Trending:


Nashik Crime News | तब्बल 27 दुचाकी चोरणारा चोरटा जळगाव जिल्ह्यातून गजाआड

नाशिक : शहरातील वेगवेगळ्या परिसरातून दुचाकी वाहने चोरी करून ती जळगाव जिल्ह्यात विक्री करणाऱ्या सराईत चोरट्यास शहर पोलिस व पारोळा पोलिसांच्या संयुक्त पथकाने पकडले. संशयितांकडून वाहनचोरीचे १४ गुन्हे उघडकीस आले आहेत. किशोर संजय चौधरी (३०, रा. तरवाडे, ता. पारोळा, जि. जळगाव) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून ११ लाख १७ हजार रुपयांच्या २७ दुचा...


कोल्हापुरात मिरवणुकीत ध्वनी नियमांचे उल्लंघन

यंदा विधानसभा निवडणुका असल्याने गणेशोत्सव वाजत गाजतच साजरा केला गेला. गणेश आगमनाच्या वेळी वाद्यांच्या भिंती उभारल्या होत्या. विसर्जन मिरवणुकीवेळी त्या पुन्हा होत्याच. मात्र त्या मोठ्या आवाजात वाजत असताना त्यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याचे दिवसभर दिसून आले होते.


Malegaon Central : मुस्लीम समाजाचं वर्चस्व असलेल्या मालेगाव मध्य मतदारसंघाची पार्श्वभूमी काय आहे?

मालेगाव मध्य या मतदारसंघात मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणावर आहेत. तसंच मोहम्मद इस्माइमल खलीक हे तिथले आमदार आहेत.


Eid-e-Milad-un Nabi: या मुस्लिम देशांमध्ये साजरा होत नाही ईद-ए-मिलाद, कारण काय?

आज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ईद मिलादचा जुलूस काढण्यात येणार आहे. इस्लामिक कॅलेंडरनुसार, ‘ईद-मिलाद-उन-नबी’ हा दिवस पैगंबर मुहम्मद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. मुस्लिम बांधव हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करतात. या दिवशी ते जुलूस या कार्यक्रमाचे आयोजन करतात. सोमवारी ईद मिलादची शासकीय सुट्टी रद्द करून बुधवारी १८ सप्टेंबर रोजी देण्यात आली आहे.मंगळवार १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी हा हिंदू सण असल्याने दोन्ही समाजामध्ये शांतता व...


PUBG मुळे पाकिस्तानवर हल्ला, दहशतवादी असा करतायत Game चा वापर

मुंबई : पबजीचं क्रेज भारतात खूप जास्त आहे. बहुतांश तरुण मंडळींना तर या खेळाचं वेडच लागलं आहे. गोळ्या, बंदुका आणि अटॅक या सगळ्या गोष्टी तरुणांच्या मनात बसल्या आहेत. ज्यामुळे तरुण मंडळी आपल्या वयक्तीक आयुष्यात ही जास्त आक्रमक होत असल्याचं तज्ज्ञांकडून समोर आलं आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, पण याच पबजीमुळे पाकिस्तानात देखील दहशदवादी हल्ला झाला.पाकिस्तानातील स्वात येथील बनर पोलीस ठाण्यावर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्याच्या हालचाली शोधणे...


केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक


Aaditya Thackeray PC : हिंदूंचा वापर फक्त राजकारणासाठी! आदित्य ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

Aaditya Thackeray on India vs Bangladesh : बांगलादेश क्रिकेट संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. या कालावधीत दोन्ही संघांमध्ये 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. ही मालिका 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. पहिली कसोटी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवली जाईल. दुसरी कसोटी कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवली जाईल. यादरम्यान, या कसोटी सामन्याच्या व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आजोबा बाळ ठाकरे यांच्या मार्गावर चालत क्रिकेट सामन्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या संदर्भात त्यांनी परराष्ट्र मंत्रालय आणि बीसीसीआयवर प्रश्न उपस्थित केले. शेजारच्या देशात हिंदू समाज हिंसाचाराला तोंड देत असताना बांगलादेश क्रिकेट संघाला भारत दौऱ्यावर का येऊ देत आहे, असा सवाल शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि बीसीसीआयला केला. ट्विटरवरील एका पोस्टमध्ये आदित्य ठाकरे म्हणाले की, भारतातील ट्रोल्स बांगलादेशमध्ये हिंसाचाराच्या नावाखाली द्वेष पसरवत आहेत तर बीसीसीआय आपल्या संघाचे आयोजन करत आहे. आता मी पराराष्ट्र मंत्रालयाकडून जाणून घेण्यास उत्सुक आहे की, काही माध्यमं आणि सोशल मिडियात सातत्याने सांगितलं जात असल्याप्रमाणे गेल्या २ महिन्यात बांगलादेशातील हिंदूवर अत्याचार होत असल्याच्या बातम्या खऱ्या आहेत का?


MLA Suresh Bhole: गणपती विसर्जन मिरवणुकीत कार्यकर्त्याला उत्साह अनावर, नाचताना MLA सुरेश भोळेंना खांद्यावर उचललं, अन्...

Jalgaon Ganpati Visarjan Procession MLA Suresh Bhole: जळगाव शहरात काल मंगळवारी गणपती विसर्जन मिरवणूक उत्साहात झाली. कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे मिरवणुकीत सहभागी झाली होते. यावेळी गिरीश महाजन यांनी कार्यर्त्यांसोबत ठेका धरला.


