जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची लढाई आम्ही जिंकली : संजय देशमुख

वाशीम; पुढारी वृत्तसेवा : यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघात शिवसेना (उबाठा)चे उमेदवार संजय देशमुख हे तब्बल ८९ हजार ४९४ मतांनी विजयी झाले. ही जनशक्तीविरुद्ध धनशक्तीची लढाई होती, यात जनशक्तीचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया आपल्या विजयानंतर संजय देशमुख यांनी दिली.

पुढे बोलताना देशमुख म्हणाले, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. देशात देखील महाविकास आघाडीची सत्ता येईल. जनतेला दिलेले आश्वासन आम्ही पूर्ण करू व जनतेचा सेवेसाठी आम्ही तत्पर राहू असे म्हणत त्यांनी निवडणुकीत साथ दिल्याबद्दल मित्रपक्षांचे आभार व्यक्त केले. त्यांच्या विजयानंतर महाविकास आघाडी कडून जल्लोष साजरा करण्यात आला.

2024-06-04T13:46:04Z dg43tfdfdgfd