Trending:


TOP 100 Headlines : सकाळच्या 100 हेडलाईन्स ; बातम्यांचा वेगवान आढावा : 20 June 2024 : ABP Majha

TOP 100 Headlines : सकाळच्या 100 हेडलाईन्स ; बातम्यांचा वेगवान आढावा : 20 June 2024 : ABP Majha खरीप हंगामासाठी १४ पिकांच्या हमीभावात केंद्र सरकारकडून वाढ, धानाचा हमीभाव आता २३०० रुपये तर कपाशीला ७ हजार १२१ रु. प्रति क्विंटल मिळणार पांढऱ्या शिधापत्रिकाधारकांनाही आता मिळणार महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मन योजनेचा लाभ, २२ लाख लाभार्थ्यांना लाभ, मंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला त्या भाजपसोबत कधीच जाणार नाही, शिवसेनेच्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरेंचा निर्धार उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्ट पाठिंबा, उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना चिमटा, तर पुन्हा येईन म्हणणारे आता जाऊ द्या ना घरी आता वाजवले की बारा म्हणतायत, फडणवीसांनाही खोचक टोला देशभक्त मुस्लिमांनी आम्हाला मतं दिली हे जाहीर सांगतो, सत्ताधाऱ्यांना उद्धव ठाकरेंचं उत्तर, तर तमाम हिंदूबांधव म्हणण्य़ाचं धाडस ठाकरेंनी केलं नाही, शिंदेंचा पलटवार


नीट सुधारा!

शिक्षण आणि आरोग्य सुविधांचे जाळे देशाच्या कानाकोपर्‍यापर्यंत पोहोचवले, तरच विकास तळागाळापर्यंत झिरपेल, असे प्रतिपादन नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी केले होते; परंतु आजही या दोन्ही तरतुदींवर आवश्यक तेवढा खर्च केला जात नाही. एवढेच नव्हे, तर शिक्षण हळूहळू खासगी संस्थांच्या हवाली झाले आहे. कॉपी, पेपरफुटी तसेच भरती प्रक्रियेतील भ—ष्टाचारामुळे हे क्षेत्र बदनाम होत आहे. उत्तम …


Maratha Reservation: जरांगे साहेब आरक्षणाशिवाय मागे हटू नका, चिऊ मला माफ कर, पुण्यात मराठा आंदोलकाचा भयंकर निर्णय

Pune Maratha Andolak Ends Life: मराठा आरक्षणासाठी आणखी एका आंदोलकाने आपला जीव दिल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यात एका मराठा आंदोलकाने पत्र लिहून पत्नीची माफी मागितली आपली जीवन यात्रा संपवली आहे.


Shivsena Foundation Day : शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसैनिकांनध्ये उत्साह

Shivsena Foundation Day : शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसैनिकांनध्ये उत्साह शिवसेनेचा ५८वा वर्धापन दिन आज ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना स्वतंत्रपणे साजरा करणार आहेत.. या वर्धापन दिना निमित्त शिवसेनेच्या दोन्ही गटांचे कार्यक्रम होणार आहे.. ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन माटुंगा येथील बन्मुखानंद सभागृहात होत आहे तर शिंदे गटाचा वर्धापन दिन सोहळा वरळी येथील डोम एनएससीआय सभागृहात होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचे बिगुल दोन्ही शिवसेना नेते या मेळाव्यात फुंकण्याची शक्यता आहे शिवसेनेतल्या पक्ष फुटीनंतर हा दुसरा वर्धापन दिन आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना आपला वेगळा वर्धापन दिन साजरा करणार आहेत. शिंदेंचा वर्धापन दिन मुंबईत वरळी डोम इथं तर ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात होणार आहे. लोकसभा निवडणुकीचा लागलेला निकाल आणि तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर या वर्धापन दिनाला महत्त्व आहे.


Shivrajyabhishek Din Nagpur:तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन;शिवरायांना मानवंदना देण्यासाठी जय्यत तयारी

