बातम्या

Trending:


Konkan Railway Block: कोकण रेल्वे मार्गावर तब्बल 28 दिवसांचा मेगाब्लॉक; या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल, पाहा

Konkan Railway Block: रेल्वे मार्गाच्या देखभालीसाठी तसेच इतर कामांसाठी रेल्वे विभागामार्फत मेगाब्लॉक घेण्यात येतो. कोकण रेल्वे मार्गावरही तब्बल 28 दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्याचा फटका प्रवाशांना बसणार आहे. सध्या कोकणात उन्ह्याळ्याच्या सुट्टीनिमित्त जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असते. तसेच आगामी निवडणूकांमुळे मतदानाकरीता कोकण रेल्वे मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांचीही संख्या जास्त आहे.


NCERT Bharti 2024 : एनसीईआरटीमध्ये ‘या’ पदांवर भरती; १० मे अर्ज करण्याचा शेवटचा दिवस

NCERT Bharti 2024 : NCERT ने शैक्षणिक सल्लागार, द्विभाषिक अनुवादक इत्यादी पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची योजना आखत असलेले उमेदवार येथे भरतीशी संबंधित सर्व तपशीलांची माहिती मिळवू शकतात.


कोल्हापूर: सैनिक टाकळीची देवआई अनंतात विलीन; साश्रू नयनांनी अखेरचा निरोप

सैनिक टाकळी: पुढारी वृत्तसेवा : सैनिक टाकळी (ता. शिरोळ) येथील रेणुका मंदिरचे पुजारी आणि गावकऱ्यांचे श्रद्धास्थान परशराम काटकर (देवआई) यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. त्यांनी देवी आणि गावची तब्बल ६० वर्षे सेवा केली. दि. ३० एप्रिलरोजी यल्लमा देवीचा जागर मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या जागराच्या वेळी देव आईने हा माझा शेवटचा भंडारा …


मनाची चेतना...

लोक म्हणतात, साखर गोड, गुलाबजाम गोड, पण माणसाचं हे मन जिथे जातं तेच त्याला गोड वाटायला लागतं. एक गोड मिळाल्यानंतर लवकरच त्यातली गोडी नष्ट होऊन ते दुसरं गोड शोधायला लागते. मन निर्मळ ठेवलं तर हे आयुष्याचा नंदनवन करतं. परंतु दूषित झालं तर हे आयुष्याची वाट लावतं.


Nashik Delhi Flight : महाराष्ट्रदिनी नाशिकची दिल्लीत भरारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर प्रारंभ करण्यात आलेल्या नाशिक-दिल्ली थेट विमानसेवेला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद लाभला. पहिल्याच दिवशी तब्बल २९५ प्रवाशांनी उड्डाण घेत, नाशिक-दिल्ली विमानसेवेचे स्वागत केले. यावेळी इंडिगो कंपनीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. बऱ्याच काळानंतर नाशिक-दिल्ली थेट विमानसेवा पुन्हा सुरू झाल्याने, नाशिकच्या विकासाला बळ मिळेल, अशी अपेक्षा उद्योग, पर्यटन आणि व्यवसाय क्षेत्राकडून व्यक्त …


Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली संभाजीराजेंची माफी; म्हणाले “आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."

Uddhav Thackeray On Sambhajiraje : संभाजीराजेंबाबत मी चुकलो असेल तर शाहू छत्रपतींबाबत तुम्ही तीच चूक का करताय, आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही पण खाल्लं पाहिजे का, असा सवाल उद्धव ठाकरेंनी विरोधकांना केला आहे.


डाळीला फोडणी !

लोकसभा निवडणुकीच्या हंगामात नेहमीप्रमाणे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. दावे आणि प्रतिदावे केले जात आहेत. देशातील गरिबी कमी केली, पिण्याचे पाणी दिले, शेतकर्‍यांचे प्रश्न सोडवले, रस्ते आणि रेल्वेमार्ग उभारल्याची आठवण सत्ताधार्‍यांकडून करून दिली जात आहे. भ्रष्टाचार निर्मूलन केले आणि यापुढेही करणार आहोत, असे ठामपणे सांगितले जात आहे. त्याचवेळी शेतमालाचे आधारभाव, बेरोजगारी आणि महागाई हे प्रश्न विरोधी …


Lok Sabha Elections 2024: राहुल गांधी वायनाडनंतर आता या मतदारसंघातूनही निवडणूक लढवणार

Raebareli Lok sabha Election 2024: कॉंग्रेसने उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. रायबरेलीतून राहुल गांधी तर अमेठीतून के. एल शर्मा (किशोरीलाल शर्मा) यांनी उमेदवारी मिळाली आहे. राहुल सध्या केरळमधील वायनाड मतदारसंघातून खासदार आहेत आणि यावेळीही त्यांनी वायनाडमधून निवडणूक लढवली आहे. आता ते रायबरेलीतूनही मैदानात उतरले आहेत.


गोदरेज उद्योगसमूहाचे विभाजन

कुलपांपासून ते फ्रीजपर्यंत आणि साबणापासून रिअल इस्टेटपर्यंत अनेकविध व्यवसायांत हा समूह कार्यरत आहे. मात्र, स्थापनेनंतर १२७ वर्षांनी प्रथमच या समूहाच्या मालकीचे अधिकृत विभाजन झाले आहे.


DMRL DRDO Recruitment 2024 : डीआरडीओ अंतर्गत विविध पदांवर भरती; आयटीआय पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

DMRL DRDO Vacancy 2024 : DRDO अंतर्गत, डिफेन्स मेटलर्जिकल रिसर्च लॅबोरेटरी (DMRL) ने शिकाऊ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी आयटीआय पास अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, निवड प्रक्रियेसह संपूर्ण तपशील येथे पहा.


