बातम्या

Trending:


मुलुंडमध्ये मोटारीच्या धडकेत तरुण जखमी

चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव वेगात धावणाऱ्या मोटारीने मुलुंड परिसरातील पदपथावरून चालणाऱ्या तरुणाला मंगळवारी पहाटे धडक दिली.


ABP Majha Headlines : 8:00 AM : 20 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

ABP Majha Headlines : 8:00 AM : 20 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स खरीप हंगामासाठी १४ पिकांच्या हमीभावात केंद्र सरकारकडून वाढ, धानाचा हमीभाव आता २३०० रुपये तर कपाशीला ७ हजार १२१ रु. प्रति क्विंटल मिळणार मंगळवारी घेतलेली UGC-NET परीक्षा रद्द, परीक्षेत गैरप्रकार झाल्यानं केंद्रीय शिक्षण खात्याचा निर्णय, UGC-NET परीक्षा पुन्हा घेणार, तारीख लवकरच कळणार यूजीसी नेट परीक्षा रद्द केल्यावर आता नीट परीक्षाही रद्द करा, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंची मागणी, पंतप्रधानांनी नीट परीक्षेतल्या घोळाची जबाबदारी स्वीकारावी, खर्गेंची टीका पांढऱ्या शिधापत्रिकाधारकांनाही आता मिळणार महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मन योजनेचा लाभ, २२ लाख लाभार्थ्यांना लाभ, मंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला त्या भाजपसोबत कधीच जाणार नाही, शिवसेनेच्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरेंचा निर्धार उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्ट पाठिंबा, उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना चिमटा, तर पुन्हा येईन म्हणणारे आता जाऊ द्या ना घरी आता वाजवले की बारा म्हणतायत, फडणवीसांनाही खोचक टोला देशभक्त मुस्लिमांनी आम्हाला मतं दिली हे जाहीर सांगतो, सत्ताधाऱ्यांना उद्धव ठाकरेंचं उत्तर, तर तमाम हिंदूबांधव म्हणण्य़ाचं धाडस ठाकरेंनी केलं नाही, शिंदेंचा पलटवार


Gajanan Maharaj Palkhi Akola : पातूरच्या घाटातील गजानन महाराजांच्या पालखीचं विहंगम दृश्य Exclusive

Gajanan Maharaj Palkhi Akola : पातूरच्या घाटातील गजानन महाराजांच्या पालखीचं विहंगम दृश्य Exclusive अकोल्यात गजानन महाराजांच्या पालखीचं काल मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आल.. आजही पालखी अकोल्यात मुक्कामी असणार आहे... गजानन महाराजांच्या पालखीचे हे 55 वे वर्ष आहेय. यावर्षी पालखीत साडेसहाशेंवर वारकऱ्यांचा समावेश आहेय. विशेष म्हणजे दरवर्षी सारखाच यावर्षीही वारीमध्ये तरुणांचा सहभाग लक्षणीय आहे. अकोल्यातील ड्रोन दृष्यांसह गजानन महाराजांच्या पालखीतील उत्साहाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश अलोणे यांनी... गजानन महाराजांच्या पालखीनं आज अकोला जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्याच्या सीमेत प्रवेश केलाय. 13 जूनला शेगावातून निघालेली गजानन महाराजांच्या पालखीने नागझरी, पारस, भौरद, अकोला, वाडेगाव, पातूरमार्मागे वाशिम जिल्ह्यातील मेडशीत प्रवेश केलाय. या पालखीतील एक अतिशय महत्वाचा आणि सुंदर टप्पा म्हणजे पातूरचा घाट. संत गजानन महाराजांच्या पालखीचा वाशिम जिल्ह्यातील मेडशीत प्रवेश, पातूर घाटातून पालखी वाशिममध्ये दाखल.


Dombivali MIDC News : आगीच्या घटनांनंतर डोंबिवली एमआयडीसीचे स्थलांतर होणार का ?

Dombivali MIDC News : डोंबिवली एमआयडीसीतील आगीच्या आणि स्फोटाच्या घटनांनंतर प्रशासनाला अचानक जाग आली आहे. स्थानिकांनी डोंबिवली एमआयडीसीतील सगळ्या केमिकल कंपन्यांचे स्थलांतर करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने या मागणीची दखल घेतली आहे.


Burger King मध्ये बसलेल्या तरुणावर झाडल्या 10 गोळ्या, गँगवॉरने शहर हादरलं

नवी दिल्ली : मंगळवारी रात्री गोळीबाराची घटना घडल्याने दिल्ली हादरून गेली. राजौरी गार्डनमधल्या बर्गर किंग आउटलेटमध्ये एका युवकावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या प्रकरणी पोलीस तपास वेगात सुरू आहे; पण सोशल मीडियावरच्या एका व्हायरल मेसेजने प्रकरणाचा अँगल बदलला आहे. या मेसेजवरून ही हत्या गँगवॉर अर्थात टोळीयुद्धातून झाल्याचं दिसतं.दिल्लीतल्या राजौरी गार्डन परिसरात मंगळवारी रात्री खुलेआम एका युवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बर्गर किंग...