Shivrajyabhishek Din Nagpur:तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन;शिवरायांना मानवंदना देण्यासाठी जय्यत तयारी रायगडावर आज ३५१वा शिवराज्यभिषेक सोहळा साजरा होतोय. ६ जूनप्रमाणे या शिवराज्याभिषेकाची देखील प्रशासनाने जय्यत तयारी केलेली आहे. रायगडावर ७ वाजता शिवरायांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. ८ वाजता नगारखान्यासमोर ध्वजारोहण केलं जाणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री यांच्या हस्ते मुख्य शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रायगडावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एकीकडे पावसाची रिमझिम सुरु असून तेवढ्याच उत्साहात शिवभक्त गडावर दाखल होताना दिसत आहेत. रायगडावर आज तिथीनुसार 351 वा शिवराज्यभिषेक सोहळा शासकीय यंत्रणा रायगडावर सज्ज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार शिवराज्यभिषेक गडावर पोलिस बंदोबस्त तैनात Anchor - आज रायगडावर 351 वा शिवराज्यभिषेक सोहळा साजरा होतोय सकाळी 8 वाजता ध्वजारोहण त्यानंतर मुख्यमंत्री यांच्या हस्ते शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे, गडावर मोठया स्वरूपात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे ,पावसाची रिमझीम एकीकडे सूरु असुन तेवढ्याच उत्साहात शिवभक्त मात्र गडावर दाखल होताना दिसत आहेत.


आजचा अग्रलेख: दोन सत्तांतरे

ओडिशात भाजपने मोहनचरण माझी यांच्याकडे धुरा दिली आहे. मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत असलेल्या नावाऐवजी दुसरेच नाव पुढे करण्याचे धक्कातंत्र भाजपने ओडिशातही वापरले. सुरेश पुजारी, मनमोहन सामल या भाजपच्या अनुक्रमे आजी-माजी प्रदेशाध्यक्षांची नावे चर्चेत होती. या दोघांनाही डावलून भाजपने तळागाळातून आलेले माझी यांना पसंती दिली.


Jalna Rasta Roko : धुळे-सोलापूर महामार्गावरील रास्ता रोको आंदोलकांकडून मागे

Jalna Rasta Roko : धुळे-सोलापूर महामार्गावरील रास्ता रोको आंदोलकांकडून मागे महाराष्ट्रातल्या शासनाने आतापर्यंत दाखल घ्यायला हवी होती आम्ही मोठे बॅकग्राऊंड असलेले कार्यकर्ते नाहीत आम्ही कुठल्याही राजकीय चेहरा नसलेले कार्यकर्ते आहोत म्हणून शासनाला आमची दखल घेऊ वाटत नाही आमची दखल नका घेऊ पण VJ एनटी ओबीसींची बाजू काय आहे हे तरी समजून घ्याव फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी कायम फेसलेस राहिला महाराष्ट्रातील गरजवंत मराठा आर्थिक दृष्ट्या गरीब आहे, म्हणून त्यांना ओबीसी आरक्षण भेटल्यावर न्याय मिळतो हे कोणी सांगितले आरक्षण गरिबी हटाव चां कार्यक्रम नाही माय बाप सरकार samjun घ्या मी घरापासून दुरू आलो तरी जालना बीड , परभणी भागात मी गेलेलो आहे, खरं बोलायला तयार नाहीत महाराष्ट्रातील शासन करते, ते दूर पळत आहेत जरांगे जी बाजू मांडत आहेत त्याचे उत्तर ओबीसी आरक्षण नव्हे ओबीसी आरक्षण मिळाल्यावर मराठा समाजाला न्याय मिळतो हे सांगणारे जरांगेचे सल्लागार कोण आहेत??


Raj Thackeray Nashik : त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेऊन राज ठाकरे निवृत्तीनाथांच्या पालखीत सहभागी होणार

Raj Thackeray Nashik : त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेऊन राज ठाकरे निवृत्तीनाथांच्या पालखीत सहभागी होणार २०० हून अधिक विधानसभेच्या जागा लढण्याची घोषणा केल्यावर राज ठाकरेंचा पहिलाच नाशिक दौरा, उद्या त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेऊन निवृत्तीनाथांच्या पालखीतही सहभागी होणार हेही वाचा : आज शिवसेनेचा ५८ वा वर्धापन दिन. शिंदेंचा वर्धापन दिन मुंबईत वरळी डोम इथं तर ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात होणार. मी दादांसोबत नाही तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत, एबीपी माझाशी बोलताना छगन भुजबळ यांचं अतिशय सूचक विधान कोणत्याही पक्षात जाणार नाही, कोणत्याही नेत्याला भेटलो नाही, नाराजीच्या चर्चेवर छगन भुजबळांची एबीपी माझाला EXCLUSIVE प्रतिक्रिया... ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनाचा आज सातवा दिवस, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड भेट घेणार, प्रकाश आंबेडकरही भेट घेण्याची शक्यता देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहणार, पियूष गोयलांची माहिती...दिल्लीतल्या बैठकीत राजीनाम्याबाबत कोणतीच चर्चा नाही... पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक, रब्बी हंगामासाठी हमीभाव वाढवण्याच्या निर्णयाची शक्यता बुलढाणा, वाशिम जिल्ह्यात पावसाची दडी, लाखो हेक्टर क्षेत्रावर पेरण्या खोळंबल्या, काही भागात स्प्रिंकलर्सने पाणी देण्याची वेळ


दिल्लीत मृत्यूचा तांडव! 48 तासात 50 मृतदेह सापडले; 9 दिवसात 192 बळी; घडतंय काय?

नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत मृत्यूचा तांडव सुरू आहे. गेल्या 48 तासांत 50 मृतदेह सापडले, 9 दिवसांत 192 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दिल्लीत असं काय घडत आहे की लोकांचा जीव जातो आहे?अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, 48 तासांत दिल्लीच्या विविध भागांतून वंचित सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीतील 50 लोकांचे मृतदेह सापडले आहेत. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, बुधवारी इंडिया गेटजवळील चिल्ड्रन पार्कमध्ये 55 वर्षीय व्यक्तीचा...


ONGC Recruitment 2024 : लेखी परीक्षेशिवाय ओएनजीसीमध्ये निवड केली जाईल, कोण अर्ज करू शकते ते जाणून घ्या

ONGC Recruitment 2024 : ओएनजीसीमध्ये भरतीकरता रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. सरकारी नोकरी करायची असेल तर एवढी चांगली संधी तुमच्यापासून दूर जाऊ देऊ नका. येथे या भरतीशी संबंधित तपशील तपासून, तुम्ही या पदांसाठी अर्ज करण्याचा विचार करू शकता.


Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : काँग्रेसच्या वोटबँकमुळे उबाठा जिंकली, शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : काँग्रेसच्या वोटबँकमुळे उबाठा जिंकली, शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार : वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा वरळी डोम इथं झाला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. एकनाथ शिंदे यांनी निवडून आलेल्या सर्व सातही खासदारांचं स्वागत आणि सत्कार केला. मुख्यमंत्री म्हणाले, हा बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा ५८ वा वर्धापन दिन आहे. बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देताना मला वेगळा आनंद आणि वेगळी भावना आहे. १९६६ साली बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली. मराठी माणूस हा बाळासाहेबांचा केंद्र होता. शिवसेना पूर्ण देशात हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना म्हणून लोकप्रिय झाली. शिवसेना वाढली ठाण्यात, कोकणात, संभाजीनगरमध्ये, महाराष्ट्रात. हे सर्व शिवसेनेचे बालेकिल्ले आहेत. हे बालेकिल्ले अबाधित राखले. कोणी म्हणाले ठाणे पडेल, कल्याण पडेल, पण आपण हे किल्ले २-२ लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकलं.संभाजीनगर जिंकलं, कोकणात एकही जागा उबाठाला मिळू शकली नाही. हा विजय घासून-पुसून नाही, ठासून विजय मिळवला


Maharashtra SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा | मुंबई सुपरफास्ट | ABP Majha | 3 PM

Maharashtra SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा | मुंबई सुपरफास्ट | ABP Majha | 3 PM राज्यात आजपासून पोलीस भरतीला सुरुवात, १७ हजार जागांसाठी १७ लाख अर्ज, ४० टक्के उमेदवार गरजेपेक्षा उच्चशिक्षित. आरटीई प्रवेशांबाबत माहिती देण्यास शाळांची टाळाटाळ, राज्य सरकारची हायकोर्टात माहिती, प्रशासनाला योग्य ती माहिती सादर करण्याचे शाळांना हायकोर्टाकडून निर्देश शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या पुन्हा ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय, दुर्गम भागात सेवा देणाऱ्या जिल्हा परिषद शिक्षकांना मिळणार न्याय. रेशनकार्ड-आधारकार्ड लिंक करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत, याआधी 30 जूनपर्यंत मुदत होती एलआयसी मेट्रो शहरातील मालमत्ता विकणार असल्याची चर्चा, या मालमत्ता विक्रीतून सहा ते सात अब्ज डॉलर उभे करण्याची एलआयसीची योजना, मात्र एलआयसीने फेटाळली शक्यता पुढचे काही दिवस मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस कोसळणार, हवामान खात्याचा अंदाज. राज्यात यंदा पावसाच्या हंगामात सरासरीपेक्षा तीन मिमी जास्त पाऊस, राज्यात या काळात सरासरी १०२ मिमी पाऊस पडतो, मात्र यंदा प्रत्यक्षात १०५.८ मिमी पाऊस पडलाय.


