मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून लेबनॉनमध्ये अराजकता माजली आहे. हिजबुल्लातील पेजर्समधील स्फोटांनी युद्धजन्य परिस्थिती सुरू झाली आहे. यानंतर वॉकी-टॉकीमध्ये स्फोट झाले, १०० हून अधिक सैनिक त्यात जखमी झाले आणि तीन जणांचा मृत्यू झाला. यानंतर सौर यंत्रणा, इलेक्ट्रिक स्कूटर आणि अनेक कारमध्ये स्फोट झाल्याचे वृत्त समोर येत आहे. या गोंधळात, इस्रायलच्या अत्यंत गुप्त सायबर वाॅर युनिटने सर्व घटना घडवून आणले असल्याचा आरोप लावला जात आहे.
युनिट ८२०० चे सिग्नल इंटेलिजन्सपासून डेटा मायनिंग आणि तांत्रिक हल्ल्यात कौशल्य आहे. युनिटने शत्रू यंत्रणांना लक्ष्य करण्यासाठी स्टक्सनेट व्हायरस तैनात केल्याचे बोलले जाते. गेल्या वर्षी, युनिट ८२०० च्या कमांडिंग ऑफिसरने तेल अवीवमधील एका पत्रकार परिषदेत उघड केले होते की, युनिटने हमासला लक्ष्य करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर केला होता.
देशाच्या आत आणि बाहेर इस्त्रायलच्या शत्रूंवर हेरगिरी करण्यात युनिट ८२०० उत्कृष्ट मानले जाते. हमासच्या प्रमुख नेत्यांसह वेस्ट बँक आणि गाझा येथील पॅलेस्टिनींवर पाळत ठेवण्याचे काम युनिटने याआधी केले आहे. शेकडो संभाव्य हल्ल्यांपासून इस्रायलचे रक्षण करण्यात महत्त्वाची भूमिका युनिट ८२०० ने बजावली आहे. युनिट ८२०० द्वारे गोळा केलेली गुप्त माहिती इस्रायली लष्कर आणि इतर सुरक्षा एजन्सींना पुरवली आहे.
युनिट ८२०० सायबर युद्ध, हॅकिंग आणि संगणकाशी संबंधित विविध क्षेत्रांमध्ये पारंगत असलेल्या तज्ञांनी बनलेले आहे. सिग्नल इंटेलिजन्स आणि तांत्रिक हल्ल्यांमध्ये पारंगत, युनिट ८२०० हे इस्रायलच्या संरक्षण रणनीतीचे केंद्रस्थान आहे. परदेशी शत्रूंवर बारकाईने लक्ष ठेवते.
अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या. 2024-09-18T20:10:04Z dg43tfdfdgfd