बातम्या

Trending:


Big Breaking : UGC-NET परीक्षा रद्द, परीक्षेत गैरप्रकार; तपास CBI कडे

केंद्र सरकारने 18 जून रोजी झालेली UGC-NET परीक्षा रद्द केलीय.. 18 जून रोजी झालेल्या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा संशय आहे..


Rohit Pawar On Ajit Pawar : लोकसभेच्या पराभवासाठी महायुतीकडून अजितदादांचा बळीचा बकरा

Rohit Pawar On Ajit Pawar : लोकसभेच्या पराभवासाठी महायुतीकडून अजितदादांचा बळीचा बकरा रोहित पवारांनी पुन्हा एका भाजपसह अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केलाय. लोकसभेच्या पराभवासाठी महायुतीकडून अजितदादांना बळीचा बकरा बनवला जात असल्याची टीका रोहित पवारांनी केलीय. तिरंगी लढतीसाठी तिसरा पर्याय उपलब्ध करण्यासाठी अजितदादा बळीचा बकरा बनवला जात असून येत्या कालात अजितदादांना वेगळं होण्यासाठी भाग पाडले जाईल असा दावा रोहित पवारांनी केलाय. दरम्यान भुजबळांसह अनेक आमदार आणि नेते अधिवशेनानंतर पक्ष सोडतील असा दावा रोहित पवारांनी केलाय. तर अजित पवारांना भाजपसोबत घेतलं तेव्हाच बोलायला हवं होतं.. असं सांगत बच्चू कडू यांनी निशाणा साधलाय.. विआ च्या विरोधात दुहेरी लढतीत जनता आपल्याला पराभूत करते म्हणून तिरंगी लढत झाली पाहिजे, तिरंगी लढत झाल्यास सर्वसामान्य जनतेची मते विभागली जाऊन भाजपला फायदा होतो, असा भाजपच्या #चाणक्यांचा कयास आहे. त्यामुळेच तिरंगी लढतीसाठी तिसरा पर्याय उपलब्ध करण्यासाठी अजितदादांना बळीचा बकरा करण्यात येत असून आधी #आरएसएस च्या मुखपत्रातून टीका, नंतर झोपलेले तथाकथित गांधी जागा करायचे आणि आता पुढे काहीतरी करून अजितदादांना वेगळे होण्यास भाग पाडायचे ही रणनीती चाणक्यांनी दिल्लीत मांडली असल्याची चर्चा आहे.


mumbai ice cream case: आईस्क्रीममध्ये सापडलेलं 'ते' बोट कोणाचं? धक्कादायक माहिती उजेडात

Mumbai Ice Cream Case: मुंबईतील मालाड परिसरातील एका महिला डॉक्टरने ऑनलाईन आईस्क्रीम ऑर्डर केलं होतं. आईस्क्रीम कोनमध्ये कापलेलं मानवी बोट आढळून (Finger Inside Cone Ice Cream) आल्याने खळबळ उडाली होती. आता या प्रकरणी धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. आईस्क्रीममध्ये सापडलेलं 'ते' बोट कोणाचं? याचा देखील पोलिस चौकशीत (Pune Police Investigation) उलगडा झाला आहे.


VIDEO | दरडीच्या धोक्यामुळे ग्रामस्थ संतप्त

Mahad Villager Life On Risk For Landslide With Big Rock


free aadhaar update: आधार कार्ड फुकटात अपडेट करण्यासाठी आणखी तीन महिन्यांची मुदत! कसा करायचा 'आधार'मध्ये बदल? जाणून घ्या

aahaar update deadline extended : मायआधार पोर्टलवर मोफत अपडेट करता येणार असून, ऑफलाइन अपडेटसाठी ५० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.


Gajanan Maharaj Palkhi Akola : पातूरच्या घाटातील गजानन महाराजांच्या पालखीचं विहंगम दृश्य Exclusive

Gajanan Maharaj Palkhi Akola : पातूरच्या घाटातील गजानन महाराजांच्या पालखीचं विहंगम दृश्य Exclusive अकोल्यात गजानन महाराजांच्या पालखीचं काल मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आल.. आजही पालखी अकोल्यात मुक्कामी असणार आहे... गजानन महाराजांच्या पालखीचे हे 55 वे वर्ष आहेय. यावर्षी पालखीत साडेसहाशेंवर वारकऱ्यांचा समावेश आहेय. विशेष म्हणजे दरवर्षी सारखाच यावर्षीही वारीमध्ये तरुणांचा सहभाग लक्षणीय आहे. अकोल्यातील ड्रोन दृष्यांसह गजानन महाराजांच्या पालखीतील उत्साहाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश अलोणे यांनी... गजानन महाराजांच्या पालखीनं आज अकोला जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्याच्या सीमेत प्रवेश केलाय. 13 जूनला शेगावातून निघालेली गजानन महाराजांच्या पालखीने नागझरी, पारस, भौरद, अकोला, वाडेगाव, पातूरमार्मागे वाशिम जिल्ह्यातील मेडशीत प्रवेश केलाय. या पालखीतील एक अतिशय महत्वाचा आणि सुंदर टप्पा म्हणजे पातूरचा घाट. संत गजानन महाराजांच्या पालखीचा वाशिम जिल्ह्यातील मेडशीत प्रवेश, पातूर घाटातून पालखी वाशिममध्ये दाखल.


Rajya Sabha Election: लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा NDA विरुद्ध इंडियाची लढाई; राज्यसभेच्या १० जागा रिक्त, पाहा कोणाला मिळणार विजय

Rajya Sabha Election: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडी विरुद्ध विरोधकांची इंडिया आघाडी अशी लढत पहायला मिळाली होती. आता राज्यसभेतील रिक्त झालेल्या जागांमुळे पुन्हा एकदा NDA विरुद्ध इंडिया अशी लढाई दिसणार आहे.


RTE Admissions : आरटीई प्रवेशांबाबत माहिती देण्यास शाळांची टाळाटाळ, राज्य सरकारची हायकोर्टात माहिती

RTE Admissions : आरटीई प्रवेशांबाबत माहिती देण्यास शाळांची टाळाटाळ, राज्य सरकारची हायकोर्टात माहिती आरटीई प्रवेशाप्रक्रियेबाबत अद्याप राज्य सरकारनं सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर न केल्याबद्दल हायकोर्टानं तीव्र नाराजी व्यक्त केली. शालेय विद्यार्थ्यांना असं ताटकळत ठेवता येणार नाही असं स्पष्ट करत राज्य सरकारला 9 फेब्रुवारीच्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर लवकरात लवकर उत्तर सादर करण्यास सांगितलंय. तसेच खाजगी शाळांना राज्याच्या शिक्षण विभागाला प्रवेशासंबंधी आवश्यक तो तपशील देण्याचे निर्देश जारी केलेत. आरटीई कायद्याअंतर्गत राखीव आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी आरक्षित असलेल्या 25 टक्के जागांमधून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरापासून एक किमी परिघात शासकीय किंवा अनुदानित शाळा असल्यास त्याच शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा, असं परिपत्रक राज्य सरकारनं 9 फेब्रुवारी रोजी काढलं होतं. याप्रकरणी काही शाळांनी तसेच पालकांनी आक्षेप घेत मुंबई उच्च न्यायालयात याला आव्हान दिलं आहे. राज्य सरकारचा हा निर्णय आरटीई कायद्याविरोधात तसेच मुलांच्या शिक्षणात बाधा आणणारा असल्याचं स्पष्ट करत हायकोर्टानं या परिपत्रकाला तात्काळ स्थगिती दिली होती. त्यानंतर न्यायालयानं दिलेल्या आदेशाच्या अधीन राहून आरटीआय कायद्याअंतर्गत नवीन परिपत्रक काढण्यात येईल अशी हमी देत तातडीनं राज्य सरकारनं सुधारीत परिपत्रक काढलं होतं यासंदर्भातील याचिकांवर मंगळवारी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. राज्य सरकारच्यावतीनं अतिरिक्त सरकारी वकील ज्योती चव्हाण यांनी हायकोर्टाला सांगितले की, संबंधित विभागाकडून प्रवेशित विद्यार्थ्यांच्या संख्येसह काही माहिती संस्थांकडून मागविण्यात आली होती, परंतु त्यापैकी बहुतेकांनी ती अद्याप दिलेली नाही. ती माहिती मिळाल्यास खंडपीठासमोर भूमिका सादर केली जाईल. हा युक्तिवाद ऐकून घेत हायकोर्टानं सुनावणी जुलैपर्यंत तहकूब केलीय.


