लाईफस्टाईल

Trending:


LLB Admission 2024: विधी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू, वेळापत्रक जाहीर; पहिली गुणवत्ता यादी कधी लागणार?

Law Admission 2024 Maharashtra: प्रवेशासाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ११ हजार कमी, म्हणजेच ३८ हजार ९१९ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत.


Union Budget 2024: नवे संकल्प आणि नवीन वक्ते!

Union Budget 2024: संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात अपेक्षेप्रमाणे विरोधकांची आक्रमकता वाढली आहे. त्याचप्रमाणे, अनेक नवे, तरुण वक्तेही दोन्ही सभागृहे गाजवू लागले आहेत. अर्थसंकल्पात महाराष्ट्रासहित अनेक राज्यांचा उल्लेख नसल्याने तर विरोधी खासदारांना आयती संधीच मिळाली...


Navi Mumbai News : नवी मुंबई शाहबाज गावात तीन मजली इमारत कोसळली

नवी मुंबई : नवी मुंबईत, बेलापूर शहाबाज गाव सेक्टर १९ हनुमान मंदिर जवळ आज शनिवारी पहाटे ५ वाजून २० मिनिटांच्या सुमारास G+3 इमारत पडली. या इमारतीच्या ढिगाऱ्यामध्ये दोन माणसे अडकली होती. त्यांना काढण्यासाठी घटनास्थळी सीबीडी फायर ब्रिगेड तसेच वॉर्ड ऑफिसमधील कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. दोन्ही व्यक्तींना रेस्क्यू करण्यात आले आहे. तरी अजून कोणी अडकलेले की...


Pune Pimpri chinchwad Heavy Rain : पुणे डेक्कन रोड परिसरात पाणी गाड्या, वस्तू पाण्यात वाहू लागल्या

Pune Pimpri chinchwad Heavy Rain : पुणे डेक्कन रोड परिसरात रस्त्यांवर पाणीच पाणी गाड्या वस्तू पाण्याखाली पुण्यात धक्कादायक घटना! विजेचा शॉक लागून 3 तरुणांचा मृत्यू पुण्यात तीन तरुणांचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. डेक्कन नदीपात्रातील पुलाची वाडी येथील ही घटना आहे. अंडा भुर्जीची गाडी दुसऱ्या जागी हलवत असताना शॉक लागून तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.हे तिघे जण अंडा भुर्जीच्या गाडीवर काम करत होते. रात्री गाडी बंद करून पाऊस जोरात आला म्हणून तिथे आवराआवरी करायला परत गेले होते. तिथे गुडघाभर पाणी साचलं होते. महावितरणाने घटनेची पुष्टी केली आहे. त्यांचे अधिकारी घटनास्थळी पोचले आहेत. पोलीस, महापालिका अधिकारीही घटनास्थळी आहेत.


Jayant Patil: शरद पवारांना भ्रष्टाचाराचे सूत्रधार बोलणारे अमित शाह यांना जयंत पाटील यांचे प्रत्युत्तर

Jayant Patil On Amit Shah: शरद पवार यांच्यावर टीका करणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.