Majha Gaon Majha Jilha : माझं गाव, माझा जिल्हा; बातम्यांचा वेगवान आढावा : 18 Sep 2024

पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीचं थाटात विसर्जन, बाप्पासमोर ढोल-ताशासह पारंपरिक वाद्यांचं सादरीकरण. पुण्यातील पहिल्या मानाच्या कसबा गणपतीचं विसर्जन, नटेश्वर घाटावर बाप्पाला निरोप. पुण्यातील भाऊसाहेब रंगारी गणपतीची मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून आरती, मिरवणुकीआधी बाप्पासमोर शंखनाद. कोल्हापुरात बंदी असताना बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत लेझरचा वापर, पोलिसांच्या सूचना मंडळांनी पाळल्या नाहीत. परभणीच्या जिंतूरमध्ये गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत डीजेमुळे एकाचा मृत्यू, 2 जण अत्यवस्थ अकोल्यातील पूर्णा नदीवर गणेश विसर्जनादरम्यान बुडून एकाचा मृत्यू, उपचारादरम्यान १८ वर्षीय मुलाचा मृत्यू. इंदापूरच्या नीरा नदी पात्रात गणेश विसर्जनासाठी गेलेला मुलगा बुडाला, मुलाचा शोध सुरु. वर्षभर मराठा समाजाचा लढा सुरुये,याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वाईट वाटायला हवं.मुख्यमंत्र्यांच्या आवाहानानंतर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया. ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांना जालन्यातील वडीगोद्री येथे पोलिसांनी रोखलं. वाघमारे यांनी अंतरावली सराटीत जाऊन आमरण उपोषण करण्याचा दिला होता इशारा. नवनाथ वाघमारे यांची मुख्यमंत्र्यांवर टीका.


Marathwada Liberation Day : ज्वलंत मराठवाडा, अस्वस्थ तरुणाई

मराठवाड्याचे पुढचे आंदोलन म्हणजे नामांतराचे आंदोलन. शरद पवार हे १९७८ साली मुख्यमंत्री झाल्यानंतर मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनाने वेग घेतला.


संविधानभान : विधिमंडळाचे विशेष अधिकार

विधिमंडळाचे विशेषाधिकार १९४ व्या अनुच्छेदामध्ये आहेत. त्यानुसार विधिमंडळाच्या सभागृहामध्ये भाषणस्वातंत्र्य आहे..


CBSE Pattern Maharashtra Schools: सरकारी शाळांमध्ये आता 'सीबीएसई'चे धडे; राज्य सरकारचा मोठा निर्णय

CBSE Pattern In Maharashtra Boards Schools: सीबीएसई बोर्डाच्या शाळांकडे मुलांचा वाढता कल पाहता आता राज्य सरकार देखील सरकारी शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न राबवणार आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षापासून राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये CBSE पॅटर्न राबवला जाईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.


Lalbaugcha Raja Visarjan 2024: लालबागचा राजा 20 तासांनी गिरगाव चौपाटीवर दाखल

मुंबई: जगातील तमाम गणेशभक्तांच्या आकर्षणाचा विषय असलेला लालबागचा राजाची मिरवणूक तब्बल 19 तासांनी गिरगाव चौपाटीच्या परिसरात दाखल झाली आहे. लालबागचा राजा (Lalbaugcha Raja Visarjan 2024) रविवारी सकाळी साधारण 11 वाजता मंडपातून विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ झाला होता. त्यानंतर लालबागचा राजा हा लालबाग, भारतमाता सिनेमा, लालबाग,चिंचपोकळी पूल, बकरी अड्डा, भायखळा रेल्वे स्थानक (पश्चिम), क्लेअर रोड, नागपाडा, डंकन रोड, दोन टाकी, कुंभारवाडा,सुतार गल्ली, माधवबाग, सी.पी.टँक, व्ही.पी.रोड, ऑपेरा हाऊस अशा प्रवास करुन गिरगाव चौपाटीवर दाखल होतो. यंदा राजाच्या विसर्जन मिरवणुकीला हे अंतर पार करण्यास तब्बल 20 तास लागले. काहीवेळापूर्वीच लालबागचा राजाची मिरवणूक गिरगाव चौपाटीवर दाखल झाली आहे. आता गिरगाव चौपाटीवर लालबागचा राजाची आरती केली जाईल. या आरतीसाठीही गिरगाव चौपाटीवर गणेशभक्तांची मोठी गर्दी असते. ही आरती संपन्न झाल्यानंतर लालबागचा राजाला तराफ्यावर ठेवून खोल समुद्रात त्याचे विसर्जन केले जाईल. येथील कोळी बांधवांच्या अनेक होड्या लालबागचा राजाला निरोप देण्यासाठी समुद्रात जातात. लालबागचा राजाला निरोप देताना कार्यकर्ते आणि गणेशभक्त भावूक होताना दिसतात. 10 दिवसांच्या पाहुणचारानंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी तराफ्यावर बसतो तेव्हा भक्तांच्या मनात कालवाकालव होताना दिसते. त्यामुळे गिरगाव चौपाटीवरील आता राजाला साश्रू नयनांनी निरोप दिला जाईल. गेल्या 10 दिवसांमध्ये अनेक सेलिब्रिटी, राजकीय नेते आणि बॉलीवूड तारे-तारकांनी लालबागचा राजाच्या मंडपात जाऊन गणपतीचे दर्शन घेतले होते. लालबागचा राजाच्या चरणस्पर्श, नवसाची आणि मुखदर्शनाच्या रांगेतही यंदा नेहमीप्रमाणे मोठी गर्दी होती. यंदा अंबानी कुटुंबीयांनी लालबागचा राजाला दिलेला सोन्याचा 20 किलोचा मुकूट अर्णण केला होता. यानंतर अनंत अंबानी पाचवेळा लालबागच्या राजाच्या दर्शनाला आले होते. याशिवाय, आज पहाटेही अनंत अंबानी यांनी लालबागचा राजाचे दर्शन घेतले होते.