उत्तर भारतात उष्माघाताचे 178 बळी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : दिल्लीत उष्म्याचा तडाखा कायम असून, गेल्या 48 तासांत या महानगरीत उष्माघाताने 33 जणांचा मृत्यू झाला आहे. लगतच्या नोएडामध्ये 9 जणांना जीव गमवावा लागला. नोएडासह उत्तर प्रदेशात गेल्या 48 तासांत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. आठवडाभरात एकट्या उत्तर प्रदेशात 119 मृत्यू झाले असून, उत्तरेकडील अन्य राज्ये मिळून ही संख्या 178 वर …


Tamil Nadu Illicit Liquor: तामिळनाडूत विषारी दारूने घेतला 25 जणांचा बळी, 60 जण गंभीर

Tamil Nadu Kallakurichi 25 dead : तामिळनाडूतील कल्लाकुरिची जिल्ह्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. या ठिकाणी विषारी दारूने तब्बल 25 जणांचा बाळी घेतला आहे. तर 60 हून अधिक लोक गंभीर असून त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील काही लोकांची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटकही केली आहे.


MSP Increase Modi Cabinet: शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 14 पिकांच्या एमएसपीत वाढ, केंद्र सरकारचा निर्णय

MSP Increase Modi Cabinet: केंद्रातील एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक 19 जून रोजी पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत मंत्रिमंडळाने खरीप पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत 14 खरीप पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ करण्यास मंजुरी दिली आहे.


डोंबिवलीतील विकासकांकडून घर खरेदीदारांची एक कोटीची फसवणूक

डोंबिवलीतील वीर मारूती डेव्हलर्पसचे चार विकासक आणि भागीदार यांनी ठाणे, पालघर जिल्ह्याच्या विविध भागातील १४ घर खरेदीदारांची गेल्या दहा वर्षात एक कोटी चार लाख ५३ हजार ९२८ रूपयांची फसवणूक केली आहे.


विधान परिषदेच्या दोन जागा अजित पवार गटाला मिळणार

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : विधान परिषदेच्या १२ जुलै रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्यमान सदस्य बाबा जानी दुर्राणी यांना पुन्हा संधी दिली जाणार असून दुसऱ्या जागेसाठी मुंबईतील दलित चळ- वळीचा प्रगत चेहरा असलेले मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे समजते. संख्याबळानुसार अजित पवार गटाला परिषदेच्या दोन जागा निश्ति …


Uddhav Thackeray: 'ए़नडीएमध्ये पुन्हा कधीच जाणार नाही', उद्धव ठाकरे यांची स्पष्टोक्ती

Mumbai Uddhav Thackeray: शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात साजरा करण्यात आला. या वेळी ठाकरे गटाने निवडून आलेल्या सर्व खासदारांचा उद्धव ठाकरे यांनी सत्कार केला; तसेच लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या सर्व उमेदवारांचाही या वेळी सत्कार करण्यात आला.


EVM Hacking Row: उद्धव ठाकरे गटाला धक्का, आमदार विलास पोतनीस यांच्यावर गुन्हा दाखल

EVM Tamparing Case: लोकसभेच्या उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघाचे शिवसेना उमेदवार, विजयी खासदार रवींद्र वायकर यांच्या एका नातेवाइकाचा फोन मतमोजणीच्या दिवशी ‘ईव्हीएम’शी जोडलेला होता, असा दावा करणारे वृत्त एका वृत्तपत्राने प्रकाशित केल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. रवींद्र वायकर यांचा मुंबई उत्तर-पश्चिम’ मतदारसंघातून ४८ मतांनी विजय झालेला आहे.


mumbai ice cream case: आईस्क्रीममध्ये सापडलेलं 'ते' बोट कोणाचं? धक्कादायक माहिती उजेडात

Mumbai Ice Cream Case: मुंबईतील मालाड परिसरातील एका महिला डॉक्टरने ऑनलाईन आईस्क्रीम ऑर्डर केलं होतं. आईस्क्रीम कोनमध्ये कापलेलं मानवी बोट आढळून (Finger Inside Cone Ice Cream) आल्याने खळबळ उडाली होती. आता या प्रकरणी धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. आईस्क्रीममध्ये सापडलेलं 'ते' बोट कोणाचं? याचा देखील पोलिस चौकशीत (Pune Police Investigation) उलगडा झाला आहे.