Guru Purnima | गुरूपौर्णिमेनिमित्त शेगवामध्ये भाविकांची मोठी गर्दी ABP Majha

आज गुरुपौर्णिमा असल्याने शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात देशभरातून भाविकांची मांदियाळी बघायला मिळत आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त अनेक दिंड्या व हजारो भाविक हे शेगावात दाखल झाले आहेत. संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी रांगही लागली आहे. हे देखील वाचा Mahayuti Seat Sharing: भाजप विधानसभेच्या 155 ते 160 जागा लढण्याची शक्यता, मुख्यमंत्रीपदाबाबत महत्त्वाची स्ट्रॅटेजी मुंबई: महायुतीतील मोठा भाऊ असलेल्या भाजपने राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत 155 ते 160 जागा लढवण्याचा निर्धार केल्याची माहिती समोर आली आहे. कोणत्याही परिस्थितीत विधानसभेच्या 155 पेक्षा कमी जागा लढवायच्या नाहीत, अशी भूमिका राज्यातील भाजप (BJP) नेत्यांनी घेतल्याचे समजते. त्यामुळे महायुतीमधील शिवसेना शिंदे गट (Shinde Camp) आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Ajit Pawar Camp) वाट्याला अवघ्या 128 ते 133 जागाच येण्याची शक्यता आहे. महायुतीमधील (Mahayuti) उर्वरित घटकपक्षांसाठी जागा सोडाव्या लागतील. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election 2024) शिंदे गट आणि अजितदादा गटाचे 80 ते 100 जागा लढवण्याचे स्वप्न अधुरेच राहण्याची शक्यता आहे. 'दैनिक लोकमत'मध्ये याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. पुण्यात सोमवारी भाजपचे महासंमेलन पार पडणार आहे. या महासंमेलनासाठी भाजपचे केंद्रीय नेते अमित शाह हे शनिवारी रात्रीच पुण्यात दाखल झाले होते. भाजपकडून सोमवारी विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले जाईल. तत्पूर्वी आज पुण्यात भाजप प्रदेश कार्यकारिणीचे अधिवेशन पार पडेल. या अधिवेशनाला अमित शाह उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते भाजप कार्यकर्त्यांना काय संदेश देणार, हे पाहावे लागेल. गुरुवारी आणि शुक्रवारी भाजप बैठकीमध्ये राज्यातील विधानसभेच्या जागांविषयी आढावा घेण्यात आला होता. त्यानंतर आज अमित शाह यांच्या उपस्थितीत पुण्यात बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल येथे प्रदेश कार्यकारिणीचे अधिवेशन होईल. सकाळी 11 पासून अधिवेशनाला सुरवात होईल. लोकसभेत राज्यात भाजपाला मिळेलेल्या कमी जागा यावर अमित शहा यांच्याकडून पदाधिकाऱ्यांची कशी कानउघडणी होणार का, याबाबत उत्सुकता असणार आहे.


Bangladesh quota protests | बांगलादेशात हिंसाचार, आतापर्यंत १०५ जणांचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : बांगलादेशमध्ये सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाविरोधात सुरू असलेले विद्यार्थी आंदोलन अधिक हिंसक होत आहे. आतापर्यंत १०५ जणांचा मृत्यू झाला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने देशभरात संचारबंदी लागू करण्याची घोषणा केली आहे. देशातील अशांतता रोखण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत, त्यानंतर शुक्रवारी सरकारने संचारबंदी लागू केली असून लष्कर...


UPSC Chairperson Manoj Soni Resigns : यूपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी यांचा तडकाफडकी राजीनामा; पूजा खेडकर प्रकरणानंतर मोठी घडामोड

UPSC Chairperson Resigns : केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी कार्यकाळ संपण्याआधीच राजीनामा दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे.


Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 12 PM : 26 जुलै 2024: ABP Majha

Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 12 PM : 26 जुलै 2024: ABP Majha ठाकरे गटाकडून नाशिकमध्ये विधानसभेसाठी चाचपणी, नाशिक जिल्ह्यात ५ ते ६ जागांवर ठाकरे गटाचा दावा, जिल्ह्यातील सर्व 15 मतदारसंघांचा उद्धव ठाकरे गटाकडून आढावा राज्यात यंदा बहुरंगी लढती होणार असून महायुतीला १६५ जागा मिळतील, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा दावा. अनिल देशमुखांचा मुलगा त्यांच्याच मतदारसंघातून लढण्यास इच्छुक, त्या घडामोडी पासून सर्वांचे लक्ष विचलित करण्यासाठी अनिल देशमुखांचे देवेंद्र फडणवीसांवर आरोप, आशिष देशमुखांचं अनिल देशमुखांच्या टीकेवर प्रत्युत्तर. आमदारांच्या अपात्रतेबाबत शिंदे गटाची पुन्हा हायकोर्टात धाव, तातडीच्या सुनावणीसाठी विनंती, उध्दव ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करण्यासाठी भरत गोगावलेंची याचिका. आमदार अपात्र न करण्याच्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला आव्हान, आमदारांचा कार्यकाळ संपण्याआधी सुनावणी घेण्याची गोगावलेंकडून विनंती, मात्र शिवसेना उध्दव ठाकरे गटाकडून तातडीच्या सुनावणीवर आक्षेप. भाजपचे माजी आमदार रमेश कुथे आज ठाकरे गटात प्रवेश करणार. पक्षप्रवेशावेळी दिलेली आश्वासनं भाजपनं पूर्ण न केल्याचा रमेश कुथेंचा आरोप. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि अजित पवारांची रात्री दीड तास बैठक, राज्यातील नुकसान, पावसाच्या पाण्याच्या नियोजनासंदर्भात बैठकीत चर्चा


