र सरकार पर्यंत येत नाही, तोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न सुटू शकणार नाही. मात्र, अशा पद्धतीने ज्या कुणाला राजकारण करायचे असेल, तो त्याच्या प्रश्न आहे. पण काँग्रेसची भुमिका यात स्पष्ट आहे. जनतेचे प्रश्न आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. त्या प्रश्नावर जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी मी लढतो आहे. आज माझ्या राज्याच्या जनतेसमोर बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या आत्महत्या, महागाई, आणि आज आपणा सर्वांवर ओढावलेली नैसर्गिक आपत्ती हे मूळ प्रश्न आहेत.

केंद्रामुळे ओबीसींचे आरक्षण रद्द : नाना पटोले

दोन दिवसांपूर्वी नागपूर मध्ये नावेने फिरावे लागत होते, आज पुण्यात नावेने फिरावे लागत आहे. तिथं तर लोकांचा जीवही गेलेला आहे. मदतीकरिता सेनेला पाचारण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, राज्याच्या विविध भागांमध्ये पुर परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर दुसरीकडे काही भागात अद्याप पाऊस पडलेला नाही, तेथील शेतकरी यामुळे चिंतातूर आहेत. अशा परिस्थितीमध्ये या सगळ्यांना मदत करायची पहिली प्राथमिकता असली पाहिजे, असे ते म्हणाले. दरम्यान, पुण्यात मुख्यमंत्र्यांनी लोकांना एयरलिफ्ट करण्याचे आदेश दिले आहेत, पण विदर्भात अशी कुठली भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली नाही. असे त्याने यावेळी सांगितले.

2024-07-26T14:00:55Z dg43tfdfdgfd