बातम्या

Trending:


Weather update : महाराष्ट्रात जोरदार पाऊस; हवामान विभागाकडून हायअलर्ट

महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे, गेल्या काही दिवसांपासून राज्यात पाऊस सुरूच आहे. दरम्यान आज देखील पुन्हा एकदा हवामान विभागाकडून (imd) अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार आज पुन्हा एकदा मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. नुसता पाऊसच पडणार नाही तर या काळात वादळी वाऱ्याचा इशारा देखील हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या काळात वाऱ्याचा वेग प्रति तास 30 - 40 किमी इतका असणार आहे. आज लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे.दरम्यान जरी पाऊस पडणार असला तरी हवामान विभागाकडून गारपिटीचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.जरी राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला असला तरी देखील महाराष्ट्रातील काही भागात आजही उष्णतेची लाट कायम राहणार आहे. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. सोलापूरमध्ये उन्हाचा पारा 44 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे.मुंबईबाबत बोलायचं झाल्यास मुंबई आणि उपनगरामध्ये आजही हवामान कोरडं राहणार असून, आकाश निरभ्र राहणार आहे. तापमान 37 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे.


'अडीच कोटी द्या EVM हॅक करुन देतो' भारतीय जवानाची थेट दानवेंना ऑफर! घटनेने खळबळ

छत्रपती संभाजीनगर, (अविनाश कानडजे, प्रतिनिधी) : राज्यात आज 11 लोकसभा जागांवर मतदान होत आहे. या निवणुकीत ईव्हीएमच्या वापरावर विरोधकांकडून वारंवार संशय व्यक्त केला जात आहे. ईव्हीएम हॅक केलं जाऊ शकतं असं दावा विरोधकांनी अनेकदा केला आहे. यापूर्वी निवडणूक आयोगाने ईव्हीएम हॅक करुन दाखवा असं आव्हान सर्व पक्षांना केलं होतं. त्यावेळी सर्वांनी माघार घेतली. मात्र, छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या एका घटनेने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. अडीच कोटी रुपये...


UPSC ची तयारी : CSAT – उताऱ्यावरील माहितीचे आकलन

दर्जेदार इंग्रजी साहित्याचे नियमित आणि सजगतेने वाचन करणे हा इंग्रजी भाषेचे आकलन वाढवण्याचा उत्तम मार्ग आहे.


Lok Sabha Elections 2024 Phase 3 Voting: देशात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 60.2 टक्के, तर राज्यात 53.40 टक्के मतदानाची नोंद

Lok Sabha Elections 2024 Phase 3 Voting Percent Till 5 pm: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान संपले आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातील रायगड, बारामती, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, हातकणंगले, माढा, लातूर, धाराशिव आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघासह देशात बिहार, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ,गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या काही राज्यांमध्ये मतदान झाले.


CISCE Board Result : कॉमर्समध्ये कावरे तर विज्ञान शाखेतून देबर्णा दास प्रथम

जळगाव : पुढारी वृत्तसेवा दिल्ली सीआयएससीई बोर्डच्या इयत्ता १२ वी आयएससीचा निकाल जाहिर झाला. यामध्ये अनुभूती निवासी स्कूलच्या १२ वी इयत्तेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले. स्कूलच्या स्थापनेपासून १०० टक्के निकालाची परंपरा यावर्षीसुद्धा कायम राहिली आहे. सीआयएससीई बोर्डच्या १२ वी इयत्तेत कॉमर्स शाखेतील विद्यार्थी तुषार कावरे हा ९४.५० टक्के गुणांसह पहिला आला. विज्ञान शाखेतून देबर्णा …


मतदानाच्या पूर्वसंध्येला सुप्रिया सुळेंची मोठी मागणी

बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती, खडकवासला, दौंड आणि इंदापूर विधानसभा मतदारसंघातील १५७ मतदान केंद्रे अतिसंवेदनशील म्हणून जाहीर करून या ठिकाणी कॅमेरे लावावेत, अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आली आहे.


Mumbai Crime: कस्टम विभागाची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावरुन 12.47 किलो सोन्यासह 8 कोटींच्या वस्तू जप्त

Mumbai News: मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. 29 एप्रिल ते 2 मे या काळात 12.47 किलो सोन्यासह 8 कोटींच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त जप्त करण्यात आल्या आहेत. 15 भारतीय प्रवाशांकडे या वस्तू सापडल्या आहेत. यातील काही प्रवाशांची चौकशी सुरु असून त्यांनी अटक करण्यात आली आहे.


मुंबई: तोतया तिकीट तपासनीसाला अटक

मध्य रेल्वेवरील घाटकोपर - विद्याविहार रेल्वे स्थानकांदरम्यान रविवारी नदीम प्रवाशांना तिकीट तपासनीस असल्याची बतावणी करून त्यांच्याकडून जबरदस्ती पैसे घेत होता.