Sanjay Gaikwad On Rahul Gandhi : राहुल यांनी चैत्यभूमी किंवा दीक्षाभूमीवर माफी मागावी- संजय गायकवाड

पुणे: वारंवार आपल्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत येणारे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले. यावेळी त्यांनी चक्क विरोधी पक्षाच्या नेत्यांची जीभ कापणाऱ्याला 11 लाखांचे बक्षीस देणार असं वक्तव्य केलं आहे. या वक्तव्याने पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापल्याचं दिसून येत आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आता नेत प्रतिक्रिया देताना दिसत आहेत, गायकवाड (Sanjay Gaikwad) यांच्या वक्तव्यावर शिवसेना शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी प्रतिक्रिया देताना संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) बोलताना चुकलेत असं म्हटलं आहे. संजय गायकवाडांच्या (Sanjay Gaikwad) कालच्या बेताल वक्तव्यामुळे सगळेच राजकीय नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशातच संजय गायकवाड बोलताना चुकले आहेत, हे मला वैयक्तिक वाटतं आहे. पक्ष त्यावर काय बोलेल माहिती नाही, आमचे नेते एकनाथ शिंदे यांना आमच्या पक्षाचे सर्व अधिकार आहेत. ते जे बोलतील तेच अंतिम राहील त्यामुळे मला तरी वाटतंय याबाबतीत मुख्यमंत्री उचित निर्णय घेतील आणि त्याची माहिती आपल्याला सुद्धा देतील, असं वक्तव्य अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केलं आहे.


पिपरीचिंचवडमध्ये दहशत पसरवणा-या दोन आरोपींची पोलिसांनी काढली धिंड

Two accused who spread terror in Piprichinchwad have been arrested by the police


Nhava-Sheva port | ११ कोटींची विदेशी सिगारेट न्हावा-शेवा बंदरातून जप्त

उरण : न्हावा शेवा सीमा विभागाच्या एसआयआयबी अधिकाऱ्यांनी दुबईतून हैदराबाद येथे बेकायदेशीररित्या तस्करी मार्गाने पाठविण्यात आलेल्या ११.४० कोटी किमतीचा विदेशी सिगारेटचा साठा जप्त केला. बंदी असतानाही तस्करी मार्गाने दुबईतून ४० फुटी कंटेनरमधून जिप्सी प्लास्टर बोर्डच्या बनावट नावाखाली ४०० कार्टूनमधून ५७ लाख विदेशी सिगारेटचा साठा पाठविण्यात आला होता. हा व...


Anil Bonde on Rahul Gandhi over his statement on reservation in India

अमरावती : काँग्रेसनेत्या (Congress) आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांच्यावर टीका करताना खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांची जीभ घसरली. इंग्रजांची चाकरी केली म्हणून यशोमती ठाकूर यांना ठाकुरांची पदवी मिळाली, असं बोंडे म्हणाले. तसंच यांचा डीएनए हा इंग्रजांची चाकरी करणाऱ्यांचा आहे, असंही ते म्हणाले. अनिल बोंडे म्हणाले, इंग्रजांची चाकरी केली म्हणून यशोमती ठाकूरांना ठाकुरांची पदवी मिळाली. इंग्रजांची चाकरी करणाऱ्यांचा यांचा डिएनए आहे. काँग्रेसचा डीएनए महात्मा गांधीचा नाही तर तो फिरोज जहांगीर गांधीचा आहे. भाजपचा डीएनए हा भारताचा आहे.. दानधर्म केल्याने "ठाकुर" ही पदवी दिल्याचा भटांचा दावा यशोमती ठाकूर यांचे अनिल बोंडें यांना थेट भाटांकडील इतिहास दाखवून प्रतिउत्तर दिले आहे.1700 साली सव्वा तोळ्याची एक अशा सव्वा लाख सोन्याच्या गिन्या या गोरगरीबांना दान केल्या म्हणून यशोमती ठाकुरांच्या कुटुंबाला "ठाकुर" ही पदवी दिल्याचा दावा यशोमती ठाकूर यांच्या घरी आलेल्या भाटांनी केला आहे. यशोमती ठाकूर यांचे अनिल बोंडे यांना प्रत्युत्तर यशोमती ठाकूर म्हणाल्या, सन 1700 मध्ये सव्वा तोळ्याची एक अशा सव्वा लाख सोन्याच्या गिन्या या गोरगरीबाना दान केल्या म्हणून यशोमती ठाकुरांच्या कुटुंबाला "ठाकुर" ही पदवी देण्यात आली आहे. दुष्काळात आमच्या पूर्वजांनी दान केले त्यांच्या नोंदी आहेत. माझ्या पूर्वजांनी गरीबांना मदत केली हा इतिहास आहे. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे दंगली झाल्या आहे.खासदार म्हणून त्यांना जे मूळ काम त्यांना करायचे आहेत ते करत नाही. ओबीसीची जनगणना झालीच पाहिजे. भाजपचा आणि नथुराम गोडसे यांचा डीएनए एकच भाजपचा आणि नथुराम गोडसे यांचा डीएनए एकच आहे. नथुराम गोडसे यांनी पण महात्मा गांधींना रावणाचं रूप दिलं होतं, आणि स्वतः महात्मा गांधीना मारायचा प्रयत्न केला. संघ आणि भाजप सतत करत असतात. गांधी त्या युगातला असो की या युगातला असो गांधी गांधी आहे. या देशाचा मूळ डीएनए गांधी आहे. कितीही मारण्याचा प्रयत्न केला तरी गांधी मरत नसतो.. जी काही विकृती आहे ती विकृती सत्ताधाऱ्यांच्या डोक्यांमध्ये आहे. ती विकृती नष्ट झाली पाहिजे यासाठी येत्या दसऱ्याला त्याचं दहन झालं पाहिजे असा आमचा अट्टाहास आहे, असे काही दिवसांपूर्वी यशोमती ठाकूर म्हणाल्या होत्या.


