बातम्या

Trending:


Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रासाठी मोठी बातमी, वाढवण बंदराला मंजुरी मिळाली

Today Breaking News LIVE Updates : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींबरोबरच दिवसभरातील घडामोडींसहीत देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी...


Human Finger Found in Icecream : ऑनलाईन मागवलेल्या आईसस्क्रीममध्ये मानवी बोटाचा तुकडा Mumbai

Human Finger Found in Icecream : मुंबईत मुंबईतील मालाड (Mumbai Malad News) परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. आईस्क्रीमच्या (Ice Cream) कोनमध्ये मानवी बोटाचा तुकडा सापडला आहे. मलाड पोलिसांनी (Malad Police) याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. पोलिसांनी तात्काळ ते मानवी बोट फॉरेन्सिककडे पाठवण्यात आले आहे. आईस्क्रीम ज्या ठिकाणी बनवले आणि पॅक केले त्याचाही शोध घेण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. (mumbai women order online ice cream found human finger maharashtra police sent to fsl) मलाडमधील एका महिलेने यम्मो कंपनीचं (EMOI) आईस्क्रीम ऑनलाईन मागवले होते. पण तिने ते खायला सुरुवात करताच तिच्या समोर मानवी बोटाचा तुकडा दिसला. आईस्क्रीम कोनमध्ये बोटाचा तुकडा पाहातच ती महिला ओरडू लागली आणि बेशुद्ध पडली. काहीक्षण तिच्या कुटुंबातील लोकांनाही काहीच समजलं नाही. पण त्यांना सर्व प्रकार समजल्यानंतर तात्काळ मलाड पोलीस ठाणे गाठले.


'मराठी माणूस यांची चड्डीपण..', 'बिनशर्ट'वरुन मनसेचा ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, 'हिरव्या..'

Uddhav Thackeray Vs Raj Thackeray: उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये राज ठाकरेंनी महायुतीला दिलेल्या बिनशर्त पाठिंब्यावरुन टोला लगावल्यानंतर मनसेने या टीकेला उत्तर दिलं आहे.


Rajya Sabha Election: लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा NDA विरुद्ध इंडियाची लढाई; राज्यसभेच्या १० जागा रिक्त, पाहा कोणाला मिळणार विजय

Rajya Sabha Election: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडी विरुद्ध विरोधकांची इंडिया आघाडी अशी लढत पहायला मिळाली होती. आता राज्यसभेतील रिक्त झालेल्या जागांमुळे पुन्हा एकदा NDA विरुद्ध इंडिया अशी लढाई दिसणार आहे.


Bhaskar Jadhav : ठाकरेंची साथ सोडल्यानंतर भाजपचा आकडा 23 वरून 9 वर, आमचा स्ट्राईक रेट 200 टक्क्यांचा; भास्कर जाधवांचा शिंदे- भाजपला टोला

मुंबई: गेल्यावेळी म्हणाले होते की मोदींचा फोटो लावल्याने शिवसेनेचे खासदार निवडून आले, आता आम्ही मोदींचा फोटो काढला आणि आमचे 31 खासदार निवडून आले, पण भाजपच्या आहे त्या जागा कमी होऊन 7 वर आल्या असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी लगावला. गेल्या वेळी भाजपचे 23 उमेदवार होते, आता महायुतीचे एकूण खासदार 17 आले असल्याचंही ते म्हणाले. विरोधकांच्या 48 उमेदवारांच्या बॅनरनवर बाळासाहेबांचा फोटो लावण्यात आला होता, पण ठाकरे...


Gajanan Maharaj Palkhi Akola : पातूरच्या घाटातील गजानन महाराजांच्या पालखीचं विहंगम दृश्य Exclusive

Gajanan Maharaj Palkhi Akola : पातूरच्या घाटातील गजानन महाराजांच्या पालखीचं विहंगम दृश्य Exclusive अकोल्यात गजानन महाराजांच्या पालखीचं काल मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आल.. आजही पालखी अकोल्यात मुक्कामी असणार आहे... गजानन महाराजांच्या पालखीचे हे 55 वे वर्ष आहेय. यावर्षी पालखीत साडेसहाशेंवर वारकऱ्यांचा समावेश आहेय. विशेष म्हणजे दरवर्षी सारखाच यावर्षीही वारीमध्ये तरुणांचा सहभाग लक्षणीय आहे. अकोल्यातील ड्रोन दृष्यांसह गजानन महाराजांच्या पालखीतील उत्साहाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश अलोणे यांनी... गजानन महाराजांच्या पालखीनं आज अकोला जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्याच्या सीमेत प्रवेश केलाय. 13 जूनला शेगावातून निघालेली गजानन महाराजांच्या पालखीने नागझरी, पारस, भौरद, अकोला, वाडेगाव, पातूरमार्मागे वाशिम जिल्ह्यातील मेडशीत प्रवेश केलाय. या पालखीतील एक अतिशय महत्वाचा आणि सुंदर टप्पा म्हणजे पातूरचा घाट. संत गजानन महाराजांच्या पालखीचा वाशिम जिल्ह्यातील मेडशीत प्रवेश, पातूर घाटातून पालखी वाशिममध्ये दाखल.


Mumbai Sion Flyover: मुंबईकरांसाठी कामाची बातमी: शीव उड्डाणपूल बंद, कारण...

Mumbai Sion Flyover: आयआयटी आणि मध्य रेल्वेच्या संरचनात्मक तपासणी अहवालात शीव रेल्वे उड्डाणपूल धोकादायक ठरला आहे. अहवालातील शिफारशीनुसार पुलाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. सध्या खबरदारीचा उपाय म्हणून अवजड वाहतूक बंद करण्यात येईल.


IRCTC Ticket Booking : चुकूनही करू नका IRCTC ID वरून दुसऱ्यांसाठी Train Ticket बुक, अन्यथा जावे लागेल जेल

IRCTC Ticket Booking Rule: जर तुम्ही रेल्वेतून प्रवास करण्याआधी IRCTC वरून तिकीट बुक करत असाल तर रेल्वेचा हा नियम तुम्हाला माहिती असावा. IRCTC आयडीवरून दुसऱ्याचे तिकीट बुक केल्यास १० हजार रुपये दंड किंवा ३ वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो.


Aadhaar and Ration Card Link: रेशनकार्ड आधारसोबत लिंक केले का? त्वरा करा शेवटची तारीख आली जवळ

Aadhar card ration card link Maharashtra: पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केल्यावर आता रेशन कार्डसोबत आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य करण्यात आले आहे. तुम्ही आपल्या रेशनकार्ड सोबत आधारकार्ड लिंक केले नसेल तर तात्काळ करुन घ्या. जाणून घ्या हे काम तुम्ही कसे करू शकता.


Jalna Rasta Roko : धुळे-सोलापूर महामार्गावरील रास्ता रोको आंदोलकांकडून मागे

Jalna Rasta Roko : धुळे-सोलापूर महामार्गावरील रास्ता रोको आंदोलकांकडून मागे महाराष्ट्रातल्या शासनाने आतापर्यंत दाखल घ्यायला हवी होती आम्ही मोठे बॅकग्राऊंड असलेले कार्यकर्ते नाहीत आम्ही कुठल्याही राजकीय चेहरा नसलेले कार्यकर्ते आहोत म्हणून शासनाला आमची दखल घेऊ वाटत नाही आमची दखल नका घेऊ पण VJ एनटी ओबीसींची बाजू काय आहे हे तरी समजून घ्याव फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी कायम फेसलेस राहिला महाराष्ट्रातील गरजवंत मराठा आर्थिक दृष्ट्या गरीब आहे, म्हणून त्यांना ओबीसी आरक्षण भेटल्यावर न्याय मिळतो हे कोणी सांगितले आरक्षण गरिबी हटाव चां कार्यक्रम नाही माय बाप सरकार samjun घ्या मी घरापासून दुरू आलो तरी जालना बीड , परभणी भागात मी गेलेलो आहे, खरं बोलायला तयार नाहीत महाराष्ट्रातील शासन करते, ते दूर पळत आहेत जरांगे जी बाजू मांडत आहेत त्याचे उत्तर ओबीसी आरक्षण नव्हे ओबीसी आरक्षण मिळाल्यावर मराठा समाजाला न्याय मिळतो हे सांगणारे जरांगेचे सल्लागार कोण आहेत??


Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : काँग्रेसच्या वोटबँकमुळे उबाठा जिंकली, शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : काँग्रेसच्या वोटबँकमुळे उबाठा जिंकली, शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार : वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा वरळी डोम इथं झाला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. एकनाथ शिंदे यांनी निवडून आलेल्या सर्व सातही खासदारांचं स्वागत आणि सत्कार केला. मुख्यमंत्री म्हणाले, हा बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा ५८ वा वर्धापन दिन आहे. बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देताना मला वेगळा आनंद आणि वेगळी भावना आहे. १९६६ साली बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली. मराठी माणूस हा बाळासाहेबांचा केंद्र होता. शिवसेना पूर्ण देशात हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना म्हणून लोकप्रिय झाली. शिवसेना वाढली ठाण्यात, कोकणात, संभाजीनगरमध्ये, महाराष्ट्रात. हे सर्व शिवसेनेचे बालेकिल्ले आहेत. हे बालेकिल्ले अबाधित राखले. कोणी म्हणाले ठाणे पडेल, कल्याण पडेल, पण आपण हे किल्ले २-२ लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकलं.संभाजीनगर जिंकलं, कोकणात एकही जागा उबाठाला मिळू शकली नाही. हा विजय घासून-पुसून नाही, ठासून विजय मिळवला


Dombivali MIDC News : आगीच्या घटनांनंतर डोंबिवली एमआयडीसीचे स्थलांतर होणार का ?

Dombivali MIDC News : डोंबिवली एमआयडीसीतील आगीच्या आणि स्फोटाच्या घटनांनंतर प्रशासनाला अचानक जाग आली आहे. स्थानिकांनी डोंबिवली एमआयडीसीतील सगळ्या केमिकल कंपन्यांचे स्थलांतर करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने या मागणीची दखल घेतली आहे.


MSP Increase Modi Cabinet: शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 14 पिकांच्या एमएसपीत वाढ, केंद्र सरकारचा निर्णय

MSP Increase Modi Cabinet: केंद्रातील एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक 19 जून रोजी पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत मंत्रिमंडळाने खरीप पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत 14 खरीप पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ करण्यास मंजुरी दिली आहे.


Shivsena Foundation Day : शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसैनिकांनध्ये उत्साह

Shivsena Foundation Day : शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसैनिकांनध्ये उत्साह शिवसेनेचा ५८वा वर्धापन दिन आज ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना स्वतंत्रपणे साजरा करणार आहेत.. या वर्धापन दिना निमित्त शिवसेनेच्या दोन्ही गटांचे कार्यक्रम होणार आहे.. ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन माटुंगा येथील बन्मुखानंद सभागृहात होत आहे तर शिंदे गटाचा वर्धापन दिन सोहळा वरळी येथील डोम एनएससीआय सभागृहात होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचे बिगुल दोन्ही शिवसेना नेते या मेळाव्यात फुंकण्याची शक्यता आहे शिवसेनेतल्या पक्ष फुटीनंतर हा दुसरा वर्धापन दिन आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना आपला वेगळा वर्धापन दिन साजरा करणार आहेत. शिंदेंचा वर्धापन दिन मुंबईत वरळी डोम इथं तर ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात होणार आहे. लोकसभा निवडणुकीचा लागलेला निकाल आणि तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर या वर्धापन दिनाला महत्त्व आहे.


Special Report BJP Delhi : भाजप एका व्यक्तीवर अवलंबून नसेल, पक्षश्रेष्ठींची भूमिका

Special Report BJP Delhi : भाजप एका व्यक्तीवर अवलंबून नसेल, पक्षश्रेष्ठींची भूमिका राज्यातल्या महायुतीच्या विशेषतः भाजपच्या सुमार कामगिरीचं दिल्लीत मंथन झालं. राज्यात भाजपच्या सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यासोबत राज्यातल्या नेतृत्वाला कानपिचक्या देण्याचं कामही दिल्लीत वरिष्ठ नेतृत्वाने केलं... काय घडलं नेमकं दिल्लीत पाहूया महाराष्ट्रात 40 प्लसचा नारा देणाऱ्या भाजपला दोन आकडी संख्याही गाठता आली नाही. लोकसभेतल्या या सुमार कामगिरीवर अमित शाह आणि जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील प्रमुख भाजप नेत्यांची शाळा घेण्यात आली. कोणा एकाच व्यक्तीवर पक्ष अवलंबून राहणार नाही असं फर्मानही देताना दिल्लीश्वरांनी विकेंद्रीकरणाचे संकेत दिलेत. महाराष्ट्रात भाजपमध्ये कोणताही समन्वय नाही सामूहिक जबाबदारी घेत चुका सुधारा पक्ष एका व्यक्तीवर अवलंबून नसेल कोअर कमिटी एकत्रितपणे पक्ष चालवेल सर्वच नेत्यांना सक्रिय व्हावं लागेल आतापासून विधानसभेच्या तयारीला लागा, उमेदवार तयार करा कुठे कशी मत मिळाली यावर सविस्तर चर्चा झाली विधानसभेचा रोडमॅप यावर चर्चा झाली. मित्र पक्षांसोबत कशा रीतीने निवडणूक काढता येईल याचा रोडमॅप आम्ही विचार केला आहे. लवकरच घटक पक्षांसोबत कसं पुढे जाता येईल यावर आम्ही चर्चा करणार आहोत लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत फडणवीसांनी सरकारमधून मोकळं करण्याची विनंती केली. यावर अंतिम निर्णय झाला नसला तरी तूर्तास फडणवीसांच्या खांद्यावरचा उपमुख्यमंत्रीपदाचा भार कायम असणार आहे.