Railway Ticket Booking Rule : रेल्वेच्या तात्काळ तिकीट नियमात मोठा बदल, प्रवाशांना होणार फायदा

Railway Ticket Booking New Rule : अनेक वेळा प्रवाशांचे वेटिंग तिकीट कन्फर्म होत नाही किंवा आरएसीमध्ये पोहोचल्यानंतर तिकीट अडकते. अशा परिस्थितीत रेल्वे स्वतःच अनेक वेळा तिकिटे रद्द करते. या मोबदल्यात प्रवाशांकडून मोठी रक्कम वसूल करण्यात येते, ज्याला सुविधा शुल्क म्हणतात. मात्र आता रेल्वेने ही रक्कम बदलली आहे.


Latur Loksabha Election 2024 | रितेश-जेनेलियासह देशमुख कुटुंबियांनी बजावला मतदानाचा हक्क

Latur Deshmukh Family With Ritesh And Genelia Voting Loksabha Election 2024


Rabindranath Tagore Jayanti 2024 Quotes : रवींद्रनाथ टागोर यांचे प्रेरणादायी विचार; संकटसमयी करतील तुमची मदत

रवींद्रनाथ टागोर यांचे प्रेरणादायी विचार; संकटसमयी करतील तुमची मदत


Aeronautical Engineering : एरोनॉटिकल इंजिनीअरिंगमध्ये करिअर करा; या क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी

Aeronautical Engineering : एरोनॉटिकल इंजिनिअर उच्च पातळीची तांत्रिक अचूकता आणि सुरक्षित ऑपरेशन सुनिश्चित करण्यासाठी विमानाची रचना, विकास आणि देखभाल करतात. या क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्यांसाठी भविष्यात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत, जाणून घेऊया त्या संधींबद्दल.


Sexual assault case | मतिमंद मुलीची खाणाखुणा, हातवारे करून दिली साक्ष : ज्येष्ठाला कारावास

पुणे : पुढारी वृत्तसेवा : लैंगिक अत्याचार प्रकरणात गर्भवती राहिलेल्या मतिमंद पीडित मुलीने खाणाखुणा, हातवारे करून प्रताप बबनराव भोसुरे (वय 59, रा. धानोरे, ता. शिरूर, जि. पुणे) याने अत्याचार केल्याची साक्ष न्यायालयात दिली. जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. पी. रागीट यांच्या न्यायालयाने ती ग्राह्य धरत ज्येष्ठ नागरिक असलेल्या भोसुरे याला दहा वर्षे सक्तमजुरी व दहा …


Solapur EVM Machine Technical Fault | ईव्हीएम मशिनमधील बिघाडामुळे गंगेवाडीत मतदान थांबले

Solapur EVM Machine Technical Fault


Punjab Haryana High Court : वृद्ध सासूबरोबर राहण्यास सुनेचा नकार, हायकोर्टानं मंजूर केला नवऱ्याचा घटस्फोटाचा अर्ज

Punjab Haryana High Court : पतीच्या वृद्ध सासूसोबत व आजारी वहिनीसोबत राहण्यास नकार देणाऱ्या महिलेला पंजाब हरयाणा न्यायालयानं मोठा दणका दिला आहे.


Ganga Saptami 2024 Date: गंगासप्तमीला गंगा पूजनाने नष्ट होतात पापे, जाणून घ्या तिथी आणि पूजाविधी

Ganga Saptami 2024 Date: हिंदू धर्मात गंगा नदीला विशेष महत्त्व आहे. गंगा नदीला मातेचा दर्जा असून पूजनीय स्थान आहे. गंगा ही अत्यंत पवित्र नदी असून मान्यतेनुसार, गंगेत स्नान केल्याने माणसाची सर्व पापे नष्ट होतात. गंगा मातेसाठी गंगा सप्तमी समर्पित असून या दिवशी गंगा मातेची विधीवत पूजा केली जाते. पंचांगानुसार, गंगा सप्तमी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सप्तमी तिथीला साजरा केला जातो.


आग्रीपाडा येथे इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

आग्रीपाडा येथील इमारतीच्या १५ व्या मजल्यावरून उडी मारून ३३ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली. याप्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


चावडी : मीच तो!

ह्य ‘महाराष्ट्रातील एक माजी मंत्री केंद्रात कृषी मंत्री होते’, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील प्रचार सभेत केले होते


चीनच्या घुसखोरीवरून काँग्रेसचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : लडाखच्या पूर्व भागातील पॅगॉंग त्सो येथे भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीला चार वर्षे पूर्ण झाल्याची आठवण काढून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सोशल मीडियावरील एक्सवरुन हल्ला चढविला आहे. Congress on PM Modi काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केलेल्या पोस्टमधून चीनच्या अपयशाची जबाबदारी तुम्ही, कधी स्वीकारणार आहात, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र … The post चीनच्या घुसखोरीवरून काँग्रेसचा...