गोंदिया : बेपत्ता युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : देवरी तालुक्यातील सालेगाव परिसरात एका युवकाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा मृतदेह सुब्रायटोला येथील ६ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या रुतिक सुनील सोनवाने (वय २२) या युवकाचे असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. ही घटना मंगळवारी (दि.17) सायंकाळी उघडकीस आली.मृत रुतिक सोनवाने १२ सप्टेंबरच्या पहाट...


Zimbabwe Elephant Culling : भुकेने त्रस्त लोकांसाठी झिम्बाब्वे २०० हत्ती मारणार

पुढारी ऑनलाईन : झिम्बाब्वेमध्ये चार दशकांतील सर्वात भीषण दुष्काळ पडला आहे. पिके नष्‍ट झाली आहेत. लोकांजवळ खाण्यासाठी काहीही उरलेले नाही. यासाठी इथल्‍या वाईल्‍डलाईफ अथॉरिटीने एक धक्‍कादायक निर्णय घेतला आहे. तो म्‍हणजे येथील जंगलातील तब्‍बल २०० हत्‍तींना मारण्यात येणार आहे. यातून जे मास मिळणार आहे. ते मास लोकांना खाण्यासाठी पुरवण्यात येणार आहे. या ठि...


Zero Hour Guest Center 01 : वन नेशन-वन इलेक्शन, विरोधकांचं नेमकं म्हणणं काय? ABP MAJHA

नवी दिल्ली: निश्चलनीकरण, सर्जिकल स्ट्राईक, कलम 370 रद्द करणे यासारख्या मोदी सरकारच्या धक्कातंत्राच्या मालिकेत आणखी एका निर्णयाची भर पडण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या महत्त्वाकांक्षी धोरणांपैकी एक असणाऱ्या 'एक देश, एक निवडणूक' (One Nation One Election) धोरणाची देशात अंमलबजावणी होण्याच्यादृष्टीने पहिले पाऊल पडले आहे. कारण केंद्रीय मंत्रिमंडळाने One Nation One Election या धोरणाला मंजुरी दिल्याची माहिती आहे. एक देश एक निवडणूक धोरणामुळे भारतीय राजकारणाचा चेहरामोहरा बदलण्याची शक्यता आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते विनय सहस्त्रबुद्धे यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. त्यांनी 'एबीपी माझा'शी संवाद साधताना म्हटले की, एक देश एक निवडणूक हा विषय फार पूर्वीपासून पंतप्रधान मोदी यांनी मांडला आहे. देशाच्या लोकशाहीचे आरोग्य टिकवण्यासाठी आणि प्रशासनाची सुशासन देण्याची क्षमता वाढवण्याच्यादृष्टीने 'एक देश एक निवडणूक' (One Nation One Election) हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरेल. माझं तर म्हणणं आहे की, धिस विल बी मदर ऑफ ऑल पॉलिटिकल रिफॉर्मस, सर्व राजकीय सुधारणांची जननी 'एक देश एक निवडणूक' ही पद्धत आहे. त्यादृष्टीने केंद्र सरकारने निर्णय घेतला असेल तर ही अत्यंत स्वागतार्ह गोष्ट आहे.


TOP 70 News : सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 16 Sept 2024 : ABP Majha

लालबागच्या राजाची मुंबईत भव्य मिरवणूक, बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्तांची अलोट गर्दी. थोड्याच वेळात होणार बाप्पाचं विसर्जन. मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर पहाटे 5 वाजता भर पावसातही बाप्पाचं विसर्जन, गर्दी आणि बाप्पाच्या दर्शनासाठीचा उत्साह देखील कायम. पुण्यातील मानाच्या पाचही गणपतीचं विसर्जन..बाप्पाला निरोप देण्यासाठी पुणेकरांची मोठी गर्दी.. पुण्यात विसर्जन मिरवणूक रखडली, अखिल मंडई मंडळ, शारदा गणपती मंडळ, भाऊसाहेब रंगारी मंडळाचं विसर्जन बाकी पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीचं थाटात विसर्जन, बाप्पासमोर ढोल-ताशासह पारंपरिक वाद्यांचं सादरीकरण. कोल्हापुरात बंदी असताना बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत लेझरचा वापर, पोलिसांच्या सूचना मंडळांनी पाळल्या नाहीत. परभणीच्या जिंतूरमध्ये गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत डीजेमुळे एकाचा मृत्यू, 2 जण अत्यवस्थ अकोल्यातील पूर्णा नदीवर गणेश विसर्जनादरम्यान बुडून एकाचा मृत्यू, उपचारादरम्यान १८ वर्षीय मुलाचा मृत्यू. इंदापूरच्या नीरा नदी पात्रात गणेश विसर्जनासाठी गेलेला मुलगा बुडाला, मुलाचा शोध सुरु.