तरीही मोदी जिंकले कसे?

मतदारांचे वर्तन हाच घटक निर्णायक असतो. त्यामुळेच २००४ मध्ये वाजपेयींचा पराभव झाला, पण मतदारांच्या वर्तनावर परिणाम करणारे दोन घटक मोदींच्या बाजूने होते.


मुलुंडमध्ये मोटारीच्या धडकेत तरुण जखमी

चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव वेगात धावणाऱ्या मोटारीने मुलुंड परिसरातील पदपथावरून चालणाऱ्या तरुणाला मंगळवारी पहाटे धडक दिली.


अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतींमध्ये ऑक्टोबरपासून इंटरनेट सुविधा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा, केंद्र सरकारच्या सहकायनि राज्यातील २८ हजार ग्रामपंचायतींमध्ये ऑक्टोबरपासून इंटरनेट सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. त्यासाठी ऑप्टिकल फायबरचे काम सप्टेंबरअखेर पूर्ण करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. राज्याच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन म्हणाले केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना ऑप्टिकल फायबरने जोडण्यात येत आहे. या माध्यमातून …


Sharad Pawar Baramati : शरद पवारांचा बारामतीत झंझावात ; नागरिकांना साद

Sharad Pawar Baramati : शरद पवारांचा बारामतीत झंझावात ; नागरिकांना साद शरद पवारांचा बारामती दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे.. दुसऱ्या दिवशी शरद पवार सहा गावांत शेतकरी जनसंवाद दौरा करणार आहेत.. विशेष म्हणजे अजित पवारांचं घर असलेल्या काटेवाडीत शरद पवारांचा संध्याकाळी जनसंवाद मेळावा आहे. आज सकाळी पवारांनी गोविंदबागेत जनता दरबार घेतला. पवारांनी बारामतीकरांच्या समस्या जाणून घेतला. सांगवी गावातही पवारांनी जनसंवाद मेळाव्यात मार्गदर्शन केलं. त्यानंतर शरद पवारांनी खांडज गावात नागरिकांशी संवाद साधला. नीरा कारखाना, सोमेश्वर आणि माळेगाव इथल्या प्रदूषणाच्या समस्येवर पवार बोलले. प्रलंबित कामं करायची असतील तर राज्य हातात दिलं पाहीजे अशी साद पवारांनी घातली. सांगवी गावातही पवारांनी जनसंवाद मेळाव्यात मार्गदर्शन केलं. त्यानंतर शरद पवारांनी खांडज गावात नागरिकांशी संवाद साधला.


Marathwada water Supply : मराठवाड्याला 1 हजार 841 टँकरनं पाणीपुरवठा ; पावसाळ्यातही पाणीबाणी

Marathwada water Supply : मराठवाड्याला 1 हजार 841 टँकरनं पाणीपुरवठा ; पावसाळ्यातही पाणीबाणी पावसाळा सुरू होऊन दोन आठवडे उलटले, तरीही मराठवाड्यात नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. सुमारे 20 लाख नागरिकांची तहान टँकरद्वारे भागवली जात आहे. त्यामुळे मराठवाड्यातील सुमारे 10 टक्के नागरिकांना पाण्यासाठी वणवण करत असल्याचे चित्र आहे. मराठवाड्यात आज घडीला 2 हजार 97 गावांना 1 हजार 841 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे टँकरची संख्या भर पावसाळ्यात कमी होण्यापेक्षा वाढताना पाहायला मिळतात. 20 लाख नागरिकांची तहान टँकरद्वारे भागवली जात आहे. त्यामुळे मराठवाड्यातील सुमारे 10 टक्के नागरिकांना पाण्यासाठी वणवण करत असल्याचे चित्र आहे. मराठवाड्यात आज घडीला 2 हजार 97 गावांना 1 हजार 841 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे विशेष म्हणजे टँकरची संख्या भर पावसाळ्यात कमी होण्यापेक्षा वाढताना पाहायला मिळतात.