पुणेकर एकाचवेळी डेंग्यू, चिकुगुनिया अन् झिकाच्या विळख्यात!

पावसाळा सुरू असल्याने डासांचे प्रमाण वाढले असून, त्यांच्या माध्यमातून पसरणारे संसर्गजन्य रोगही वाढले आहेत.


सरकारी कार्यालयात आता इंटर्नशीपची संधी

CM Eknath Shinde announces Internship Schme


Sangli Flood News : महापुराचा धोका कायम

सांगली : पुढारी वृत्तसेवा महापुराच्या भीतीची टांगती तलवार कायम असल्याचे शुक्रवारी रात्री स्पष्ट झाले. पाऊस आणि पाणीसाठ्याची स्थिती पाहता, आज (शनिवारी) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कोयना धरणातून 42 हजार 100 क्युसेक विसर्ग केला जाणार आहे. त्यामुळे सांगलीची वाटचाल महापुराच्या दिशेने सुरू झालेली आहे. महापुराचे सावट आणखी गडद झाले. आयर्विन पुलाजवळ कृष्णा...


Maharashtra Weather Update: राज्यात पावसाचा जोर वाढला, आज या 2 जिल्ह्यांना IMD कडून रेड अलर्ट जारी

IMD Rain Prediction: आज राज्यातील पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईसह बऱ्याच भागात मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान विभागाने आज राज्यातील 2 जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे.


'मला फक्त 5 मिनिटं बोलू दिलं, इतर मुख्यमंत्री 20 मिनिटं बोलले,' ममता बॅनर्जी संतापून नीति आयोगाच्या बैठकीतून बाहेर पडल्या

नीती आयोगाच्या (Niti Ayog) बैठकीत सामील झालेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal CM Mamata Banerjee) यांनी मोठा आरोप केला आहे. आपल्याला बोलण्याची संधी दिली नाही असं सांगत त्यांनी अर्ध्यातच बैठक सोडली.


Raigad Rain : कुंडलिका नदीच्या पुलावरील संरक्षक कठडे व पाईप तुटल्‍या

रोहे : महादेव सरसंबे कुंडलिका नदी काल तुडुंब भरून वाहत होती. काल मोठ्या प्रमाणात पाऊस असल्याने कुंडलिका तुडुंब भरून वाहत होती. पाण्याचा प्रवाह मोठा होता. प्रवाहाला वेग जास्त असल्याने कुंडलिका नदीवरील रोहा अष्टमीला जोडलेला पुलावर झाडे झुडपे अडकल्याने पुलावरील संरक्षणासाठी लावलेल्‍या लोखंडी पाईप, संरक्षण भिंत वाहून गेल्‍या आहेत. (Raigad Rain) रायगड ज...


Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 | काय आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना? कसा घ्याल योजनेला लाभ?

धुळे : राज्यातील 65 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित तालुक्याच्या गट विकास अधिकारी, तालुका पंचायत समिती येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनिष पवार यांनी केले आहे. (Mukhyamantri Vayoshri Yojana 2024) अशी आहे मुख्यमंत्री वयोश्री ...


Radhanagari Dam : राधानगरी धरण ८० टक्के भरले!

गुडाळ : (आशिष पाटील) राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आज (रविवार) पहाटे पासून होणाऱ्या धुवाधार अतिवृष्टीमुळे दुपारी चार वाजता राधानगरी धरण 79.57% म्हणजे जवळपास 80 टक्के भरले आहे. विशेष म्हणजे पहाटे पासून दहा तासात धरणामध्ये तब्बल तीन टक्के पाणी संचय वाढला आहे. Raigad Rain : महाड पोलादपूरमध्ये सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली! रविवारी पहाटे स...


लहुसिंग अतिग्रे यांचे निधन

कोल्हापूर : पॅको इंडस्ट्रीजचे सदस्य व युनायटेड इंडस्ट्रीजचे संस्थापक प्रसिद्ध उद्योगपती लहुसिंग भाऊसो अतिग्रे यांचे रविवारी रात्री वृद्धापकाळाने ताराबाई पार्क येथील निवासस्थानी निधन झाले. ते 97 वर्षांचे होते. पॅको इंडस्ट्रीजच्या उभारणीत अतिग्रे यांचा मोलाचा वाटा होता. उद्योग क्षेत्राबरोबरच प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष, कोल्हापूर जनता...


Lokmanya Tilak Statue : एका पुतळ्याचं मनोगत, माझी हक्काची जागा मला कधी मिळणार?

Lokmanya Tilak : डोंबिवलीतला सुशोभीकरणासाठी हटवण्यात आलेला लोकमान्य टिळकांचा पुतळा अद्यापही उभारण्यात आलेला नाही, त्यानिमित्ताने हा विशेष लेख


Raj Thackeray : राज ठाकरेंची विधानसभा निवडणुकांबाबत मोठी घोषणा; स्वबळाचा नारा देत म्हणाले, “आपण इतक्या जागांवर…”

राज ठाकरेंनी मुंबईत पदाधिकारी मेळावा घेतला, या मेळाव्यात त्यांनी स्वबळावर लढण्याची घोषणा केली.


Ajit Pawar Pune : पुण्यातील पूरस्थितीचा पालकमंत्र्यांकडून A to Z आढावा; काय उपाययोजना करणार?

अनेक रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरलं आहे. तर काही भागात जनजीवन देखील विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी प्रशासन कामाला लागलं आहे. हवामान विभागाने आज पुणे शहराला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज मुसळदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार येत्या काही तासांमध्ये पुणे शहर भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला, पिंपरी चिंचवड परिसरात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर गेल्या ३२ वर्षांमध्ये पहिल्यांदाच इतका पाऊस (Pune Rain) झाला असल्याची माहिती हवामान तज्ज्ञ अनुपम कश्यपी यांनी दिली आहे. हवामान तज्ज्ञ अनुपम कश्यपी माहिती देताना म्हणाले, गेल्या ३२ वर्षांमध्ये पहिल्यांदाच पुण्यात आत्तापर्यंत रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला आहे. गेल्या २४ तासांमध्ये झालेला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस (Pune Heavy Rain) पुण्यात झाला आहे. काही भागांमध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस कोसळला आहे. शहर परिसरातील सर्व धरणे जवळपास भरली आहेत. पावसाचा वाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला असल्याचे दिसून येत आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी झाल्याचं दिसून येत आहे. चालकांनी व्यवस्थित वाहने चालवा, आवश्क नसल्यास घराबाहेर जाणे टाळा, काळजी घ्या असंही त्यांनी म्हटलं आहे.


Supriya Sule on Sunil Shelke | अजित पवार, शरद पवारांसमोर सुप्रिया सुळे - सुनिल शेळकेंमध्ये बाचाबाची

पुणे : पुढारी वृत्तसेवा : एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाची एकही संधी न सोडणाऱ्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शनिवारी (दि. २०) पुण्यात एकत्र आले. यावेळी खासदार शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी विचारलेल्या प्रश्नांना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी उत्तरे दिली. याला निमित्त ठरले पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक. या बैठकीमध्ये ही एकमेकांना...


Nashik| नाशिकमध्ये जोर, मराठवाड्यासाठी दिलासा

Nashik Dam Good Condition Report


BECIL Mumbai Govt Jobs 2024: १० वी, १२वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मुंबईत सरकारी नोकरी; 'इतका' मिळेल पगार

BECIL Recruitment 2024: इच्छुक उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. उमेदवारांना हे अर्ज BECIL च्या www.becil.com या अधिकृत संकेतस्थळावर मिळतील.