Goa News : बेपत्ता बाशुदेवचे नेमके काय झाले?

दीपक जाधव पणजी : सांतइस्तेव बेटावर असलेल्या आखाडा फेरी धक्क्यावर घडलेल्या अपघाताचे गूढ उकलण्यात पोलिसांना अद्यापही यश आलेले नाही. पोलिस सर्व शक्यता पडताळून तपास करीत असले, तरी या कारमधून बेपत्ता झालेल्या बाशुदेव भंडारी याची कोणतीही माहिती पोलिसांना अद्याप मिळालेली नाही. त्यातच चौकशीला पाचारण केलेल्या त्याच्या मैत्रिणीने आपण 23 सप्टेंबरपर्यंत गोव्या...


अग्रलेख : नंदीबैल नगरी!

पुण्यातील ‘गोखले इन्स्टिटय़ूट’ असो वा देशातील सर्वोच्च विज्ञान पुरस्कार असोत. सरकारला विरोध सोडा; साधी मतभिन्नताही चालत नाही, असे चित्र यावरून निर्माण होते.


हरवत गेलेले निवांतपण

मराठवाडा बदलत गेला तसं बाईपणही बदलत गेलं. महिलांच्या क्षेत्रातील अनेक छोटे- मोठे बदल निसटून जातात नोंदवायचे. अशाच बदलाच्या निवडक नोंदी...


Zero Hour One Nation One Election : देशातील निवडणुकांसंदर्भात सर्वात मोठा निर्णय, प्रकरण नेमकं काय?

नवी दिल्ली: निश्चलनीकरण, सर्जिकल स्ट्राईक, कलम 370 रद्द करणे यासारख्या मोदी सरकारच्या धक्कातंत्राच्या मालिकेत आणखी एका निर्णयाची भर पडण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या महत्त्वाकांक्षी धोरणांपैकी एक असणाऱ्या 'एक देश, एक निवडणूक' (One Nation One Election) धोरणाची देशात अंमलबजावणी होण्याच्यादृष्टीने पहिले पाऊल पडले आहे. कारण केंद्रीय मंत्रिमंडळाने One Nation One Election या धोरणाला मंजुरी दिल्याची माहिती आहे. एक देश एक निवडणूक धोरणामुळे भारतीय राजकारणाचा चेहरामोहरा बदलण्याची शक्यता आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते विनय सहस्त्रबुद्धे यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. त्यांनी 'एबीपी माझा'शी संवाद साधताना म्हटले की, एक देश एक निवडणूक हा विषय फार पूर्वीपासून पंतप्रधान मोदी यांनी मांडला आहे. देशाच्या लोकशाहीचे आरोग्य टिकवण्यासाठी आणि प्रशासनाची सुशासन देण्याची क्षमता वाढवण्याच्यादृष्टीने 'एक देश एक निवडणूक' (One Nation One Election) हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरेल. माझं तर म्हणणं आहे की, धिस विल बी मदर ऑफ ऑल पॉलिटिकल रिफॉर्मस, सर्व राजकीय सुधारणांची जननी 'एक देश एक निवडणूक' ही पद्धत आहे. त्यादृष्टीने केंद्र सरकारने निर्णय घेतला असेल तर ही अत्यंत स्वागतार्ह गोष्ट आहे.


धर्माधिष्ठित मतपेढीची जुळवाजुळव

धर्म आणि शासन स्वतंत्र असावेत ही गोष्ट अमेरिकेतील कायद्याने तसेच सर्वसामान्य जनमतानेही अगदी हल्लीपर्यंत मान्य केली होती. मात्र आता निवडणूक प्रचारादरम्यान धार्मिक मुद्दे चर्चेस येण्यात सामान्य जनतेलाही काही वावगे वाटेनासे झाले आहे, ते का?


Nagpur Umred Vidhan Sabha : नागपुरातील उमरेड मतदारसंघावरून शिंदे गट आणि भाजप आमने-सामने

Nagpur Umred Vidhan Sabha : नागपुरातील उमरेड मतदारसंघावरून शिंदे गट आणि भाजप आमने-सामने नागपुरातील उमरेड मतदारसंघावरून शिंदे गट आणि भाजप आमने-सामने आलेत.. राजू पारवे हे उमरेड विधानसभेतून शिंदे गटाचे नाहीतर काँग्रेसचा सीटींग आमदार होते , त्यामुळे भाजपने शिंदे गटाचा दावा अमान्य असल्याचे सुधीर पारवे यांनी सांगितलंय.. दरम्यान भाजपकडून सुधीर पारवे उमरेडमधून निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याच त्यांनी सांगितंय.


विसर्जनादरम्यान राज्यात २१ जणांचा मृत्यू

गणपती विसर्जनादरम्यान राज्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये २१ जणांचा मृत्यू झाला.


Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 06 PM 18 Sep 2024

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर एक देश एक निवडणूक विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडणार, काँग्रेससह इंडिया आघाडीतील अनेक पक्षांचा विरोध, राज्याच्या संमतीचंही केंद्रासमोर आव्हानमहायुतीतल्या वादाच्या जागांवर अमित शाह तोडगा काढणार असल्याची माहिती, सप्टेंबर अखेरीस जागावाटप पूर्ण करण्याचं टार्गेट, उद्या शिंदे, फडणवीस अजितदादांची बैठक पक्षांतर्गत नाराजीबद्दल अजितदादांनी बोलावली सर्व आमदारांची बैठक, महामंडळ वाटपासंदर्भात अजितदादा आणि फडणवीस मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार मुंबईतल्या ३६ जागांवर महाविकास आघाडीची खलबतं, 6 ते 7 जागांवर अद्याप तिढा कायम,उद्या पुन्हा बैठकीचं आयोजनराहुल गांधींच्या जीभेला चटके द्या म्हणणाऱ्या खासदार अनिल बोंडेंविरोधात गुन्हा, काँग्रेसकडून उद्या राज्यव्यापी आंदोलनाची हाक राहुल गांधींवर हल्ल्याचा कट, संजय राऊतांचा गंभीर आरोप, गृहमंत्र्यांवरही व्यक्त केला संशय, तर केंद्र सरकार संरक्षण करण्यास सक्षम, बावनकुळेंचं प्रत्युत्तर मनसे कार्यकर्ता जय मालोकार यांचा मृत्यू हृदयविकारानं नाही तर जबर मारहाणीमुळे, पोस्ट मॉर्टम अहवालात उघड, अमोल मिटकरींच्या कार तोडफोड प्रकरणामुळे चर्चेतमागण्या मान्य न केल्यास राजकीय करिअर उद्धवस्त करेन, दोन दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या जरांगेंचा इशारा, तर जरांगेंच्या विरोधात ओबीसींच्या वतीनं अंतरवालीतच मंगेश ससाणेंचं उपोषण नवाब मलिकांचा जावई समीर खान यांचा भीषण अपघात, ड्रायव्हरनं ब्रेकच्या ऐवजी अॅक्लिलरेटर दाबल्यानं कार समीर यांना घेऊन भिंतीवर धडकली भिवंडीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात काही वाहनांची तोडफोड, ईद-ए-मिलादच्या जुलूसदरम्यान काही तरुणांनी घोषणाबाजी केल्यानं वाहनं फोडली


ABP Majha Headlines : 11 PM : 18 September 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

ABP Majha Headlines : 11 PM : 18 September 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर एक देश एक निवडणूक विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडणार, काँग्रेससह इंडिया आघाडीतील अनेक पक्षांचा विरोध, राज्याच्या संमतीचंही केंद्रासमोर आव्हानमहायुतीतल्या वादाच्या जागांवर अमित शाह तोडगा काढणार असल्याची माहिती, सप्टेंबर अखेरीस जागावाटप पूर्ण करण्याचं टार्गेट, उद्या शिंदे, फडणवीस अजितदादांची बैठक पक्षांतर्गत नाराजीबद्दल अजितदादांनी बोलावली सर्व आमदारांची बैठक, महामंडळ वाटपासंदर्भात अजितदादा आणि फडणवीस मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार मुंबईतल्या ३६ जागांवर महाविकास आघाडीची खलबतं, 6 ते 7 जागांवर अद्याप तिढा कायम,उद्या पुन्हा बैठकीचं आयोजनराहुल गांधींच्या जीभेला चटके द्या म्हणणाऱ्या खासदार अनिल बोंडेंविरोधात गुन्हा, काँग्रेसकडून उद्या राज्यव्यापी आंदोलनाची हाक राहुल गांधींवर हल्ल्याचा कट, संजय राऊतांचा गंभीर आरोप, गृहमंत्र्यांवरही व्यक्त केला संशय, तर केंद्र सरकार संरक्षण करण्यास सक्षम, बावनकुळेंचं प्रत्युत्तर मनसे कार्यकर्ता जय मालोकार यांचा मृत्यू हृदयविकारानं नाही तर जबर मारहाणीमुळे, पोस्ट मॉर्टम अहवालात उघड, अमोल मिटकरींच्या कार तोडफोड प्रकरणामुळे चर्चेतमागण्या मान्य न केल्यास राजकीय करिअर उद्धवस्त करेन, दोन दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या जरांगेंचा इशारा, तर जरांगेंच्या विरोधात ओबीसींच्या वतीनं अंतरवालीतच मंगेश ससाणेंचं उपोषण नवाब मलिकांचा जावई समीर खान यांचा भीषण अपघात, ड्रायव्हरनं ब्रेकच्या ऐवजी अॅक्लिलरेटर दाबल्यानं कार समीर यांना घेऊन भिंतीवर धडकली भिवंडीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात काही वाहनांची तोडफोड, ईद-ए-मिलादच्या जुलूसदरम्यान काही तरुणांनी घोषणाबाजी केल्यानं वाहनं फोडली


Yashomati Thakur : खासदार Anil Bonde यांच्यावर गुन्हा दाखल करा : यशोमती ठाकूर

Yashomati Chandrakant Thakur : खासदार Anil Bonde यांच्यावर गुन्हा दाखल करा : यशोमती ठाकूर भाजप खासदार अनिल बोंडेंनी राहुल गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने अमरावतीत काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे.. अनिल बोंडेंना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत काँग्रेसचं पोलिस आयुक्त कार्यालयात ठिय्या सुरूच राहील अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिलीये.. मागील एका तासापासून काँग्रेसचे नेते पदाधिकारी पोलीस आयुक्त यांच्या दालनात ठाण मांडून बसलेत...