Smart Prepaid Electricity Meter : प्रिपेड वीज मिटरच्या निर्णयाचे तीव्र पडसाद; अनेक संघटनांनी दिला निर्वाणीचा इशारा

Nagpur News नागपूर : प्रिपेड वीज मिटरचा (Smart Prepaid Electricity Meter) वाढता विरोध निवडणूकीच्या काळात सत्ताधाऱ्यांसाठी चिंतेची बाब ठरण्याची शक्यता आहे. कारण विदर्भासह राज्यातही या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटताना सध्या दिसत आहेत. महावितरणच्या नागपूर झोनमध्ये आतापर्यंत फक्त 100 प्रीपेड वीजमिटर लागले. पण त्या 100 मिटरच्या विरोधात आतापर्यंत ठिकठिकाणी 25 आंदोलनं झालीय. प्रीपेड वीजमीटर विरोधात विदर्भवादी संघटना, बहुजन विचार मंच, संघर्ष समिती, विविध...


Chandrashekhar Bawankule PC FULL : नाना पटोले गचाळ लेव्हलला गेलेत; काँग्रेसने इंग्रजांचा काळ आणला

Chandrashekhar Bawankule PC FULL : नाना पटोले गचाळ लेव्हलला गेलेत; काँग्रेसने इंग्रजांचा काळ आणला कालच्या बैठकीत महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत 0.30 टक्के मतांनी कमी राहिलो त्याची कारणं, त्याचा विचार विनिमय केला जिते कमी पडलो.. त्यावर आम्ही काम करतो आहे राज्यातील सर्व नेते, कार्यकर्ते त्यावर काम करणार आहोत.. धन्यवाद यात्रा आम्ही करतो आहोत.. ऑन पवार मोदींनी एखादा शब्द बोलले.. मागच्या तीन वर्षापासून तुम्ही काय काय बोलताय मोदींवर गलिच्छ पद्धत्तीने मावीआच्या नेत्यांनी टिप्पणी केली आहे.. पवारांनी त्य़ाचं आकलन केलं पाहिजे ऑन फडणवीस केंद्रीय नेतृत्वाने आमची विनंती मान्य केली असं आम्ही समजतो.. महायुतीच्या सर्वच नेत्यांसोबत एकत्र काम करायचं आहे ऑन मिटकरी आमच्याकडून असा कोणी प्रयत्न करत नाही ऑन खडसे खडसे भाजपमध्ये नाहीत.. भाजपमध्ये आल्यावर बघू नाना पटोले शेतकऱ्यांकडून पाय धूऊन घेतात.. इंग्रजांचा काळ काँग्रेसने आणलाय.. नाना पटोलेंचा निषेध करतो काळाच्या बैठकीत महाराष्ट्रात पॉईंट 0.3 टक्के कमी मत मिळाले...याचे कारण काय, जिथे कमी पडलो तिथं अधिकचे काम करून, कमी पडू नये यासाठी आम्ही काम करत आहे, यावर आम्ही सर्व नेते काम करणार आहे, मतदाराचे आभार धन्यवाद यात्रा महाराष्ट्रमध्ये काढणार आहे, मत दिले, ज्यांनी नाही त्यांचेही आभार मानत आहे. पुढील पाच वर्षांसाठी आम्ही योजना तयार करत आहे. मोदीजी एक शब्द बोलले तुम्ही मागील काही वर्षात मोदीजींवर मोठ्या प्रमाणात टीका करत आहे. खालच्या भाषेत मोदीजींवर टीका केली, वैयक्तिक स्वरूपाचे टीका टिपणी केली. शरद पवार यांनी याचा आकलन केलं पाहिजे एखादा शब्द पंतप्रधान मोदी बोलले तर तुम्हाला एवढा का लागला. फडणवीस यांनी सरकारमध्ये राहूनच संघटनेला मदत करावी अशी विनंती केली आहे त्यांनी ती विनंती मान्य केली आहे असा आम्ही समजतो केंद्रीय नेतृत्वाने सुद्धा आमची विनंती मान्य केले असे आम्ही समजतो महायुती सरकार लोकांच्यासाठी काम करतील यासाठी त्यांनी सरकारमध्ये असणे आवश्यक आहे. माहायुतीच्या सर्वच नेत्याबद्दल मी असे म्हणेल सर्वांनी चांगलं काम करायचे आहे, दादा बद्दल आमच्याकडून बोलतही नाही. ज्यांनी कोणी बोललं असेल त्यांना लखलाभ. छगन भुजबळ यांनाच विचारावा लागेल त्यांची नाराजी काय त्यांच्या भूमिकेबद्दल मी काही मत व्यक्त करणे हे योग्य नाही. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीवर अन्याय होणार नाही याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे. ही भूमिका आमची आहे. अजून भाजपात नाही.. जेव्हा भाजपात येईल तेव्हा बघू आमचे प्रभारी वैष्ण अश्विनी वैष्णव येथील तेव्हा त्याबद्दल चर्चा होईल नाना पटोले इतक्या खालच्या लेव्हलला गेले आहे शेतकऱ्यांकडून पाय धुवायला लावत आहे. या महाराष्ट्रात अशोभनीय प्रकार नाना पटोले यांनी केला. इंग्रजांचा काळ काँग्रेसने आणला आहे. काळातील मानसिकता नाना पटोले मध्ये उतरली आहे. नाना पटोले यांनी पदाचा अपमान केलेला आहे. त्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. या पद्धतीचा वक्तव्य करणे शोभणार नाही भविष्यात त्यांची जे वृत्ती आहे बुद्धीभेद जो झाला ती दुरुस्त केली पाहिजे. या महिन्यात आभार यात्रासाठी तयारी करत आहे.जुलै महिन्यात धन्यवाद आभार दौरा करणार आहोत. 21 व्या शतकात चाललो, काय संदेश समाजाला चाललो, या देशात बघितले पाहिजे...पाय धुणार असो की धुवून घेणारा असो.. महायुतीचे सरकार आहे, भाजपचे नेता देवेन्द्र फडणवीस आहे, महाविकास आघाडीत 5 मुख्यमंत्री झाले आहे, 6 लोकांचे बॅनर लागले, कोण मुख्यमंत्री बनणार आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे, महायुतीचे मुख्यमंत्री कोण असेल यावर कुठली चर्चा आज नाही. देवेंद्र फडणवीस हे भाजपचे नेते आहेत. आज मुख्यमंत्री पदाची चर्चा करण्याची गरज नाही. आमचे प्रभारी तिन्ही पक्षाचे नेते मिळून ठरवतील..


