बातम्या

Trending:


महायुतीचे जागावाटप अखेर पूर्ण

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे दोन दिवस शिल्लक असताना बुधवारी महायुतीचे जागावाटपाचे चित्र अखेर स्पष्ट झाले. महाराष्ट्रातील 48 जागांपैकी सर्वाधिक 28 जागा भाजपला गेल्या असून, त्याखालोखाल शिवसेना शिंदे गटाला 15 जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी 4 आणि रासप 1 जागा लढवत आहे. दक्षिण मुंबईसह मुंबईतील तीन जागा आणि …


NOTA असताना उमेदवार बिनविरोध कसा? सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल

एकच उमेदवार रिंगणात असेल तर अशावेळी NOTAला काल्पनिक उमेदवार समजलं जावं अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे.


‘राईट टू एज्युकेशन’ कधी?

या कायद्यानुसार खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये दुर्बल आणि वंचित घटकातील मुलांना २५ टक्के आरक्षित जागांवर प्रवेश दिले जातात.


दक्षिण दिग्विजयाची आस

‘अत्युत्कृष्ट घडवण्यासाठीच प्रयत्न करा; पण वाईटात वाईट घडले तरी तयार राहा,’ अशा आशयाची इंग्रजी म्हण आहे. ‘होप फॉर द बेस्ट, बट प्लॅन फॉर द वर्स्ट.’ युद्धात आणि स्पर्धेत सगळ्यात आधी कच्चे दुवे दूर करावे लागतात. कारण, त्या कच्च्या दुव्यांमुळे जिंकलेली लढाईसुद्धा गमावण्याची भीती असते. त्यामुळेच पहिले लक्ष कच्च्या दुव्यांकडे द्यावे लागते. सलग तिसर्‍यांदा सत्ता मिळवण्याचे …


Kerala Lottery Result Today LIVE: 80 लाख रुपये जिंकले, तुमचा आहे का हा नंबर?

केरळ: संपूर्ण केरळमध्ये प्रसिद्ध असलेल्या केरळ लॉटरीचा अखेर निकाल जाहीर झाला आहे. केरळ लॉटरी करुण्य प्लस केएन-520 चा निकाल गुरुवार 2 मे रोजी लाईव्ह करण्यात आला आहे. केरळ राज्य लॉटरी विभागाने लकी ड्रॉचे निकाल जाहीर केले आहेत. लाइव्ह अपडेट्स आणि जिंकण्याची संपूर्ण यादी पहा खालील क्रमांक5 व्या क्रमांकाचे विजेते , रक्कम 1,000 7873 7480 1666 6431 5553 2480 9497 0800 8399 0 960 5222 8966 5584 0090 1063 1970 9954 4529 8,000 जिंकणारे नंबर AREPA 168524PB...


प्रवाळभिंतींचे 'ब्लीचिंग'

१५ एप्रिलपासून लक्षद्वीप द्वीपसमूहात प्रवाळभिंती ब्लीच होण्यास, म्हणजेच पांढऱ्या पडण्यास व्यापक प्रमाणामध्ये सुरुवात झाली आहे. उष्णतेमुळे प्रवाळावर पडणाऱ्या तणावाचे हे लक्षण आहे.


सेवा क्षेत्राची भरारी

मागील काही दशकांचा विचार केला, तर भारतीय अर्थव्यवस्थेची सर्वात उजवी बाजू म्हणजे सेवा क्षेत्रातील निर्यातीला मिळालेली गती. या गतीमुळे देशा-देशांतील व्यापारात वाढणारे अंतर रोखण्यात केवळ मदत झाली नाही, तर देशात रोजगारनिर्मितीचा स्रोतही अखंडित राहिला आहे. यात उच्च कौशल्यप्राप्त रोजगारांचादेखील समावेश आहे. सेवा क्षेत्रात देशाचे यश पाहता जागतिक पातळीवर आपले स्थान कोठे आहे आणि भविष्यातील काय …


ठाकरे गटाच्या जाहिरातीत अॅडल्ट स्टार, चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप

Chitra Wagh Alleges Uddhav Thackeray used adult star in advertisement


युरोपाला ‘झळा’

जगाच्या तुलनेत युरोपातील तापमानवाढ दुप्पट असल्याच्या वास्तवावर या अभ्यासाने बोट ठेवले आहे.