BMC मध्ये 4500 हजार कामचोर कर्मचारी? प्रशासन मोठ्या कारवाईच्या तयारीत

Mumbai News : लोकसभा निवडणूक संपली, निकालही लागला... आता 'त्या' कर्मचाऱ्यांवर पालिका कठोर कारवाई करण्याच्या तयारीत... पाहा महत्त्वाची बातमी


Big Breaking : UGC-NET परीक्षा रद्द, परीक्षेत गैरप्रकार; तपास CBI कडे

केंद्र सरकारने 18 जून रोजी झालेली UGC-NET परीक्षा रद्द केलीय.. 18 जून रोजी झालेल्या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा संशय आहे..


Police Recruitment: नवी मुंबई पोलीस भरतीसंदर्भात मोठी अपडेट; प्रक्रिया पुढे ढकलली, कधी होणार परीक्षा? जाणून घ्या नवी तारीख

Navi Mumbai Police Recruitment: नवी मुंबई पोलीस मुख्यालयामध्ये आज होणारी भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. या संदर्भातील माहिती उपायुक्त संजय पाटील यांनी दिली. भरती प्रक्रियेची नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे.


Panipuri Poisson Jalgaon : जळगावात पाणीपुरी खाल्ल्याने 80 पेक्षा अधिक जणांना विषबाधा

Panipuri Poisson Jalgaon : जळगावात पाणीपुरी खाल्ल्याने 80 पेक्षा अधिक जणांना विषबाधा कमळगाव आणि आजूबाजूच्या खेड्यांतील तसेच चांदसणी, मितावली, पिंप्री येथील ग्रामस्थ बाजारासाठी आले असताना तेथील पाणीपुरी विक्रेत्यांकडून अनेकांनी पाणीपुरी खाल्ली तर काहींनी पाणीपुरीचे पार्सल घरी नेले होते. या पाणीपुरी खाल्लेल्यांना मंगळवारी सकाळी उलट्या, जुलाब, पोटात दुखणे असे त्रास जाणवू लागले. यापैकी अनेक रुग्णांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले. परंतु, संध्याकाळी ६ वाजेनंतर अचानक रुग्णांमध्ये वाढ झाली. पाणीपुरीमुळे त्रास झाल्याबाबत सोमनाथ जगन कोळी (रा. पिंप्री) यांनी पोलिस स्टेशनला लेखी जबाब दिला आहे. अडावद येथे सायंकाळनंतर अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रात पिंप्री, कमळगाव येथील विषबाधा झालेले सर्वच वयोगटातील रुग्ण वाढतच गेले. या ठिकाणाहून ७० पैकी ३० रुग्ण चोपडा येथे उपजिल्हा रुग्णालयात व इतर रुग्ण खासगी व जळगाव जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. रात्री सुमारे १० रुग्णांवर अडावद येथे उपचार सुरू होते. घटना समजल्यानंतर चोपडा तालुका गटविकास अधिकारी रमेश वाघ तसेच आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर हे आरोग्य पथकांसह दाखल झाल्यावर उपचारास गती मिळाली. अडावद आरोग्य केंद्रात रुग्णसंख्येत वाढ होताच गावातील ग्रामस्थांनी मदत कार्यासाठी धाव घेतली.


Naval Bajaj is New ATS Chief: नवल बजाज महाराष्ट्राचे नवे ATS प्रमुख!

Naval Bajaj Appointed As Maharashtra New ATS Chief : मुंबई : वरिष्ठ पोलीस अधिकारी नवल बजाज (Naval Bajaj) यांची महाराष्ट्र पोलीस दहशतवाद विरोधी पथकाच्या (ATS) प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सदानंद दाते (Sadanand Date) यांची राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) महासंचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून महाराष्ट्र एटीएस प्रमुखाचं पद रिक्त होतं. त्यामुळे एटीएस प्रमुखपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होतं. अखेर नवल...


Maratha Reservation: जरांगे साहेब आरक्षणाशिवाय मागे हटू नका, चिऊ मला माफ कर, पुण्यात मराठा आंदोलकाचा भयंकर निर्णय

Pune Maratha Andolak Ends Life: मराठा आरक्षणासाठी आणखी एका आंदोलकाने आपला जीव दिल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यात एका मराठा आंदोलकाने पत्र लिहून पत्नीची माफी मागितली आपली जीवन यात्रा संपवली आहे.