Rohit Pawar On Ajit Pawar : लोकसभेच्या पराभवासाठी महायुतीकडून अजितदादांचा बळीचा बकरा

Rohit Pawar On Ajit Pawar : लोकसभेच्या पराभवासाठी महायुतीकडून अजितदादांचा बळीचा बकरा रोहित पवारांनी पुन्हा एका भाजपसह अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केलाय. लोकसभेच्या पराभवासाठी महायुतीकडून अजितदादांना बळीचा बकरा बनवला जात असल्याची टीका रोहित पवारांनी केलीय. तिरंगी लढतीसाठी तिसरा पर्याय उपलब्ध करण्यासाठी अजितदादा बळीचा बकरा बनवला जात असून येत्या कालात अजितदादांना वेगळं होण्यासाठी भाग पाडले जाईल असा दावा रोहित पवारांनी केलाय. दरम्यान भुजबळांसह अनेक आमदार आणि नेते अधिवशेनानंतर पक्ष सोडतील असा दावा रोहित पवारांनी केलाय. तर अजित पवारांना भाजपसोबत घेतलं तेव्हाच बोलायला हवं होतं.. असं सांगत बच्चू कडू यांनी निशाणा साधलाय.. विआ च्या विरोधात दुहेरी लढतीत जनता आपल्याला पराभूत करते म्हणून तिरंगी लढत झाली पाहिजे, तिरंगी लढत झाल्यास सर्वसामान्य जनतेची मते विभागली जाऊन भाजपला फायदा होतो, असा भाजपच्या #चाणक्यांचा कयास आहे. त्यामुळेच तिरंगी लढतीसाठी तिसरा पर्याय उपलब्ध करण्यासाठी अजितदादांना बळीचा बकरा करण्यात येत असून आधी #आरएसएस च्या मुखपत्रातून टीका, नंतर झोपलेले तथाकथित गांधी जागा करायचे आणि आता पुढे काहीतरी करून अजितदादांना वेगळे होण्यास भाग पाडायचे ही रणनीती चाणक्यांनी दिल्लीत मांडली असल्याची चर्चा आहे.


IRCTC Ticket Booking : चुकूनही करू नका IRCTC ID वरून दुसऱ्यांसाठी Train Ticket बुक, अन्यथा जावे लागेल जेल

IRCTC Ticket Booking Rule: जर तुम्ही रेल्वेतून प्रवास करण्याआधी IRCTC वरून तिकीट बुक करत असाल तर रेल्वेचा हा नियम तुम्हाला माहिती असावा. IRCTC आयडीवरून दुसऱ्याचे तिकीट बुक केल्यास १० हजार रुपये दंड किंवा ३ वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो.