नवमतदारांच्या नजरेतून..

मूलभूत गरजांकडे लक्ष देऊ शकणाऱ्या आणि नवनवीन योजना राबवू शकणाऱ्या लोकप्रतिनिधीला निवडून देण्याकडे प्राधान्य असेल.’


तडका : माघारीचा विक्रम

सध्या निवडणुकांच्या काळात इंदूर आणि सुरत या स्वच्छ शहरांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तसाही या दोन्ही शहरांचा आणि मराठी माणसांचा खूप जवळचा संबंध आहे. छत्रपती शिवरायांनी सुरतेवर स्वार्‍या करून इतिहासात सुरतेचे नाव अजरामर करून ठेवले आहे. इंदूरमध्ये असंख्य मराठी भाषिक लोक आहेत आणि होळकर कुटुंबाचे साम्राज्यही इंदूरमध्येच होते. सध्या सुरू असलेल्या निवडणुकांमध्ये या दोन्ही …


Kerala Lottery Result Today LIVE: 80 लाख रुपये जिंकले, तुमचा आहे का हा नंबर?

केरळ: संपूर्ण केरळमध्ये प्रसिद्ध असलेल्या केरळ लॉटरीचा अखेर निकाल जाहीर झाला आहे. केरळ लॉटरी करुण्य प्लस केएन-520 चा निकाल गुरुवार 2 मे रोजी लाईव्ह करण्यात आला आहे. केरळ राज्य लॉटरी विभागाने लकी ड्रॉचे निकाल जाहीर केले आहेत. लाइव्ह अपडेट्स आणि जिंकण्याची संपूर्ण यादी पहा खालील क्रमांक5 व्या क्रमांकाचे विजेते , रक्कम 1,000 7873 7480 1666 6431 5553 2480 9497 0800 8399 0 960 5222 8966 5584 0090 1063 1970 9954 4529 8,000 जिंकणारे नंबर AREPA 168524PB...


SSC & HSC Result Date 2024: १० वी, १२ वीचा निकाल कधी लागतो? कुठे व कसा पाहावा, गतवर्षीची आकडेवारी काय सांगते?

मार्च २०२४ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षेला तब्बल २६ लाख विद्यार्थी उपस्थित होते


Mumbai Metro: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! मेट्रोच्या प्रवाशांना तिकिटात मोठी सवलत मिळणार

Mumbai Metro: मुंबईकरांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर महामुंबई मेट्रो प्रशासनाने (MMRDA) मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे मतदानाच्या दिवशी मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकिटात मोठी सवलत मिळणार आहे. या दिवशी मुंबई मेट्रो मार्ग 2 अ आणि 7 च्या सर्व प्रवाशांना तिकिटावर 10 टक्के सवलत मिळणार आहे.


कुतूहल : जेम्स लाइटहिल

या अहवालात असे संकेत आहेत की बुद्धिबळाच्या खेळात संगणकासारखे यंत्र माणसाला हरवू शकत नाही


Congress | Rahul Gandhi रायबरेलीतून लोकसभा निवडणूक लढवणार? तर अमेठीतून के.एल शर्मा निवडणूक लढणार?

Congress Rahul Gandhi will contest the Lok Sabha elections from Rae Bareli? So KL Sharma will contest the election from Amethi?


औषध उद्योगाची पुनर्बांधणी

सुमारे अडीच दशकांपूर्वीपर्यंत औषध निर्मितीच्या क्षेत्रात भारत स्वयंपूर्ण होता. औषधांसाठी लागणारा कच्चा माल म्हणजेच ‘एपीआय’ही भारतातच तयार होत असे; पण चीनने या क्षेत्रात घुसखोरी केली आणि स्वस्त दरात ‘एपीआय’ पाठवून भारतातील हे क्षेत्र विस्कळीत केले; परंतु कोरोना कालावधीनंतर भारताने या क्षेत्रात पुन्हा आत्मनिर्भर होण्यासाठी सुनियोजित पावले टाकली. भारत एवढ्या संख्येने औषध उद्योगाची पुनर्बांधणी करेल, याची …


Aadhar Card: लग्नानंतर आधार कार्डवरील नावात बदल कसा करायचा? जाणून घ्या प्रोसेस

Aadhar Card Name Change After Marriage: लग्नानंतर मुलींना सरकारी कागदपत्रांवर त्यांच्या नावात बदल करावा लागतो. भविष्यातील सरकारी किंवा बॅंकिंग आणि इतर कामांसाठी आधार कार्डावरील नाव बदले गरजेचे असते. आज आपण आधार कार्डवरील नाव कसे बदलायचे? यासाठी काय कागदपत्रे लागतात? किती शुल्क लागते? या आणि अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत.


बकुळीच्या फुलाचा गंध

परवा सहज म्हणून कपाट उघडले आणि काय व किती लिहिले आहे, याचा धांडोळा घेतला तर अलिबाबाची गुहाच सापडल्याचा आनंद झाला. इसवी सन १९८०च्या सुमारास लेखणी हातात धरली. बालकथा हा माझा अगदी आवडीचा प्रांत. अनेक वृत्तपत्रांतून अनेक बालकथा लिहिल्या. त्या बालकथांचे पुढे पुस्तक झाले. आणि अनेक वाचकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. कुणी भेटून, गोष्ट आवडली म्हणून सांगे; ...


NOTA असताना उमेदवार बिनविरोध कसा? सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल

एकच उमेदवार रिंगणात असेल तर अशावेळी NOTAला काल्पनिक उमेदवार समजलं जावं अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे.