बातम्या

Trending:


Konkan Railway : गोव्याशी संबंधित असलेली ही योजना कोकण रेल्वेकडून अखेर रद्द! मोठं कारण आलं समोर

Konkan Railway News : स्थानिकांकडून या योजनेला होत असलेला विरोध लक्षात घेता रेल्वेकडून ही योजना रद्द करण्यात आली आहे. यामुळे या योजनेसाठी जारी केलेल्या निविदा रद्द केल्या आहेत.


Shivrajyabhishek Din Nagpur:तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन;शिवरायांना मानवंदना देण्यासाठी जय्यत तयारी

Shivrajyabhishek Din Nagpur:तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन;शिवरायांना मानवंदना देण्यासाठी जय्यत तयारी रायगडावर आज ३५१वा शिवराज्यभिषेक सोहळा साजरा होतोय. ६ जूनप्रमाणे या शिवराज्याभिषेकाची देखील प्रशासनाने जय्यत तयारी केलेली आहे. रायगडावर ७ वाजता शिवरायांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. ८ वाजता नगारखान्यासमोर ध्वजारोहण केलं जाणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री यांच्या हस्ते मुख्य शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रायगडावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एकीकडे पावसाची रिमझिम सुरु असून तेवढ्याच उत्साहात शिवभक्त गडावर दाखल होताना दिसत आहेत. रायगडावर आज तिथीनुसार 351 वा शिवराज्यभिषेक सोहळा शासकीय यंत्रणा रायगडावर सज्ज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार शिवराज्यभिषेक गडावर पोलिस बंदोबस्त तैनात Anchor - आज रायगडावर 351 वा शिवराज्यभिषेक सोहळा साजरा होतोय सकाळी 8 वाजता ध्वजारोहण त्यानंतर मुख्यमंत्री यांच्या हस्ते शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे, गडावर मोठया स्वरूपात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे ,पावसाची रिमझीम एकीकडे सूरु असुन तेवढ्याच उत्साहात शिवभक्त मात्र गडावर दाखल होताना दिसत आहेत.


Nashik Crime : घरगुती वाद, अनैतिक संबंधातून काढला पतीचा काटा, पत्नी-प्रियकरासह कुटुंबीयांनी रचला कट, नांदगाव हादरले

Nashik Crime News नाशिक : घरगुती वाद व अनैतिक संबंधातून खुनाची धक्कादायक घटना नांदगाव (Nandgaon) तालुक्यात घडली आहे. पत्नी, प्रियकर, बहीण व मुलगा यांनी संगनमताने पतीचा काटा काढला असून 24 तासांच्या आत नांदगाव पोलिसांना (Nandgaon Police) घटनेची उकल करण्यात यश आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई मनपाचे कर्मचारी दीपक गोण्या सोनवणे (54, रा. वाघोरे, ता. अमळनेर, जि. जळगाव) यांची घरगुती वाद व अनैतिक संबंधातून पत्नी, प्रियकर, बहीण व मुलगा यांनी...


Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रासाठी मोठी बातमी, वाढवण बंदराला मंजुरी मिळाली

Today Breaking News LIVE Updates : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींबरोबरच दिवसभरातील घडामोडींसहीत देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी...


Big Breaking : UGC-NET परीक्षा रद्द, परीक्षेत गैरप्रकार; तपास CBI कडे

केंद्र सरकारने 18 जून रोजी झालेली UGC-NET परीक्षा रद्द केलीय.. 18 जून रोजी झालेल्या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा संशय आहे..


Burger King मध्ये बसलेल्या तरुणावर झाडल्या 10 गोळ्या, गँगवॉरने शहर हादरलं

नवी दिल्ली : मंगळवारी रात्री गोळीबाराची घटना घडल्याने दिल्ली हादरून गेली. राजौरी गार्डनमधल्या बर्गर किंग आउटलेटमध्ये एका युवकावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या प्रकरणी पोलीस तपास वेगात सुरू आहे; पण सोशल मीडियावरच्या एका व्हायरल मेसेजने प्रकरणाचा अँगल बदलला आहे. या मेसेजवरून ही हत्या गँगवॉर अर्थात टोळीयुद्धातून झाल्याचं दिसतं.दिल्लीतल्या राजौरी गार्डन परिसरात मंगळवारी रात्री खुलेआम एका युवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बर्गर किंग...


BJP Meeting Delhi : मित्रपंक्षांसोबत जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्याच्या फडणवीसांना सूचना

BJP Meeting Delhi : मित्रपंक्षांसोबत जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्याच्या फडणवीसांना सूचना देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहणार आहेत. त्यांच्या राजीनाम्याबाबत दिल्लीमध्ये बैठकीत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं समोर आलेय. राज्यात लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला जोरदार फटका बसला होता, ही जबाबदारी स्वीकारुन देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यंत्रीपद सोडण्याचा प्रस्ताव भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला दिला होता. यावर आज चर्चा होईल, असा अंदाज बांधला जात होता. पण देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याबाबत बैठकीत कोणताही चर्चा झाली नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हेच उपमुख्यमंत्रीपदी राहणार असल्याचं आता निश्चित झालेय. विधानसभा निवडणुकीसाठी रोडमॅप आणि विधानसभेसाठी जागा वाटपाची चर्चा लवकर करणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. नवी दिल्लीमध्ये आज महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पिछेहाटीबाबत आणि आगामी विधानसभा निवडणुकीबद्दल महत्त्वपूर्ण अशी बैठक पार पडली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवात साधला. विधानसभेसाठी केंद्राकडून फूल सपोर्ट मिळणार असल्याचे यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.


MSP Increase Modi Cabinet: शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 14 पिकांच्या एमएसपीत वाढ, केंद्र सरकारचा निर्णय

MSP Increase Modi Cabinet: केंद्रातील एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक 19 जून रोजी पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत मंत्रिमंडळाने खरीप पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत 14 खरीप पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ करण्यास मंजुरी दिली आहे.


Top 60 Superfast News : महत्वाच्या 60 मोठ्या बातम्यांचा आढावा : सिटी सिक्स्टी : 19 जून 2024

Top 60 Superfast News : महत्वाच्या 60 मोठ्या बातम्यांचा आढावा : सिटी सिक्स्टी : 19 जून 2024 आज शिवसेनेचा ५८ वा वर्धापन दिन. शिंदेंचा वर्धापन दिन मुंबईत वरळी डोम इथं तर ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात होणार. मी दादांसोबत नाही तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत, एबीपी माझाशी बोलताना छगन भुजबळ यांचं अतिशय सूचक विधान कोणत्याही पक्षात जाणार नाही, कोणत्याही नेत्याला भेटलो नाही, नाराजीच्या चर्चेवर छगन भुजबळांची एबीपी माझाला EXCLUSIVE प्रतिक्रिया... २०० हून अधिक विधानसभेच्या जागा लढण्याची घोषणा केल्यावर राज ठाकरेंचा पहिलाच नाशिक दौरा, उद्या त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेऊन निवृत्तीनाथांच्या पालखीतही सहभागी होणार राज्यात भाजप काढणार धन्यवाद यात्रा, लोकसभा निकालांनंतर मतदारांचे मानणार आभार दिल्लीतून नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाल्यावर फडणवीस अॅक्शन मोडवर, आज तातडीने बोलावल्या दोन बैठका, विकास प्रकल्पांचा घेणार आढावा ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनाचा आज सातवा दिवस, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड भेट घेणार, प्रकाश आंबेडकरही उद्या भेट घेणार लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनावर जरांगेंची टीका, आंदोलन सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप


Dombivali MIDC News : आगीच्या घटनांनंतर डोंबिवली एमआयडीसीचे स्थलांतर होणार का ?

Dombivali MIDC News : डोंबिवली एमआयडीसीतील आगीच्या आणि स्फोटाच्या घटनांनंतर प्रशासनाला अचानक जाग आली आहे. स्थानिकांनी डोंबिवली एमआयडीसीतील सगळ्या केमिकल कंपन्यांचे स्थलांतर करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने या मागणीची दखल घेतली आहे.


मुलुंडमध्ये मोटारीच्या धडकेत तरुण जखमी

चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव वेगात धावणाऱ्या मोटारीने मुलुंड परिसरातील पदपथावरून चालणाऱ्या तरुणाला मंगळवारी पहाटे धडक दिली.


Gajanan Maharaj Palkhi Akola : पातूरच्या घाटातील गजानन महाराजांच्या पालखीचं विहंगम दृश्य Exclusive

Gajanan Maharaj Palkhi Akola : पातूरच्या घाटातील गजानन महाराजांच्या पालखीचं विहंगम दृश्य Exclusive अकोल्यात गजानन महाराजांच्या पालखीचं काल मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आल.. आजही पालखी अकोल्यात मुक्कामी असणार आहे... गजानन महाराजांच्या पालखीचे हे 55 वे वर्ष आहेय. यावर्षी पालखीत साडेसहाशेंवर वारकऱ्यांचा समावेश आहेय. विशेष म्हणजे दरवर्षी सारखाच यावर्षीही वारीमध्ये तरुणांचा सहभाग लक्षणीय आहे. अकोल्यातील ड्रोन दृष्यांसह गजानन महाराजांच्या पालखीतील उत्साहाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश अलोणे यांनी... गजानन महाराजांच्या पालखीनं आज अकोला जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्याच्या सीमेत प्रवेश केलाय. 13 जूनला शेगावातून निघालेली गजानन महाराजांच्या पालखीने नागझरी, पारस, भौरद, अकोला, वाडेगाव, पातूरमार्मागे वाशिम जिल्ह्यातील मेडशीत प्रवेश केलाय. या पालखीतील एक अतिशय महत्वाचा आणि सुंदर टप्पा म्हणजे पातूरचा घाट. संत गजानन महाराजांच्या पालखीचा वाशिम जिल्ह्यातील मेडशीत प्रवेश, पातूर घाटातून पालखी वाशिममध्ये दाखल.


Uddhav Thackeray: 'ए़नडीएमध्ये पुन्हा कधीच जाणार नाही', उद्धव ठाकरे यांची स्पष्टोक्ती

Mumbai Uddhav Thackeray: शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात साजरा करण्यात आला. या वेळी ठाकरे गटाने निवडून आलेल्या सर्व खासदारांचा उद्धव ठाकरे यांनी सत्कार केला; तसेच लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या सर्व उमेदवारांचाही या वेळी सत्कार करण्यात आला.


Shivsena Foundation Day : शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसैनिकांनध्ये उत्साह

Shivsena Foundation Day : शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसैनिकांनध्ये उत्साह शिवसेनेचा ५८वा वर्धापन दिन आज ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना स्वतंत्रपणे साजरा करणार आहेत.. या वर्धापन दिना निमित्त शिवसेनेच्या दोन्ही गटांचे कार्यक्रम होणार आहे.. ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन माटुंगा येथील बन्मुखानंद सभागृहात होत आहे तर शिंदे गटाचा वर्धापन दिन सोहळा वरळी येथील डोम एनएससीआय सभागृहात होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचे बिगुल दोन्ही शिवसेना नेते या मेळाव्यात फुंकण्याची शक्यता आहे शिवसेनेतल्या पक्ष फुटीनंतर हा दुसरा वर्धापन दिन आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना आपला वेगळा वर्धापन दिन साजरा करणार आहेत. शिंदेंचा वर्धापन दिन मुंबईत वरळी डोम इथं तर ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात होणार आहे. लोकसभा निवडणुकीचा लागलेला निकाल आणि तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर या वर्धापन दिनाला महत्त्व आहे.


एटीएसच्या प्रमुखपदी नवल बजाज यांची नियुक्ती

वरिष्ठ पोलीस अधिकारी नवल बजाज यांची राज्याच्या पोलीस दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.


नीट सुधारा!

शिक्षण आणि आरोग्य सुविधांचे जाळे देशाच्या कानाकोपर्‍यापर्यंत पोहोचवले, तरच विकास तळागाळापर्यंत झिरपेल, असे प्रतिपादन नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी केले होते; परंतु आजही या दोन्ही तरतुदींवर आवश्यक तेवढा खर्च केला जात नाही. एवढेच नव्हे, तर शिक्षण हळूहळू खासगी संस्थांच्या हवाली झाले आहे. कॉपी, पेपरफुटी तसेच भरती प्रक्रियेतील भ—ष्टाचारामुळे हे क्षेत्र बदनाम होत आहे. उत्तम …


Naval Bajaj is New ATS Chief: नवल बजाज महाराष्ट्राचे नवे ATS प्रमुख!

Naval Bajaj Appointed As Maharashtra New ATS Chief : मुंबई : वरिष्ठ पोलीस अधिकारी नवल बजाज (Naval Bajaj) यांची महाराष्ट्र पोलीस दहशतवाद विरोधी पथकाच्या (ATS) प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सदानंद दाते (Sadanand Date) यांची राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) महासंचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून महाराष्ट्र एटीएस प्रमुखाचं पद रिक्त होतं. त्यामुळे एटीएस प्रमुखपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होतं. अखेर नवल...


Google Chrome वापरताय सावधान! सरकारने दिला Alert, सांगितला मोठा धोका

नवी दिल्ली : इंटरनेटवर कोणत्याही स्वरूपाचं काम करायचं असेल तर बहुतांश युजर्स गुगलचा वापर करतात. त्यामुळे इंटरनेट म्हणजे गुगल असं समीकरण तयार झालं आहे. पण सायबर गुन्हेगारीचा वाढता धोका पाहता इंटरनेटवर काम करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. अनेक युजर्स रोज गुगल क्रोम ब्राउझरचा वापर करतात. सरकारने आता गुगल क्रोम ब्राउझर युजर्सना एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. काही कारणांमुळे युजर्सचा खासगी डाटा हॅकर्सच्या हाती लागू शकतो. त्यामुळे युजर्सने...


Aadhaar and Ration Card Link: रेशनकार्ड आधारसोबत लिंक केले का? त्वरा करा शेवटची तारीख आली जवळ

Aadhar card ration card link Maharashtra: पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केल्यावर आता रेशन कार्डसोबत आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य करण्यात आले आहे. तुम्ही आपल्या रेशनकार्ड सोबत आधारकार्ड लिंक केले नसेल तर तात्काळ करुन घ्या. जाणून घ्या हे काम तुम्ही कसे करू शकता.


Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 7:30 AM: 20 June 2024

Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 7:30 AM: 20 June 2024 खरीप हंगामासाठी १४ पिकांच्या हमीभावात केंद्र सरकारकडून वाढ, धानाचा हमीभाव आता २३०० रुपये तर कपाशीला ७ हजार १२१ रु. प्रति क्विंटल मिळणार पांढऱ्या शिधापत्रिकाधारकांनाही आता मिळणार महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मन योजनेचा लाभ, २२ लाख लाभार्थ्यांना लाभ, मंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला त्या भाजपसोबत कधीच जाणार नाही, शिवसेनेच्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरेंचा निर्धार उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्ट पाठिंबा, उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना चिमटा, तर पुन्हा येईन म्हणणारे आता जाऊ द्या ना घरी आता वाजवले की बारा म्हणतायत, फडणवीसांनाही खोचक टोला देशभक्त मुस्लिमांनी आम्हाला मतं दिली हे जाहीर सांगतो, सत्ताधाऱ्यांना उद्धव ठाकरेंचं उत्तर, तर तमाम हिंदूबांधव म्हणण्य़ाचं धाडस ठाकरेंनी केलं नाही, शिंदेंचा पलटवार


उत्तर भारतात उष्माघाताचे 178 बळी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : दिल्लीत उष्म्याचा तडाखा कायम असून, गेल्या 48 तासांत या महानगरीत उष्माघाताने 33 जणांचा मृत्यू झाला आहे. लगतच्या नोएडामध्ये 9 जणांना जीव गमवावा लागला. नोएडासह उत्तर प्रदेशात गेल्या 48 तासांत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. आठवडाभरात एकट्या उत्तर प्रदेशात 119 मृत्यू झाले असून, उत्तरेकडील अन्य राज्ये मिळून ही संख्या 178 वर …


जरांगेंचे समाधान होतच नसेल, तर आम्ही काय करणार: गिरीश महाजन

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिले होते. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने आजपर्यंत जे काही करायचे होते त्याबाबत सर्वकाही केले असल्याचे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. तसेच, मनोज जरांगे यांचे समाधान होतच नसेल, तर आता आम्ही काय करणार? असे देखील महाजन म्हणाले. पुण्यात विभागीय आयुक्त कार्यालयात …


तरीही मोदी जिंकले कसे?

मतदारांचे वर्तन हाच घटक निर्णायक असतो. त्यामुळेच २००४ मध्ये वाजपेयींचा पराभव झाला, पण मतदारांच्या वर्तनावर परिणाम करणारे दोन घटक मोदींच्या बाजूने होते.


Mumbai Sion Flyover: मुंबईकरांसाठी कामाची बातमी: शीव उड्डाणपूल बंद, कारण...

Mumbai Sion Flyover: आयआयटी आणि मध्य रेल्वेच्या संरचनात्मक तपासणी अहवालात शीव रेल्वे उड्डाणपूल धोकादायक ठरला आहे. अहवालातील शिफारशीनुसार पुलाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. सध्या खबरदारीचा उपाय म्हणून अवजड वाहतूक बंद करण्यात येईल.


mpsc ची तयारी: भूगोल (मुख्य परीक्षा)

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भूगोल विषयाच्या यूपीएससी सामान्य अध्ययन मुख्य परीक्षा तयारीच्या लेखमालिकेत मागील लेखात आपण भूगोल विषयाचे महत्त्व, त्याचे स्वरूप व प्रश्नसंख्या यांची चर्चा केली. आज आपण भूगोलाच्या अभ्यासक्रमासंदर्भात सविस्तर चर्चा करू.


IRCTC Ticket Booking : चुकूनही करू नका IRCTC ID वरून दुसऱ्यांसाठी Train Ticket बुक, अन्यथा जावे लागेल जेल

IRCTC Ticket Booking Rule: जर तुम्ही रेल्वेतून प्रवास करण्याआधी IRCTC वरून तिकीट बुक करत असाल तर रेल्वेचा हा नियम तुम्हाला माहिती असावा. IRCTC आयडीवरून दुसऱ्याचे तिकीट बुक केल्यास १० हजार रुपये दंड किंवा ३ वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो.


Underwater Drone: पुण्यात साकारणार पाण्याखालचा 'ड्रोन'; देशातील पहिला वहिला प्रकल्प, कसा होणार फायदा?

Underwater Drones : पुण्यातील ‘सागर डिफेन्स इंजिनिअरींग’ या कंपनीला दिली असून, संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या (डीआरडीओ) तंत्रज्ञान विकास निधी प्रकल्पाअंतर्गत हा प्रकल्प विकसित केला जाणार आहे.


ONGC Recruitment 2024 : लेखी परीक्षेशिवाय ओएनजीसीमध्ये निवड केली जाईल, कोण अर्ज करू शकते ते जाणून घ्या

ONGC Recruitment 2024 : ओएनजीसीमध्ये भरतीकरता रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. सरकारी नोकरी करायची असेल तर एवढी चांगली संधी तुमच्यापासून दूर जाऊ देऊ नका. येथे या भरतीशी संबंधित तपशील तपासून, तुम्ही या पदांसाठी अर्ज करण्याचा विचार करू शकता.


Rohit Pawar : भुजबळांसह अनेक नेते अधिवेशनानंतर पक्ष सोडतील : रोहित पवार

Rohit Pawar : भुजबळांसह अनेक नेते अधिवेशनानंतर पक्ष सोडतील : रोहित पवार दरम्यान भुजबळांसह अनेक आमदार आणि नेते अधिवशेनानंतर पक्ष सोडतील असा दावा रोहित पवारांनी केलाय. तर अजित पवारांना भाजपसोबत घेतलं तेव्हाच बोलायला हवं होतं.. असं सांगत बच्चू कडू यांनी निशाणा साधलाय.. गेले काही दिवसांपासून मंत्री छगन भुजबळ हे पक्ष सोडतील अशा चर्चा सुरू आहे, मात्र छगन भुजबळ यांनी या चर्चा फेटाळून लावल्या, पण याबाबत बोलत असताना भुजबळांनी "मी अजित पवारांसोबत नाही तर राष्ट्रवादीसोबत आहे" असं सूचक विधान केलं होतं... याबाबत आमदार रोहित पवार यांना विचारले असता त्यांनी छगन भुजबळ हे अनुभवी नेते असून त्यांना भविष्याचा अंदाज आला असावा केवळ छगन भुजबळच नाही तर अनेक नेते आणि आमदार पक्ष सोडतील असं सूचक विधान रोहित पवार यांनी केला आहे... सोबतच येऊ घातलेल्या अधिवेशनामध्ये निधी मिळवून घेतील आणि नंतर पक्षाला रामराम करतील असा टोला रोहित पवारांनी लगावलाय.