लहुसिंग अतिग्रे यांचे निधन

कोल्हापूर : पॅको इंडस्ट्रीजचे सदस्य व युनायटेड इंडस्ट्रीजचे संस्थापक प्रसिद्ध उद्योगपती लहुसिंग भाऊसो अतिग्रे यांचे रविवारी रात्री वृद्धापकाळाने ताराबाई पार्क येथील निवासस्थानी निधन झाले. ते 97 वर्षांचे होते. पॅको इंडस्ट्रीजच्या उभारणीत अतिग्रे यांचा मोलाचा वाटा होता. उद्योग क्षेत्राबरोबरच प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष, कोल्हापूर जनता बँकेचे अध्यक्ष अशा विविध संस्थांवर त्यांनी काम केले. अतिग्रे यांच्या निधनाने कोल्हापूरच्या उद्योग क्षेत्राचा चालता-बोलता इतिहास काळाच्या डद्याआड गेला आहे.

MadanDas Devi Passes Away : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मदनदास देवी यांचे निधन

लहुसिंग अतिग्रे यांचा जन्म

9 ऑक्टोबर 1926 रोजी करवीर तालुक्यातील कोगे येथे झाला. त्यांनी सातवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. महात्मा गांधीजींची स्वातंत्र्य चळवळ सुरू झाली होती. त्याचा प्रभाव अतिग्रे यांच्या मनावर पडला. ‘कोणतेही काम हलके नसते, ती एक देशसेवाच असते,’ या महात्मा गांधी यांनी वर्धा येथील पवनार आश्रमात दिलेल्या मूलमंत्राने अतिग्रे यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. उद्योग क्षेत्रात आपल्या चुलत्यांसमवेत त्यांनी सुरुवातीला हेल्पर म्हणून काम सुरू केले. यातून फौंड्री, कास्टिंग कामाचा अनुभव त्यांना मिळत गेला.

Dharmapuri Srinivas passed away | काँग्रेस नेते धर्मपुरी श्रीनिवास यांचे निधन

औद्योगिक क्षेत्राला दिशा दिली

उद्योगातील कोणतेही गुपित न ठेवता वाय. पी. पोवार व लहुसिंग अतिग्रे यांनी नवनव्या उद्योजकांना मार्गदर्शन करत कोल्हापूरच्या औद्योगिक क्षेत्राला दिशा देण्याचे काम केले. 1957 साली वाय. पी. पोवार यांनी पॅको इंडस्ट्रीजची स्थापना केली. ‘पॅको’ (पोवार-अतिग्रे-कोठावळे) या फर्मने उद्योग क्षेत्रात भरारी मारली. या ‘त्रिमूर्तीं’नी कोल्हापूरच्या उद्यमनगरीचा नावलौकिक वाढविला. त्या काळात लक्ष्मणराव रामचंद्र अतिग्रे, वाय. पी. पोवार, यशवंतराव रामचंद्र अतिग्रे, शंकरराव कोठावळे, निवासराव रामचंद्र पोवार यांची प्रेरणा मिळाली. पॅको इंडस्ट्रीजचा संपूर्ण आर्थिक व्यवहार चार्टर्ड अकाऊंटंट आर. बी. भागवत व लहुसिंग अतिग्रे पाहत होते. देशभरात ‘पॅको’ची उत्पादने त्यांनी लोकप्रिय केली.

Kamala Pujari passed away | पद्मश्री पुरस्कारप्राप्त कमला पुजारी यांचे निधन

कालांतराने लहुसिंग अतिग्रे यांनी भागीदारीत युनायटेड इंडस्ट्रीज नावाने उद्योग सुरू केला. कोल्हापूरच्या औद्योगिक क्षेत्राबरोबरच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रांतील त्यांचे योगदान मोलाचे होते. कोल्हापूर स्टील लि.चे संचालक, उद्यम को-ऑप. सोसायटीचे संचालक, लायन्स क्लबचे अध्यक्ष व सदस्य म्हणून त्यांनी काम केले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे मुले उद्योजक सुभाष अतिग्रे, विजय अतिग्रे, मुली अनघा जाधव, भारती शिंदे तसेच जावई, सुना, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे. कसबा बावडा येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रक्षाविसर्जन आज, मंगळवारी सकाळी 9 वाजता कसबा बावडा स्मशानभूमी येथे आहे.

Lookout Notice Against Param Bir Singh : परमबीर सिंग कसे पळाले?

2024-07-23T13:17:22Z dg43tfdfdgfd