Marathwada water Supply : मराठवाड्याला 1 हजार 841 टँकरनं पाणीपुरवठा ; पावसाळ्यातही पाणीबाणी

Marathwada water Supply : मराठवाड्याला 1 हजार 841 टँकरनं पाणीपुरवठा ; पावसाळ्यातही पाणीबाणी पावसाळा सुरू होऊन दोन आठवडे उलटले, तरीही मराठवाड्यात नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. सुमारे 20 लाख नागरिकांची तहान टँकरद्वारे भागवली जात आहे. त्यामुळे मराठवाड्यातील सुमारे 10 टक्के नागरिकांना पाण्यासाठी वणवण करत असल्याचे चित्र आहे. मराठवाड्यात आज घडीला 2 हजार 97 गावांना 1 हजार 841 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे टँकरची संख्या भर पावसाळ्यात कमी होण्यापेक्षा वाढताना पाहायला मिळतात. 20 लाख नागरिकांची तहान टँकरद्वारे भागवली जात आहे. त्यामुळे मराठवाड्यातील सुमारे 10 टक्के नागरिकांना पाण्यासाठी वणवण करत असल्याचे चित्र आहे. मराठवाड्यात आज घडीला 2 हजार 97 गावांना 1 हजार 841 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे विशेष म्हणजे टँकरची संख्या भर पावसाळ्यात कमी होण्यापेक्षा वाढताना पाहायला मिळतात.


Vasai Crime News : आरोपीनं आरतीला धमकी दिल्याची पोलिसांकडे तक्रार केली होती, कुटुंबियांची माहिती

Vasai Crime News : आरोपीनं आरतीला धमकी दिल्याची पोलिसांकडे तक्रार केली होती, कुटुंबियांची माहितीपालघर जिल्ह्यातील वसईमध्ये प्रियकराने प्रेयसीची भर रस्त्यात निर्घृण हत्या केली. आरती यादव असं मृत प्रेयसीचं नाव आहे, तर रोहित यादव असं आरोपीचं नाव आहे, त्याला पोलिसांनी अटक केलीये.. दरम्यान या प्रकरणी मृत तरुणी आरती यादवच्या कुटुंबियांनी पोलिसांवर गंभीर आरोप केलेत .. दरम्यान त्यांच्याशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर यांनी.. शनिवारी ८ जून ला रोहितने भर रस्त्यात आरतीला मारहाण केली होती. तिचा मोबाईल फोडला होता. आणि तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. याबबत आरतीने आचोळे पोलीस ठाण्यात तक्रार ही दाखल केली होती. माञ पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली. आणि रोहीतकडून पैसे घेवून त्याला सोडून दिल्याचा आरोप आरतीची बहिण सानिया हिने केला आहे. त्यामुळे रोहित जेवढा दोषी आहे तेवढाच हत्याकांडाच्यावेळी बघ्याची भूमिका घेणारे ते लोक, पैसै घेवून रोहितला सोडणारे पोलीस ही दोषी असल्याचा आरोप सानिया हिने केला आहे.


Gajanan Maharaj Palkhi Akola : पातूरच्या घाटातील गजानन महाराजांच्या पालखीचं विहंगम दृश्य Exclusive

Gajanan Maharaj Palkhi Akola : पातूरच्या घाटातील गजानन महाराजांच्या पालखीचं विहंगम दृश्य Exclusive अकोल्यात गजानन महाराजांच्या पालखीचं काल मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आल.. आजही पालखी अकोल्यात मुक्कामी असणार आहे... गजानन महाराजांच्या पालखीचे हे 55 वे वर्ष आहेय. यावर्षी पालखीत साडेसहाशेंवर वारकऱ्यांचा समावेश आहेय. विशेष म्हणजे दरवर्षी सारखाच यावर्षीही वारीमध्ये तरुणांचा सहभाग लक्षणीय आहे. अकोल्यातील ड्रोन दृष्यांसह गजानन महाराजांच्या पालखीतील उत्साहाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश अलोणे यांनी... गजानन महाराजांच्या पालखीनं आज अकोला जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्याच्या सीमेत प्रवेश केलाय. 13 जूनला शेगावातून निघालेली गजानन महाराजांच्या पालखीने नागझरी, पारस, भौरद, अकोला, वाडेगाव, पातूरमार्मागे वाशिम जिल्ह्यातील मेडशीत प्रवेश केलाय. या पालखीतील एक अतिशय महत्वाचा आणि सुंदर टप्पा म्हणजे पातूरचा घाट. संत गजानन महाराजांच्या पालखीचा वाशिम जिल्ह्यातील मेडशीत प्रवेश, पातूर घाटातून पालखी वाशिममध्ये दाखल.


ठाकरे गट मोदींकडे जाणार? छगन भुजबळ ठाकरे गटात येणार? उद्धव ठाकरे यांचा भर सभेत खुलासा

ठाकरे गट मोदींकडे जाणार? छगन भुजबळ ठाकरे गटात येणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळाता लंगली आहे. उद्धव ठाकरे यांनी भर सभेत याचा खुलासा केला आहे.


Konkan Railway : गोव्याशी संबंधित असलेली ही योजना कोकण रेल्वेकडून अखेर रद्द! मोठं कारण आलं समोर

Konkan Railway News : स्थानिकांकडून या योजनेला होत असलेला विरोध लक्षात घेता रेल्वेकडून ही योजना रद्द करण्यात आली आहे. यामुळे या योजनेसाठी जारी केलेल्या निविदा रद्द केल्या आहेत.


विधानपरिषदेसाठी निष्ठवंतांना संधी द्या, भाजप पदाधिकाऱ्याचं थेट खासदार अशोक चव्हाणांना पत्र

Legislative Council Elections : विधान परिषदेच्या (Legislative Council Elections) 11 जागांसाठी लवकरच निवडणूक (Election) होणार आहे. त्या 11 जागेत नांदेडच्या (Nanded) सुद्धा जागेचा समावेश आहे. त्यासाठी भाजपच्या (Bjp) पदाधिकाऱ्याने थेट राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) व माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना पत्र लिहले आहे. आता नांदेड मधून निष्ठावांताना उमेदवारी मिळावी अशी मागणी भाजपचे पदाधिकारी मनोज जाधव (Manoj jadhav) यांनी केली आहे....


SSC GD Results 2024: खुशखबर..! निकाल जाहीर होण्याआधीच रिक्त पदांची संख्या झाली दु्प्पट, येथे पाहा सुधारित जागा

SSC GD Results 2024 : एसएससी जीडी निकाल २०२४ जाहीर होण्यापूर्वी, रिक्त पदांच्या संख्येत बदल करण्यात आला आहे. रिक्त पदांची संख्या दुप्पटीने वाढली आहे. नवीन रिक्त पदांची संख्या ४६,६१७ झाली आहे. वाचा सविस्तर..


Hajj and Umrah : हज आणि उमराह यात्रेमध्ये नेमका फरक काय? मुस्लिमांना माहितीच हवेत हे नियम

Hajj and Umrah Significance : इस्लामचा आधारस्तंभ म्हणून हज आणि त्याचा सखोल आध्यात्मिक अर्थ : सौदी अरेबियातील मक्का येथे मुस्लिमांच्या काबा यात्रेचे आध्यात्मिक महत्त्व समजून घेणे


Naval Bajaj is New ATS Chief: नवल बजाज महाराष्ट्राचे नवे ATS प्रमुख!

Naval Bajaj Appointed As Maharashtra New ATS Chief : मुंबई : वरिष्ठ पोलीस अधिकारी नवल बजाज (Naval Bajaj) यांची महाराष्ट्र पोलीस दहशतवाद विरोधी पथकाच्या (ATS) प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सदानंद दाते (Sadanand Date) यांची राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) महासंचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून महाराष्ट्र एटीएस प्रमुखाचं पद रिक्त होतं. त्यामुळे एटीएस प्रमुखपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होतं. अखेर नवल...


NEET UG Result 2024 : NEET परीक्षेबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, १५६३ विद्यार्थ्यांचे ग्रेस मार्क्स रद्द, २३ जूनला होणार फेरपरीक्षा

NEET re-examination to be held on 23 June : कोर्टाच्या आदेशानुसार २३ जून रोजी १५६३ विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा होणार आहे. या परिक्षेचा निकाल ३० जून पूर्वी निकाल लावला जावा, अशा सूचना न्यायालयाने दिल्या आहेत.


Sharad Pawar Baramati : शरद पवारांचा बारामतीत झंझावात ; नागरिकांना साद

Sharad Pawar Baramati : शरद पवारांचा बारामतीत झंझावात ; नागरिकांना साद शरद पवारांचा बारामती दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे.. दुसऱ्या दिवशी शरद पवार सहा गावांत शेतकरी जनसंवाद दौरा करणार आहेत.. विशेष म्हणजे अजित पवारांचं घर असलेल्या काटेवाडीत शरद पवारांचा संध्याकाळी जनसंवाद मेळावा आहे. आज सकाळी पवारांनी गोविंदबागेत जनता दरबार घेतला. पवारांनी बारामतीकरांच्या समस्या जाणून घेतला. सांगवी गावातही पवारांनी जनसंवाद मेळाव्यात मार्गदर्शन केलं. त्यानंतर शरद पवारांनी खांडज गावात नागरिकांशी संवाद साधला. नीरा कारखाना, सोमेश्वर आणि माळेगाव इथल्या प्रदूषणाच्या समस्येवर पवार बोलले. प्रलंबित कामं करायची असतील तर राज्य हातात दिलं पाहीजे अशी साद पवारांनी घातली. सांगवी गावातही पवारांनी जनसंवाद मेळाव्यात मार्गदर्शन केलं. त्यानंतर शरद पवारांनी खांडज गावात नागरिकांशी संवाद साधला.


