बातम्या

Trending:


MSP Increase Modi Cabinet: शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 14 पिकांच्या एमएसपीत वाढ, केंद्र सरकारचा निर्णय

MSP Increase Modi Cabinet: केंद्रातील एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक 19 जून रोजी पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत मंत्रिमंडळाने खरीप पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत 14 खरीप पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ करण्यास मंजुरी दिली आहे.


नीट सुधारा!

शिक्षण आणि आरोग्य सुविधांचे जाळे देशाच्या कानाकोपर्‍यापर्यंत पोहोचवले, तरच विकास तळागाळापर्यंत झिरपेल, असे प्रतिपादन नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी केले होते; परंतु आजही या दोन्ही तरतुदींवर आवश्यक तेवढा खर्च केला जात नाही. एवढेच नव्हे, तर शिक्षण हळूहळू खासगी संस्थांच्या हवाली झाले आहे. कॉपी, पेपरफुटी तसेच भरती प्रक्रियेतील भ—ष्टाचारामुळे हे क्षेत्र बदनाम होत आहे. उत्तम …


धुळे जिल्ह्यात कृषि संजीवनी पंधरवड्याचे आयोजन

धुळे पुढारी वृत्तसेवा- डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या 125 व्या जयंती निमित्ताने जिल्ह्यात 17 जून ते 1 जुलै या कालावधीत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी संजीवनी पंधरवडा साजरा करण्यात येतो आहे. या पंधरवड्यामध्ये प्रत्येक दिवशी विशिष्ट मुद्यांवर शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या पंधरवाडयामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी …


Big Breaking : UGC-NET परीक्षा रद्द, परीक्षेत गैरप्रकार; तपास CBI कडे

केंद्र सरकारने 18 जून रोजी झालेली UGC-NET परीक्षा रद्द केलीय.. 18 जून रोजी झालेल्या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा संशय आहे..


mpsc ची तयारी: भूगोल (मुख्य परीक्षा)

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भूगोल विषयाच्या यूपीएससी सामान्य अध्ययन मुख्य परीक्षा तयारीच्या लेखमालिकेत मागील लेखात आपण भूगोल विषयाचे महत्त्व, त्याचे स्वरूप व प्रश्नसंख्या यांची चर्चा केली. आज आपण भूगोलाच्या अभ्यासक्रमासंदर्भात सविस्तर चर्चा करू.


जरांगेंचे समाधान होतच नसेल, तर आम्ही काय करणार: गिरीश महाजन

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिले होते. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने आजपर्यंत जे काही करायचे होते त्याबाबत सर्वकाही केले असल्याचे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. तसेच, मनोज जरांगे यांचे समाधान होतच नसेल, तर आता आम्ही काय करणार? असे देखील महाजन म्हणाले. पुण्यात विभागीय आयुक्त कार्यालयात …


Sharad Ponkshe Speech Mumbai :शरद पोंक्षे यांच्या भाषणादरम्यान चिठ्ठी आली, पुढे काय घडलं पाहा!

Sharad Ponkshe Speech Mumbai :शरद पोंक्षे यांच्या भाषणादरम्यान चिठ्ठी आली, पुढे काय घडलं पाहा!शरद पोंक्षे यांच्या भाषणा दरम्यान मागून चिठ्ठी आली, भाषण लवकर संपवावे म्हणून संदेश आला, त्याच वेळी पोंक्षे यांनी भाषणात नाराजी व्यक्त केली, "यासाठी मला इथे यायला आवडत नाही, माझ्या नंतर येणाऱ्या लोकांना विचारतो, मी थोडा वेळ तरी बोलू का? हा विषय असा सोडता येत नाही, नाहीतर मला बोलवू नका"


Shivrajyabhishek Din Nagpur:तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन;शिवरायांना मानवंदना देण्यासाठी जय्यत तयारी

Shivrajyabhishek Din Nagpur:तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन;शिवरायांना मानवंदना देण्यासाठी जय्यत तयारी रायगडावर आज ३५१वा शिवराज्यभिषेक सोहळा साजरा होतोय. ६ जूनप्रमाणे या शिवराज्याभिषेकाची देखील प्रशासनाने जय्यत तयारी केलेली आहे. रायगडावर ७ वाजता शिवरायांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. ८ वाजता नगारखान्यासमोर ध्वजारोहण केलं जाणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री यांच्या हस्ते मुख्य शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रायगडावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एकीकडे पावसाची रिमझिम सुरु असून तेवढ्याच उत्साहात शिवभक्त गडावर दाखल होताना दिसत आहेत. रायगडावर आज तिथीनुसार 351 वा शिवराज्यभिषेक सोहळा शासकीय यंत्रणा रायगडावर सज्ज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार शिवराज्यभिषेक गडावर पोलिस बंदोबस्त तैनात Anchor - आज रायगडावर 351 वा शिवराज्यभिषेक सोहळा साजरा होतोय सकाळी 8 वाजता ध्वजारोहण त्यानंतर मुख्यमंत्री यांच्या हस्ते शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे, गडावर मोठया स्वरूपात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे ,पावसाची रिमझीम एकीकडे सूरु असुन तेवढ्याच उत्साहात शिवभक्त मात्र गडावर दाखल होताना दिसत आहेत.


Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 19 June 2024

Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 19 June 2024 आज शिवसेनेचा ५८ वा वर्धापन दिन. शिंदेंचा वर्धापन दिन मुंबईत वरळी डोम इथं तर ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी कॅबिनेटची आज संध्याकाळी ५ वाजता बैठक, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीचीही बैठक होणार. राज्यात आजपासून पोलीस भरतीला सुरुवात...१७ हजार जागांसाठी तब्बल १७ लाख अर्ज, ४० टक्के उमेदवार उच्चशिक्षित... मुंबईतील ५० पेक्षा अधिक रुग्णालय, महाविद्यालय आणि मुंबई महापालिका मुख्यालयाला धमकीचा ई-मेल, पोलिसांचा तपास सुरु. मी दादांसोबत नाही तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत, एबीपी माझाशी बोलताना छगन भुजबळ यांचं अतिशय सूचक विधान छगन भुजबळांनी शिवसेना सोडली नसती तर एव्हाना मुख्यमंत्री झाले असते, संजय राऊतांचं वक्तव्य तर शिवसेना सोडणारे सगळे अस्वस्थ आत्मे, राऊतांची टीका


western Railway Mumbai : मुसळधार पावसाचा पश्चिम रेल्वेला फटका; 30 ते 40 मिनिटे ट्रेन उशिरा

Western Railway Mumbai : मुसळधार पावसाचा पश्चिम रेल्वेला फटका; 30 ते 40 मिनिटे ट्रेन उशिरा बोईसर-उमरोळीदरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी आल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, दोन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूक ३० ते ४० मिनिटे उशिराने हेही वाचा: खरीप हंगामासाठी १४ पिकांच्या हमीभावात केंद्र सरकारकडून वाढ, धानाचा हमीभाव आता २३०० रुपये तर कपाशीला ७ हजार १२१ रु. प्रति क्विंटल मिळणार मंगळवारी घेतलेली UGC-NET परीक्षा रद्द, परीक्षेत गैरप्रकार झाल्यानं केंद्रीय शिक्षण खात्याचा निर्णय, UGC-NET परीक्षा पुन्हा घेणार, तारीख लवकरच कळणार यूजीसी नेट परीक्षा रद्द केल्यावर आता नीट परीक्षाही रद्द करा, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंची मागणी, पंतप्रधानांनी नीट परीक्षेतल्या घोळाची जबाबदारी स्वीकारावी, खर्गेंची टीका पांढऱ्या शिधापत्रिकाधारकांनाही आता मिळणार महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मन योजनेचा लाभ, २२ लाख लाभार्थ्यांना लाभ, मंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला त्या भाजपसोबत कधीच जाणार नाही, शिवसेनेच्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरेंचा निर्धार उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्ट पाठिंबा, उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना चिमटा, तर पुन्हा येईन म्हणणारे आता जाऊ द्या ना घरी आता वाजवले की बारा म्हणतायत, फडणवीसांनाही खोचक टोला देशभक्त मुस्लिमांनी आम्हाला मतं दिली हे जाहीर सांगतो, सत्ताधाऱ्यांना उद्धव ठाकरेंचं उत्तर, तर तमाम हिंदूबांधव म्हणण्य़ाचं धाडस ठाकरेंनी केलं नाही, शिंदेंचा पलटवार


RTE Admissions : आरटीई प्रवेशांबाबत माहिती देण्यास शाळांची टाळाटाळ, राज्य सरकारची हायकोर्टात माहिती

RTE Admissions : आरटीई प्रवेशांबाबत माहिती देण्यास शाळांची टाळाटाळ, राज्य सरकारची हायकोर्टात माहिती आरटीई प्रवेशाप्रक्रियेबाबत अद्याप राज्य सरकारनं सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर न केल्याबद्दल हायकोर्टानं तीव्र नाराजी व्यक्त केली. शालेय विद्यार्थ्यांना असं ताटकळत ठेवता येणार नाही असं स्पष्ट करत राज्य सरकारला 9 फेब्रुवारीच्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर लवकरात लवकर उत्तर सादर करण्यास सांगितलंय. तसेच खाजगी शाळांना राज्याच्या शिक्षण विभागाला प्रवेशासंबंधी आवश्यक तो तपशील देण्याचे निर्देश जारी केलेत. आरटीई कायद्याअंतर्गत राखीव आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी आरक्षित असलेल्या 25 टक्के जागांमधून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरापासून एक किमी परिघात शासकीय किंवा अनुदानित शाळा असल्यास त्याच शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा, असं परिपत्रक राज्य सरकारनं 9 फेब्रुवारी रोजी काढलं होतं. याप्रकरणी काही शाळांनी तसेच पालकांनी आक्षेप घेत मुंबई उच्च न्यायालयात याला आव्हान दिलं आहे. राज्य सरकारचा हा निर्णय आरटीई कायद्याविरोधात तसेच मुलांच्या शिक्षणात बाधा आणणारा असल्याचं स्पष्ट करत हायकोर्टानं या परिपत्रकाला तात्काळ स्थगिती दिली होती. त्यानंतर न्यायालयानं दिलेल्या आदेशाच्या अधीन राहून आरटीआय कायद्याअंतर्गत नवीन परिपत्रक काढण्यात येईल अशी हमी देत तातडीनं राज्य सरकारनं सुधारीत परिपत्रक काढलं होतं यासंदर्भातील याचिकांवर मंगळवारी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. राज्य सरकारच्यावतीनं अतिरिक्त सरकारी वकील ज्योती चव्हाण यांनी हायकोर्टाला सांगितले की, संबंधित विभागाकडून प्रवेशित विद्यार्थ्यांच्या संख्येसह काही माहिती संस्थांकडून मागविण्यात आली होती, परंतु त्यापैकी बहुतेकांनी ती अद्याप दिलेली नाही. ती माहिती मिळाल्यास खंडपीठासमोर भूमिका सादर केली जाईल. हा युक्तिवाद ऐकून घेत हायकोर्टानं सुनावणी जुलैपर्यंत तहकूब केलीय.


Tamil Nadu Illicit Liquor: तामिळनाडूत विषारी दारूने घेतला 25 जणांचा बळी, 60 जण गंभीर

Tamil Nadu Kallakurichi 25 dead : तामिळनाडूतील कल्लाकुरिची जिल्ह्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. या ठिकाणी विषारी दारूने तब्बल 25 जणांचा बाळी घेतला आहे. तर 60 हून अधिक लोक गंभीर असून त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील काही लोकांची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटकही केली आहे.


Dombivali MIDC News : आगीच्या घटनांनंतर डोंबिवली एमआयडीसीचे स्थलांतर होणार का ?

Dombivali MIDC News : डोंबिवली एमआयडीसीतील आगीच्या आणि स्फोटाच्या घटनांनंतर प्रशासनाला अचानक जाग आली आहे. स्थानिकांनी डोंबिवली एमआयडीसीतील सगळ्या केमिकल कंपन्यांचे स्थलांतर करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने या मागणीची दखल घेतली आहे.


Millionaires Leave India: यंदाच्या वर्षात ४३०० भारतीय कोट्यधीश देश सोडणार; कोणत्या देशांमध्ये बस्तान बसवणार?

Shocking News: देशातील तब्बल ४,३०० कोट्यधीश हे देश सोडून जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एका अहवालानुसार, यंदा वर्षभरात भारतातील ४,३०० कोट्यधीश हे देश सोडून दुसऱ्या देशात स्थलांतर करतील.


बीजेडीचा तोटा, कॉंग्रेसचा फायदा?

ओडिशात भाजपने जबरदस्त विजय मिळवल्यामुळे या झंझावातात बिजू जनता दलाचे अस्तित्व कितपत टिकते हे पाहावे लागेल. ही काँग्रेसलाही संधी असेल. तसे झाले तर राज्याचे राजकारण पुन्हा राष्ट्रीय पक्षांकडे जाईल...


तरीही मोदी जिंकले कसे?

मतदारांचे वर्तन हाच घटक निर्णायक असतो. त्यामुळेच २००४ मध्ये वाजपेयींचा पराभव झाला, पण मतदारांच्या वर्तनावर परिणाम करणारे दोन घटक मोदींच्या बाजूने होते.


मुलुंडमध्ये मोटारीच्या धडकेत तरुण जखमी

चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव वेगात धावणाऱ्या मोटारीने मुलुंड परिसरातील पदपथावरून चालणाऱ्या तरुणाला मंगळवारी पहाटे धडक दिली.


Uddhav Thackeray: 'ए़नडीएमध्ये पुन्हा कधीच जाणार नाही', उद्धव ठाकरे यांची स्पष्टोक्ती

Mumbai Uddhav Thackeray: शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात साजरा करण्यात आला. या वेळी ठाकरे गटाने निवडून आलेल्या सर्व खासदारांचा उद्धव ठाकरे यांनी सत्कार केला; तसेच लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या सर्व उमेदवारांचाही या वेळी सत्कार करण्यात आला.


Maharashtra Vidhan Sabha Election : महाराष्ट्रात आता विधानसभा निवडणूक झाल्यास काय परिणाम होतील? तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज!

Maharashtra Vidhan Sabha Election : लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचा उत्साह वाढला आहे. महाविकास आघाडीने 48 पैकी 30 जागा जिंकल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी 150 जागा जिंकू शकते, असे निवडणूक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. न्यूज तकच्या वृत्तानुसार, लोकसभा निवडणुकीच्या निकालाने महाराष्ट्रात काँग्रेस ताकदवान झाल्याचे दिसून आले आहे. महायुतीचे 23 जण खासदार म्हणून निवडून...


Gajanan Maharaj Palkhi Akola : पातूरच्या घाटातील गजानन महाराजांच्या पालखीचं विहंगम दृश्य Exclusive

Gajanan Maharaj Palkhi Akola : पातूरच्या घाटातील गजानन महाराजांच्या पालखीचं विहंगम दृश्य Exclusive अकोल्यात गजानन महाराजांच्या पालखीचं काल मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आल.. आजही पालखी अकोल्यात मुक्कामी असणार आहे... गजानन महाराजांच्या पालखीचे हे 55 वे वर्ष आहेय. यावर्षी पालखीत साडेसहाशेंवर वारकऱ्यांचा समावेश आहेय. विशेष म्हणजे दरवर्षी सारखाच यावर्षीही वारीमध्ये तरुणांचा सहभाग लक्षणीय आहे. अकोल्यातील ड्रोन दृष्यांसह गजानन महाराजांच्या पालखीतील उत्साहाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश अलोणे यांनी... गजानन महाराजांच्या पालखीनं आज अकोला जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्याच्या सीमेत प्रवेश केलाय. 13 जूनला शेगावातून निघालेली गजानन महाराजांच्या पालखीने नागझरी, पारस, भौरद, अकोला, वाडेगाव, पातूरमार्मागे वाशिम जिल्ह्यातील मेडशीत प्रवेश केलाय. या पालखीतील एक अतिशय महत्वाचा आणि सुंदर टप्पा म्हणजे पातूरचा घाट. संत गजानन महाराजांच्या पालखीचा वाशिम जिल्ह्यातील मेडशीत प्रवेश, पातूर घाटातून पालखी वाशिममध्ये दाखल.


Mumbai Sion Flyover: मुंबईकरांसाठी कामाची बातमी: शीव उड्डाणपूल बंद, कारण...

Mumbai Sion Flyover: आयआयटी आणि मध्य रेल्वेच्या संरचनात्मक तपासणी अहवालात शीव रेल्वे उड्डाणपूल धोकादायक ठरला आहे. अहवालातील शिफारशीनुसार पुलाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. सध्या खबरदारीचा उपाय म्हणून अवजड वाहतूक बंद करण्यात येईल.


Underwater Drone: पुण्यात साकारणार पाण्याखालचा 'ड्रोन'; देशातील पहिला वहिला प्रकल्प, कसा होणार फायदा?

Underwater Drones : पुण्यातील ‘सागर डिफेन्स इंजिनिअरींग’ या कंपनीला दिली असून, संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या (डीआरडीओ) तंत्रज्ञान विकास निधी प्रकल्पाअंतर्गत हा प्रकल्प विकसित केला जाणार आहे.


IOCL Recruitment 2024 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरीची संधी! पाहा अधिक माहिती

IOCL Recruitment 2024 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत कोणत्या पदांवर नोकरीची भरती करण्यात येणार आहे, याची माहिती इच्छुक उमेदवारांनी पाहा.


उत्तर भारतात उष्माघाताचे 178 बळी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : दिल्लीत उष्म्याचा तडाखा कायम असून, गेल्या 48 तासांत या महानगरीत उष्माघाताने 33 जणांचा मृत्यू झाला आहे. लगतच्या नोएडामध्ये 9 जणांना जीव गमवावा लागला. नोएडासह उत्तर प्रदेशात गेल्या 48 तासांत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. आठवडाभरात एकट्या उत्तर प्रदेशात 119 मृत्यू झाले असून, उत्तरेकडील अन्य राज्ये मिळून ही संख्या 178 वर …