Konkan News | अजित पवार, शरद पवार कोकणात आमनेसामने येणार, कारण...

Ajit pawar And Sharad Pawar Kokan Visit For Election Campaign


What is NPS Vatsalya Scheme: काय आहे NPS वात्सल्य योजना? वाचा सविस्तर

What is NPS Vatsalya Scheme: मुलांचे भवितव्य लक्षात घेऊन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Minister Nirmala Sitharaman) आज, बुधवारी म्हणजेच 18 सप्टेंबरला एक नवी योजना सुरू करणार आहेत. ‘एनपीएस वात्सल्य’ (NPS Vatsalya Scheme) असं या योजनेचं नाव आहे. अर्थमंत्र्यांनी वात्सल्य योजनेची घोषणा अर्थसंकल्प 2024 दरम्यान केली होती.


Pune Ganpati Visarjan: 24 तासांनंतरही पुणेकरांचा उत्साह; पुणे पोलीस अॅक्शन मोडवर

Pune Ganpati Visarjan: अलका चौकात तिन्ही बाजूने मंडळे येऊन थांबली आहेत. पुढे जागा नसल्याने संथ गतीने मंडळे मार्गस्थ होत आहेत.


Pimpri Crime:बिहारहून पुण्यात आला, पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरला; पत्नीचाही काटा काढणार तितक्यात...

पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड शहरात कायदा अन सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गणपती विसर्जनादिवशी तर एकाने थेट फिनिक्स मॉलच्या दिशेने गोळीबार केला तर दोघांनी एकाचा गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीशी प्रेमसंबंध ठेवणाऱ्या प्रियकराचा खून करण्यासाठी पती थेट बिहारहून पुण्यात आल्याचं आत्तापर्यंतच्या तपासात निष्पन्न झालं आहे. यामुळं शहरात खळबळ उडाली आहे. (Pune Crime News) पिंपरी चिंचवडमध्ये नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो आहे. गणेशोत्सव सुरू झाल्यापासून वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन खून आणि दोन ठिकाणी गोळीबारासह चोऱ्या-माऱ्यांच्या घटना घडल्या आहेत. वाकडचे पोलीस निरीक्षक एस बी कोल्हटकर यांचे तर गुन्हेगारांवर कोणतीच पकड राहिली नसल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाल्या आहेत. दुसरीकडे सर्वसामान्यांचे प्रश्न व्हर्च्युअली सोडविण्याचा विडा हाती घेतलेले पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना वाकडमध्ये काय सुरुये याची कल्पना आहे की नाही? असा प्रश्न सर्व सामान्यांना पडला आहे. (Crime News Pune) अशातच हिंजवडी पोलिसांच्या हद्दीत बावधनमध्ये आणखी एक खुनाची घटना समोर आली आहे. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवारांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील कायदा-सुव्यवस्थेबाबत पोलिसांवर अनेकदा खरडपट्टी केलेली आहे. पण याचं पिंपरी चिंचवड पोलिसांना काही सोयरसुतक नसल्याचं दिसून येतं आहे. ऐन गणेशोत्सवात पिंपरी चिंचवडमध्ये घटनांनी हे अधोरेखित केलं आहे.


Hirvi Mirchi Nashik | खानगाव बनतेय हिरवी मिरची विक्रीचे केंद्र

लासलगाव : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार असलेल्या खाणगाव येथे 2002 ला सुरू केलेल्या उपबजारात हिरवी मिरचीची विक्रमी आवक होत असून आहे. त्यामुले खानगाव हिरवी मिरची विक्रीचे मोठे केंद्र बनत आहे. यापूर्वी खानगाव बाजारात सुमारे बारावर्षे द्राक्ष मणी लिलाव सुरू करण्यात आले होते. मात्र, 2020 पासून येथे भाजीपाला लिलावाला सुरुवात होऊन प्रामुख्यान...


Buldhana Jalgaon Jamod : जळगाव जामोदमध्ये विसर्जन मिरवणुकीत तणाव

बुलढाण्यातील जळगाव जामोदमध्ये विसर्जन मिरवणुकीत तणाव, दोषींवर कारवाई केल्याशिवाय विसर्जन करणार नसल्याची सर्व मंडळांची भूमिका. त्यामुळं सर्व मंडळांच्या विसर्जन मिरवणूका थांबून. काल सायंकाळी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे विसर्जन मिरवणुकी दरम्यान दोन गटात वाद झाला होता.. त्यानंतर झालेल्या दगडफेकीत अनेक वाहनांचे नुकसान झालं तर तीन पोलीस कर्मचाऱ्यांसह अनेक गणेशभक्त ही जखमी झाले.. त्यानंतर जळगाव जामोद शहरातील पंधरा गणेश मंडळ हे दोषींवर कारवाई केल्याशिवाय विसर्जन करणार नाही या भूमिकेत आहेत अद्यापही जवळपास 15 गणेश मंडळ हे जळगाव जामोद शहरात थांबून आहेत अद्यापही विसर्जन झालेल्या नाही जळगाव जामोद शहरात मोठा पोलीस बंदोबस्त असून परिस्थिती नियंत्रणात आहे मात्र गणेश विसर्जन न झाल्यामुळे जळगाव जामोद शहराच्या मुख्य रस्त्यावर गणेश मंडळांच्या मूर्ती थांबून आहे.