Uddhav Thackeray: 'ए़नडीएमध्ये पुन्हा कधीच जाणार नाही', उद्धव ठाकरे यांची स्पष्टोक्ती

Mumbai Uddhav Thackeray: शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात साजरा करण्यात आला. या वेळी ठाकरे गटाने निवडून आलेल्या सर्व खासदारांचा उद्धव ठाकरे यांनी सत्कार केला; तसेच लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या सर्व उमेदवारांचाही या वेळी सत्कार करण्यात आला.


IRCTC Ticket Booking : चुकूनही करू नका IRCTC ID वरून दुसऱ्यांसाठी Train Ticket बुक, अन्यथा जावे लागेल जेल

IRCTC Ticket Booking Rule: जर तुम्ही रेल्वेतून प्रवास करण्याआधी IRCTC वरून तिकीट बुक करत असाल तर रेल्वेचा हा नियम तुम्हाला माहिती असावा. IRCTC आयडीवरून दुसऱ्याचे तिकीट बुक केल्यास १० हजार रुपये दंड किंवा ३ वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो.


Tamil Nadu Illicit Liquor: तामिळनाडूत विषारी दारूने घेतला 25 जणांचा बळी, 60 जण गंभीर

Tamil Nadu Kallakurichi 25 dead : तामिळनाडूतील कल्लाकुरिची जिल्ह्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. या ठिकाणी विषारी दारूने तब्बल 25 जणांचा बाळी घेतला आहे. तर 60 हून अधिक लोक गंभीर असून त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील काही लोकांची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटकही केली आहे.


Underwater Drone: पुण्यात साकारणार पाण्याखालचा 'ड्रोन'; देशातील पहिला वहिला प्रकल्प, कसा होणार फायदा?

Underwater Drones : पुण्यातील ‘सागर डिफेन्स इंजिनिअरींग’ या कंपनीला दिली असून, संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या (डीआरडीओ) तंत्रज्ञान विकास निधी प्रकल्पाअंतर्गत हा प्रकल्प विकसित केला जाणार आहे.


एटीएसच्या प्रमुखपदी नवल बजाज यांची नियुक्ती

वरिष्ठ पोलीस अधिकारी नवल बजाज यांची राज्याच्या पोलीस दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.


मित्रावर जडलं तरुणाचं प्रेम; गुप्तांग कापून बनवलं मुलगी, मग..अख्खं शहर हादरलं

लखनऊ : एक खळबळजनक घटना समोर आली आहे. यात एका व्यक्तीने मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांच्या संगनमताने त्याच्या एका सहकारी तरुणाचं गुप्तांग कापून त्याचं लिंगच बदललं. या घटनेचं वृत्त परिसरात वाऱ्यासारखं पसरल्याने भारतीय किसान युनियनचे कार्यकर्तेही आरोपी आणि डॉक्टरवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मेडिकल कॉलेजमध्ये धरण्यावर बसले. ही घटना उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथून समोर आली आहे. मन्सूरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील बेगराजपूर मेडिकल कॉलेजमध्ये ही घटना...


IOCL Recruitment 2024 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरीची संधी! पाहा अधिक माहिती

IOCL Recruitment 2024 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत कोणत्या पदांवर नोकरीची भरती करण्यात येणार आहे, याची माहिती इच्छुक उमेदवारांनी पाहा.


CM Eknath Shinde Full Speech : आदित्य ठाकरेंना टार्गेट, हिंदुत्वावरुन शिंदेंचा हल्लाबोल