RTE Admissions : आरटीई प्रवेशांबाबत माहिती देण्यास शाळांची टाळाटाळ, राज्य सरकारची हायकोर्टात माहिती

RTE Admissions : आरटीई प्रवेशांबाबत माहिती देण्यास शाळांची टाळाटाळ, राज्य सरकारची हायकोर्टात माहिती आरटीई प्रवेशाप्रक्रियेबाबत अद्याप राज्य सरकारनं सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर न केल्याबद्दल हायकोर्टानं तीव्र नाराजी व्यक्त केली. शालेय विद्यार्थ्यांना असं ताटकळत ठेवता येणार नाही असं स्पष्ट करत राज्य सरकारला 9 फेब्रुवारीच्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर लवकरात लवकर उत्तर सादर करण्यास सांगितलंय. तसेच खाजगी शाळांना राज्याच्या शिक्षण विभागाला प्रवेशासंबंधी आवश्यक तो तपशील देण्याचे निर्देश जारी केलेत. आरटीई कायद्याअंतर्गत राखीव आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी आरक्षित असलेल्या 25 टक्के जागांमधून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरापासून एक किमी परिघात शासकीय किंवा अनुदानित शाळा असल्यास त्याच शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा, असं परिपत्रक राज्य सरकारनं 9 फेब्रुवारी रोजी काढलं होतं. याप्रकरणी काही शाळांनी तसेच पालकांनी आक्षेप घेत मुंबई उच्च न्यायालयात याला आव्हान दिलं आहे. राज्य सरकारचा हा निर्णय आरटीई कायद्याविरोधात तसेच मुलांच्या शिक्षणात बाधा आणणारा असल्याचं स्पष्ट करत हायकोर्टानं या परिपत्रकाला तात्काळ स्थगिती दिली होती. त्यानंतर न्यायालयानं दिलेल्या आदेशाच्या अधीन राहून आरटीआय कायद्याअंतर्गत नवीन परिपत्रक काढण्यात येईल अशी हमी देत तातडीनं राज्य सरकारनं सुधारीत परिपत्रक काढलं होतं यासंदर्भातील याचिकांवर मंगळवारी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. राज्य सरकारच्यावतीनं अतिरिक्त सरकारी वकील ज्योती चव्हाण यांनी हायकोर्टाला सांगितले की, संबंधित विभागाकडून प्रवेशित विद्यार्थ्यांच्या संख्येसह काही माहिती संस्थांकडून मागविण्यात आली होती, परंतु त्यापैकी बहुतेकांनी ती अद्याप दिलेली नाही. ती माहिती मिळाल्यास खंडपीठासमोर भूमिका सादर केली जाईल. हा युक्तिवाद ऐकून घेत हायकोर्टानं सुनावणी जुलैपर्यंत तहकूब केलीय.


Konkan Railway : गोव्याशी संबंधित असलेली ही योजना कोकण रेल्वेकडून अखेर रद्द! मोठं कारण आलं समोर

Konkan Railway News : स्थानिकांकडून या योजनेला होत असलेला विरोध लक्षात घेता रेल्वेकडून ही योजना रद्द करण्यात आली आहे. यामुळे या योजनेसाठी जारी केलेल्या निविदा रद्द केल्या आहेत.


Google Chrome वापरताय सावधान! सरकारने दिला Alert, सांगितला मोठा धोका

नवी दिल्ली : इंटरनेटवर कोणत्याही स्वरूपाचं काम करायचं असेल तर बहुतांश युजर्स गुगलचा वापर करतात. त्यामुळे इंटरनेट म्हणजे गुगल असं समीकरण तयार झालं आहे. पण सायबर गुन्हेगारीचा वाढता धोका पाहता इंटरनेटवर काम करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. अनेक युजर्स रोज गुगल क्रोम ब्राउझरचा वापर करतात. सरकारने आता गुगल क्रोम ब्राउझर युजर्सना एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. काही कारणांमुळे युजर्सचा खासगी डाटा हॅकर्सच्या हाती लागू शकतो. त्यामुळे युजर्सने...


सुसंस्कृत राजकारणी - मुरलीधर भंडारे

Muralidhar Bhandare : अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी त्यांच्या आत्मचरित्राचे दिल्लीत प्रकाशन झाले होते, त्या समारंभातूनही त्यांचे वेगळेपण दिसून आले होते. ‘सतत कार्यरत राहा आणि लोकांच्या दृष्टीने उपयोगाचे राहा’ हाच मंत्र त्यांनी आयुष्यभर जपला.


IRCTC Ticket Booking : चुकूनही करू नका IRCTC ID वरून दुसऱ्यांसाठी Train Ticket बुक, अन्यथा जावे लागेल जेल

IRCTC Ticket Booking Rule: जर तुम्ही रेल्वेतून प्रवास करण्याआधी IRCTC वरून तिकीट बुक करत असाल तर रेल्वेचा हा नियम तुम्हाला माहिती असावा. IRCTC आयडीवरून दुसऱ्याचे तिकीट बुक केल्यास १० हजार रुपये दंड किंवा ३ वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो.