लोकमानस : सुधारणा एकीकडे, लाभ भलतीकडेच

दक्षिणेकडील राज्यांनी प्रगती केली. तर उत्तरेकडील राज्यांनी प्रगती केलीच नाही असे नाही, मात्र तेथील लोकसंख्या वेगाने वाढत गेली.


Rupali Chakankar On Rohini Khadse : खडसे परिवारामध्ये कोण कुठल्या पक्षामध्ये तेच कळत नाही

मुंबई: भाजपच्या अतिवरिष्ठ नेत्यांनी मला पक्षात पुन्हा प्रवेश करण्याविषयी विचारले होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत माझा पक्षप्रवेशही झाला होता. मात्र, यानंतर भाजपने (BJP) त्याबाबत घोषणा केलीच नाही. आता या सगळ्याला पाच महिने उलटून गेल्यामुळे मी भाजप प्रवेशाच्या विषयावर फुली मारली आहे, असे वक्तव्य एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केले होते. एकनाथ खडसे यांनी 'एबीपी'च्या माझा कट्टा या कार्यक्रमात बोलताना याबद्दल भाष्य केले होते. एकनाथ खडसे यांच्या मुलाखतीनंतर आता महाराष्ट्र भाजपमध्ये हालचाली दिसून येत आहेत. नाथाभाऊंचे कट्टर विरोधक असणाऱ्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्वत: एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये सामावून घेण्याविषयी भाष्य केले आहे. एकनाथ खडसे मुलाखतीत काय म्हणाले, ते मी ऐकलं नाही. त्यांच्यासंदर्भात आमच्या केंद्रीय नेतृत्त्वाने निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय आम्हाला मान्यच आहे. त्यासंदर्भात केंद्रीय नेतृत्त्वाशी चर्चा करुन एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाबाबत गणेशोत्सवानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे आता महाराष्ट्र भाजप एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम कधी आयोजित करणार, हे पाहावे लागेल. तसेच एकनाथ खडसे भाजपचा हा प्रस्ताव स्वीकारणार का, हेदेखील बघावे लागेल.


Amol Mitkari on Jai Malokar : जय मालोकर प्रकरणात मोठा ट्वीस्ट, अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया

Amol Mitkari on Jai Malokar : जय मालोकर प्रकरणात मोठा ट्वीस्ट, अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया MNS Activist Jay Malokar Death Case : अकोला जिल्ह्यामधील मनसे कार्यकर्ते जय मालोकारच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. जय मालोकारच्या शवविच्छेदन अहवालात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. जय मालोकारचा मृत्यू जबर मारहाणीनं झाल्याचं शवविच्छेदन अहवालात उघड झालं आहे. 30 जुलै रोजी अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहावर मनसे कार्यकर्ते आणि अमोल मिटकरी यांच्या कार्यकर्त्यांचा राडा झाला होता. मनसे कार्यकर्त्यांनी अजित पवारांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरी यांची गाडी फोडली होती. यानंतर गुन्हा दाखल झालेल्या कार्यकर्त्यांपैकी जय मालोकारचा मृत्यू हृदयविकारानं झाल्याचा दावा करण्यात आला होता. जय हा मनसेच्या विद्यार्थी सेनेचा जिल्हा उपाध्यक्ष होता. तसेच परभणी येथे होमिओपॅथी अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षात शिकत होता. मिटकरींसोबत झालेल्या राड्याच्या ताणातूनच जय यांचा मृत्यू झाल्याचा आरोप मनसेनं केला आहे. जयच्या मृत्यूनंतर राज आणि अमित ठाकरे यांनी अकोल्यात त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. राडा झाल्यानंतर तीन तासांत जयसोबत नेमकं काय झालं होतं याची चौकशी करण्याची मागणी जयच्या कुटूंबियांनी केली आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची कुटूंबियांची राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे मागणी करण्यात आली आहे. कुटूंबीयांच्या जीवाला धोका असल्याचे मालोकार कुटूंबियांनी 'एबीपी माझा'शी बोलताना म्हटले आहे.


Kolkata Rape Case: सिब्बल यांची Live Streaming थांबवण्याची मागणी; चंद्रचूड म्हणाले, 'कोणत्याही...'

RG Kar Medical Collage Case Supreme court Hearing: कोलकाता सरकारची बाजू मांडणाऱ्या सिब्बल यांनी न्यायालयासमोर आपली बाजू मांडताना महिला सहकाऱ्यांना धमकावलं जात असल्याचा दावा केला.


Railway Recruitment 2024: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! कोकण रेल्वेत रिक्त पदांसाठी भरती, ३५ हजारांपर्यंत मिळणार पगार

konkan railway Recruitment 2024 : रेल्वे विभागात नोकरी करणे हे अनेकांचे स्वप्न असते. रेल्वेमध्ये नोकरी करणे ही संधी सगळ्यांनाच मिळत नाही. अशा संधी उमेदवारांना त्यांचे करियर स्थिर आणि सुरक्षित होण्यासाठी मदत करतात. कोकण रेल्वेने नवीन भरतीसाठी अधिकृत जाहिरात जारी केली आहे, त्यामध्ये विविध पदांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. वाचा सविस्तर...


Sandalwood Stock Seized In Nashik : म्हसरुळ शिवारात ३५ लाखांचा चंदन साठा जप्त

अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या या बंगल्याच्या आवारातील जुन्या वाहनात चंदनाची पाच लाकडे आढळून आली.