CM Eknath Shinde Full Speech : आदित्य ठाकरेंना टार्गेट, हिंदुत्वावरुन शिंदेंचा हल्लाबोल सात खासदार निवडून आले तुमच्या सगळ्यांचे अभिनंदन मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना स्थापन केली त्याचा वर्धापन दिवस १९६६ साली शिवसेना स्थापन... मराठी माणूस न्याय हक्क नोकऱ्या या सर्व घोस्थी करत असताना शिवसेनेची व्यापकता वाढली... लोकप्रिय झाली... शिवसेना वाढली कोकणात, संभाजी नगरात महाराष्ट्रात... आपण बले किल्ले अबाधित राखले... लाखांच्या मताने जिंकलो... कोकणात एक पण जागा UBT ला मिळू शकली नाही . घासून पुसून नाही ठासून विजय मिळवला . शिवसेनेचा परंपरागत मतदार आपल्यासोबत... शिवसेनेच्या हक्काचा मतदारांनी आमच्यावर विश्वास ठेवला... मी तुमच्यापुढे नतमस्तक होती.. काँग्रेस च्या दावणीला बांधली शिवसेना सोडवायला आपण उठाव केला .. २ वर्षापूर्वी आपण उठाव केला... तो खऱ्या अर्थाने त्यावर जनतेने शिक्कामोर्तब केलं... मतदारांनी दाखवलेला विश्वास ल हा शिंदे तडा जाऊ देणार नाही... जमलेल्या माझ्या तमाम हिंदू मातांनो भगिनी नो... पण आज त्यांचा वारसा म्हणणारे हिंदू बोलायला लाज वाटते त्यांना.. हिंदू शब्दाची अलार्जी आली... इंडिया आघाडी सभेत आणि आजच्या सभेत त्यांनी हिंदू बोलण्याचे धाडस नाही केलं... बाळासाहेब आणि त्यांचा फोटो वापरून मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही ... मी हिंदु आहे आमचे हिंदुत्व असे ... कुठे गेलं ते ...


Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 7:30 AM: 20 June 2024

Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 7:30 AM: 20 June 2024 खरीप हंगामासाठी १४ पिकांच्या हमीभावात केंद्र सरकारकडून वाढ, धानाचा हमीभाव आता २३०० रुपये तर कपाशीला ७ हजार १२१ रु. प्रति क्विंटल मिळणार पांढऱ्या शिधापत्रिकाधारकांनाही आता मिळणार महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मन योजनेचा लाभ, २२ लाख लाभार्थ्यांना लाभ, मंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला त्या भाजपसोबत कधीच जाणार नाही, शिवसेनेच्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरेंचा निर्धार उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्ट पाठिंबा, उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना चिमटा, तर पुन्हा येईन म्हणणारे आता जाऊ द्या ना घरी आता वाजवले की बारा म्हणतायत, फडणवीसांनाही खोचक टोला देशभक्त मुस्लिमांनी आम्हाला मतं दिली हे जाहीर सांगतो, सत्ताधाऱ्यांना उद्धव ठाकरेंचं उत्तर, तर तमाम हिंदूबांधव म्हणण्य़ाचं धाडस ठाकरेंनी केलं नाही, शिंदेंचा पलटवार


राणेंविरोधात विनायक राऊतांची तक्रार

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : निवडणूक प्रचार कालावधी संपलेला असतानाही रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांचे समर्थक प्रचार करत होते. त्यांनी भ्रष्ट मार्गाचा वापर करत लोकसभा निवडणुकीत विजय मिळवलेला आहे. त्यामुळे नारायण राणे यांची निवड रद्द करावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांनी केली आहे. तसेच राणे यांच्यावर 5 वर्षे निवडणूक लढविण्यावर …


उत्तर भारतात उष्माघाताचे 178 बळी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : दिल्लीत उष्म्याचा तडाखा कायम असून, गेल्या 48 तासांत या महानगरीत उष्माघाताने 33 जणांचा मृत्यू झाला आहे. लगतच्या नोएडामध्ये 9 जणांना जीव गमवावा लागला. नोएडासह उत्तर प्रदेशात गेल्या 48 तासांत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. आठवडाभरात एकट्या उत्तर प्रदेशात 119 मृत्यू झाले असून, उत्तरेकडील अन्य राज्ये मिळून ही संख्या 178 वर …


Naval Bajaj is New ATS Chief: नवल बजाज महाराष्ट्राचे नवे ATS प्रमुख!

Naval Bajaj Appointed As Maharashtra New ATS Chief : मुंबई : वरिष्ठ पोलीस अधिकारी नवल बजाज (Naval Bajaj) यांची महाराष्ट्र पोलीस दहशतवाद विरोधी पथकाच्या (ATS) प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सदानंद दाते (Sadanand Date) यांची राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) महासंचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून महाराष्ट्र एटीएस प्रमुखाचं पद रिक्त होतं. त्यामुळे एटीएस प्रमुखपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होतं. अखेर नवल...