TOP 100 Headlines : सकाळच्या 100 हेडलाईन्स ; बातम्यांचा वेगवान आढावा : 19 June 2024 : ABP Majha

TOP 100 Headlines : सकाळच्या 100 हेडलाईन्स ; बातम्यांचा वेगवान आढावा : 19 June 2024 : ABP Majha आज शिवसेनेचा ५८ वा वर्धापन दिन. शिंदेंचा वर्धापन दिन मुंबईत वरळी डोम इथं तर ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी कॅबिनेटची आज संध्याकाळी ५ वाजता बैठक, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीचीही बैठक होणार. राज्यात आजपासून पोलीस भरतीला सुरुवात...१७ हजार जागांसाठी तब्बल १७ लाख अर्ज, ४० टक्के उमेदवार उच्चशिक्षित... मुंबईतील ५० पेक्षा अधिक रुग्णालय, महाविद्यालय आणि मुंबई महापालिका मुख्यालयाला धमकीचा ई-मेल, पोलिसांचा तपास सुरु. मी दादांसोबत नाही तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत, एबीपी माझाशी बोलताना छगन भुजबळ यांचं अतिशय सूचक विधान छगन भुजबळांनी शिवसेना सोडली नसती तर एव्हाना मुख्यमंत्री झाले असते, संजय राऊतांचं वक्तव्य तर शिवसेना सोडणारे सगळे अस्वस्थ आत्मे, राऊतांची टीका


Underwater Drone: पुण्यात साकारणार पाण्याखालचा 'ड्रोन'; देशातील पहिला वहिला प्रकल्प, कसा होणार फायदा?

Underwater Drones : पुण्यातील ‘सागर डिफेन्स इंजिनिअरींग’ या कंपनीला दिली असून, संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या (डीआरडीओ) तंत्रज्ञान विकास निधी प्रकल्पाअंतर्गत हा प्रकल्प विकसित केला जाणार आहे.


Rahul Gandhi Happy Birthday : राहुल गांधींच्या वाढदिवशी काँग्रेसकडून कुलरचं वाटप!

राहुल गांधी यांनी यंदा लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश संपादन केलं आहे. वायनाड आणि रायबरेली या दोन्ही मतदारसंघातून त्यांना यश मिळालं. त्यांनी वायनाडची जागा सोडली असून या ठिकाणाहून आता प्रियंका गांधी निवडणूक लढवणार करणार आहेत.


अन्वयार्थ: बँकबुडी आता तरी थांबावी!

खासगी क्षेत्रातील काही बँका बुडता बुडता वाचल्या. किंबहुना वाचवल्या गेल्या. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची पाच वर्षांपूर्वीपर्यंत २७ असलेली संख्या, विलीनीकरण, एकत्रीकरण करून १२ वर आली.


Shivrajyabhishek Din Nagpur:तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन;शिवरायांना मानवंदना देण्यासाठी जय्यत तयारी

Shivrajyabhishek Din Nagpur:तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन;शिवरायांना मानवंदना देण्यासाठी जय्यत तयारी रायगडावर आज ३५१वा शिवराज्यभिषेक सोहळा साजरा होतोय. ६ जूनप्रमाणे या शिवराज्याभिषेकाची देखील प्रशासनाने जय्यत तयारी केलेली आहे. रायगडावर ७ वाजता शिवरायांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. ८ वाजता नगारखान्यासमोर ध्वजारोहण केलं जाणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री यांच्या हस्ते मुख्य शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रायगडावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एकीकडे पावसाची रिमझिम सुरु असून तेवढ्याच उत्साहात शिवभक्त गडावर दाखल होताना दिसत आहेत. रायगडावर आज तिथीनुसार 351 वा शिवराज्यभिषेक सोहळा शासकीय यंत्रणा रायगडावर सज्ज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार शिवराज्यभिषेक गडावर पोलिस बंदोबस्त तैनात Anchor - आज रायगडावर 351 वा शिवराज्यभिषेक सोहळा साजरा होतोय सकाळी 8 वाजता ध्वजारोहण त्यानंतर मुख्यमंत्री यांच्या हस्ते शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे, गडावर मोठया स्वरूपात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे ,पावसाची रिमझीम एकीकडे सूरु असुन तेवढ्याच उत्साहात शिवभक्त मात्र गडावर दाखल होताना दिसत आहेत.