western Railway Mumbai : मुसळधार पावसाचा पश्चिम रेल्वेला फटका; 30 ते 40 मिनिटे ट्रेन उशिरा

Western Railway Mumbai : मुसळधार पावसाचा पश्चिम रेल्वेला फटका; 30 ते 40 मिनिटे ट्रेन उशिरा बोईसर-उमरोळीदरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी आल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, दोन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूक ३० ते ४० मिनिटे उशिराने हेही वाचा: खरीप हंगामासाठी १४ पिकांच्या हमीभावात केंद्र सरकारकडून वाढ, धानाचा हमीभाव आता २३०० रुपये तर कपाशीला ७ हजार १२१ रु. प्रति क्विंटल मिळणार मंगळवारी घेतलेली UGC-NET परीक्षा रद्द, परीक्षेत गैरप्रकार झाल्यानं केंद्रीय शिक्षण खात्याचा निर्णय, UGC-NET परीक्षा पुन्हा घेणार, तारीख लवकरच कळणार यूजीसी नेट परीक्षा रद्द केल्यावर आता नीट परीक्षाही रद्द करा, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंची मागणी, पंतप्रधानांनी नीट परीक्षेतल्या घोळाची जबाबदारी स्वीकारावी, खर्गेंची टीका पांढऱ्या शिधापत्रिकाधारकांनाही आता मिळणार महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मन योजनेचा लाभ, २२ लाख लाभार्थ्यांना लाभ, मंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला त्या भाजपसोबत कधीच जाणार नाही, शिवसेनेच्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरेंचा निर्धार उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्ट पाठिंबा, उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना चिमटा, तर पुन्हा येईन म्हणणारे आता जाऊ द्या ना घरी आता वाजवले की बारा म्हणतायत, फडणवीसांनाही खोचक टोला देशभक्त मुस्लिमांनी आम्हाला मतं दिली हे जाहीर सांगतो, सत्ताधाऱ्यांना उद्धव ठाकरेंचं उत्तर, तर तमाम हिंदूबांधव म्हणण्य़ाचं धाडस ठाकरेंनी केलं नाही, शिंदेंचा पलटवार


Police Bharti Maharashtra : अमरावतीत 281 पदांसाठी पोलीस भरती सुरू

Police Bharti Maharashtra : अमरावतीत 281 पदांसाठी पोलीस भरती सुरू संपूर्ण राज्यभरात रखडलेल्या पोलीस भरतीला अखेर मुहूर्त सापडलाय. आजपासून पोलीस भरतीला सुरूवात झालीय. अमरावतीत 281 पदांसाठी पोलीस भरती सुरू आहे...शहरातील 74 जागेसाठी 4 हजार 789 तर ग्रामीणच्या 207 जागेसाठी 25 हजार 549 विद्यार्थी मैदानी चाचणी देणार आहेत.. यादरम्यान कुठल्याही विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी देखील घेण्यात आली आहे.. .. दरम्यान याचा आढावा घेतलाय ामचे प्रतिविधी प्रणय निर्बाण यांनी अमरावतीत 281 पदासाठी पोलीस भरती मैदानी चाचणीला सुरुवात झाली आहे.. अमरावती शहरासाठी 74 आणि ग्रामीण 207 असे एकूण 281 जागांसाठी ही भरती होणार असून शहरातील 74 जागेसाठी 4 हजार 789 तर ग्रामीणच्या 207 जागेसाठी 25 हजार 549 विद्यार्थी मैदानी चाचणी देणार आहेत.. यादरम्यान कुठल्याही विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी देखील घेण्यात आली आहे.. पोलीस भरती संदर्भात कुठल्याही प्रलोभनात विद्यार्थ्यांनी बळी पडू नये असे आवाहन देखील पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडून करण्यात आले आहे..


Big Breaking : UGC-NET परीक्षा रद्द, परीक्षेत गैरप्रकार; तपास CBI कडे

केंद्र सरकारने 18 जून रोजी झालेली UGC-NET परीक्षा रद्द केलीय.. 18 जून रोजी झालेल्या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा संशय आहे..


MSP Increase Modi Cabinet: शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 14 पिकांच्या एमएसपीत वाढ, केंद्र सरकारचा निर्णय

MSP Increase Modi Cabinet: केंद्रातील एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक 19 जून रोजी पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत मंत्रिमंडळाने खरीप पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत 14 खरीप पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ करण्यास मंजुरी दिली आहे.