Panipuri Poisson Jalgaon : जळगावात पाणीपुरी खाल्ल्याने 80 पेक्षा अधिक जणांना विषबाधा

Panipuri Poisson Jalgaon : जळगावात पाणीपुरी खाल्ल्याने 80 पेक्षा अधिक जणांना विषबाधा कमळगाव आणि आजूबाजूच्या खेड्यांतील तसेच चांदसणी, मितावली, पिंप्री येथील ग्रामस्थ बाजारासाठी आले असताना तेथील पाणीपुरी विक्रेत्यांकडून अनेकांनी पाणीपुरी खाल्ली तर काहींनी पाणीपुरीचे पार्सल घरी नेले होते. या पाणीपुरी खाल्लेल्यांना मंगळवारी सकाळी उलट्या, जुलाब, पोटात दुखणे असे त्रास जाणवू लागले. यापैकी अनेक रुग्णांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले. परंतु, संध्याकाळी ६ वाजेनंतर अचानक रुग्णांमध्ये वाढ झाली. पाणीपुरीमुळे त्रास झाल्याबाबत सोमनाथ जगन कोळी (रा. पिंप्री) यांनी पोलिस स्टेशनला लेखी जबाब दिला आहे. अडावद येथे सायंकाळनंतर अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रात पिंप्री, कमळगाव येथील विषबाधा झालेले सर्वच वयोगटातील रुग्ण वाढतच गेले. या ठिकाणाहून ७० पैकी ३० रुग्ण चोपडा येथे उपजिल्हा रुग्णालयात व इतर रुग्ण खासगी व जळगाव जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. रात्री सुमारे १० रुग्णांवर अडावद येथे उपचार सुरू होते. घटना समजल्यानंतर चोपडा तालुका गटविकास अधिकारी रमेश वाघ तसेच आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर हे आरोग्य पथकांसह दाखल झाल्यावर उपचारास गती मिळाली. अडावद आरोग्य केंद्रात रुग्णसंख्येत वाढ होताच गावातील ग्रामस्थांनी मदत कार्यासाठी धाव घेतली.


Maharashtra SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा | मुंबई सुपरफास्ट | ABP Majha | 3 PM

Maharashtra SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा | मुंबई सुपरफास्ट | ABP Majha | 3 PM राज्यात आजपासून पोलीस भरतीला सुरुवात, १७ हजार जागांसाठी १७ लाख अर्ज, ४० टक्के उमेदवार गरजेपेक्षा उच्चशिक्षित. आरटीई प्रवेशांबाबत माहिती देण्यास शाळांची टाळाटाळ, राज्य सरकारची हायकोर्टात माहिती, प्रशासनाला योग्य ती माहिती सादर करण्याचे शाळांना हायकोर्टाकडून निर्देश शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या पुन्हा ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय, दुर्गम भागात सेवा देणाऱ्या जिल्हा परिषद शिक्षकांना मिळणार न्याय. रेशनकार्ड-आधारकार्ड लिंक करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत, याआधी 30 जूनपर्यंत मुदत होती एलआयसी मेट्रो शहरातील मालमत्ता विकणार असल्याची चर्चा, या मालमत्ता विक्रीतून सहा ते सात अब्ज डॉलर उभे करण्याची एलआयसीची योजना, मात्र एलआयसीने फेटाळली शक्यता पुढचे काही दिवस मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस कोसळणार, हवामान खात्याचा अंदाज. राज्यात यंदा पावसाच्या हंगामात सरासरीपेक्षा तीन मिमी जास्त पाऊस, राज्यात या काळात सरासरी १०२ मिमी पाऊस पडतो, मात्र यंदा प्रत्यक्षात १०५.८ मिमी पाऊस पडलाय.


ठाकरे गट मोदींकडे जाणार? छगन भुजबळ ठाकरे गटात येणार? उद्धव ठाकरे यांचा भर सभेत खुलासा

ठाकरे गट मोदींकडे जाणार? छगन भुजबळ ठाकरे गटात येणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळाता लंगली आहे. उद्धव ठाकरे यांनी भर सभेत याचा खुलासा केला आहे.