Covishield vaccine: कोविशील्डमुळे वाढले हार्ट अटॅकचे प्रकरण? या गोष्टी किती तथ्य

अ‍ॅस्ट्राझेनेका या ब्रिटनमधल्या फार्मास्युटिकल कंपनीने अशी कबुली दिली आहे, की त्यांच्या कंपनीने विकसित केलेल्या कोविड-19 लशीमुळे काही साइड इफेक्ट्स होऊ शकतात. भारतातल्या सिरम इन्स्टिट्यूटने अ‍ॅस्ट्राझेनेका कंपनीच्या फॉर्म्युलापासूनच कोविशील्ड लस उत्पादित केली होती. ब्रिटनमधल्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, कंपनीच्या विरोधात 51 खटले सुरू असून, त्यांपैकी अनेक खटल्यांमध्ये असा आरोप ठेवण्यात आला आहे, की त्या लशीमुळे प्राण गेले आहेत. तसंच अनेक जण गंभीररीत्या आजारी पडले आहेत. या संदर्भात भारतातले डॉक्टर्स काय म्हणतात, याविषयी जाणून घेऊ या. ज्या डॉक्टर्सनी कोरोना महासाथीचा बारकाईने अभ्यास केला होता, त्यांच्याशी इंडिया टुडेने संवाद साधला. आज तकने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. हैदराबादच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये न्यूरॉलॉजिस्ट असलेल्या डॉ. सुधीर कुमार यांनी सांगितलं, की अॅस्ट्राझेनेका कंपनीने कोर्टात असं सांगितलं आहे, की कोविशील्ड आणि वॅक्सझेवरिया ब्रँडनेमने विकल्या जाणाऱ्या त्यांच्या लशीमुळे टीटीएस अर्थात थ्रोम्बोसायटोपेनिया सिंड्रोम विथ थ्रोम्बोसिस हा साइड इफेक्ट होण्याची शक्यता खूप कमी आहे. त्याआधीही कोविडसह अन्य लशींच्या प्रतिकूल प्रभावामुळे अॅक्वायर्ड टीटीएसची नोंद झाली आहे. टीटीएस म्हणजे एक अशी दुर्मीळ परिस्थिती, ज्यात रक्त गोठू लागतं आणि रक्तात प्लेटलेट्सची संख्या कमी होत जाते. डॉ. सुधीर कुमार यांनी सांगितलं, की लस घेतल्यानंतर साइड इफेक्ट झालेच, तर ते एक ते सहा आठवड्यांत दिसून येतात. त्यामुळे भारतात त्यांनी दोन वर्षांपूर्वी लस घेतली होती, त्यांनी घाबरण्याची काहीही गरज नाही. नॅशनल इंडियन मेडिकल असोसिएशनचे सहअध्यक्ष डॉ. राजीव जयदेवन यांनी सांगितलं, की लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर पहिल्या महिन्यातच साइड इफेक्ट्स दिसून येऊ शकतात, त्यानंतर नाही. डॉ. जयदेवन यांनी असंही सांगितलं, की 'हे सारं ब्रिटनमधल्या माध्यमांनी प्रसारित केलं आहे. लशीमुळे होणाऱ्या टीटीएसवर आधीही चर्चा झाली आहे. डब्ल्यूएचओने मे 2021मध्ये यावर एक रिपोर्टही प्रसिद्ध केला होता.' डॉ. सुधीर यांनी सांगितलं, की लशीनंतर टीटीएस झाल्याच्या प्रकाराची अद्याप भारतात नोंद झालेली नाही. वेगवेगळ्या प्रकरणांत त्याची नोंद झाली आहे. कोविड लसीकरणानंतर टीटीएस होणं खूप दुर्मीळ आहे. ब्रिटन आणि युरोपीय संघात आतापर्यंत 1.7 कोटीहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली असून, गेल्या आठवड्यापर्यंत टीटीएसची 40 प्रकरणं नोंदवली गेली आहेत. डॉ. सुधीर असंही म्हणाले, की 2021पासून कोविड लसीकरणानंतर जगभरात टीटीएसची अनेक प्रकरणं घडली आहेत. हे खुलासे नवे नाहीत. डॉ. सुधीर यांनी सांगितलं, की टीटीएस हा विकार 100 वर्षांपासून आपल्याला माहिती आहे. 1924 साली पहिल्यांदा या विकाराची नोंद झाली होती. डॉ. सुधीर यांनी सांगितलं, की कोविड लसीकरणामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढू शकतो; मात्र ती जोखीम खूप कमी आहे. कार्डिअॅक अरेस्ट किंवा हृदयविकाराचा झटका येण्यामागे लसीकरणाचं कारण असण्याची शक्यता नगण्य आहे. भारतासह अन्य अनेक देशांतल्या वैज्ञानिक संशोधनात हे सिद्ध झालं आहे. कोविडचा संसर्ग झाल्यास रक्ताच्या गुठळ्या बनण्याचा धोका वाढतो. तो कोविड लसीकरणाच्या तुलनेत किती तरी अधिक आहे. तरुणांना हृदयविकार होण्यामागे बदलती जीवनशैली, लठ्ठपणा, डायबेटीस, कमी झोप, ताण, हाय कोलेस्टेरॉल, पॅकेज्ड फूड अशी अनेक कारणं असू शकतात. कोविड संसर्गामुळे हृदयविकाराचा धोका वाढला; मात्र खूपच कमी प्रकरणांमध्ये हृदयविकाराला कोविड लस कारणीभूत असू शकेल, असं डॉ. सुधीर म्हणाले. तरुणांना हृदयविकार होण्यामागे बदलती जीवनशैली, लठ्ठपणा, डायबेटीस, कमी झोप, ताण, हाय कोलेस्टेरॉल, पॅकेज्ड फूड अशी अनेक कारणं असू शकतात. कोविड संसर्गामुळे हृदयविकाराचा धोका वाढला; मात्र खूपच कमी प्रकरणांमध्ये हृदयविकाराला कोविड लस कारणीभूत असू शकेल, असं डॉ. सुधीर म्हणाले. टीटीएस हा विकार एन्फ्लुएंझा, न्यूमोकोकल, एच वन एन वन, रेबीज आदी विकारांच्या लसीकरणामुळेही झाल्याच्या नोंदी आहेत, असंही डॉ. सुधीर यांनी सांगितलं. कोविड लशींची तुलना करण्यासाठी पुरेसा डेटा नसल्याचंही ते म्हणाले. डॉ. जयदेवन यांनी सांगितलं, की कोव्हॅक्सिन आणि कोविशील्ड या दोन्ही लशी प्रभावी आहेत. प्रत्येक लस आणि उपचारांचे काही ना काही साइफ इफेक्ट्स असतात. भारतात लस घेतलेले कोट्यवधी नागरिक जिवंत आहेत आणि व्यवस्थित आहेत. लशीचा वापर झाला नसता, तर अनेक जण आज जिवंत असले नसते.


आधी आईवर अतिप्रसंग, नंतर मुलीवर लैंगिक अत्याचार करुन गळा आवळला

पश्चिम बंगाल येथील एक कुटुंब रोजीरोटीसाठी मागील नऊ महिन्यांपासून वाडे-दाबोळी येथे आले होते. आई-वडील आणि एक साडेपाच वर्षांची चिमुरडी मुलगी असे हे छोटेखानी कुटुंब होते. मुलीचे वडील तिथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते आणि तिथे जवळच असलेल्या एका भाड्याच्या खोलीत हे कुटुंब राहत होते. राहते घर आणि वडिलांचे कामाचे ठिकाण …


Goa News : काणकोणात समुद्रकिनारी बारमाही पर्यटक

काणकोण; पुढारी वृत्तसेवा : राज्यात एकूण 106 किलोमीटर किनारपट्टी आहे. त्यातील एकट्या काणकोण तालुक्यात 26 किलोमीटर किनारपट्टी लाभलेली आहे. त्यामुळे वर्षाच्या बाराही महिने येथील किनार्‍यांवर देशी तसेच विदेशी पर्यटकांची गर्दी असते. सुट्टीच्या दिवसात तर देशी पर्यटक आपल्या कुटुंबीयांसमवेत किनार्‍यांवर मौजमजा करायला आलेले असतात. काणकोण तालुक्यात पाळोळे, ओवरे, पाटणे, आगोंद, खणगिणी-खोला, गालजीबाग, तळपण, देवावेळ, धारवेळ, पोळे, …


Mumbai: पॅलेस्टाईनसमर्थक भूमिकेमुळे मुंबईतील शाळेच्या मुख्याध्यापिकेकडून राजीनामा मागितला!

: मुंबईच्या विद्याविहार येथील सोमय्या शाळेच्या मुख्यधापिका परवीश शेख यांना पॅलेस्टाईनसमर्थक भूमिकेमुळे शाळा व्यवस्थापनाने राजीनामा देण्यास सांगितले आहे.


Cidco Lottery : तारीख ठरली! अखेर घरं मिळणार... सिडकोच्या सोडतीसंदर्भातील मोठी Update

Cidco Lottery : सिडकोच्या घरांसाठी अर्ज भरलेल्यांना दिलासा. पाहा 'या' भागातील घरांच्या सोडतीसंदर्भातील मोठी अपडेट. तुम्हीही घरांसाठी अर्ज केला आहे का?


Lok Sabha Election 2024 : अंतिम आकडेवारीत मतदान 6 % वाढले

मुंबई ः पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यासाठीची मतदानाची आकडेवारी जाहीर करताना केलेला विलंब आणि मतदानाच्या दिवशी जाहीर झालेल्या आकडेवारीत व अंतिम आकडेवारीतील मोठ्या फरकामुळे निवडणूक आयोगावर टीकेचा भडिमार होऊ लागला आहे. राजकीय पक्ष व जाणकारांनी यावरून आयोगाला धारेवर धरले आहे. देशात दोन टप्प्यांत झालेल्या मतदानाच्या अंतिम आकडेवारीत एकूण 6 टक्क्यांनी, तर …


NCERT Bharti 2024 : एनसीईआरटीमध्ये ‘या’ पदांवर भरती; १० मे अर्ज करण्याचा शेवटचा दिवस

NCERT Bharti 2024 : NCERT ने शैक्षणिक सल्लागार, द्विभाषिक अनुवादक इत्यादी पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची योजना आखत असलेले उमेदवार येथे भरतीशी संबंधित सर्व तपशीलांची माहिती मिळवू शकतात.


Ganesh Rudraksha Benefits For Students: विद्यार्थ्यांसाठी फलदायी गणेश रुद्राक्ष,कधी आणि कसे धारण करावे जाणून घ्या

Ganesh Rudraksha Benefits For Students: एकमुखी रुद्राक्षापासून चौदा मुखांच्या रुद्राक्षापर्यंत रुद्राक्षाचे अनेक प्रकार आपल्याला बघायला मिळतात. विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष धारण करणे शुभ मानले जाते. गणेश रुद्राक्ष धारण केल्याने होणारे फायदे जाणून घेऊयात.


LokSabha Elections | मुखईने घरातल्या माणसाप्रमाणे जपले : आढळराव पाटील

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : मुखई गावाशी माझे जुने ऋणानुबंध राहिले आहेत. या गावासाठी कामे करताना मी कधीच मागे-पुढे पाहिले नाही. येथील बैलगाडा घाटाला निधी दिला. खरेतर तुमच्या गावाने मला घरातल्या माणसाप्रमाणे जपले आहे, असे प्रतिपादन शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मुखई येथे केले. महायुतीच्या शिरूर मतदारसंघातील प्रचारार्थ आयोजित दौर्‍यानिमित्त ते …


Leopard attack | लांडेवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात महिला जखमी!

मंचर : पुढारी वृत्तसेवा : लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथील विश्वासमळा येथे दुचाकीवरून घरी जात असताना दुचाकीवर मागे बसलेल्या शेतकरी महिलेवर बिबट्याने हल्ला केला. त्यात ही महिला जखमी झाली. ही घटना सोमवारी( दि. 29) सायंकाळी साडेसात वाजता घडली. मयूरा नवनाथ विश्वासराव, असे जखमी महिलेचे नाव आहे. मयूरा विश्वासराव व त्यांचे कुटुंबीय शेतात टोमॅटो तोडण्याचे काम करत …


मुंबईत महाविकास आघाडीचं मराठी कार्ड, 6 पैकी 6 उमेदवार मराठी

Special Report On Marathi Card In mumbai Election


Income Tax on Gold Jewellery : दागिन्यांच्या विक्रीवर द्यावा लागणार नाही कर, आयकराचे हे कलम समजून घ्या

Income Tax : न्यायाधिकरणासमोर एक खटला आला ज्यामध्ये एका व्यक्तीने वारसाहक्काने दिलेले दागिने विकून पैसे घराच्या मालमत्तेत गुंतवले होते. मात्र, मूल्यांकन अधिकाऱ्याने त्या व्यक्तीला कलम 54F अंतर्गत सूट देण्यास नकार दिला होता.


महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्र्यांकडून राष्ट्रध्वज वंदन

जळगाव : पुढारी वृत्तसेवा- महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पोलीस कवायत मैदान येथे राष्ट्रध्वज वदंन करून सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी ज्या …