Shivrajyabhishek Din Nagpur:तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन;शिवरायांना मानवंदना देण्यासाठी जय्यत तयारी

Shivrajyabhishek Din Nagpur:तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन;शिवरायांना मानवंदना देण्यासाठी जय्यत तयारी रायगडावर आज ३५१वा शिवराज्यभिषेक सोहळा साजरा होतोय. ६ जूनप्रमाणे या शिवराज्याभिषेकाची देखील प्रशासनाने जय्यत तयारी केलेली आहे. रायगडावर ७ वाजता शिवरायांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. ८ वाजता नगारखान्यासमोर ध्वजारोहण केलं जाणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री यांच्या हस्ते मुख्य शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रायगडावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एकीकडे पावसाची रिमझिम सुरु असून तेवढ्याच उत्साहात शिवभक्त गडावर दाखल होताना दिसत आहेत. रायगडावर आज तिथीनुसार 351 वा शिवराज्यभिषेक सोहळा शासकीय यंत्रणा रायगडावर सज्ज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार शिवराज्यभिषेक गडावर पोलिस बंदोबस्त तैनात Anchor - आज रायगडावर 351 वा शिवराज्यभिषेक सोहळा साजरा होतोय सकाळी 8 वाजता ध्वजारोहण त्यानंतर मुख्यमंत्री यांच्या हस्ते शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे, गडावर मोठया स्वरूपात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे ,पावसाची रिमझीम एकीकडे सूरु असुन तेवढ्याच उत्साहात शिवभक्त मात्र गडावर दाखल होताना दिसत आहेत.


Panipuri Poisson Jalgaon : जळगावात पाणीपुरी खाल्ल्याने 80 पेक्षा अधिक जणांना विषबाधा

Panipuri Poisson Jalgaon : जळगावात पाणीपुरी खाल्ल्याने 80 पेक्षा अधिक जणांना विषबाधा कमळगाव आणि आजूबाजूच्या खेड्यांतील तसेच चांदसणी, मितावली, पिंप्री येथील ग्रामस्थ बाजारासाठी आले असताना तेथील पाणीपुरी विक्रेत्यांकडून अनेकांनी पाणीपुरी खाल्ली तर काहींनी पाणीपुरीचे पार्सल घरी नेले होते. या पाणीपुरी खाल्लेल्यांना मंगळवारी सकाळी उलट्या, जुलाब, पोटात दुखणे असे त्रास जाणवू लागले. यापैकी अनेक रुग्णांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले. परंतु, संध्याकाळी ६ वाजेनंतर अचानक रुग्णांमध्ये वाढ झाली. पाणीपुरीमुळे त्रास झाल्याबाबत सोमनाथ जगन कोळी (रा. पिंप्री) यांनी पोलिस स्टेशनला लेखी जबाब दिला आहे. अडावद येथे सायंकाळनंतर अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रात पिंप्री, कमळगाव येथील विषबाधा झालेले सर्वच वयोगटातील रुग्ण वाढतच गेले. या ठिकाणाहून ७० पैकी ३० रुग्ण चोपडा येथे उपजिल्हा रुग्णालयात व इतर रुग्ण खासगी व जळगाव जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. रात्री सुमारे १० रुग्णांवर अडावद येथे उपचार सुरू होते. घटना समजल्यानंतर चोपडा तालुका गटविकास अधिकारी रमेश वाघ तसेच आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर हे आरोग्य पथकांसह दाखल झाल्यावर उपचारास गती मिळाली. अडावद आरोग्य केंद्रात रुग्णसंख्येत वाढ होताच गावातील ग्रामस्थांनी मदत कार्यासाठी धाव घेतली.


Underwater Drone: पुण्यात साकारणार पाण्याखालचा 'ड्रोन'; देशातील पहिला वहिला प्रकल्प, कसा होणार फायदा?

Underwater Drones : पुण्यातील ‘सागर डिफेन्स इंजिनिअरींग’ या कंपनीला दिली असून, संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या (डीआरडीओ) तंत्रज्ञान विकास निधी प्रकल्पाअंतर्गत हा प्रकल्प विकसित केला जाणार आहे.


Police Recruitment: नवी मुंबई पोलीस भरतीसंदर्भात मोठी अपडेट; प्रक्रिया पुढे ढकलली, कधी होणार परीक्षा? जाणून घ्या नवी तारीख

Navi Mumbai Police Recruitment: नवी मुंबई पोलीस मुख्यालयामध्ये आज होणारी भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. या संदर्भातील माहिती उपायुक्त संजय पाटील यांनी दिली. भरती प्रक्रियेची नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे.